Submitted by -शाम on 10 February, 2014 - 23:15
एक गोष्ट .. शेवट विस्कटलेली
एक गाठ .. करकचून सुटलेली
एक पत्र .. सुगंध विटलेलं
एक काळीज .. गलबलून दाटलेलं
एक पुस्तक .. मोरपीस जपलेलं
एक वही .. पान अन पान ओलं
एक नदी .. वळसा घालून गेलेली
एक वाट .. गाव टाळून निघालेली
एक चंद्र .. कुंकू माळणारा
एक किनारा .. लाटा ढाळणारा
एक पाऊस .. डोळ्यातून निसटलेला
एक मोर .. पिसारा मिटलेला
एक झरा .. बेफिकीर कोसळणारा
एक कातळ .. आत आत ढासळणारा
एक पक्षी .. आभाळ जपणारा
एक पारधी .. पिसे विकणारा
एक दोर .. मध्येच तुटलेला
एक पतंग .. काट्यात रुतलेला
एक दिवा .. रात्र पेटवणारा
एक पारा .. काळ गोठवणारा
एक जखम .. भरूच नये अशी
एक आठवण .. स्मरुच नये अशी
एक भास .. आंबट गोड खारट
एक सत्य .. कडू तिखट तुरट
एक कविता .. रद्दीत गेलेली
एक सीता .. माती झालेली
अजूनही बरच लिहता येईल
आपल्या दोघांबद्दल!
______________________________शाम
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज ह ब ह री!! एक पक्षी .. आभाळ
ज ह ब ह री!!
एक पक्षी .. आभाळ जपणारा
एक पारधी .. पिसे विकणारा
>> व्वा!!
शेवट तर अफाट आवडला...
व्वा! शेवट आवडला, कविताही
व्वा! शेवट आवडला, कविताही मस्तच!
___/\____
___/\____
आहा!! शेवट>>> !!!!
आहा!!
शेवट>>> !!!!
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
जबरदस्त !! कडक सॅल्यूट यार
जबरदस्त !!
कडक सॅल्यूट यार ...... !!
शेवट तर कळस !!
धन्यवाद दोस्तान्नो!
धन्यवाद दोस्तान्नो!
हॅट्स ऑफ.
हॅट्स ऑफ.
मस्त
मस्त
१
१
२
२
३
३
४
४
५
५
६
६
७
७
८
८
९
९
१०
१०
आपणच आपल्याला!!!
छान कविता, छान आशय. सुरवातीला
छान कविता, छान आशय.
सुरवातीला यादी भासणारी आणि अखेरच्या ओळींतून आधीच्या ओळींना एकसंध अर्थ प्राप्त करून देणारी कविता.
शेवट अफलातून ! कवितेला गहिरा
शेवट अफलातून !
कवितेला गहिरा अर्थ प्राप्त करुन देणारा.
वा ! मस्त !!
व्वा फारच छान
व्वा फारच छान
सुंदर! प्रतिसाद संख्येवरून
सुंदर!
प्रतिसाद संख्येवरून लिखाणाचं कौतुक जोखत नाही आम्ही... तेरा नाम ही काफी है! स्पेशल वाचायला मिळणार ह्याची गॅरेंटी

बागेश्री +१ काल पासुन
बागेश्री +१

काल पासुन ब्राऊझर मध्ये उघडून ठेवलेली पण कामाच्या व्यापात वाचायची राहीली.
आण खास वेळ देऊन वाचयची इच्छा होती
+१
+१
+२
+२
+३
+३
+४
+४
+५
+५
Pages