इडली, हॉटेल आणि भामटा !

Submitted by चंपक on 4 January, 2014 - 05:57

गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!

ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!

हे सर्व सुरु झाले, ते माझ्या एका अमेरिका स्थित मित्राने त्यांच्या नासिक येथील एका प्रसिद्ध उद्योगपतीं यांचेशी माझी फोन वर ओळख करुन दिल्याने!! मी मे २०११ ला भारतात परतलो, अन व्यवसाय करायचे मनावर घेतले. म्हणुन मग, माझ्या मित्राने मला त्या बुजुर्ग उद्योगपतींची भेट घडवुन दिली.

एप्रिल २०१२ मध्ये मी त्यांना नासिक ला भेटलो. त्यांनी त्यांच्या पुणे येथील एका अन्न प्रक्रिया कंपनीत व्यवस्थापनाचे प्रश्न असल्याने मी त्यात लक्ष घालावे असे सांगितले. मी त्यात जास्त रस घेण्याचे कारण म्हणजे, त्या कंपनीत (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" भागीदार आहेत अन त्यांचा तरुन मुलगा विशाल ह्या कंपनीचे कामकाज पाहतो हे कळाले म्हणुन! ह्या "श्रीमान ईडलीवाले" नी आशियातील पहिले ईको-फ्रेंडली हॉटेल बनवले असे जगाला महिती आहेच!

मी मे२०१२ पासुन चिखली, पुणे येथील या कंपनीत बिनपगारी, सी. ई. ओ. म्हणुन काम सुरु केले! (जगातला मी पहिला सी. ई. ओ. असेल जो बिन-पगारी कामावर हजर झाला!) अर्थात, कंपनीचे उत्पादन ४० टन प्रती महिना वाढवले तर मला योग्य तो पगार सुरु केला जाणार होता. तसेच ह्याच कंपनीत ३०% हिस्सा खरेदी करुन रितसर भागीदार बनवले जाणार होते. तसा शब्द, नासिकचे उद्योगपती अन (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" ह्यांनी दिला होता.

ही कंपनी (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" कुटुंबिय अन नासिकचे उद्योजक यांचेतील "लिमिटेड कंपनी' आहे. हॉटेल व्यवसायाला लागणारे "ग्रेव्ही" अन "रेडीमिक्सेस" कंपनी तर्फे बनवले जात असत. पुणे, मुंबई अन गोवा येथे हे पदार्थ हॉटेल व्यावसायीकांना विकले जात असत.

मी मे २०१२ पासुन कंपनीच्या उत्पादन वाढ, विक्री मध्ये वाढ अन त्याच सोबत उत्पादन खर्चात कपात अशा तीन पातळ्यांवर काम सुरु केले. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई अन एक संचालक नासिक येथे असल्याने कंपनीचे चेक मिळणे अन 'पेटीकॅश' चा मेळ सांभाळणे अवघड असल्याने अनेकदा माझे पदरचे पैसे खर्चुन मी कंपनी चे काम चालु ठेवत असे. माझे पैसे मला १-२ महिन्याने परत मिळत असत. अश्याने माझे दोन्ही संचालक माझ्या कामावर खुष होते.

विक्री मध्ये वाढ करण्यासाठी मी संचालकांना महाराष्ट्रभर विक्रेत्यांचे जाळे उभारण्याचे सुचवले. विक्रेत्यांची आर्थिक ताकत कळावी म्हणुन त्यांचेकडुन तीन लाखां पर्यंत अनामत रक्कम घ्यावी असे मीच सुचवले.(कुठुन दुर्बुद्धी सुचली!) त्यावर विशाल नी मला विक्रेत्यांशी संपर्क करायला अनुमती दिली. मी नगर, मुंबई, जळगाव, औरंगाबाद, नासिक आणि पुणे येथे काही लोकांशी चर्चा केली. पैकी नगर आणि पुणे येथील दोन फर्म विक्रेते बनण्यास तयार झाले. त्यानुसार करार करण्यात आले. त्या दोन्ही फर्म्सनी प्रत्येकी रु. तीन लाख असे एकुन रु. सहा लाख हे कंपनीच्या एस. बी. आय. मुंबई येथील बॅन्क खात्यात जमा केले. त्यानुसार, अहमदनगर तसेच पुणे येथील फर्म्सना तसे लेखी पत्र माझ्या नावे देण्यात आली. तेंव्हा मला शंका आली, कि माझा अन कंपनी चा लेखी व्यवहार नसल्याने ती पत्रे "श्रीमान इडलीवाले"च्या नावाने द्यायला हवीत. पण "श्रीमान इडलीवाले" ने ती पत्रे माझ्याच सहीने द्यावीत असे आग्रहाने सांगितले.

करार झाल्या नंतर पुणे अन नगर येथे सेल्स टीम ने जाऊन जुजबी मार्केटींग पन केले. परंतु स्पर्धेत टिकण्या साठी पुरेसे मार्केटींग करण्यासाठी "श्रीमान इडलीवाले"तयार झाले नाहीत. (त्यांनी जमलेल्या सहा लाख रुपयांत बिग बजार ह्या रिटेल चेन ची एक ऑर्डर पुर्ण केली अन नफा कमावला). ज्या तडफेने "श्रीमान इडलीवाले" ह्यांनी नगर अन पुणे येथे मार्केटींग साठी पैसे अन वेळ द्यायला हवा तो दिला नाही. मला स्वतःला कुठलाही खर्च करायला परवानगी दिली नाही. माझ्या सहीने पैसे जमा केले पन खर्च करताना "श्रीमान इडलीवाले" चीच सही हवी असे !!!

कालांतराने, मला कंपनीची पुर्वीची अनेक कर्जे नव्याने लक्षात यायला लागली. नव्याने केलेल्या विक्रेत्यांना माल देण्यासाठी नवीन माल तयार करणे गरजेचे होते. पण "श्रीमान इडलीवाले" यांनी ते पैसे इतरत्र वापरल्याने कंपनी बंद राहु लागली. तीन-तीन महिने कर्मचार्यांना पगार नसे. वीज बील अन पाणी बील थकलेले होते. कच्चा मालाचे पैसे मिळावेत म्हणुन अनेक सप्लायर दररोज प्रत्यक्ष येऊन अन फोन करुन त्रास देऊ लागले. काही स्थानिक सप्लायर्सनी कंपनी अन कर्माचार्यांना त्रास दिला जाईल असेही सुचवुन पाहिले.

अश्या अनेक तक्रारी नंतर, नोव्हेंबर २०१२ ला कंपनीचे उत्पादन पैसे नसल्याने बंद पडले. तेंव्हा काही गोष्टी नव्याने कळल्या.

१) "श्रीमान इडलीवाले" ह्यांच्या पुणे येथील या कंपनी मध्ये तयार केलेल्या उत्पादनांची विक्री ही प्रत्यक्षात "श्रीमान इडलीवाले हॉस्पिटॅलिटी अॅन्ड कन्सलटन्सी प्रा लि" ह्या बाप्-बेटे संचालक असलेल्या वेगळ्याच कंपनीच्या नावाने करत असत. त्यामुळे पुणे येथील कंपनीला तिच्या उत्पादनांचे पैसेच मिळत नसत. ते सर्व पैसे "श्रीमान इडलीवाले" अपहार करुन स्वतःच्या इतर कंपनीसाठी वापरत असत.

२) "श्रीमान इडलीवाले हॉस्पिटॅलिटी अॅन्ड कन्सलटन्सी प्रा लि" ने पुणे येथील कंपनीची उत्पादणे वेगळ्या नावाने तळोजा येथील एका कंपनीतुन बनवुन घेणे सुरु केले होते. पुणे येथील ही भागीदारीतील कंपनी त्यांना बंद पाडायची होती.

३) "श्रीमान इडलीवाले" बाल्-बेटे अनेक कागदी खेळ करुन कंपन्यांचे संचालक अन सह्याचे अधिकार बदलत होते. अन त्यामुळे त्यांच्या ही फसवा-फसवी कायद्याच्या आधारे सिद्ध करणे कठीण झाले होते.

नोव्हेंबर/ डिसेंबर २०१२ ला कंपनी बंद झाली. तोवर माझे कंपनीत खर्च केलेले रु.१.९२ लाख आणि दोन विक्रेत्यांचे रु. सहा लाख, असे एकुन रु.सात लाख ९२ हजार ही रक्कम "श्रीमान इडलीवाले" नी मला त्वरीत परत द्यावी असे मी त्यांना कळवले. त्यांनी अनेक उडवा उडवीची उतार दिली. फोन न घेणे, एस एम एस ला उत्तर न देणे, असे प्रकार केले. मी खंडणी मागतोय, अशी पोलीसांत तक्रार करील, अशी धमकीही त्यांनी ई-मेल पाठवुन मला दिली.

तुझे पैसे देईल पण वितरकांचे पैसे विसरुन जा असे सुनावले. आज एक वर्ष उलटुन एक रुपयाचाही उत्पादित माल विक्रेत्यांना न देउन, त्यांचे सहा लाख रुपये बिन-व्याजी वापरायला "श्रीमान इडलीवाले" बाप्-बेट्यांना थोडीही लाज वाटु नये ?? त्या नव्याने उद्योगात आलेल्यांचे पैसे आपण फुकट वापरतोय याची शरम वाटु नये ??

माझ्या अन सोबतच्या तरुणांच्या कुटुंबातील अनेक अडचणीच्या प्रसंगी विशाल इडलीवाले ला मदतीचे साकडे घातले, परंतु निगरगट्ट इडलीवाले महाशय अजिबात बधले नाहीत.

आपल्या पुस्तकांनी महाराष्ट्रातील तरुणांना उदयोजक बना असा सल्ला देणारे, अन आत्महत्येच्या दारातुन परत फिरुन एवढा मोठा उद्योग उभारल्याच्या गप्पा मारणारे "श्रीमान इडलीवाले" प्रत्यक्षात मात्र धादांत खोटारडे अन फसवणुकी चे धंदे करतात हे पाहुन माझ्या सारख्या तरुणाला अत्यंत क्लेश झाले.

जेंव्हा माझ्या घरी बाळ जन्माला यायचे होते, तेंव्हा मी पैशांसाठी खुप विनवनी केली, परंतु "श्रीमान इडलीवाले" बाप-लेक मात्र बधले नाहीत. त्याची शिक्षा म्हणुनच "श्रीमान इडलीवाले" च्या बेट्याच्या बायकोचा गर्भपात झाला...काव्यागत अन नैसर्गिक न्याय होऊनही ह्या बाप-लेकांची बुद्धी मात्र ठिकाण्यावर येत नाही, हे दुर्दैवच!

"श्रीमान इडलीवाले" नी स्वतःची आत्महत्या टाळली, मात्र मी अन माझ्या सारखे नव्याने व्यवसाय करु इच्छिणारे अजुन तीन तरुणांना मात्र आत्महत्येच्या दारात ढकलुन दिले!

स्वतः ऑडी ,मर्सीडिज अन तत्सम लक्झरी गाड्या उडवायच्या, फोर अन फाईव स्टार हॉटेलांत मजा मारायची, पार्ट्या करायच्या, बायका-मुलांना परदेशात फिरायला न्यायचे अन, महाराष्ट्रातील तरुण मुलांना व्यावसायीकतेची स्वप्ने दाखवुन लुटायचे हा नवाच "धंदा" "श्रीमान इडलीवाले"अन त्याच्या मुलांनी सुरु केलाय असे दिसते. मराठी मुलांना फसवणार्या या "ठकसेना" ला शिक्षा झालीच पाहिजे!

आमच्या सारख्या किती तरुणांना "श्रीमान इडलीवाले" ने फसवले ह्याचा शोध गृह खात्याने घेतला पाहिजे, ह्याची चौकशी झाली पाहिजे, आणि त्या सर्वांचे पैसे परत केले गेले पाहिजेत, ही नम्र विनंती!

"श्रीमान इडलीवाले" इतके मोठे आहेत, कि त्यांचे नाव ऐकुन पोलीस अन प्रसार माध्यमेही ह्या हत्येची दखल घेत नाहीत. पोलीसांनी एक कागदावर तक्रार तर लिहुन घेतली, पण पुढे काहीही नाही!

सदर तक्रार गेले एक वर्षे मी स्वतः मा. मुख्यमंत्री, मा. गृह्मंत्री, मा. पोलीस महासंचालक, मा. पोलीस आयुक्त, पुणे, मा. पोलिस निरिक्षक-निगडी, पुणे इत्यादी "अकार्यक्षम" कार्यालयात दिलेली आहे. पण आजवर त्यावर काहीही दखल घेउन कारवाही झाली नाही!

आता न्यायलयात जाउन आपलेच पैसे परत मिळण्यासाठी पुढील २० वर्षे लढाईची मानसिक तयारी करतो आहे!

जै हिंद! जै म्हाराष्ट्र !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता कुणी राजकीय गुन्ड नेताच गाठा मग.:रागः काट्यानेच काटा काढावा.

मनोध्येर्य खचु देऊ नका. लढत रहा. देवाच्या दरबारात कधीच अन्याय नसतो. कायम पॉझीटिव्ह रहा. ( म्हणणे सोपे आहे हे मला माहीत आहे तरीही म्हणतेय.) एक एक पुरावे गोळा करुन तगडा ( कामात, पैशाने नव्हे) वकील गाठुन त्याचा सल्ला घेता येतोय का ते बघा. मायबोलीवर पण वकील असतीलच.

देव तुमच्या पाठिशी राहो.

बापरे! भयानक अनुभव आहे. पेपर मध्येच लिहायला हवा हा. मिडियामध्ये आलं की बरोबर घाबरतील. पण नाव इतकं मोठं आहे की कोणी तयार होतील का ही शंकाच आहे.

याच इडलीवाल्यांच्या पुण्याजवळील एका गढीतील हॉटेलात आम्हालाही अत्यंत अनप्रोफेशनल अनुभव आला आहे.

माणूस एकदम पोचलेला दिसतोय.

तुमच्य लढ्यात यश येवो.

या भामट्यांची नावे सांगितलीत तर इतर लोक ही फसण्यापासून दूर राहतील.

>>या भामट्यांची नावे सांगितलीत तर इतर लोक ही फसण्यापासून दूर राहतील.
त्यांनी जे काही लिहिले आहे त्यावरून सहज कळेल असे वाटते आहे.

चंपक, भगवानके घर मे देर है लेकिन अंधेर नही. इडलीवाल्याची गाजरपुंगी नक्की फुटेल. तुमच्यात व्यवसायाचं बीज आहे. त्यातून पुढे चांगला वृक्ष फोफावो. तुम्ही प्रयत्न करत असालंच म्हणा. पुढेमागे जम बसल्यावर जमल्यास वितरकांची देणी फेडून टाकता येतील का ते पहा. त्यांचा तुमच्या प्रामाणिकपणावर तरी विश्वास बसेल.

मामी, माहितीबद्दल धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

>>पुढेमागे जम बसल्यावर जमल्यास वितरकांची देणी फेडून टाकता येतील का ते पहा
अरे, पैसे उडवले ते त्यांनी, मग चंपक यांनी का फेडायचे ??

चंपक, वाचून मनापासून वाईट वाटलं.
पण व्यवसायात/ आर्थिक व्यवहारात नुसत्या तोंडी हमीवर, 'वैयक्तिक विश्वासावर', रेप्युटेशनवर काही अवलंबून नसतं तर पांढर्‍यावर काळं तेवढंच खरं असतं हे आधी लक्षात आलं असतं तर तुझा मनस्ताप आणि अक्षरशः विकतची ऋणकोगिरी वाचली असती असं वाटलं.
तुझी लढाई अवघड आहे. उत्तम व्यावसायिक कायदेशीर सल्ला घे. शुभेच्छा.

चंपक, वाईट वाटले वाचून. स्वतःभोवतालच्या वलयाचा गैरफायदा घेऊन या व्यक्तीने तुम्हाला फसवले. पण स्पष्ट बोलू का? तुमची बिन पगारी कामाला सुरुवात, समोरच्या व्यक्तीने कुठलाही करार न करता नुसता शब्द देणे, जेव्हा विक्रेत्यांबरोबर कराराची वेळ आली तेव्हा त्यात तुम्हाला अडकवणे वगैरे रेड फ्लॅग्ज सुरुवातीपासूनच होते. एखाद्या व्यक्तीला सचोटीने व्यवहार करायचा असेल तर ती व्यक्ती असे वागली असती का?
असो. तुम्हाला न्याय मिळो हिच सदिच्छा!

हे वाचून खूपच वाईट वाटले.
जिथे कुठे पब्लिक फोरमवर या लोकांचा पर्दाफाश करता येईल तिथे करत जाऊया.
त्या कष्टमरना पैशांची रिसीट तुमच्या सहीने असली तरी त्यांच्या लेटरहेडवर आहे का?
तसे असेल तर काही प्रॉब्लेम नाही.
या लोकांच्या पुस्तकांना वैगेरे भुलून आपण भारावून जातो आणि आपण भारावलोयत हे यांना बरोबर कळतं.
आजकाल कुणावरही विश्वास टाकणे मूर्खपणाचे झाले आहे.

या भामट्यांची नावे सांगितलीत तर इतर लोक ही फसण्यापासून दूर राहतील. >>> राहुल१२३ या धाग्याच्या शीर्षकावरूनच लक्षात येईल त्या दाढीवाल्या भामट्याचं नाव.

चंपक इकडे लिहिल्याबद्द्ल धन्यवाद! पण धंदात स्मार्ट आंणि लिगल राहणे जरुरीचे असतं.. शब्दांवर किंवा माणसांवर भुलून जाऊ नये... कधीतर पाटर्नरशीपमध्ये समोरचा साधा आहे म्हणून त्याचा पाटर्नर फसवेअगिरी करु शकतो.. पैसा चीज ही वैसी है!..

जर लिगली तुम्ही त्या माणसांचे ६ लाख देणे लागत असला तर देऊन टाका नाहीतर तुमचे नाव/ पत सर्कलमध्ये खराब होईल्.. आणि अक्कलमाशी खात्यात ते नुकसान जमा करा... धंदा नेहमी बरोबरच्या किवा एक/ दोन लेवलच्यावरच्या लोकांबरोबर करा किंवा तुम्ही बेरकी असावं लागतं... नाहीतर असं नुकसान होण्याचं प्रमाण जास्त असतं...

तुम्ही डायरेक्ट इड्लीवाल्याशी व्यवहार केलेला कि त्याचा माणसांशी... कधी कधी मालकाला गैरव्यवहार माहिती नसतो..

तुमचा गेम केला आहे .
आणखी वकीललोक तुमच्याकडून तीस टक्के रक्कम काढतील .

इडलीवाले मुरलेले लोक आहेत त्यांच्याकडे पगारी वकील असतात .

ऑफेन्स इज गुड डिफेन्स या पध्दतीने ईडलीवाले तुमच्यावर खर्च केलेल्या रकमेची(?!)उलट तुमच्या वरच भरपाईची मागणी करतील ! तशी काही बिले त्यांनी अगोदरच ठेवलीपण असतील .
तुम्हाला कागदोपत्री चोर आणि फसवे बनवले आहे .

परदेशात अमुक एक कारंज्यात नाणे टाका म्हणजे तुमची इच्छा स्वप्ने पूर्ण होईल हे एक मार्केटिंग असते ,रात्री तुमच्या स्वप्नांचा गुंडांकडून लिलाव होतो .

ईडलीवाले हेच करत आहेत .

आता न्यायलयात जाउन आपलेच पैसे परत मिळण्यासाठी पुढील २० वर्षे लढाईची मानसिक तयारी करतो आहे! >>>>> मनापासून शुभेच्छा!
पण पैसा खर्च करण्याची व मनस्ताप सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल.

चंपक,

तू या प्रकारातून लवकरच बाहेर पडशील, याची खात्री आहे. Happy
बाकी, त्या पुस्तकाचीही गंमत आहे. प्रस्तावनेत 'मी काही लेखक नाही, पण लिखाणाचा प्रयत्न केला आहे, हे तुटकंफुटकं लेखन गोड मानून घ्या', अशा अर्थाची वाक्यं आहेत. मजा अशी की, पुस्तकातला एकही शब्द (प्रस्तावना वगळता) पुस्तकावर लेखक म्हणून ज्याचं नाव आहे, त्यानं लिहिलेला नाही. पुस्तक लिहिलं आहे शोभा बोंद्रे यांनी. आणि या कामाचं श्रेय काही त्यांना मिळालं नाही. लेखक म्हणून प्रसिद्धी मिळाली ती पुस्तकाच्या नायकाला. वर प्रस्तावनेतली ती वाक्यं. शोभा बोंद्रे यांनी या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

बाकी, त्या पुस्तकाचीही गंमत आहे. प्रस्तावनेत 'मी काही लेखक नाही, पण लिखाणाचा प्रयत्न केला आहे, हे तुटकंफुटकं लेखन गोड मानून घ्या', अशा अर्थाची वाक्यं आहेत. मजा अशी की, पुस्तकातला एकही शब्द (प्रस्तावना वगळता) पुस्तकावर लेखक म्हणून ज्याचं नाव आहे, त्यानं लिहिलेला नाही. पुस्तक लिहिलं आहे शोभा बोंद्रे यांनी. आणि या कामाचं श्रेय काही त्यांना मिळालं नाही. लेखक म्हणून प्रसिद्धी मिळाली ती पुस्तकाच्या नायकाला. वर प्रस्तावनेतली ती वाक्यं. शोभा बोंद्रे यांनी या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

>>> हे माहित नव्हतं. किती नीच असेल हा माणूस.

आम्हाला त्या हॉटेलात अनुभव आल्यावर मी इडलीवाल्यांना एक इमेल लिहिली होती. पण त्याचंही उत्तर कधीच आलं नाही. आता हे सगळे अनुभव बघता त्याचे फसवणुकीचेच धंदे आहेत हे उघड आहे. माझाही अनुभव इथे लिहिते सविस्तर नंतर.

mala ajun kahi clue lagat nahi kon aahe te?...
pan champak la fasavalele paahun faar vaait vaaTale aaNI rag hi aalaay..

वाचून वाईट वाटले.
<त्या दोन्ही फर्म्सनी प्रत्येकी रु. तीन लाख असे एकुन रु. सहा लाख हे कंपनीच्या एस. बी. आय. मुंबई येथील बॅन्क खात्यात जमा केले>
असे आहे तर त्या सहा लाखांसाठी तुम्ही ऋणको कसे काय व्हाल ते कळले नाही. ते दोन वितरक काय म्हणताहेत?

<त्याची शिक्षा म्हणुनच "श्रीमान इडलीवाले" च्या बेट्याच्या बायकोचा गर्भपात झाला...काव्यागत अन नैसर्गिक न्याय> हे वाक्य नसते तर चालले असते.

बापरे! काय लोक असतात एकेक. असे कसे काय वागु शकतात?
शोभा बोंन्द्रे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यावरही काहीच घडले नाही? किती निर्लज्ज माणुस असेल हा! ते पुस्तक वाचल्यावर ,मला खुप कौतुक वाटलेले. पण आता..
चंपक, खरंच खुप वाईट झाले. पण मला खात्री आहे कि तुम्ही यातुन नक्की बाहेर पडाल. आम्हां सर्व मायबोलिकरांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत.

वाचून वाईट वाटले व अत्यंत रागही आला.
पुस्तक कोणे एके काळी आवडले होते पण अश्या फसवणूक वगैरे भामटेगिरिबद्दल अजिबात कल्पना नव्हती.
इथे लेख लिहून चांगले केलेत.
तुम्हाला शुभेच्छा. आयुष्यातला फारच मोठा धडा होता हा काळ आणि पुढचा काळही परिक्षा बघणारा असेल, पण तुम्ही खंबीर राहून त्यातून तरुन जावे अशी प्रार्थना.

मला वाटते तुम्हाला काही अंशी पैशाच्या जबाबदारीतून योग्य वकील (३०% वाले नव्हे) सुटता येईल. मानसिक त्रास व वैयक्तिक पैशाचा तोटा मात्र अक्कलखाती...

परदेशात अमुक एक कारंज्यात नाणे टाका म्हणजे तुमची इच्छा स्वप्ने पूर्ण होईल हे एक मार्केटिंग असते ,रात्री तुमच्या स्वप्नांचा गुंडांकडून लिलाव होतो .
<<<< +१

चिनुक्स तुम्ही सांगितलेली माहिती नविनच आहे. ते पुस्तक आहे माझ्याकडे. ते पुस्तक वाचुन कौतुक वाटले होते या माणसाबद्दल.... पण सत्य काही दुसरेच आहे...

माझं चुलीपलीकडचं जग, वैशाली भट यांचे पुस्तक हल्ली वाचले. सदर लेखिकेचे उत्तम चाललेले हॉटेल इडलीवाले वेगवेगळ्या प्रकारे सांगुन ( ज्यात आधी पैसे देउन, मग तुझ्या हॉटेलसमोर माझे हॉटेल बांधुन तुझा धंदा बंद करतो असे सांगुन, मग धमकी देउन वगैरे) हडप करायला बघत होते. परंतु लेखिकेचा मुलगा बधला नाही.

चंपक तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळुन तुमचे व यात गुंतलेल्या इतरांचे पैसे व्याजासहित तुम्हाला मिळोत हि शुभेच्छा...

हे हादरवून टाकणारं आहे... तुम्हीच नाही तर इतरही जे भारावून गेलेले होते/आहेत त्यांनाही हा मानसिक धक्काच असेल. हे नक्कीच की .... आजकाल कुणावरही विश्वास टाकणे मूर्खपणाचे झाले आहे .....

मागील तीन वर्ष तुमच्या प्रगती बद्दल येथे मायबोलीवर वाचताना खरंच खूप छान वाटायचं. मला वैयक्तिक रित्या अश्या उमेदीच्या गोष्टी वाचून स्व:तच्या ठूस्स झालेल्या फुग्यात थोडी हवा भरली की पुन्हा चार सहा महिने उडता येतं. आता तर तुम्हीही असे उद्योजकांची आत्महत्या प्रकरणाकडे वळालात... कठीण आहे, असंच सध्या मायबोली वर काही उद्योजक विषयक काहीच हालचाल नाही. साजिरा यांना मी विचारणारच होतो कि ती M-Sauda सध्या का बंद आहे.... कठीण आहे, (तुंमचं, माझं... नि बर्‍याच उद्योजकांचं)

उद्योजक...उद्योजक... उद्योजकाकडे कामाला असणार्‍या माणसाला बँक कर्ज देते पण उद्योजकाला नाही... त्यातून ह्या प्रकारचे (भागिदारी, फ्रेंचायझी, कमिशन बेसिस, प्रायव्हेट फंडींग) अनेक मार्ग चोखाळले जातात. त्यात काही बरं वाईटं झालं कि पुढची दोन-तीन वर्ष त्यातून सावरण्यात जातात. जग त्या दिवसांमध्ये आणखी पुढे निघून जाते. नि तो पल्ला धावत पळत पुन्हा गाठताना पार दमछाम होऊन जाते.

Pages