इडली, हॉटेल आणि भामटा !

Submitted by चंपक on 4 January, 2014 - 05:57

गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!

ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!

हे सर्व सुरु झाले, ते माझ्या एका अमेरिका स्थित मित्राने त्यांच्या नासिक येथील एका प्रसिद्ध उद्योगपतीं यांचेशी माझी फोन वर ओळख करुन दिल्याने!! मी मे २०११ ला भारतात परतलो, अन व्यवसाय करायचे मनावर घेतले. म्हणुन मग, माझ्या मित्राने मला त्या बुजुर्ग उद्योगपतींची भेट घडवुन दिली.

एप्रिल २०१२ मध्ये मी त्यांना नासिक ला भेटलो. त्यांनी त्यांच्या पुणे येथील एका अन्न प्रक्रिया कंपनीत व्यवस्थापनाचे प्रश्न असल्याने मी त्यात लक्ष घालावे असे सांगितले. मी त्यात जास्त रस घेण्याचे कारण म्हणजे, त्या कंपनीत (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" भागीदार आहेत अन त्यांचा तरुन मुलगा विशाल ह्या कंपनीचे कामकाज पाहतो हे कळाले म्हणुन! ह्या "श्रीमान ईडलीवाले" नी आशियातील पहिले ईको-फ्रेंडली हॉटेल बनवले असे जगाला महिती आहेच!

मी मे२०१२ पासुन चिखली, पुणे येथील या कंपनीत बिनपगारी, सी. ई. ओ. म्हणुन काम सुरु केले! (जगातला मी पहिला सी. ई. ओ. असेल जो बिन-पगारी कामावर हजर झाला!) अर्थात, कंपनीचे उत्पादन ४० टन प्रती महिना वाढवले तर मला योग्य तो पगार सुरु केला जाणार होता. तसेच ह्याच कंपनीत ३०% हिस्सा खरेदी करुन रितसर भागीदार बनवले जाणार होते. तसा शब्द, नासिकचे उद्योगपती अन (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" ह्यांनी दिला होता.

ही कंपनी (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" कुटुंबिय अन नासिकचे उद्योजक यांचेतील "लिमिटेड कंपनी' आहे. हॉटेल व्यवसायाला लागणारे "ग्रेव्ही" अन "रेडीमिक्सेस" कंपनी तर्फे बनवले जात असत. पुणे, मुंबई अन गोवा येथे हे पदार्थ हॉटेल व्यावसायीकांना विकले जात असत.

मी मे २०१२ पासुन कंपनीच्या उत्पादन वाढ, विक्री मध्ये वाढ अन त्याच सोबत उत्पादन खर्चात कपात अशा तीन पातळ्यांवर काम सुरु केले. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई अन एक संचालक नासिक येथे असल्याने कंपनीचे चेक मिळणे अन 'पेटीकॅश' चा मेळ सांभाळणे अवघड असल्याने अनेकदा माझे पदरचे पैसे खर्चुन मी कंपनी चे काम चालु ठेवत असे. माझे पैसे मला १-२ महिन्याने परत मिळत असत. अश्याने माझे दोन्ही संचालक माझ्या कामावर खुष होते.

विक्री मध्ये वाढ करण्यासाठी मी संचालकांना महाराष्ट्रभर विक्रेत्यांचे जाळे उभारण्याचे सुचवले. विक्रेत्यांची आर्थिक ताकत कळावी म्हणुन त्यांचेकडुन तीन लाखां पर्यंत अनामत रक्कम घ्यावी असे मीच सुचवले.(कुठुन दुर्बुद्धी सुचली!) त्यावर विशाल नी मला विक्रेत्यांशी संपर्क करायला अनुमती दिली. मी नगर, मुंबई, जळगाव, औरंगाबाद, नासिक आणि पुणे येथे काही लोकांशी चर्चा केली. पैकी नगर आणि पुणे येथील दोन फर्म विक्रेते बनण्यास तयार झाले. त्यानुसार करार करण्यात आले. त्या दोन्ही फर्म्सनी प्रत्येकी रु. तीन लाख असे एकुन रु. सहा लाख हे कंपनीच्या एस. बी. आय. मुंबई येथील बॅन्क खात्यात जमा केले. त्यानुसार, अहमदनगर तसेच पुणे येथील फर्म्सना तसे लेखी पत्र माझ्या नावे देण्यात आली. तेंव्हा मला शंका आली, कि माझा अन कंपनी चा लेखी व्यवहार नसल्याने ती पत्रे "श्रीमान इडलीवाले"च्या नावाने द्यायला हवीत. पण "श्रीमान इडलीवाले" ने ती पत्रे माझ्याच सहीने द्यावीत असे आग्रहाने सांगितले.

करार झाल्या नंतर पुणे अन नगर येथे सेल्स टीम ने जाऊन जुजबी मार्केटींग पन केले. परंतु स्पर्धेत टिकण्या साठी पुरेसे मार्केटींग करण्यासाठी "श्रीमान इडलीवाले"तयार झाले नाहीत. (त्यांनी जमलेल्या सहा लाख रुपयांत बिग बजार ह्या रिटेल चेन ची एक ऑर्डर पुर्ण केली अन नफा कमावला). ज्या तडफेने "श्रीमान इडलीवाले" ह्यांनी नगर अन पुणे येथे मार्केटींग साठी पैसे अन वेळ द्यायला हवा तो दिला नाही. मला स्वतःला कुठलाही खर्च करायला परवानगी दिली नाही. माझ्या सहीने पैसे जमा केले पन खर्च करताना "श्रीमान इडलीवाले" चीच सही हवी असे !!!

कालांतराने, मला कंपनीची पुर्वीची अनेक कर्जे नव्याने लक्षात यायला लागली. नव्याने केलेल्या विक्रेत्यांना माल देण्यासाठी नवीन माल तयार करणे गरजेचे होते. पण "श्रीमान इडलीवाले" यांनी ते पैसे इतरत्र वापरल्याने कंपनी बंद राहु लागली. तीन-तीन महिने कर्मचार्यांना पगार नसे. वीज बील अन पाणी बील थकलेले होते. कच्चा मालाचे पैसे मिळावेत म्हणुन अनेक सप्लायर दररोज प्रत्यक्ष येऊन अन फोन करुन त्रास देऊ लागले. काही स्थानिक सप्लायर्सनी कंपनी अन कर्माचार्यांना त्रास दिला जाईल असेही सुचवुन पाहिले.

अश्या अनेक तक्रारी नंतर, नोव्हेंबर २०१२ ला कंपनीचे उत्पादन पैसे नसल्याने बंद पडले. तेंव्हा काही गोष्टी नव्याने कळल्या.

१) "श्रीमान इडलीवाले" ह्यांच्या पुणे येथील या कंपनी मध्ये तयार केलेल्या उत्पादनांची विक्री ही प्रत्यक्षात "श्रीमान इडलीवाले हॉस्पिटॅलिटी अॅन्ड कन्सलटन्सी प्रा लि" ह्या बाप्-बेटे संचालक असलेल्या वेगळ्याच कंपनीच्या नावाने करत असत. त्यामुळे पुणे येथील कंपनीला तिच्या उत्पादनांचे पैसेच मिळत नसत. ते सर्व पैसे "श्रीमान इडलीवाले" अपहार करुन स्वतःच्या इतर कंपनीसाठी वापरत असत.

२) "श्रीमान इडलीवाले हॉस्पिटॅलिटी अॅन्ड कन्सलटन्सी प्रा लि" ने पुणे येथील कंपनीची उत्पादणे वेगळ्या नावाने तळोजा येथील एका कंपनीतुन बनवुन घेणे सुरु केले होते. पुणे येथील ही भागीदारीतील कंपनी त्यांना बंद पाडायची होती.

३) "श्रीमान इडलीवाले" बाल्-बेटे अनेक कागदी खेळ करुन कंपन्यांचे संचालक अन सह्याचे अधिकार बदलत होते. अन त्यामुळे त्यांच्या ही फसवा-फसवी कायद्याच्या आधारे सिद्ध करणे कठीण झाले होते.

नोव्हेंबर/ डिसेंबर २०१२ ला कंपनी बंद झाली. तोवर माझे कंपनीत खर्च केलेले रु.१.९२ लाख आणि दोन विक्रेत्यांचे रु. सहा लाख, असे एकुन रु.सात लाख ९२ हजार ही रक्कम "श्रीमान इडलीवाले" नी मला त्वरीत परत द्यावी असे मी त्यांना कळवले. त्यांनी अनेक उडवा उडवीची उतार दिली. फोन न घेणे, एस एम एस ला उत्तर न देणे, असे प्रकार केले. मी खंडणी मागतोय, अशी पोलीसांत तक्रार करील, अशी धमकीही त्यांनी ई-मेल पाठवुन मला दिली.

तुझे पैसे देईल पण वितरकांचे पैसे विसरुन जा असे सुनावले. आज एक वर्ष उलटुन एक रुपयाचाही उत्पादित माल विक्रेत्यांना न देउन, त्यांचे सहा लाख रुपये बिन-व्याजी वापरायला "श्रीमान इडलीवाले" बाप्-बेट्यांना थोडीही लाज वाटु नये ?? त्या नव्याने उद्योगात आलेल्यांचे पैसे आपण फुकट वापरतोय याची शरम वाटु नये ??

माझ्या अन सोबतच्या तरुणांच्या कुटुंबातील अनेक अडचणीच्या प्रसंगी विशाल इडलीवाले ला मदतीचे साकडे घातले, परंतु निगरगट्ट इडलीवाले महाशय अजिबात बधले नाहीत.

आपल्या पुस्तकांनी महाराष्ट्रातील तरुणांना उदयोजक बना असा सल्ला देणारे, अन आत्महत्येच्या दारातुन परत फिरुन एवढा मोठा उद्योग उभारल्याच्या गप्पा मारणारे "श्रीमान इडलीवाले" प्रत्यक्षात मात्र धादांत खोटारडे अन फसवणुकी चे धंदे करतात हे पाहुन माझ्या सारख्या तरुणाला अत्यंत क्लेश झाले.

जेंव्हा माझ्या घरी बाळ जन्माला यायचे होते, तेंव्हा मी पैशांसाठी खुप विनवनी केली, परंतु "श्रीमान इडलीवाले" बाप-लेक मात्र बधले नाहीत. त्याची शिक्षा म्हणुनच "श्रीमान इडलीवाले" च्या बेट्याच्या बायकोचा गर्भपात झाला...काव्यागत अन नैसर्गिक न्याय होऊनही ह्या बाप-लेकांची बुद्धी मात्र ठिकाण्यावर येत नाही, हे दुर्दैवच!

"श्रीमान इडलीवाले" नी स्वतःची आत्महत्या टाळली, मात्र मी अन माझ्या सारखे नव्याने व्यवसाय करु इच्छिणारे अजुन तीन तरुणांना मात्र आत्महत्येच्या दारात ढकलुन दिले!

स्वतः ऑडी ,मर्सीडिज अन तत्सम लक्झरी गाड्या उडवायच्या, फोर अन फाईव स्टार हॉटेलांत मजा मारायची, पार्ट्या करायच्या, बायका-मुलांना परदेशात फिरायला न्यायचे अन, महाराष्ट्रातील तरुण मुलांना व्यावसायीकतेची स्वप्ने दाखवुन लुटायचे हा नवाच "धंदा" "श्रीमान इडलीवाले"अन त्याच्या मुलांनी सुरु केलाय असे दिसते. मराठी मुलांना फसवणार्या या "ठकसेना" ला शिक्षा झालीच पाहिजे!

आमच्या सारख्या किती तरुणांना "श्रीमान इडलीवाले" ने फसवले ह्याचा शोध गृह खात्याने घेतला पाहिजे, ह्याची चौकशी झाली पाहिजे, आणि त्या सर्वांचे पैसे परत केले गेले पाहिजेत, ही नम्र विनंती!

"श्रीमान इडलीवाले" इतके मोठे आहेत, कि त्यांचे नाव ऐकुन पोलीस अन प्रसार माध्यमेही ह्या हत्येची दखल घेत नाहीत. पोलीसांनी एक कागदावर तक्रार तर लिहुन घेतली, पण पुढे काहीही नाही!

सदर तक्रार गेले एक वर्षे मी स्वतः मा. मुख्यमंत्री, मा. गृह्मंत्री, मा. पोलीस महासंचालक, मा. पोलीस आयुक्त, पुणे, मा. पोलिस निरिक्षक-निगडी, पुणे इत्यादी "अकार्यक्षम" कार्यालयात दिलेली आहे. पण आजवर त्यावर काहीही दखल घेउन कारवाही झाली नाही!

आता न्यायलयात जाउन आपलेच पैसे परत मिळण्यासाठी पुढील २० वर्षे लढाईची मानसिक तयारी करतो आहे!

जै हिंद! जै म्हाराष्ट्र !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंपक, प्रॅक्टीकली एक सल्ल्ला देउ का,
तुम्ही जितक्या पैश्यांसाठी २० वर्ष लढायच म्हणताय , त्यापेक्षा तिच एनर्जी अन वेळ नव्यानी उद्योग धंदा सुरू करण्यात घालवा. गाठीशी असलेल्या पैश्याच ही एक बळ असत. पोट भरल की मगच लढाईला सुरवात करा. समोरचा पूर्ण चुकिच अन अन्याय्य वागला आहे , त्याला तसच सोडून द्यायच नाही हे कबूल पण ही लढाई तुमच्या असण्या पेक्षा मोठी नाही.
तसच आत्ता चा वेळ तुमच्या नविन उद्योगा बरोबरच , ह्या माहाभागानी अजून कोणा कोणाला फसवलय ह्याची माहीती जमवण्यासाठी वापरा . लहान लहान बर्‍याच जणांचा ग्रुप एकत्र जमला तर त्याना धडा शिकवण सोप होइल.

चंपक वाचुन वाईट वाटलं आणि रागही आल्..चिनुक्स ने लिहिलेल वाचुन तर डोक्यातच गेल

मी काय करणार>>>

तर मी ह्या माणसाच्या हॉटेल मध्ये खाण जाण बंद करणार..

वैशाली , तसही ते फार जाण्या लायक नसतच.
पुस्तकाबद्दल वाचून मात्र सखेद आश्चर्य वाटल. माझ्या कडे त्यांच्या सहीची प्रत आहे. टूरिझम आणि एन्टर्टेन्मेंट इंडस्टीबद्दल फार मस्त भाषण दिल होत त्यांनी, मात्र सहभागाची वेळ आली तेव्हा पसार झाले. ( आणि आम्ही वाचलो Happy )

Angry Sad
पेपर मध्ये यायलाच हवं हे Sad
नीट, सगळे पुरावे असतील (ज्याने हे सगळं तुमच्यावर उलटणार नाही) तर मिडिया मध्ये जाता येतय का बघा.
मिडियाच एक सणसनीत कानाखाली वाजवू शकतो असल्यांच्या.
पेपरवाले, न्युज चॅनलवाले यांची साथ मिळाली तर या माणसाची आणखी प्रकरण उघड होतील आणी मग न्यान मिळणं फारसं कठीण नसेल!
मनःस्तापची मानसिक तयारी केलीच आहे तर आता हेही करुन पाहिला हरकत नाही.
नीच माणुस कुठला Angry !

यात बरीच प्रश्न दिसतात.
तुम्ही सीईओ पदी बिनपगारी का केली, हिस्सेदार व्हायचे असतान पुर्ण खात्री का केली नाही , केले ते सारे मित्राचे सांगण्यावर. फसगत झाल्याचे दु:ख आहेच. !

.

अश्विनीमामी,

मी हेच सगळे माझ्या प्रतिसादातही विचारले. त्यावर अजुन तरी काही उत्तर नाही. चंपक ह्यांच्याबद्दल सहानुभुती वाटत आहे व ती वाटणे हा एक भाग आहे. पण हे सगळे मुळात झालेच कसे, होत असताना एकदाही शंका कशी नाही आली वगैरे तितकेच महत्वाचे आहे.

आजकालच्या जगात लीगली सर्व काही ओके झाल्याशिवाय पानही हालत नाही, येथे तर सी ई ओ ची नेमणुक 'बातोबातोंमे' झालेली आहे.

मला चंपक यांच्याबद्दल सहानुभूती आहे पण त्याचवेळी इतरांना जे प्रश्न पडलेत ते मलाही पडले.

चंपक यांनी त्यांच्या इतर अनुभवांविषयी त्यांच्या रंगिबेरंगीवर लिहिलेय आणि वर लिहिलेय ते वाचुन एक विचार मनात आला. हल्लीच्या जगात विश्वासपात्र माणसे राहिली नाहीत, कोणी कोणावर विश्वास ठेवतच नाही याबद्दल आपण नेहमी खंत व्यक्त करत राहतो आणि त्याचवेळी काही लोक जे आजही समोरचा खरेच बोलतोय, आपल्यासारखाच आहे यावर विश्वास ठेवतात त्यांच्याबद्दल आश्चर्यही व्यक्त करतो. ह्या दोन्ही भावना आपण प्रसंगानुरुप व्यक्त करत असतो. पण हे कुठेतरी परस्पर विरोधी आहे असे नाही वाटत?

विश्वास ठेवणे वेगळे. पण नोकरी स्वीकारताना टर्म्स कंडिशन्स तर पेपरवर पाहिजेत कि नाही? सीइओ हे फार क्रिटिकल पोस्ट आहे. बोर्ड ला रिपोर्ट करते.

लोकहो,

बायकोला ही गोष्ट सांगितली. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. इडलीवाल्यांचं नाव ऐकून नव्हे, तर किरकोळ रक्कम ऐकून! सगळ्यांना कोटीच्याकोटी रकमांचे घोटाळे ऐकायची सवय आहे. चंपक यांच्यासाठी ही रक्कम मोठी आहे, पण इडलीवाल्यांच्या दृष्टीने आठेक लाख म्हणजे किस झाडकी पत्ती आहे.

प्रश्न असा पडतो की इडलीवाल्यांना इतक्या कमी रकमेसाठी असा मार्ग का अनुसरावासा वाटला? थोडा विचार केल्यावर वाटलं की लोकांना त्रास देण्यात त्यांना गंमत वाटत असावी. इंग्रजीत ज्याला joy of inflicting pain upon others म्हणतात तसं काहीसं. Angry वर वैशाली भटांच्या पुस्तकाचा उल्लेख आला आहे. तेही तशाच वळणावर जाणारं प्रकरण दिसतंय.

आ.न.,
-गा.पै.

लेखाचे शिर्षक वाचले आणि पुस्तकाचे शिर्षक आठवले. पुस्तक वाचल्यावर त्या माणसाबद्दल निर्माण झालेला आदर वाक्यागणीत कमी झाला.

मागे एक्दा असेच यांच्या हॉटेलमधे नावाजलेले म्हणुन ईडली , उत्तपा खाल्ला. पण चव अजिबात आवडली नाही. मनात आले आपली आवड वेगळि आहे म्हणुन आवडले नसेल. एव्हडे कष्ट आहेत या माणसाचे म्हणजे असेल लोकांना आवडत. [ तसे माझ्या बाबतीत सांगायचे म्हणजे जेव्हडे महागडे हॉटेल तेव्हडा तिथला चहा मला नावडता.. असा माझा (गैर) समज आहे.. सो हेही तसेच असेल अशी मी माझीच समजुत काढली.

"वर वैशाली भटांच्या पुस्तकाचा उल्लेख आला आहे. तेही तशाच वळणावर जाणारं प्रकरण दिसतंय. >> सध्या तरी ते "पान हरवलेलं दिसतंय...." प्रकरण झालेलं दिसतय Uhoh

>> प्रश्न असा पडतो की इडलीवाल्यांना इतक्या कमी रकमेसाठी असा मार्ग का अनुसरावासा वाटला? थोडा विचार केल्यावर वाटलं की लोकांना त्रास देण्यात त्यांना गंमत वाटत असावी.
गा.पै. हे अतिशय कॉमन आहे. जितके मोठे लोक तितका पैसे द्यायला जास्त carelessness.
सेविंग छोटं असो कि मोठं ते ते तुम्हाला सेव करत जातं. तसंच निर्लज्ज माणसं घोटाळे, फसवाफसवी यात भेदभाव करत नाहीत. कामवाल्या, भाजीवाल्यापासून करोडपती पर्यंत सगळ्यांशी ते सारख्च वागतात.
चंपक, बाकीच्यांना पडलेले प्रश्न मलाही पडले तरी पण तुम्ही बिनपगारी काम केलं हे काही मला फार impossible वाटत नाही. अशा लोकांचा charisma असा असतो कि लोक पटकन विश्वास ठेवतात. शिवाय , अशा पोस्टस वर नंतर मिळणारा शेयर आणि percentage हे भरपूर असल्यामुळं तसं होत असेल.
Still I will suggest to get rid of it and turn to something more productive instead of legal teaching of lesson. You can publicize this case wherever you go but don't wait for your personal legal justice. It will be frustrating and painful and for a very long time. Take it as an expensive course in how to deal in business.

स्वाती२ यांनी लिहिल्याप्रमाणे लेख वाचताना मला पण वाटले की बरेच रेड फ्लॅग्स आधीच दिसत होते. अर्थात लेख वाचताना एक त्रयस्थ म्हणून हे सहजपणे नजरेत येत असेल हे ही शक्य आहे.

चंपक, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!! झाल्या प्रकारातून धडा घेऊन इथून पुढे सावध राहाशील आणि पुन्हा असे लेख लिहायची वेळ तुझ्यावर येणार नाही यासाठी पण शुभेच्छा.

हे पुस्तक माझ्याकडून मुळीच वाचल्या गेले नाही. लोकांना साहित्याचा अर्थबिर्थ कळत नाही आणि कशालाही दर्जा देतात. धिक्कार आहे अशा वाचकांचा. उद्योजकाची व्याख्या देखील लोकांना माहिती नसते आणि विठठल कामत ह्यांना उद्योजक म्हणून संबोधतात. इडली, वडापाव वैगेरे चवदार बनवणारे कित्येक पाहिले आहेत. पण इतका गवगवा फक्त ह्याच माणसाचा करण्यात आलेला आहे. पुस्तकातून वाचकांपर्यंत इडलीची चव जणून पोचली असेल Sad

चंपक, चुक निव्वळ तुमची आहे. इतके शिकले सवरलेले असून असा व्यवसाय निवडला. पदरचे पैसे खर्च केले. जपूण वावरला नाहीत. काय हे? परदेशात काम करुन स्वानुभवच हवे होते का ह्याबाबतीत?

असो.. मी हा लेख माझ्या फेबुवर शेअर केला आहे. इतरांन्नीही करावा.

एक किस्सा,

हे इडलीवाले एकदा नाटक पाहताना पुढच्या रांगेतच होते म्हणून नवऱ्याला (तेव्हा लग्न झाले नाही होते) सांगितले जरा autograph घेवून येते तर माझा नवरा जामच वैतागला आणि मला सांगितले काही नको. मला तेव्हा कळलेच नाही का ते ??
नंतर नवऱ्याने मला सांगितले इडलीवालच्या मुलगा फार बदमाश आहे आणि त्याला हा माणूस बिलकुल आवडत नाही.

नवऱ्याला तेव्हा नीट मला समजावता आले नाही कसे ते आणि तो जास्त काही वाईट वाक्य बोलला नाही.
मी TV वर एक मुलाखत पहिली होती आणि भारावून गेले होते , मला काही पटेनाच कि असे कसे. मी विषय सोडून दिला, पण हे खरे नाही असेच वाटत होते.

आत्ता हे सारे प्रकरण वाचून लक्षात येत आहे कि अगदी ३-४ वर्ष आधीच माझा नवरा जे सांगत होते ते बरोबर होते.

चंपक तुमच्या लढाई करता शुभेच्छा ! पण असे बदमाश, बदनाम लोकांचे काहीच गोष्टी तुम्हाला कानावर पण आल्या नाहीत.
खरच अजून हिम्मत करा आणि media मध्ये जा पण आधी स्वतःला आणि घरच्यांना कणखर करा.

झालं ते वाईट झालं, त्यामुळे तुला आणि तुझ्या कुटुंबियांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं हे दुर्दैवी खरं, पण आधीच दिसलेल्या रेड फ्लॅग्जबद्दल लिहिलेल्यांशी मी सहमत आहे.
मागेही मायबोलीवरच्या काही मित्रमैत्रिणींनी फसवणूक केल्याबद्दल तू लिहिलं होतंस ना? You need to wise up, चंपक.
तसंच ते गर्भपात इ. लिहिलेलं मलाही आवडलं नाही.

तुझ्यामागच्या अडचणी लवकर संपोत ही शुभेच्छा.
इडलीवाल्यांनाही त्यांच्या कर्माचं फळ भोगायला लागो.

चंपकराव, आपले पैसे अडकल्यावर भले समोरचा माणुस मोठा कि छोटा मिळवायला त्रास होतोच. समोरचा आपल्यापेक्षा लहान असेल तर सदान्कदा रडत असतो म्हणुन काही करता येत नाही आणि मोठा असेल तर तो आपल्याला रडवत असतो. तोच काय तो फरक.

बाकी लगे रहो, सगळ्यासाठी शुभेच्छा.

चंपक
वाचून वाईट वाटले. मी इडलीवाल्यांसंदर्भात असे काहीतरी आधी ऐकले होते. नंतर त्यांची टिव्हीवर गोड्गोड मुलाखत पाहिल्यावर राग आला होता. आमचेही इडलीवाले हॉटेलमधील अनुभव वाईट आहेत, अर्थात त्याची आणि तुमच्यावरील प्रसंगाची बरोबरी होऊ शकत नाही.
ह्या प्रसंगातून धडा घेऊन पुढे जा, असे आम्ही सांगणे फार सोपे आहे. असा प्रसंग घडल्यावर जोपर्यंत त्याला न्याय्य क्लोजर मिळत नाही तोपर्यंत फार मानसिक त्रास होतो ह्याची कल्पना आहे. (मला हे नीट मांडता आलेले नाही :अओ:) तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

अवांतर :

लोकहो,

>> पुणे येथील ही भागीदारीतील कंपनी त्यांना बंद पाडायची होती.

लेखातले हे वाक्य कळीचा मुद्दा वाटतंय. कंपनी बुडीतखाती दाखवून पैसा हाडपायचा धंदा जोरात चालत असावा. मला एक माणूस माहीतीये. त्याने कंपनी स्थापून IPO मार्गे लोकांचा पैसा गोळा केला. चक्क कंपनी बुडवली आणि पैसा ढापला. त्यातून स्थावरं (रियाल इस्टेटी) खरीदल्या आणि त्या भाड्याने लावून फुकट ऐष करतोय. लघुउद्योजक म्हणून स्वत:ची ओळख सांगतो. दाखवण्यापुरती काही युनिटं आहेत.

आ.न.,
-गा.पै.

तुमची फसवणूक झाली आहे असे तुमची बाजू ऐकून वाटते पण हे असे एका पब्लिक फोरम वर लिहिणे थोडे risky वाटते! म्हणजे संबंधीत व्यक्ती कोण हे कळायला वेळ लागत नाहीये आणि तुम्ही देखील anonymous नाही. अशावेळी तुमच्यावर ती व्यक्ती अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू शकते. इथल्या इतर सदस्यांनी जर ही लिंक शेअर केली असेल तर त्या व्यक्तीपर्यंत हा लेख पोहोचायला कितीसा वेळ लागेल? कही लेने के देने ना पड जाए! (I hope तुम्ही ह्या धाग्यावर आलेल्या प्रतिक्रिया वाचत आहात!)

जिज्ञासा > +१

"आता न्यायलयात जाउन आपलेच पैसे परत मिळण्यासाठी पुढील २० वर्षे लढाईची मानसिक तयारी करतो आहे! " >> जर न्यायालयात जाणारच असाल तर, हा लेख पब्लिक फोरमवरुन कढुन टाका, अथवा वेगळ्या प्रकारे लिहुन चर्चा करा. आजकाल काहीच वेळ लागत नाही बातमी पसरायला, उगाच तुमची बाजु कमकुवत करुन घेउ नका.
काही प्रतिक्रियेत थेट नावाचा उल्लेख आढळतोय.

अशावेळी तुमच्यावर ती व्यक्ती अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू शकते.
------ जिज्ञासा यान्नी व्यक्त केलेल्या मताशी सहमत. कागदोपत्री पुरावे महत्वाचे आहे. त्यान्नी खुप केले पण काहीच कागदी पुरावे मागे ठेवले नाही. तुम्ही काहीच चुकीचे केले नसेल पण ते अब्रुनुकसानी बद्दल तुम्हाला हकनाक त्रास देऊ शकतात.

तुमच्याकडे खुप मोठे कार्य करण्याचे पोटेन्शियल आहे, तुम्हाला या प्रकरणातुन बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा...

Pages