कलिंगडाचं झाड... पोटात

Submitted by दाद on 9 December, 2013 - 22:29

"...बी गिळ्ळिस ना?"... ह्या कानापासून त्या कानापर्यंत तोंडावर कलिंगडाची मोठ्ठी फोड लावून माझ्यासारखीच बाहीला तोंड पुसत एखादा वर्षानेच मोठा भाऊ किंवा बहीण डोळे मोठ्ठे करून विचारते.
दुपारच्या ह्यावेळी माझी जबाबदारी त्या मोठ्या भावंडावर आहे.
"... " मी नुस्तीच हो हो अशी हलवलेली मान.

"... वाट... वाट लागली आता. पोटात झाड उगवणार"
कशाचं ते विचारायलाच नको, अजिबातच.

कधीतरी सिताफळ किंवा अनवधानानं सफरचंदाचं बी गिळलेली मी ह्यावेळी जाम म्हणजे जाम टरकते. पोटातून सिताफळ, सफरचंद वगैरे माफक आकाराच्या फळांची झाडं ... ठीकय.
पण कलिंगड?

हे असं कितीतरी बाबतींत झालय. तुमचंही झालं असणार. कधी मुद्दाम भीती घातलीये किंवा आमिषही दाखवलय... ह्या मोठ्या म्हणवणार्‍यांनी.

काय तर म्हणे... गाजर खाल्लं की रात्रीचं दिसतं.

तुम्हाला आठवतय असलं काय काय?.. मोठ्यांनीच नाही... पण मित्रं-मैत्रिणींमधले प्रवाद... समजुती ज्या मोठं होता होता गैर ठरतात.

आता... सॅन्टाक्लॉजबद्दल नाही हं बोलायचं वेड्यासारखं. ख्रिसमसला प्रेझेंट हवय का नाही? वेडेपणा केलेल्यांना नाही मिळत सॅन्टाकडून कायपणच.

हं तर... सांगा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माकडाला नाक खाजवुन वेडावु नये. नाहीतर ते चिडतं आणि थोबाडीत देतं.
त्यांच्यासमोर डोकं ही खाजवु नये. नैतर लगेच ती आपल्याला बळजबरीने घेउन बसतात उवा काढण्यासाठी.>>>>>>>>>>>>>>> आर्या तु भारी आहेस... खूप हसले!!

चालताना मैत्रीणीच्या हाताला चुकुन हात लागला कि आपल्यच हाताची पप्पी घ्यायची, नाहीतर भांडण होतं!
हात धुतल्यावर हाताचं पाणी कुणावर शिंपडु नये ताप येतो.

बंगाल्यांमधे अजुन एक समजुत आहे (सासुबाई वय वर्षे ५२ अजुन मानतात) की मुलांच्या जन्मवाराला काहीही भाजु नये. (पापड, भुट्टा, वांग भरताला ई.)
मग त्या वारी सा.बुवा भरताची वांगे भाजतात Wink मज्ज आहे की नाई?

चहा पीला तर काळा नवरा मिळेल
( एकदा मामी ने हे ऐकवल्यावर तिला उलटुन विचरलं होतं की तु खूप चहा प्यायची का मग लहान पणी??)
ओरडा बसला खूप Wink Lol

माझ्या भावाने मला लहानपणी सांगितले होते की च्युईंग गम खाताना चुकुन गिळले गेले तर माणूस मरतो. खखोदेजा. म्हणून मी आयुष्यात एकदाही आजपर्यंत च्युईंग गम खाल्ले नाही.

Pages