Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झंपी मलाही मधुगंधा
झंपी
मलाही मधुगंधा कुलकर्णीचा अभिनय आवडतो... (आठवत नाहीये आत्ता पण लिहीते कशात पाहीलेला ते.. तेव्हा तरी आवडलेला... हरिश्चंद्राची फॅक्टरीमध्येही होता छोटासा रोल
) या सिरीयल मध्ये सगळ्याचीच बोंब म्हणून पाहत नाही. त्यामुळे या सिरीयल मधील तिच्या अभिनय क्षमतेवर नो कमेंट्स
पण त्या सर्वांसाठी ज्यांनी तिचा इतरत्र अभिनय पाहीला नाहीय आणि या बावळट सिरीयलमधील गबाळ्या वेशातील अभिनयावरून (शितावरून भाताची) परीक्षा केलेय त्यांच्यासाठी : http://indiatoday.intoday.in/story/Two+Marathi+short+films+to+be+screene...
आपली आपली आवड 
तसंही कोणाला कोण आवडावं यात कोणी दुखावलं जाण्याचा, किंवा कोणी रागावण्याचा प्रश्नच नाहीये. बर्याच जणांना डोक्यात जाणारा बाबाजी, बर्याच जणांना रोज सतत पाहणे फार इंटरेस्टिंग वाटू शकतेच की
या सिरीयल मधील तिच्या ड्रेसेस, मेक अप आणि हेअरस्टाईल साठी मात्र सगळ्यांना अनेक अनुमोदन! खूपच गबाळा अवतार दिलाय तिला (आणि त्या आन लाही!! एरवी बरा आहे दिसायला पण यात डोक्यावरच्या त्या छप्परामुळे झपाटलेला तात्या विंचू वाटतोय)! (इन फॅक्ट तिला स्वतःचा ड्रेसींग सेन्स नाही हे ही सांगू शकते कारण मागे साम टिव्ही वरील तिच्या स्वतःच्या घराचे चित्रीकरण केले होते तेव्हाची तिची घराचे पडदे, उश्या अभ्रे, बेडशीट तिचा स्वतःचा घरगुती ड्रेस (निदान टिव्ही वर दाखवण्यापुरता तरी नवीन घालावा ) इ. रंगसंगती अगदीच बाद कॅटॅगरीतील!!
या सिरियलमध्ये सगळ्या बायांना
या सिरियलमध्ये सगळ्या बायांना बावळटछाप कपडे दिलेत.
या सिरियलमध्ये सगळ्या बायांना
या सिरियलमध्ये सगळ्या बायांना बावळटछाप कपडे दिलेत.<<<
बावळटछाप हा शब्द 'बायांना' ह्या शब्दाआधी योग्य ठरेल.
हरिश्चंद्राची फॅक्टरीमध्येही
हरिश्चंद्राची फॅक्टरीमध्येही होता छोटासा रोल>>>>>>>>>>>>>..हो थोड्या वेळासाठीच आहे तीचा रोल...अभिनयाबाबतीत दुमत नाही.मुळात त्यावर कोणी वाईट बोल्लच नाहीये.....पण ती डिझायनर आहे तर थोडे तरी तीला छान कपडे द्यायचे.. शर्मिष्ठा राउत चे पण साधेच असतात पण जरा नीट तरी असतात....मेघना आणि विजयांचा वॉर्ड्रोब असा काय तो.....
आता मेघनाचा खरच कंटाळा आलाय....तीचा तो भेटलाय आ दे ला खुश करायच्या पाठी का आहे ती.....
बावळटछाप हा शब्द 'बायांना'
बावळटछाप हा शब्द 'बायांना' ह्या शब्दाआधी योग्य ठरेल.>>>> सु मो नाही हो बावळट छाप.....
शर्मिष्ठा राउत चे पण साधेच
शर्मिष्ठा राउत चे पण साधेच असतात पण जरा नीट तरी असतात....मेघना आणि विजयांचा वॉर्ड्ररोब असा काय तो.....!! यावर संपूर्ण अनुमोदन. मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मधुगंधाची स्वतःचीच फॅशन टेस्ट भयाण आहे तर इथे तिला काही बरं मिळेल अशी आशाही नको!! हे तिला तिच्या कॉश्च्युम डिझायनरने (मराठी सिरीयल्सनाही असतो/असते ना???) पटवून द्यायला हवं होतं की बाई गं तुझ्या या सिरीयल मधील कॅरॅक्टरलाच काय पण तुलाही पर्सनली हे केस आणि हे ड्रेस सूट होत नाहीत. असो... मी खरंच टाकू का ही लिंक त्याच्या थोपू पानावर??? धागाकर्तीने आणि इतर उत्साही वाचकांनी परवानगी दिलीत तर?? अलिकडे तो छुपा रोमातला आयडी या धाग्यावर मात्र फिरकेना!!
या सिरियलमध्ये सगळ्या बायांना
या सिरियलमध्ये सगळ्या बायांना बावळटछाप कपडे दिलेत.<<<
बावळटछाप हा शब्द 'बायांना' ह्या शब्दाआधी योग्य ठरेल.>> बेफी, बावळटछाप हा शब्द 'बायांना' ह्या शब्दाआधी पण योग्य ठरेल. असं हवंय ना?? दोनदा बावळटछाप हवंय (नाहीतर अर्थ पार (फार) बदलतो हो
)
अनि, सुमो बावळटछाप नाहीये ना म्हणून तिला नाहीत बावळटछाप कपडे.
अनि, सुमो बावळटछाप नाहीये ना
अनि, सुमो बावळटछाप नाहीये ना म्हणून तिला नाहीत बावळटछाप कपडे.>>>>>>>>>>>>> हो गं.....ती मस्तच काम करते.....
बेफिकीर काकांची आवडती आहे मेघना आणि विजया...त्यांना राग येईल हो....
कोण विजया?
कोण विजया?
मेघनाचा प्रियकर आला होता ना
मेघनाचा प्रियकर आला होता ना तिच्यासमोर? काय झालं मग पुढे? ते परत भेटले नाहीतच का? तो येईपर्यंत ती त्याच्यासाठी झुरत होती ना?
मेघनाचे नुसते असणेच भीषण
मेघनाचे नुसते असणेच भीषण असते, झुरणे काय असेल!
मेघनाचे नुसते असणेच भीषण
मेघनाचे नुसते असणेच भीषण असते, झुरणे काय असेल!>>>>>>>>>>>>>>>>>>> हा हा ते घशात हं असं काहीस करते तेच झुरणे असेल....
माझा बॉस ला ती खुप आवडते...तेही मी कलिग बरोबर गॉसिप करत असताना त्याला अगदीच रहवलं नाही म्हणुन तो बोल्ला की ती चांगली अभिनेत्री आहे...आणि तुम्हाला असा अभिनय करता तरी येईल का??? तर आम्ही म्हटले नाही हो असा अभिअय नाहीच करता येणार
ते सगळं ठीक आहे. पण कथेत
ते सगळं ठीक आहे. पण कथेत प्रियकर आणि मेघनाचं काय झालं पुढे? का काहीच नाही झालं?
नाही झालं.....अजुन
नाही झालं.....अजुन दुर्दैवाने.... होइल तेव्हा तरी सिरीयल संपेल
अनिश्का असो काल मेघनीला
अनिश्का
असो काल मेघनीला कुणितरी ब्लँक कॉल करत होतं. आता ब्लँक कॉल म्हणजे काय?
आपण हॅलो हॅलो करतो पण पलिकडून कुणिच काहीच बोलत नाही. बरोबर ना?
तर ही बया पलिकडून कुणिच बोलत नसून 'कोण बोलतंय?" असं विचारत होती.
त्या ऐवजी "कोण बोलत नाहिये?" असं विचारायला हवं होतं ना?
त्या ऐवजी "कोण बोलत नाहिये?"
त्या ऐवजी "कोण बोलत नाहिये?" असं विचारायला हवं होतं ना? <<<
हा हा ते घशात हं असं काहीस करते तेच झुरणे असेल....<<< काय माध्यम आहे च्यायला झुरायचं, घसा??????
प्रियकर आणि मेघनाचे काही न होणे ह्यावरच मालिकेचे भवितव्य तूर्त अवलंबून आहे.
ऐवजी "कोण बोलत नाहिये?" असं
ऐवजी "कोण बोलत नाहिये?" असं विचारायला हवं होतं ना? >>>:D
<<त्या ऐवजी "कोण बोलत
<<त्या ऐवजी "कोण बोलत नाहिये?" असं विचारायला हवं होतं ना? >> दक्षिणा
त्या ऐवजी "कोण बोलत नाहिये?"
त्या ऐवजी "कोण बोलत नाहिये?" असं विचारायला हवं होतं ना?
काय इकडे एवढा शुकशुकाट?
काय इकडे एवढा शुकशुकाट?
आज मेघना 'बाबाजी लक्ष
आज मेघना 'बाबाजी लक्ष असूद्या' म्हणाली...
आ. दे. चा पाय बरा आहे, पण पूर्ण बरा नाही..
एकत्र जेवले (असावेत) आदे आणि मेघना...
बाकी विशेष नाही..
उरलेला वेळ 'सारेगामा' वर कोण जिंकणार याची जाहीरात, तेही शिरेलीमधे...
गोगा मस्तच विजया आणि अर्चू
गोगा
मस्तच
विजया आणि अर्चू फिरायला जायचे बेत करत आहेत मे महिन्याच्या सुट्टीत एक्सेप्ट आदित्य मेघना.
खर तर मेघना आणि आदित्यला
खर तर मेघना आणि आदित्यला जबरदस्तीने घराच्या लोकांनी फिरायला पाठवले पाहिजे. तर त्यांचे बरे जुळेल:) पण मग शिरियलच संपेल ना म्हणून अजून तस करणार नाहीत
ते सगळं ठीक आहे. पण कथेत
ते सगळं ठीक आहे. पण कथेत प्रियकर आणि मेघनाचं काय झालं पुढे? का काहीच नाही झालं? >>>
मेघना आणि तिचा आदु एकमेकांसमोर आले. आदित्यने मेघनाची 'ही माझी बायको' अशी ओळख करुन दिली. मग नेमका तेव्हाच त्याला महत्त्वाचा कॉल आला ( ह्यात काय आश्चर्य ! ) आणि तो तिथून निघून गेला. इथे एक भाग संपला ...
पुढच्या भागात ... मेघना आणि आदुने काही सेकंद एकमेकांकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी ( + तिने रडक्या चेहेर्याने ) पाहिले आणि तो तिथून निघून गेला. दोघं काहीही बोलली नाहीत एकमेकांशी.
प्रगती एवढीच की मेघनाने एका भागानंतर का होईना आदित्यला 'तोच माझा आदु' असे सांगितले ( हुश्श !!! ) त्यामुळे आता आदित्यची घालमेल चालू आहे आणि तो तिच्यावर चिडचिड करतोय.
बाबाजीवाले आता ज्योतिषाच्या
बाबाजीवाले आता ज्योतिषाच्या मागे लागले आहेत..
आता त्यांच्यात प्रेम होईल
आता त्यांच्यात प्रेम होईल कारण सगळे हॉलिडे ला सोलापुरात जातील..
नाना तिथे ही ज्ञानामृत पाजत सुटतील.. पण एन्जॉय करतील सगळे..
इथे आदित्य आणि मेघनाला एकांत मिळेल. मग लाईट जाईल, ही घाबरेल...मग ते एकमेकांना धडकतील आपटतील अंधारात..मग त्यांच्या लव्ह श्टोरी ला सुरुवात होईल...मग ते प्रेमात पडतील तो पर्यंत सगळे येतील....त्यांनाअ ही हा बदल जाणवेल..मग आनंदीआनंद.....
बाबाजी ला काही होप्स नाहीत बरे होण्याचे...त्या रडक्या माधवीचे तर नाहीच नाही...
आता मेघना चा कबुतराचा आवाज गायब आणि घशात गुरगुरणे कमी होउन जरा कोकीळा,चिमणी चा आवाज येईल.....
मग आ दे चा पाय बरा होईल...मग गाणं पण म्हणतील दोघे...जुळल्या अखेर रेशिमगाठी.....वगैरे अर्थाच...
आता आदित्य नगरकर ला राग येइल...आणि उसे मै हासिल करके रहुंगा वगैरे कसम खाईल तो...आणि मेघना ला त्रास देइल....मग तो विलनच होईल......
पण मेघना किंवा आ दे त्या आ न च्या मुस्कटात वाजवुन हे विचारणार नाहीत ....बाबा रे जेव्हा लग्न ठरत होत मेघनेच...तेव्हा ती तुला इतके फोन करत होती तेव्हा तु खुठे गेला होतास शेण खायला???
मग शिरेल अशीच अजुन एखादे वर्ष चालु राहील
त्या दोन शेजारणी अधुन मधुन झलक मारुन जातीलच
अर्चना सारखी तिथेच....जेवण पण जास्त करुन तिथेच असते त्यांच...ती ही जरा ईकडली काडी तिकडे करताना दाखवतील एखादे वेळ....
अजुन खुप काय काय आहे डोक्यात जस आ न काहीतरी करुन आ दे ला मारेल...मग एक वर्षा नंतर आ दे सर्जरी करुन येइल वगैरे वगैरे...पण ही केकतेची शिरेल नाही त्यामुळे मी ही जास्त डोक चालवत नाहीये...
बाकी बघण्या सारखं बरच आहे.......
समर हॉलिडे ला सोलापूर
समर हॉलिडे ला सोलापूर हिल्स्टेशन का निवडलं म्हणे ?
अनिश्का किती कष्ट घेतलेस
अनिश्का किती कष्ट घेतलेस
तिचे काका तिकडे रहातात
तिचे काका तिकडे रहातात
आणि त्यांच्या पानवेलीच्या
आणि त्यांच्या पानवेलीच्या बागेत गारवा असतो.
Pages