बेसनाच्या मिरच्या!

Submitted by प्राजक्ता on 6 December, 2008 - 22:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पोपटि ढेब्या लांबुळक्या मिरच्या( इथल्या इंडियन ग्रोसरि स्टोअर मधे मिळतात).
बेसन पिठ
एका मोठ्या लिंबाचा रस
मिठ्,हिंग,साखर चविप्रमाणे
मोहनासाठि आणि शलो फ्राय करायला तेल.

क्रमवार पाककृती: 

मिरच्यांना चिर देवुन आतिल बिया काढुन साधारण बोट्भर तुकडे करावे.
बेसनात मुटका वळेल इतके मोहन आणि इतर साहित्य घालुन पाण्याने साधारण घट्ट भिजवावे.
मिरचित भरुन तेलावर शलो फ्राय करावे.
लिंबाचा रस एवजि दहि घातले तरि चालेल, दहि मात्र आंबट हवे.
image_28.jpgimage_29.jpg

अधिक टिपा: 

मोहन कमि झाले किंवा बेसन घट्ट भिजले तर मिरचि दड्स लागते.
चमचा भर भाजणीचे पिठ घातले तर अजुन चान्गली चव येते, बेसन कोरडे भाजुन घेतले मोहन चमचाभर पुरते.
दहि घातले तर मोहन कमि घातले तरि चालेल..

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त... अशा प्रकारच्या मिरच्या आमच्या शेजारच्या काकु नेहेमी करयच्या... त्या बहुतेक शेंगदाण्याचे कुट पण घालत होत्या... आता दिसल्या मिरच्या तर करेन एकदा...

प्राजक्ता ..मस्त एकदम.. तोन्डाला पाणी सुटलं.. Happy

प्राजक्ता, हीच कृती पण ब्याडगी किंवा संकेश्वरी मिरची वापरून होईल का?

अरे ! इथे लक्षच गेल नाहि... जानेवारित भारतवारि केलि त्यामुळे मायबोलिला संपर्क नव्हता.असो, बी हि पोपटि मिरचि म्हणजे बरिच जाड असते... ब्याडगि किंवा संकेश्वरि मिरचि ओलि असताना बरिच बारिक असेल .आत सारण कसे भरणार? किमान दिड इंच तरि जाड हवि मिरचि...
अल्पना, शेंगदाण्याचा कुट! ह्म्म्म ..कधि ट्राय केले नाहि पण, घातला तरि चालेल..

धन्स प्राजक्ता पण मी म्हणत होते त्या मिरच्या हालापिनोपेक्षा एखादं इंच लांब बाकी जाडी वगैरे तेवढीच. साधारण anaheim मिरच्यांच्या जवळ जाणार्‍या. स्वादाला पण माइल्ड टू मिडियम तिखट अश्या आहेत.

एक प्रमाणवाटी बेसनासाठी अर्धी वाटी तेल मोहन म्हणुन पुरे आहे का?>> मी वर लिहलय तस मुटका वळेल इतक हव पण कमि वापरल तरी चालेल.

ओह ओके! सा.गते मग बेसनात हळूहळु तेल घाल (चमच्या-चमच्याने) आणी कालव आता थोड मिश्रण हातात कि.न्वा मुठित घेवुन दाबुन बघायच (कोरडा तात्पुरता) गोळा झाला पाहिजे
१वाटीला ४ चमचे तेल पुरे होईल.

पाककृतींचा फोटो असल्याशिवाय आम्ही दाद देत नाही. क्षमस्व. Happy

2013-01-22-064
[मिर्च्या आणून ठेवल्या आहेत. पण बेसनाबरोबर साखर घालायची का यावर आमचा काथ्याकूट चालू आहे. पुढे आमची पाककृती गेलीच तर फोटो इथे डकवू.]

-दिलीप बिरुटे