(ही पूर्णपणे मी केलेली पाककृती आहे)
ओली हळद
मोठे आवळे
आल्याचा तुकडा
पुदिन्याची पाने (देठासकट)
तिखट मिरच्या (हल्ली तिखट नसलेल्याही मिळतात म्हणून असे लिहिले)
मीठ
अर्धे भांडी पाणी
ओल्या हळदीचे दोन मोठे तुकडे, आल्याचा एक तुकडा, चार ते पाच मोठे आवळे, पुदिन्याची मुठभर पाने, पाच सहा तिखट मिरच्या व दोन टीस्पून (धन्यवाद साती - दुरुस्तीसाठी) मीठ आणि अर्धे भांडे पाणी मिक्सरमध्ये घालून दोन मिनिटे मिक्सर चालवावा.
अफलातून चटणी तयार!
अत्यंत गुणकारी अशी ही चटणी असून तितकीच स्वादिष्टही आहे.
हेल्थ बेनिफिट्सः
ओळी हळद - पचनास सहाय्य, लिव्हर, अल्झायमर, कॅन्सर, कोलेस्टेरॉल, मधूमेह व संधिवातावर उत्तम, प्रतिकारशक्ती वाढवते, सूज घालवते, जखमा भरून आणते, वजन ताब्यात ठेवते.
आवळा - मधूमेहावर गुणकारी, हृदयासाठी चांगला, आतड्यासाठी उत्तम, मेंदूसाठी चांगला, भूक वाढवतो, कॅन्सर रोखतो, लोह पुरवतो, नेत्रांवर गुणकारी, रक्तातील प्रतिकारशक्ती वाढवतो, नर्व्हस सिस्टीमवर चांगला परिणाम, वजन ताब्यात ठेवतो, त्वचा उत्तम ठेवतो, गोरे बनवतो, सर्व त्वचा प्रकारांवर गुणकारी, केसांचे आरोग्य राखतो.
आले - श्वसन सुधारते, नॉशिया जातो, भूक सुधारते, पचन सुधारते, डोकेदुखी, संधिवात व कॅन्सर रोखते.
मिरच्या - ए व सी व्हिटॅमिन रिच, प्रतिकारशक्ती सुधारते, हृदयविकाराची शक्यता घटते, सूज घालवते, पचन सुधारते, हाडे ताकदवान बनवते, ब्लड शुगर लेव्हल्स मेन्टेन करते, वेदना शमवते, रक्त पातळ करते (जे हृदयविकार असलेल्यांसाठी उपयुक्त), प्रोस्टेट कॅन्सर रोखते, फॅट बर्न करते.
पुदिना - पचन सुधारतो, वेदना शमवतो, त्वचेला झळाळी देतो, ओरल इन्फेक्शन्स घालवतो, कफ व दम्यावर गुणकारी, प्रतिकारशक्ती वाढवतो, ताण घालवतो, कॅन्सरशी लढतो.
मीठ - प्रतिकारशक्ती सुधारते, अॅसिडिटीशी लढते, वजन घटवते, त्वचा सुधारते, दमा, मधूमेह, हृदय विकार व ओस्टिओपोरॉसिसवर गुणकारी असते, स्नायूंसाठी उत्तम, ताण व डिप्रेशन घालवते.
एकुण काय? अत्यंत चविष्ट आणि अत्यंत औषधी व गुणकारी अशी ही चटणी आहाराचा नियमीत भाग बनण्यास पात्र आहे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
अरे वा .. मस्त आहे रेसिपी
अरे वा .. मस्त आहे रेसिपी ..
बेफिकीर, गुलमोहोराबरोबर आआपा ही पादाक्रांत करून सोडणार बहुतेक तुम्ही ..
हळद आणि आवळे दोन्ही मिळणार
हळद आणि आवळे दोन्ही मिळणार नाहीत
पण फोटो बघुन तोंडाला पाणी सुटलं..
गुळ घालावा का चवीला?
गुळ घालावा का चवीला?
हळदीची साले काढायचा आळस करू
हळदीची साले काढायचा आळस करू नका लोकहो...कडू होइल चटणी. अनुभवांती आलेले शहाणपण.
झक्कास!
झक्कास!
छानच आहे पण ही चटणी नेमकी
छानच आहे पण ही चटणी नेमकी कशाशी खायची ?
केली आज..खूप टेस्टीये मॅचिंग
केली आज..खूप टेस्टीये
मॅचिंग है क्या ओरिजिनल से??
मस्त आणि फोटोही सुंदर
मस्त
आणि फोटोही सुंदर 
फोटो, रेसिपी दोन्ही भारी आहे.
फोटो, रेसिपी दोन्ही भारी आहे. ओली हळद मिळाल्यास करून बघता येईल.
भारीये रेसिपी
भारीये रेसिपी
फोटो, रेसिपी दोन्ही मस्त
फोटो, रेसिपी दोन्ही मस्त तों.पा.सु. नक्की करणार. सोपी रेसिपी आहे. धन्यवाद बेफ़िकीर.

वर्षू नील, फोटो मस्त आहे.
अरे वा....... नक्की करुन
अरे वा....... नक्की करुन बघावी लागणार
वर्षुताई, मस्त फ्लुरोसंट
वर्षुताई, मस्त फ्लुरोसंट ग्रीन कलर आलाय.
मी ही आज सकाळी ओली हळद, आंबेहळद आणि आवळे आणलेत.
बेफिकीर रेसिपी टाकून गायब?
बेफिकीर रेसिपी टाकून गायब?
काल इंग्रोतून ओली हळद आणि
काल इंग्रोतून ओली हळद आणि फ्रोजन आवळे आणले. आज चटणी करणार.
एखाद्या वस्तूचे औषधी गुण जरा
एखाद्या वस्तूचे औषधी गुण जरा जास्तच गायिले, की त्याची चव संशयास्पद आहे असे वाटते
भारी!
भारी!
>>एखाद्या वस्तूचे औषधी गुण
>>एखाद्या वस्तूचे औषधी गुण जरा जास्तच गायिले, की त्याची चव संशयास्पद आहे असे वाटते
ते वाचायचे नाहीत. फक्त घटक, क्रमवार पाककृती आणि फोटो.
फोटो बिटो भारी की एकदम! बेफी
फोटो बिटो भारी की एकदम! बेफी ऐकत नाहीत!
नक्की करून बघणार.
माझी चटणी गंडली. आयुर्वेदिक
माझी चटणी गंडली. आयुर्वेदिक चटणी झाली. ही स्वतः केलेली दुसरी रेसिपी. पहिली अननस वाईन केली होती. ती महा गंडली होती. छे बुवा हे आपले काम / प्रांत नव्हे. बायकोने केलेल गपचूप खावे हे आपल बरं!
नक्की करून बघणार. << करून बघू
नक्की करून बघणार.

<<
करून बघू नका नुस्ती. कलर फ्लुरोसंट ग्रीन असा डिस्क्राईब्ड आहे वरती.
करून खा अन चव ल्ह्या इथे
दिवा बेफिंनाही दिलेला आहे.
दिवा बेफिंनाही दिलेला आहे.
हटके आणि हेल्दी वाटत आहे, पण
हटके आणि हेल्दी वाटत आहे, पण आवळे न मिळाल्याने अजून करायला मूहूर्त लागत नाहीये.
आवळे व ओली हळ्द हे काँबिनेशन कसं सुचलं ?
वा वर्षूताई, चटणीचा कलर एकदम
वा वर्षूताई, चटणीचा कलर एकदम सुरेख आहे. चवीला पण छान झाली असणार.
करुन पहाणार. मस्त रेसीपी आहे.
करुन पहाणार. मस्त रेसीपी आहे. बेफिकिर , एकदम हेल्थ कॉन्शस ? या वर्षीच रिझॉल्युशन का?
मवा फ्रोजन सेक्शन मध्ये दीपचे मिळतात बघं आवळे.
अगं बघितलं तिथेच, संपले आहेत
अगं बघितलं तिथेच, संपले आहेत जवळच्या दुकानातले, आता उद्या लांबच्या दुकानातून आणेन(च).
मामी, अन्जू हां , रिअली वेरी
मामी, अन्जू हां , रिअली वेरी प्रिटी फ्लुरोसंट ग्रीन कलर..
टेस्ट बद्दलही कमेंट दिलीये ना मी वरतीच... इट्स वेरी टेस्टी... नुसतीच खायलाही चांगली लागतीये..
झालंच तर.. फुल् राईस + दाल फ्राय बरोबर मस्त काँबी आहे...
मी आज सगळं सामान पटापट
मी आज सगळं सामान पटापट मिळालं, जिन्नस लक्षात होते म्हणून आणले आणि चटणी केली. प्रामाणिकपणे कबूल करायचं तर मला आवडली नाही. कोणतीच चव प्रॉमिनंटली जाणवत नाही. आवळे चारच घातले तरीही खूप आंबट वाटल्याने आंबेहळद वाढवली पण त्यानेही आंबटपणा वाढल्यासारखाच वाटला. घशात जळजळ आणि दातांवर अतिशय आंबटपणा असं काहीतरी जाणवत राहिलं.
हि चटणी केली नाही अजून पण
हि चटणी केली नाही अजून पण मध्ये आवळा candy केली होती . छान झाली .
हि बघा लिंक :
http://nishamadhulika.com/special/how-to-make-amla-candy.html
मस्त वाटत्येय रेसिपी. फोटो
मस्त वाटत्येय रेसिपी. फोटो भारीच.
माझी चटणी गंडली. आयुर्वेदिक चटणी झाली. >
Pages