इडली, हॉटेल आणि भामटा !

Submitted by चंपक on 4 January, 2014 - 05:57

गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!

ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!

हे सर्व सुरु झाले, ते माझ्या एका अमेरिका स्थित मित्राने त्यांच्या नासिक येथील एका प्रसिद्ध उद्योगपतीं यांचेशी माझी फोन वर ओळख करुन दिल्याने!! मी मे २०११ ला भारतात परतलो, अन व्यवसाय करायचे मनावर घेतले. म्हणुन मग, माझ्या मित्राने मला त्या बुजुर्ग उद्योगपतींची भेट घडवुन दिली.

एप्रिल २०१२ मध्ये मी त्यांना नासिक ला भेटलो. त्यांनी त्यांच्या पुणे येथील एका अन्न प्रक्रिया कंपनीत व्यवस्थापनाचे प्रश्न असल्याने मी त्यात लक्ष घालावे असे सांगितले. मी त्यात जास्त रस घेण्याचे कारण म्हणजे, त्या कंपनीत (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" भागीदार आहेत अन त्यांचा तरुन मुलगा विशाल ह्या कंपनीचे कामकाज पाहतो हे कळाले म्हणुन! ह्या "श्रीमान ईडलीवाले" नी आशियातील पहिले ईको-फ्रेंडली हॉटेल बनवले असे जगाला महिती आहेच!

मी मे२०१२ पासुन चिखली, पुणे येथील या कंपनीत बिनपगारी, सी. ई. ओ. म्हणुन काम सुरु केले! (जगातला मी पहिला सी. ई. ओ. असेल जो बिन-पगारी कामावर हजर झाला!) अर्थात, कंपनीचे उत्पादन ४० टन प्रती महिना वाढवले तर मला योग्य तो पगार सुरु केला जाणार होता. तसेच ह्याच कंपनीत ३०% हिस्सा खरेदी करुन रितसर भागीदार बनवले जाणार होते. तसा शब्द, नासिकचे उद्योगपती अन (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" ह्यांनी दिला होता.

ही कंपनी (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" कुटुंबिय अन नासिकचे उद्योजक यांचेतील "लिमिटेड कंपनी' आहे. हॉटेल व्यवसायाला लागणारे "ग्रेव्ही" अन "रेडीमिक्सेस" कंपनी तर्फे बनवले जात असत. पुणे, मुंबई अन गोवा येथे हे पदार्थ हॉटेल व्यावसायीकांना विकले जात असत.

मी मे २०१२ पासुन कंपनीच्या उत्पादन वाढ, विक्री मध्ये वाढ अन त्याच सोबत उत्पादन खर्चात कपात अशा तीन पातळ्यांवर काम सुरु केले. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई अन एक संचालक नासिक येथे असल्याने कंपनीचे चेक मिळणे अन 'पेटीकॅश' चा मेळ सांभाळणे अवघड असल्याने अनेकदा माझे पदरचे पैसे खर्चुन मी कंपनी चे काम चालु ठेवत असे. माझे पैसे मला १-२ महिन्याने परत मिळत असत. अश्याने माझे दोन्ही संचालक माझ्या कामावर खुष होते.

विक्री मध्ये वाढ करण्यासाठी मी संचालकांना महाराष्ट्रभर विक्रेत्यांचे जाळे उभारण्याचे सुचवले. विक्रेत्यांची आर्थिक ताकत कळावी म्हणुन त्यांचेकडुन तीन लाखां पर्यंत अनामत रक्कम घ्यावी असे मीच सुचवले.(कुठुन दुर्बुद्धी सुचली!) त्यावर विशाल नी मला विक्रेत्यांशी संपर्क करायला अनुमती दिली. मी नगर, मुंबई, जळगाव, औरंगाबाद, नासिक आणि पुणे येथे काही लोकांशी चर्चा केली. पैकी नगर आणि पुणे येथील दोन फर्म विक्रेते बनण्यास तयार झाले. त्यानुसार करार करण्यात आले. त्या दोन्ही फर्म्सनी प्रत्येकी रु. तीन लाख असे एकुन रु. सहा लाख हे कंपनीच्या एस. बी. आय. मुंबई येथील बॅन्क खात्यात जमा केले. त्यानुसार, अहमदनगर तसेच पुणे येथील फर्म्सना तसे लेखी पत्र माझ्या नावे देण्यात आली. तेंव्हा मला शंका आली, कि माझा अन कंपनी चा लेखी व्यवहार नसल्याने ती पत्रे "श्रीमान इडलीवाले"च्या नावाने द्यायला हवीत. पण "श्रीमान इडलीवाले" ने ती पत्रे माझ्याच सहीने द्यावीत असे आग्रहाने सांगितले.

करार झाल्या नंतर पुणे अन नगर येथे सेल्स टीम ने जाऊन जुजबी मार्केटींग पन केले. परंतु स्पर्धेत टिकण्या साठी पुरेसे मार्केटींग करण्यासाठी "श्रीमान इडलीवाले"तयार झाले नाहीत. (त्यांनी जमलेल्या सहा लाख रुपयांत बिग बजार ह्या रिटेल चेन ची एक ऑर्डर पुर्ण केली अन नफा कमावला). ज्या तडफेने "श्रीमान इडलीवाले" ह्यांनी नगर अन पुणे येथे मार्केटींग साठी पैसे अन वेळ द्यायला हवा तो दिला नाही. मला स्वतःला कुठलाही खर्च करायला परवानगी दिली नाही. माझ्या सहीने पैसे जमा केले पन खर्च करताना "श्रीमान इडलीवाले" चीच सही हवी असे !!!

कालांतराने, मला कंपनीची पुर्वीची अनेक कर्जे नव्याने लक्षात यायला लागली. नव्याने केलेल्या विक्रेत्यांना माल देण्यासाठी नवीन माल तयार करणे गरजेचे होते. पण "श्रीमान इडलीवाले" यांनी ते पैसे इतरत्र वापरल्याने कंपनी बंद राहु लागली. तीन-तीन महिने कर्मचार्यांना पगार नसे. वीज बील अन पाणी बील थकलेले होते. कच्चा मालाचे पैसे मिळावेत म्हणुन अनेक सप्लायर दररोज प्रत्यक्ष येऊन अन फोन करुन त्रास देऊ लागले. काही स्थानिक सप्लायर्सनी कंपनी अन कर्माचार्यांना त्रास दिला जाईल असेही सुचवुन पाहिले.

अश्या अनेक तक्रारी नंतर, नोव्हेंबर २०१२ ला कंपनीचे उत्पादन पैसे नसल्याने बंद पडले. तेंव्हा काही गोष्टी नव्याने कळल्या.

१) "श्रीमान इडलीवाले" ह्यांच्या पुणे येथील या कंपनी मध्ये तयार केलेल्या उत्पादनांची विक्री ही प्रत्यक्षात "श्रीमान इडलीवाले हॉस्पिटॅलिटी अॅन्ड कन्सलटन्सी प्रा लि" ह्या बाप्-बेटे संचालक असलेल्या वेगळ्याच कंपनीच्या नावाने करत असत. त्यामुळे पुणे येथील कंपनीला तिच्या उत्पादनांचे पैसेच मिळत नसत. ते सर्व पैसे "श्रीमान इडलीवाले" अपहार करुन स्वतःच्या इतर कंपनीसाठी वापरत असत.

२) "श्रीमान इडलीवाले हॉस्पिटॅलिटी अॅन्ड कन्सलटन्सी प्रा लि" ने पुणे येथील कंपनीची उत्पादणे वेगळ्या नावाने तळोजा येथील एका कंपनीतुन बनवुन घेणे सुरु केले होते. पुणे येथील ही भागीदारीतील कंपनी त्यांना बंद पाडायची होती.

३) "श्रीमान इडलीवाले" बाल्-बेटे अनेक कागदी खेळ करुन कंपन्यांचे संचालक अन सह्याचे अधिकार बदलत होते. अन त्यामुळे त्यांच्या ही फसवा-फसवी कायद्याच्या आधारे सिद्ध करणे कठीण झाले होते.

नोव्हेंबर/ डिसेंबर २०१२ ला कंपनी बंद झाली. तोवर माझे कंपनीत खर्च केलेले रु.१.९२ लाख आणि दोन विक्रेत्यांचे रु. सहा लाख, असे एकुन रु.सात लाख ९२ हजार ही रक्कम "श्रीमान इडलीवाले" नी मला त्वरीत परत द्यावी असे मी त्यांना कळवले. त्यांनी अनेक उडवा उडवीची उतार दिली. फोन न घेणे, एस एम एस ला उत्तर न देणे, असे प्रकार केले. मी खंडणी मागतोय, अशी पोलीसांत तक्रार करील, अशी धमकीही त्यांनी ई-मेल पाठवुन मला दिली.

तुझे पैसे देईल पण वितरकांचे पैसे विसरुन जा असे सुनावले. आज एक वर्ष उलटुन एक रुपयाचाही उत्पादित माल विक्रेत्यांना न देउन, त्यांचे सहा लाख रुपये बिन-व्याजी वापरायला "श्रीमान इडलीवाले" बाप्-बेट्यांना थोडीही लाज वाटु नये ?? त्या नव्याने उद्योगात आलेल्यांचे पैसे आपण फुकट वापरतोय याची शरम वाटु नये ??

माझ्या अन सोबतच्या तरुणांच्या कुटुंबातील अनेक अडचणीच्या प्रसंगी विशाल इडलीवाले ला मदतीचे साकडे घातले, परंतु निगरगट्ट इडलीवाले महाशय अजिबात बधले नाहीत.

आपल्या पुस्तकांनी महाराष्ट्रातील तरुणांना उदयोजक बना असा सल्ला देणारे, अन आत्महत्येच्या दारातुन परत फिरुन एवढा मोठा उद्योग उभारल्याच्या गप्पा मारणारे "श्रीमान इडलीवाले" प्रत्यक्षात मात्र धादांत खोटारडे अन फसवणुकी चे धंदे करतात हे पाहुन माझ्या सारख्या तरुणाला अत्यंत क्लेश झाले.

जेंव्हा माझ्या घरी बाळ जन्माला यायचे होते, तेंव्हा मी पैशांसाठी खुप विनवनी केली, परंतु "श्रीमान इडलीवाले" बाप-लेक मात्र बधले नाहीत. त्याची शिक्षा म्हणुनच "श्रीमान इडलीवाले" च्या बेट्याच्या बायकोचा गर्भपात झाला...काव्यागत अन नैसर्गिक न्याय होऊनही ह्या बाप-लेकांची बुद्धी मात्र ठिकाण्यावर येत नाही, हे दुर्दैवच!

"श्रीमान इडलीवाले" नी स्वतःची आत्महत्या टाळली, मात्र मी अन माझ्या सारखे नव्याने व्यवसाय करु इच्छिणारे अजुन तीन तरुणांना मात्र आत्महत्येच्या दारात ढकलुन दिले!

स्वतः ऑडी ,मर्सीडिज अन तत्सम लक्झरी गाड्या उडवायच्या, फोर अन फाईव स्टार हॉटेलांत मजा मारायची, पार्ट्या करायच्या, बायका-मुलांना परदेशात फिरायला न्यायचे अन, महाराष्ट्रातील तरुण मुलांना व्यावसायीकतेची स्वप्ने दाखवुन लुटायचे हा नवाच "धंदा" "श्रीमान इडलीवाले"अन त्याच्या मुलांनी सुरु केलाय असे दिसते. मराठी मुलांना फसवणार्या या "ठकसेना" ला शिक्षा झालीच पाहिजे!

आमच्या सारख्या किती तरुणांना "श्रीमान इडलीवाले" ने फसवले ह्याचा शोध गृह खात्याने घेतला पाहिजे, ह्याची चौकशी झाली पाहिजे, आणि त्या सर्वांचे पैसे परत केले गेले पाहिजेत, ही नम्र विनंती!

"श्रीमान इडलीवाले" इतके मोठे आहेत, कि त्यांचे नाव ऐकुन पोलीस अन प्रसार माध्यमेही ह्या हत्येची दखल घेत नाहीत. पोलीसांनी एक कागदावर तक्रार तर लिहुन घेतली, पण पुढे काहीही नाही!

सदर तक्रार गेले एक वर्षे मी स्वतः मा. मुख्यमंत्री, मा. गृह्मंत्री, मा. पोलीस महासंचालक, मा. पोलीस आयुक्त, पुणे, मा. पोलिस निरिक्षक-निगडी, पुणे इत्यादी "अकार्यक्षम" कार्यालयात दिलेली आहे. पण आजवर त्यावर काहीही दखल घेउन कारवाही झाली नाही!

आता न्यायलयात जाउन आपलेच पैसे परत मिळण्यासाठी पुढील २० वर्षे लढाईची मानसिक तयारी करतो आहे!

जै हिंद! जै म्हाराष्ट्र !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला काही समजलेच नाही. असे काम तुम्ही कसे काय स्वीकारलेत हेच आधी मला समजलेले नाही आहे. स्वतःचे पैसे का घातलेत? करारांवर तुमच्या सह्या का मान्य केल्यात?

तसेच, अनेकांना हे इडलीवाले म्हणजे कोण ते समजलेले दिसत आहे, मला तेही नाही समजलेले. Sad

>>मला काही समजलेच नाही. असे काम तुम्ही कसे काय स्वीकारलेत हेच आधी मला समजलेले नाही आहे. स्वतःचे पैसे का घातलेत? करारांवर तुमच्या सह्या का मान्य केल्यात?

कदाचित माणूस आणि संस्था प्रसिद्ध असल्याने आणि यांची कोणीतरी विश्वासू व्यक्तीने ओळख करून दिलेली होती म्हणुन पण असे असेल.

चम्पक ...... आपला अनुभव खरच धक्कादायक आहे ...

मला काही वर्षा पुर्वी अगदी असाच अनुभव आहे म्हणजे स्वानुभव आहे. आपले आपले म्हणवणारे कसे धोका देतात ह्याचे अनेक अनुभव गाठीशी आहेत... मी तर कगदो पत्री आणी कायदेशीर गुन्तवणुक करुन पण जोरर्दार फसली गेली आहे . आणि ह्या गोश्टिला १२ वर्शे उलटली आहेत. पहिली काही वर्षे मी ह्या न्याया साठी खुप लढले ,पण शेवटी अशी वेळ येते की कुणी कुणाचे नसते आणी आपली priority आपल्यालाच ठरवावी लागते ( माझी तर हाता तोन्डाची गाठ आली होती ) म्हणून मी आधी ते सोडवले ( म्हणजे चक्क नोकरी सुरु केली Sad ) आणी कुटुम्ब साभाळले.. ( अर्थात ह्यात मझा नवरा १००% माझ्या बरोबरच होता) आणी मग लढाई सुरु ठेवली ..अजुनही सुरु च आहे.... आपला ईडली वाला जसा मोठा माणुस आहे तसाच माझा ही आहे. त्यामूळे ह्या लोकान्शी एकट्याने लढणे हे जरा जि़कीरी चे असते (आपल्याला हे सागणे नकोच ) .

तर मुद्दा असा की -- आधी स्वत:ची priority ठरवा आणी ही लढाई लढा ...यश आपलेच आहे हे नक्की... शुभेच्छा

#भरत मयेकर ,चंपक ऋणको कसे ते सांगतो .

(A)त्यांनी कंपनीचे लेटरहेड दिले नसणार ही शक्यता आहे .त्यांनी कंपनीकडून फुकट काम केले .त्यामुळे चंपक फ्रंचायजी (बिजनेस इंटरेस्ट असणारी पार्टी झाली )झाले .फायदा झाला तर चंपकचा तोटा झाला तर चंपकचाच .घेतलेले डिपॉजिट लगेच कंपनीच्या अकाउंट मध्ये जमा केले असेल तर केस लढवायला एक चिंटुकला मुद्दा मिळेल ,

(B)त्यांनी कंपनी लेटरहेडवर खाली मनेजर म्हणून सही केलेली असल्यासच आणि अगोदर कंपनीचे त्यांच्याकडे अपोंइंटमंट लेटर असल्यास चंपक हे कंपनीचे एंम्प्लॉयी ठरून अनामत रक्कम परत देण्या ची जबाबदारी कंपनीची होते .केस भक्कम झाली .पण तसा कोणताही पुरावा चंपकपाशी नसावा .

C) मी तुला यंव देईन वगैरे बोललेले कोर्टात पुरावा होणार नाही .

या फसवणूकीकडे आपण एक लाक्षणिक उदा:हरण आणि पुढच्यास धडा असे पाहात आहोत .

A : पैसे डायरेक्ट कंपनीच्याच खात्यात जमा केले असे लिहिले आहे. ही एक जमेची बाजू आहे.
B चंपक अनपेड सीईओ आहेत असे म्हटले आहे. त्यांच्याकडे तसे पत्र असायला हवे.

मला वाटते चंपक यांच्या लेखात त्यांनी फसवल्या गेलेल्या तीन तरुणांचा उल्लेख केला आहे. म्हणजे ते स्वतः आणि बाकीचे दोघे - वितरक ज्यांनी प्रत्येकी तीन लाख रुपये दिले. याचा अर्थ ते दोघे तरुण चंपक यांच्याकडे पैसे परत मागत नसून इडलीवाल्यांकडेच मागत आहेत.

प्रकरण धक्का देणारे आहेत... हा फ्रॉड वाटतो आहे आणि चाग्ला वकिल नक्कीच तुम्हाला यातुन बाहेर काढण्यास मदत करेल.

चम्पक तुम्हाला यातुन बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा... तुम्हाला फसवणार्‍या महाभागाचे नाव सम्पर्कातुन सान्गाल का?

माझा अन कंपनी चा लेखी व्यवहार नसल्याने ती पत्रे "श्रीमान इडलीवाले"च्या नावाने द्यायला हवीत. पण "श्रीमान इडलीवाले" ने ती पत्रे माझ्याच सहीने द्यावीत असे आग्रहाने सांगितले.
----- येथेच धोका लक्षात का नाही आला... ? Angry

ते पुस्तक वाचणे हे येथे सुविद्य असण्याचे लक्षण ठरते हे माहीत असते तर वाचले असते. आता तर मुळीच नाही वाचणार.

चंपक, अनुभव वाचून वाईट वाटले. कागदोपत्री कोणताच व्यवहार न करता केवळ शब्द, विश्वासाच्या बळावर व्यवसायात फसवले जाण्याची शक्यता अधिक असते. तुम्हाला ह्या सर्व प्रकारातून महत्त्वाचे धडे मिळाले असतीलच. तुम्ही लवकर यातून बाहेर याल आणि नव्या जोमाने काम सुरु कराल ह्यासाठी शुभेच्छा!

बाप रे ! धक्कादायक आहे हे सर्व !
चिनूक्सने दिलेली माहिती माझ्यासाठी नवी आहे. काही माणसांना समजण्यात कशी गफलत होऊ शकते आपली... Sad

चंपक, हे सगळं वाचून वाईट वाटलं. असे प्रसंग किती नाउमेद करू शकतात! तुला यातून बाहेर पडून नव्या जोमानं स्वतःचा उद्योग सुरू करता येवो, त्यात खूप सुयश मिळो.

>>जेंव्हा माझ्या घरी बाळ जन्माला यायचे होते, तेंव्हा मी पैशांसाठी खुप विनवनी केली, परंतु "श्रीमान इडलीवाले" बाप-लेक मात्र बधले नाहीत. त्याची शिक्षा म्हणुनच "श्रीमान इडलीवाले" च्या बेट्याच्या बायकोचा गर्भपात झाला...काव्यागत अन नैसर्गिक न्याय होऊनही ह्या बाप-लेकांची बुद्धी मात्र ठिकाण्यावर येत नाही, हे दुर्दैवच!
तू भावनेच्या भरात हे लिहिलं असावंस. पण असं ल्याहायला नको होतंस. तुझ्यावर गुदरलेला प्रसंग कशाचातरी नैसर्गिक न्याय असावा असा विचार कुणी केला तर?

हे वाचुन फार वाईट वाटलं. चंपक तुम्ही यातून यशस्वीपणे बाहेर याल असा विश्वास आहे.
इडलीवाल्यांबद्दल काय बोलावं? माणसं असं कसं वागु शकतात? पुस्तकाबद्दल वाचुन तर त्यांच्याबद्दल वाटणारा आदर नष्ट झालाय.

इडलीवाल्यांबद्दल काय बोलावं? माणसं
असं कसं वागु शकतात? पुस्तकाबद्दल वाचुन
तर त्यांच्याबद्दल वाटणारा आदर नष्ट
झालाय.>>>>> +11111

चंपक तुमच्या लढ्याला शुभेच्छा !!!

मामी तुझा अनुभव पण भयानक आहे
किती अनप्रोफेशनलझिम आहे हां

चंपक, वाचुन वाईट वाटले. अशी वेळ कुणावरही येऊ नये. विशेषतः मुलांच्या/ गर्भाच्या बाबतीत. असो.
तुमच्या पुढच्या आयुष्यात तुम्हाला सुख लाभो हीच सदिच्छा.
मोठ्यांच्या खोट्या गोष्टी म्हणतात, ते असं. पण मग जी मंडळी मोठी झाली, त्यांनी असच खोटंनाटं करुनच पैसा कमावला असेल का? तसं असेल तर तो पैसाच त्यांना डुबवेल, हे नक्की.

बापरे, चंपक... हे घातक आहे... क्रिमिनलही.
एक गुणी उद्योजक म्हणून मारे मुलाला पुस्तक भाषांतर करीत वाचून दाखवलं होतं. आजच्या आज जाऊन ही नवीन माहिती सांगणार आहे.
चंपक तुला तुझ्या लढाईत यश येऊ दे... लढण्यासाठी जे काही आवश्यक ते ते सारं मिळू दे.

वरची एक कॉमेंन्ट आवडली... "किती घुमवून फिरवून बोल्तायत सगळे? सरळ का-मत मांडत नाहीयेत?"

चंपक, आय एंपथायज विथ यु. इडलीवाल्यांना दोष देण्यात अर्थ नाहि; यु नीड टु बी मोर बिझिनेस सॅवी.

टेक धिस होल ऑरडील इन योर स्ट्राइड अँड मुव ऑन...

अरे बापरे!!!!!!!!!!!!!!!!!

एवढा लोचा झालेला??

झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. यावर कायदेशीर इलाज नक्कीच करता येईल असं वाटतं. पण त्यासाठी कागदोपत्री केस मजबूत असणे खूपच गरजेचे आहे. आणि कायदेशीर इलाजांचाच एक भाग म्हणून इथे या धाग्यावर याबाबतीत सल्ले आणि उपाय देणे-घेणे टाळले पाहिजेत हे माझं वैयक्तिक मत. हा 'पब्लिक फोरम' आहे त्यामुळे या धाग्यावरची चर्चा 'सर्व' जगासमोर खुली आहे. त्यामुळे चंपक यांना सल्ले आणि उपाय इथे न लिहिता, संपर्कातून पत्र पाठवून द्यावे असं वाटतं..
कृपया या माझ्या मताबद्दल कोणाचा गैरसमज नसावा...

वाईट वाटले वाचून आणि इडलीवाल्यांचं वर्तन पाहून चीड आली ! मनःपूर्वक शुभेच्छा तुम्हाला.

Pages