तांदूळ ४ वाटी , उडीद डाळ १ वाटी, अर्धचमचा मेथी दाणा, पोहे मूठभर
तांदूळ ४ वाटी , उडीद डाळ १ वाटी, अर्धचमचा मेथी दाणा, पोहे मूठभर हे सगळे जिन्नस एकत्र पाण्यात साधारण ६-७ तास भिजवायचे नंतर mixer मधून वाटायचे व हे पीठ fermentation करता झाकून ठेवून द्यायचे . साधारण ऋतूप्रमाणे ७-१२ तास लागतात ( म्हणजे थंडीत जास्त वेळ आणि उन्हाळ्यात कमी वेळ लागतो )
मग एकदा डोसा पीठ तयार झाले कि मग काय पटापट डोसे घालणे सुरु!
बरेच दिवस झाले घरी डोसे केले नव्हते त्यामुळे बरीच आरडाओरड झाली आता मात्र डोसे करणे भागच आहे असे कळल्यावर सकाळी १० च्या सुमारास भिजत टाकले आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास वाटले . दुसर्यादिवशी सकाळी breakfast ला डोसे तयार.
खरेतर सोपी गोष्ट आहे पण आठवणीने डाळ , तांदूळ भिजत घालणे विसरले जाते .
.
.
सही दिसत आहेत डोसे
सही दिसत आहेत डोसे
भारी दिसताहेत....हॉटेलातल्या
भारी दिसताहेत....हॉटेलातल्या सारखे.... यम्मी....
किती जाड/बारीक वाटायचं? पीठ
किती जाड/बारीक वाटायचं? पीठ किती पातळ करायचं? वाटताना पाणी घालुन वाटायचं का?
हो अगदी हॉटेलातल्यासारखे
हो अगदी हॉटेलातल्यासारखे दिसताहेत. पिठाची कन्सिस्टन्सी, तवा किती तापवला, आच कशी होती, किती उंचावरून पीठ सोडले हे न लिहिता डोश्याची कृती कशी काय लिहिता?
कसले क्रिस्पी दिसतायत. एकदम
कसले क्रिस्पी दिसतायत. एकदम सही
फोटो मस्तच!
फोटो मस्तच!
डोसे आवडल्याबद्दल इथल्या
डोसे आवडल्याबद्दल इथल्या सगळ्यांचे धन्यवाद !
डोसे सगळेचजण करतात आणि मायबोली वर तर खूपच सुगरणी आहेत . पीठाचे प्रमाण बर्याच वेळा वेगळे घेतात प्रत्येक जण पण मला ह्या प्रमाणाचे आवडतात. बाकी नेहेमी आपण डोसे करतो तसेच. वाटताना जास्त पाणी घालू नये म्हणजे पटकन smooth वाटले जाते. मी nonstick तवा वापरला आहे. लोखंडी तव्यावर पण छान होतात पण
ते तंत्र जमावे लागते . पीठ जास्त पातळ नको म्हणजे डोसे घालताना पटापट पसरता येते .
Anvita, मस्त फोटो तो.पासु.
Anvita, मस्त फोटो तो.पासु. मला सांबार हव ह्या डोश्यांबरोबर. लगेच खायला येते.
फोटो मस्तच............भुक
फोटो मस्तच............भुक लागलि........
बाकी नेहेमी आपण डोसे करतो
बाकी नेहेमी आपण डोसे करतो तसेच. >>>>> इथेच तर प्रॉब्लेम आहे.. मी पहिल्यांदाच करत असते बर्याच गोष्टी, त्यामुळे इतके डिटेल्स विचारावे लागतात.. धन्यवाद
आमचे प्रमाण ३:१. उकडा तांदूळ
आमचे प्रमाण ३:१. उकडा तांदूळ आणि अख्खा उडीद. हे सगळं वेगवेगळं भिजत घालायचं. वाटतानापण वेगळं वाटायचं आणि नंतर एकत्र करून चवीपुरतं मीठ घालायचं. पीठ आंबवायची आम्ची प्रोसेस भारी किचकट आहे, लिहिणं शक्य नाही.
एकच पीठ तयार करून आम्ही त्याचे इडली, दोसे, उत्तप्पे, आप्पे, असे सर्व प्रकार यशस्वीरीत्या. फक्त पीठ आंबवायची ट्रीक जमली पाहिजे.
मस्त दिसतायत. भूक लागली फोटो
मस्त दिसतायत. भूक लागली फोटो बघून.
मस्त, हॉटेलमध्ये असतात तसे
मस्त, हॉटेलमध्ये असतात तसे झालेत, माझे इतके सुंदर नाही होत.
मस्त डोसे. तू उकाडा तांदूळ
मस्त डोसे. तू उकाडा तांदूळ वापरलास कि साधा.
तो सोनेरी रंग कस्काय येतो ते
तो सोनेरी रंग कस्काय येतो ते सांगा. फ्लेम कमी ठेवली तर अॅनिमिक आणि जास्त केली की खर्पूस काळे होतात.
मस्त दिसतायत डोसे..
मस्त दिसतायत डोसे.. यम्मी..एकदम हॉटेलातल्यासारखे..
अन्विता, छान दिसताहेत
अन्विता, छान दिसताहेत डोसे.
----------------------------------------------------
हे तुम्हाला नाही उद्देशून पण आठवले म्हणून,
आजकाल तर ट्रेंड आहे मायबोलीवर, त्याच त्याच रेसीप्या लिहायची. जिथे जिन्नस भाजला नसेल तिथे भाजून पुन्हा तशीच रेसीपी लिहायची व जिथे दुसर्या कोणाच्या रेसीपीत भाजला असे लिहिले असेल तिथे न भाजता घ्या असे म्हणून रेसीपी लिहायची. तवा वापरायचे जिथे अवन असेल तिथे व नवीन रेसीपी म्हणून टाकायची आणि खाली आई, आजी, मावशी लिहायचे. नाहितर पुन्हा पुन्हा त्याच त्या पारंपारीक रेसीप्या(खीरी,शिरे,लाडू वगैरे) लिहत बसायच्या.
(गंमतीने लिहिलेय)
अन्विता, दोसे मस्त दिसत आहेत.
अन्विता, दोसे मस्त दिसत आहेत.
मी साधाच तांदूळ वापरला आहे
मी साधाच तांदूळ वापरला आहे म्हणजे घरात बासमती तुकडा होता तो .
सोनेरी रंग बहुतेक पोह्यांमुळे येतो . ( पोह्यांमुळे fermentation नीट होते त्यामुळे येत असावा )
झम्पी , डोशाची recipe आधी लिहिली होती का कोणी? मी पाहिली नाही . मायबोलीवर तशी नवीनच असल्याने फारशी माहिती नाही.
ग्रेट दिसत आहेत.
ग्रेट दिसत आहेत.
अन्विता, मी तुला नाही गं
अन्विता, मी तुला नाही गं लिहिले; इथे मायबोलीची ट्रेंड सांगतेय आताच काही इतर रेसीप्या पाहून.
नंदिनी, लिही की पीठ आंबवायची
नंदिनी, लिही की पीठ आंबवायची किचकट कृती. मला आता खूपच वाचावीशी वाटत आहे.
शूम्पी, नंतर ट्राय करते.
शूम्पी, नंतर ट्राय करते.
सोनेरी रंग मेथ्यांमुळे येतो. पण ज्यांना आंबवलेले पदार्थ खाऊन पित्त होते, त्यांनी मेथ्या शक्यतो वापरू नयेत. पित्त होण्याचे चान्सेस फार वाढतात.
झम्पी, हो हो मला कळले कि मला
झम्पी, हो हो मला कळले कि मला उद्देशून नाही लिहिले आणि गमतीनेच लिहिले आहे. पण मी मायबोलीवर नवीन असल्याने हळूहळू ट्रेंड्स कळतील न मला पण... ( मी पण गमतीनेच लिहिले आहे पण smilee टाकता नाही आला मला)
अच्छा , मला वाटले मेथ्यांमुळे
अच्छा , मला वाटले मेथ्यांमुळे क्रिस्पी होतात आणि पोह्यांनी रंग येतो.
डोसे भारी दिसतायत. इथे
डोसे भारी दिसतायत. इथे रेडीमेड पीठ मिळतं त्याचेही छान होतात. त्यामुळे भिजवणं, वाटणं, आंबवणं हे प्रकार काळाच्या पडद्याआड दिसेनासे झालेत
आरती , यावेळेस सांबर केले
आरती , यावेळेस सांबर केले नव्हते . पुढच्यावेळेस करेन :):-)
आज ईड्लि चे मिश्रण भिजवले
आज ईड्लि चे मिश्रण भिजवले आहे.. रात्री बारीक करणार आहे..पण थंडी मुळे आंबणार नाही. स्पंजी होण्या साठी काय करावे(मावे पण नाही) उद्या सकाळी करायच्या आहे.
रुमहिटर असेल तर हिटरपुढे
रुमहिटर असेल तर हिटरपुढे ठेवा. किंवा स्टॅबिलायझरवर. अवन गरम करून त्यात ठेवलेत तरी लवकर आंबेल पीठ. दुपारी करायच्या असल्यास. सकाळपासून भांडे उन्हात ठेवा. वरून पातळ कापडाने झाका भांडे.
वाटलेल्या मिश्रणात कापलेला कांदा घालून ठेवल्यास पीठ लवकर येते अशी टिपही मैत्रिणीने दिली होती. पण कांद्याचा वास येईल अशी शंका आल्याने मी कधी तसे करून पाहिलेले नाही.
Pages