डोसे

Submitted by Anvita on 26 December, 2013 - 23:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

तांदूळ ४ वाटी , उडीद डाळ १ वाटी, अर्धचमचा मेथी दाणा, पोहे मूठभर

क्रमवार पाककृती: 

तांदूळ ४ वाटी , उडीद डाळ १ वाटी, अर्धचमचा मेथी दाणा, पोहे मूठभर हे सगळे जिन्नस एकत्र पाण्यात साधारण ६-७ तास भिजवायचे नंतर mixer मधून वाटायचे व हे पीठ fermentation करता झाकून ठेवून द्यायचे . साधारण ऋतूप्रमाणे ७-१२ तास लागतात ( म्हणजे थंडीत जास्त वेळ आणि उन्हाळ्यात कमी वेळ लागतो )
मग एकदा डोसा पीठ तयार झाले कि मग काय पटापट डोसे घालणे सुरु!
image.jpg

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात माझ्यामते ६-८ लोकांसाठी डोसे होतील .
अधिक टिपा: 

बरेच दिवस झाले घरी डोसे केले नव्हते त्यामुळे बरीच आरडाओरड झाली आता मात्र डोसे करणे भागच आहे असे कळल्यावर सकाळी १० च्या सुमारास भिजत टाकले आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास वाटले . दुसर्यादिवशी सकाळी breakfast ला डोसे तयार.
खरेतर सोपी गोष्ट आहे पण आठवणीने डाळ , तांदूळ भिजत घालणे विसरले जाते .

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

हो अगदी हॉटेलातल्यासारखे दिसताहेत. पिठाची कन्सिस्टन्सी, तवा किती तापवला, आच कशी होती, किती उंचावरून पीठ सोडले हे न लिहिता डोश्याची कृती कशी काय लिहिता? Wink

डोसे आवडल्याबद्दल इथल्या सगळ्यांचे धन्यवाद !
डोसे सगळेचजण करतात आणि मायबोली वर तर खूपच सुगरणी आहेत . पीठाचे प्रमाण बर्याच वेळा वेगळे घेतात प्रत्येक जण पण मला ह्या प्रमाणाचे आवडतात. बाकी नेहेमी आपण डोसे करतो तसेच. वाटताना जास्त पाणी घालू नये म्हणजे पटकन smooth वाटले जाते. मी nonstick तवा वापरला आहे. लोखंडी तव्यावर पण छान होतात पण
ते तंत्र जमावे लागते . पीठ जास्त पातळ नको म्हणजे डोसे घालताना पटापट पसरता येते .

बाकी नेहेमी आपण डोसे करतो तसेच. >>>>> इथेच तर प्रॉब्लेम आहे.. मी पहिल्यांदाच करत असते बर्‍याच गोष्टी, त्यामुळे इतके डिटेल्स विचारावे लागतात.. धन्यवाद Happy

आमचे प्रमाण ३:१. उकडा तांदूळ आणि अख्खा उडीद. हे सगळं वेगवेगळं भिजत घालायचं. वाटतानापण वेगळं वाटायचं आणि नंतर एकत्र करून चवीपुरतं मीठ घालायचं. पीठ आंबवायची आम्ची प्रोसेस भारी किचकट आहे, लिहिणं शक्य नाही.

एकच पीठ तयार करून आम्ही त्याचे इडली, दोसे, उत्तप्पे, आप्पे, असे सर्व प्रकार यशस्वीरीत्या. फक्त पीठ आंबवायची ट्रीक जमली पाहिजे.

अन्विता, छान दिसताहेत डोसे.

----------------------------------------------------

हे तुम्हाला नाही उद्देशून पण आठवले म्हणून,
आजकाल तर ट्रेंड आहे मायबोलीवर, त्याच त्याच रेसीप्या लिहायची. जिथे जिन्नस भाजला नसेल तिथे भाजून पुन्हा तशीच रेसीपी लिहायची व जिथे दुसर्‍या कोणाच्या रेसीपीत भाजला असे लिहिले असेल तिथे न भाजता घ्या असे म्हणून रेसीपी लिहायची. तवा वापरायचे जिथे अवन असेल तिथे व नवीन रेसीपी म्हणून टाकायची आणि खाली आई, आजी, मावशी लिहायचे. नाहितर पुन्हा पुन्हा त्याच त्या पारंपारीक रेसीप्या(खीरी,शिरे,लाडू वगैरे) लिहत बसायच्या. Wink

(गंमतीने लिहिलेय)

मी साधाच तांदूळ वापरला आहे म्हणजे घरात बासमती तुकडा होता तो .
सोनेरी रंग बहुतेक पोह्यांमुळे येतो . ( पोह्यांमुळे fermentation नीट होते त्यामुळे येत असावा )
झम्पी , डोशाची recipe आधी लिहिली होती का कोणी? मी पाहिली नाही . मायबोलीवर तशी नवीनच असल्याने फारशी माहिती नाही.

अन्विता, मी तुला नाही गं लिहिले; इथे मायबोलीची ट्रेंड सांगतेय आताच काही इतर रेसीप्या पाहून.

शूम्पी, नंतर ट्राय करते.

सोनेरी रंग मेथ्यांमुळे येतो. पण ज्यांना आंबवलेले पदार्थ खाऊन पित्त होते, त्यांनी मेथ्या शक्यतो वापरू नयेत. पित्त होण्याचे चान्सेस फार वाढतात.

झम्पी, हो हो मला कळले कि मला उद्देशून नाही लिहिले आणि गमतीनेच लिहिले आहे. पण मी मायबोलीवर नवीन असल्याने हळूहळू ट्रेंड्स कळतील न मला पण... ( मी पण गमतीनेच लिहिले आहे पण smilee टाकता नाही आला मला)

डोसे भारी दिसतायत. इथे रेडीमेड पीठ मिळतं त्याचेही छान होतात. त्यामुळे भिजवणं, वाटणं, आंबवणं हे प्रकार काळाच्या पडद्याआड दिसेनासे झालेत Wink

आज ईड्लि चे मिश्रण भिजवले आहे.. रात्री बारीक करणार आहे..पण थंडी मुळे आंबणार नाही. स्पंजी होण्या साठी काय करावे(मावे पण नाही) उद्या सकाळी करायच्या आहे.

रुमहिटर असेल तर हिटरपुढे ठेवा. किंवा स्टॅबिलायझरवर. अवन गरम करून त्यात ठेवलेत तरी लवकर आंबेल पीठ. दुपारी करायच्या असल्यास. सकाळपासून भांडे उन्हात ठेवा. वरून पातळ कापडाने झाका भांडे.
वाटलेल्या मिश्रणात कापलेला कांदा घालून ठेवल्यास पीठ लवकर येते अशी टिपही मैत्रिणीने दिली होती. पण कांद्याचा वास येईल अशी शंका आल्याने मी कधी तसे करून पाहिलेले नाही.

Pages