Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आदित्य देसाई काय तिच्या
आदित्य देसाई काय तिच्या प्रेमात पडलाय, सोडून दे तिला. तो दुसरा आदुच बरोबर आहे तिच्यासाठी.
आ. दे. साठी कोणीतरी छान फ्रेश चेहेरा आणारे.
परवा टीव्हीवर एका गाण्यात
परवा टीव्हीवर एका गाण्यात पाहिल तिला तिथेही थोराडच वाटत होती तो अजुनही चांदरात आहे मधला हिरो (पोरगेलासा) तिचा जोडीदार होता गाणं गाताना.
बाकी तो देसाईंचा आदित्य लग्गेच काय गाल फुगवतो हल्ली
आता तशीही हि मालिका लवकरच
आता तशीही हि मालिका लवकरच संपणार आहे. (आणखी पाणी घालुन वाढवली नाही तर!) तेव्हा आता यातले कलाकार बदलणे शक्य नाही.
आदीत्य देसाईला जेव्हा मेघना
आदीत्य देसाईला जेव्हा मेघना आ.न बद्दल सांगते तेव्हा तो म्हणालेला असतो की मी तुला त्याच्याकडे घेउन जाईन. हा त्याचा पत्ता मिळवण्यासाठी कहीतरी करेल याची मालिकावाले वाट बघुन कंटाळले आणि शेवटी आ.न लाच परत आणला.
बाकी तो देसाईंचा आदित्य
बाकी तो देसाईंचा आदित्य लग्गेच काय गाल फुगवतो हल्ली<<<
काय फुगवणार तो तरी बिचारा मग!
बेफिकीर, मग मला ते गालावरच्या
बेफिकीर, मग मला ते गालावरच्या रागाला औषध काय अस म्हणुन मेघना नाचते असच दिसतो पुढच्या शॉटमधे
मुग्धे त्या देसाईच एकतर्फी
मुग्धे त्या देसाईच एकतर्फी प्रेम आहे ना त्या मेघनावर त्याला मनातुन तिला नगरकरकडे पाठवायचच नसत. नाटकं सगळी सगळेच काय हम दिल दे चुके सनम मधले अजय देवगण नसतात आणि तो नगरकर काय सलमान थोडाच्चे.
येडा आहे तो आ. दे. मस्त तिला
येडा आहे तो आ. दे. मस्त तिला त्या आदुकडे पोचवून, छानशी, स्वतःला शोभेल अशी बघायचीना.
(No subject)
मस्त तिला त्या आदुकडे पोचवून,
मस्त तिला त्या आदुकडे पोचवून, छानशी, स्वतःला शोभेल अशी बघायचीना.<<<
स्त्रीचे ऑब्जेक्टिफिकेशन एक स्त्रीच करते हे सिद्ध झाले.
बेफि खरंच ती मेघना, आदित्यची
बेफि खरंच ती मेघना, आदित्यची मोठी बहिण वाटते निदान मलातरी. झीने अशी कशी तिची निवड केली मग निदान राधा ही मोठी होती सौरभपेक्षा तशी हीपण वयाने मोठी आहे असं तरी दाखवायचं. तो लहान वाटतो तिच्यापुढे, बरं अभिनय पण यथा तथाच आहे तिचा. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.
अंजुडीचा राग प्रत्येक
अंजुडीचा राग प्रत्येक पोस्टीतुन दिसतोय मेघनाबद्दलचा
बेफिकीर, नियम अपवादाने सिद्ध होतात हो.
ते आदु आदु ऐकलं की मला ए
ते आदु आदु ऐकलं की मला ए ऐद्या (ऐतखाऊ) अशी हाक माराविशी वाटते त्या आदित्य नगरकरला
ते आदु आदु ऐकलं की मला ए
ते आदु आदु ऐकलं की मला ए ऐद्या (ऐतखाऊ) अशी हाक माराविशी वाटते त्या आदित्य नगरकरला <<<
एक प्रकारचा ऐतखाऊच आहे की तो!
त्याला काय करावं लागतंय तिच्यासाठी? एक ते अधून मधून तुणतुणं का काय ते वाजवलं की झालं!
एक ते अधून मधून तुणतुणं का
एक ते अधून मधून तुणतुणं का काय ते वाजवलं की झालं!
>>>
काय हे?? चुरा लिया है तुमने किती छान वाजवतो तो अस मागे एकदा मेघना म्हणाली होती की. आणि उलटी मेघना अशी स्वाक्षरी करुन चित्र पण काढतो तो फावल्या वेळेत (तो काम कधी करतो? त्याला पोसतो कोण? तो भटकतो तेंव्हा तो खर्च करतो कोण? त्याला चित्रकलेल्च साहित्य देत कोण? असले प्रश्न पडत नैत हल्ली)
(No subject)
शुभांगी बहुतेक त्या आदुच्या
शुभांगी बहुतेक त्या आदुच्या बाबा, काका, मामा यापैकी कोणीतरी भरपूर विस्टेट सोडलेली दिसतेय त्याच्यासाठी.
काकाच असणार मग....मेघनाच्या
काकाच असणार मग....मेघनाच्या लग्नाच्यावेळी आ न चा काकाच आजारी असतो म्हणून त्याला यायला उशीर होतो.
पण काहीही असो या मालिकेमुळे
पण काहीही असो या मालिकेमुळे उदय टिकेकर आणि त्यांचे 'लक्ष असु द्या बाबाजी' लैच फेमस झालय
उलटी मेघना<<< म्हणजे काय आता?
उलटी मेघना<<< म्हणजे काय आता?
मेघना या नावाच्या उलट्या
मेघना या नावाच्या उलट्या बाजूने(मेघना नाव उलट दिशेने लिहून) तो सही करतो त्याच्या चित्रावर, बेफि.
जाऊदे हे लिहिताना मीच उलट पुलट झाले.
शुभान्गीचे वाक्य जोडुन आलेले
अरे धन्यवाद अन्जू
अरे धन्यवाद अन्जू स्पष्टीकरणाबद्दल. तो एपिसोड हातचा गेला होता. काय करणार रिमोट माझ्या हातात नसल्याने आजकाल कुठलीच सिरीयल धड बघता येत नाही.
शुभान्गी सॉरी ग, ते वाक्य मी आधी वेगळेच वाचले होते. म्हणजे आपण म्हणतो ना, की तिला काय बोलतेस, उलट तिनेच सगळे सान्गीतले वगैरे.:स्मित:
मेघना या नावाच्या उलट्या
मेघना या नावाच्या उलट्या बाजूने(मेघना नाव उलट दिशेने लिहून) तो सही करतो त्याच्या चित्रावर, बेफि.<<<
त्याच्यावर ती ह्यामुळे भाळलीय? मेंटल बिंटल आहे का काय ती मेघना? कात्रजच्या उद्यानात भरती करा तिला!
<<मेघना या नावाच्या उलट्या
<<मेघना या नावाच्या उलट्या बाजूने(मेघना नाव उलट दिशेने लिहून) तो सही करतो त्याच्या चित्रावर>>
याचा अर्थ माझा पण तो एपिसोड हुकला वाटत
उलटी मेघना<<< म्हणजे काय
उलटी मेघना<<< म्हणजे काय आता?>>>>>>>>>>
मेन्टल आहे तर येरवड्याला टाका
मेन्टल आहे तर येरवड्याला टाका ना, कात्रजला टाकुन बिचार्या वन्य जीवाना का त्रास द्यावा?:खोखो:
मेन्टल कशाने? मेघना मस्त
मेन्टल कशाने? मेघना मस्त सगळ्यांना वापरतेय.
स्वाती परफेक्ट निरीक्षण.
स्वाती परफेक्ट निरीक्षण. बाकीचेच वेडे झालेत तिच्या चुका सहन करताना.
मेन्टल कशाने? मेघना मस्त
मेन्टल कशाने? मेघना मस्त सगळ्यांना वापरतेय.<<<
असंय होय! 'उसवून टाके रेशीमगाठी' शीर्षक ठेवा!
Pages