अफलातून चटणी

Submitted by बेफ़िकीर on 11 January, 2014 - 01:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

(ही पूर्णपणे मी केलेली पाककृती आहे)

ओली हळद
मोठे आवळे
आल्याचा तुकडा
पुदिन्याची पाने (देठासकट)
तिखट मिरच्या (हल्ली तिखट नसलेल्याही मिळतात म्हणून असे लिहिले)
मीठ
अर्धे भांडी पाणी

क्रमवार पाककृती: 

ओल्या हळदीचे दोन मोठे तुकडे, आल्याचा एक तुकडा, चार ते पाच मोठे आवळे, पुदिन्याची मुठभर पाने, पाच सहा तिखट मिरच्या व दोन टीस्पून (धन्यवाद साती - दुरुस्तीसाठी) मीठ आणि अर्धे भांडे पाणी मिक्सरमध्ये घालून दोन मिनिटे मिक्सर चालवावा.

IMG_0272.JPGIMG_0274.JPG

अफलातून चटणी तयार!

अत्यंत गुणकारी अशी ही चटणी असून तितकीच स्वादिष्टही आहे.

वाढणी/प्रमाण: 
जेवणात चवीपुरती घ्या किंवा दिवसातून चार वेळा चिमूटभर खा!
अधिक टिपा: 

हेल्थ बेनिफिट्सः

ओळी हळद - पचनास सहाय्य, लिव्हर, अल्झायमर, कॅन्सर, कोलेस्टेरॉल, मधूमेह व संधिवातावर उत्तम, प्रतिकारशक्ती वाढवते, सूज घालवते, जखमा भरून आणते, वजन ताब्यात ठेवते.

आवळा - मधूमेहावर गुणकारी, हृदयासाठी चांगला, आतड्यासाठी उत्तम, मेंदूसाठी चांगला, भूक वाढवतो, कॅन्सर रोखतो, लोह पुरवतो, नेत्रांवर गुणकारी, रक्तातील प्रतिकारशक्ती वाढवतो, नर्व्हस सिस्टीमवर चांगला परिणाम, वजन ताब्यात ठेवतो, त्वचा उत्तम ठेवतो, गोरे बनवतो, सर्व त्वचा प्रकारांवर गुणकारी, केसांचे आरोग्य राखतो.

आले - श्वसन सुधारते, नॉशिया जातो, भूक सुधारते, पचन सुधारते, डोकेदुखी, संधिवात व कॅन्सर रोखते.

मिरच्या - ए व सी व्हिटॅमिन रिच, प्रतिकारशक्ती सुधारते, हृदयविकाराची शक्यता घटते, सूज घालवते, पचन सुधारते, हाडे ताकदवान बनवते, ब्लड शुगर लेव्हल्स मेन्टेन करते, वेदना शमवते, रक्त पातळ करते (जे हृदयविकार असलेल्यांसाठी उपयुक्त), प्रोस्टेट कॅन्सर रोखते, फॅट बर्न करते.

पुदिना - पचन सुधारतो, वेदना शमवतो, त्वचेला झळाळी देतो, ओरल इन्फेक्शन्स घालवतो, कफ व दम्यावर गुणकारी, प्रतिकारशक्ती वाढवतो, ताण घालवतो, कॅन्सरशी लढतो.

मीठ - प्रतिकारशक्ती सुधारते, अ‍ॅसिडिटीशी लढते, वजन घटवते, त्वचा सुधारते, दमा, मधूमेह, हृदय विकार व ओस्टिओपोरॉसिसवर गुणकारी असते, स्नायूंसाठी उत्तम, ताण व डिप्रेशन घालवते.

एकुण काय? अत्यंत चविष्ट आणि अत्यंत औषधी व गुणकारी अशी ही चटणी आहाराचा नियमीत भाग बनण्यास पात्र आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

माहितीचा स्रोत: 
स्वतःचीच कल्पनाशक्ती
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजीवाल्याला दोन दिवस आवळे आणि पुदिना आणायला सांगतोय पण......

काल दमच दिलाय, बघू आज आणले तर घरी आज ही चटणी बनणार!

अरे वा.... घरात ओली हळद आहेच.

लोणच्या व्यतिरीक्त अजून काय करूया.... या विचारातच चटणीची पाककृती दिसली मस्त...

हो वर्षूताई, तुम्ही टेस्टबद्दलपण लिहिलेय वरती पण मी फोटो बघितल्यावर पहिली कमेंट लिहिली आणि परत तुम्ही लिहिलेले नीट वाचले, पण बदल नाही केला कमेंटमध्ये आळसाने.

मस्त घरी आवळ्याचे झाड आहे. पुदीनाही उपलब्ध आहे. हळद बाजारात असेच या हंगामात. करायला हरकत नाही !

बेफि.
एकुण एक मुळ जिन्नस उत्तम आहेत. लहानपणी आवळ्याची चटणी आई करे. इथे आवळे मिळाले तर जरुर प्रयत्न करेन.

वा!

चटणीच्या रेसिपी पेक्षा त्यात वापरलेल्या वस्तूंचे बेनिफिट्स वाचून ज्ञानांत भर पडली। ओली हळदीचे लोणचे याची कृती कोणी देऊ शकतो का ?

त्यात वापरलेल्या वस्तूंचे बेनिफिट्स वाचून ज्ञानांत भर पडली
<<
हो. माझ्याही ज्ञानात भर पडली होती. Rofl
***
ओली हळदीचे लोणचे याची कृती कोणी देऊ शकतो का ?
<<
ओल्या हळदीचे काप किंवा जाड कीस करावा. यात हिरव्या मिरचीचे तुकडे मिक्स करतात, तिखटपणासाठी.
रेडीमेड मिरची लोणचे मसाला मिळतो. मी केप्रचा वापरतो.
तो मसाला हवा तितका हळद-मिरचीत मिक्स करावा. वर भरपूर लिंबाचा रस अन मीठ मिसळावे. (पाकिटावर प्रमाण आहे)
ही लोणची वर्षभर टिकवण्यासाठी नसतात. थोडी करून महिना-२ महिने फ्रीझमधे टीकलीत तर पुरे. तेव्हा तेल ऑप्शनल आहे. मी कोणत्याच लोणच्यात तेल शक्यतो घालत नाही. (एक्सेप्ट लसणाचे लोणचे.)

Pages