कलिंगडाचं झाड... पोटात

Submitted by दाद on 9 December, 2013 - 22:29

"...बी गिळ्ळिस ना?"... ह्या कानापासून त्या कानापर्यंत तोंडावर कलिंगडाची मोठ्ठी फोड लावून माझ्यासारखीच बाहीला तोंड पुसत एखादा वर्षानेच मोठा भाऊ किंवा बहीण डोळे मोठ्ठे करून विचारते.
दुपारच्या ह्यावेळी माझी जबाबदारी त्या मोठ्या भावंडावर आहे.
"... " मी नुस्तीच हो हो अशी हलवलेली मान.

"... वाट... वाट लागली आता. पोटात झाड उगवणार"
कशाचं ते विचारायलाच नको, अजिबातच.

कधीतरी सिताफळ किंवा अनवधानानं सफरचंदाचं बी गिळलेली मी ह्यावेळी जाम म्हणजे जाम टरकते. पोटातून सिताफळ, सफरचंद वगैरे माफक आकाराच्या फळांची झाडं ... ठीकय.
पण कलिंगड?

हे असं कितीतरी बाबतींत झालय. तुमचंही झालं असणार. कधी मुद्दाम भीती घातलीये किंवा आमिषही दाखवलय... ह्या मोठ्या म्हणवणार्‍यांनी.

काय तर म्हणे... गाजर खाल्लं की रात्रीचं दिसतं.

तुम्हाला आठवतय असलं काय काय?.. मोठ्यांनीच नाही... पण मित्रं-मैत्रिणींमधले प्रवाद... समजुती ज्या मोठं होता होता गैर ठरतात.

आता... सॅन्टाक्लॉजबद्दल नाही हं बोलायचं वेड्यासारखं. ख्रिसमसला प्रेझेंट हवय का नाही? वेडेपणा केलेल्यांना नाही मिळत सॅन्टाकडून कायपणच.

हं तर... सांगा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिक्षेच्या नंबरच्या शेवटी ७८६ हे आकडे असले तर त्या पाटीला (नंबरप्लेट) हात लावायचा. लकी असतं. Uhoh

आम्ही लहानपणी ह्या नादात कितीतरी रीक्षांच्या धूळ भरलेल्या पाट्या आमच्या (त्या वेळच्या) चिमुकल्या हातांनी पुसलेल्या आहेत.

खेळतांना कुणी रुसलं की तिच्यासमोर सगळ्या जणी हाताची मुठ करुन उभ्या रहायच्या. (ही खरं म्हणजे पुढे होणार्‍या भांडणाची 'नांदी' असायची) आणि 'माझी मुठ उघड, माझी मूठ उघड' म्हणणार. मग जिची त्या रुसणारीणीने मुठ उघडली, तिच्यावर तिचा काही राग नाहीये असं समजायचं. जिची नाही उघडली, ती बिचारी विचार करत रहायची की मी हिला काय बोलले? माकाचु? ... मग रुसणारीचा बांध फुटणार आणि पुढची धुमशान!! >>>>>>>>>>>>>>>>> हो हो. आम्ही करायचो असं. Lol

मांजर / बेडुक यांनी पायावर शु केली की तिथे चामखीळ / मस येतो. Lol

ताटात काही टाकु नये ह्यासाठी "ताटात टाकलस की मुन्ग्या तुला ओढुन नदीला नेतील.
तिथे मगर असते" . Lol

जास्त साय खाउ नये. मोठेपणी मिशा येणार नाहीत.

कवडी दे हे आम्ही बगळा ते विमान अशा सर्वानाच म्हणत असु.

वावटळ / वादळ येतं त्यात मीठ टाकलं की भुत दिसत हे वर लिहिलच आहे.

आमावस्येला माळावर (जिथे ओसाड जागा आहे / माणसांचा राबता कमी आहे) वेताळाची पालखी निघते.

साळुंकीची जोडी दिसली तर काही तरी शुभ घडणार आणि गोड खायला मिळणार, Happy
एक साळूंकी दिसली तर बोलणी खावी लागणार किंवा मार मिळणार. Sad

माझ्या शाळेजवळच्या विहीरीत सात फण्यांचा नाग होता म्हणे, जाम टरकायची तेव्हा..

आकाशात चंद्र आणि एकच चांदणी असेल तर जे मागाल मिळते.
काही मागायचं म्ह्टलं की लगेच दुसरी चांदणी दिसायची Sad

आकाशात चंद्र आणि एकच चांदणी असेल तर जे मागाल मिळते. >>>> हे हे मी तर अजुनही मागते.

बाकी वरील सर्व आमच्याकडे पण

कुणाची टाच आपल्या टाचेला चुकुन खेळताना वगैरे लागली तर त्याला परत टाच द्यायची म्हणजे त्याला पण आपल्या टाचेने स्पर्श करायचा,, नाहितर मार मिळतो....
१ साळुंखी दिसली तर वाईट , दोन दिसल्यातर म्हणायच "दोन साळुंख्या राम राम, दोन साळुंख्या राम राम" मग गोड खायला मिळतो...

कुणाशी डोक्याला टक्कर झाली तर पटकन आपण म्हणायच ... " गाई गाई याला शिंग येउ दे, मला नको ... गाई गाई याला शिंग येउ दे, मला नको " Happy

लहान मुल झोपले असेल तर त्याच्या अंगावरुन जाउ नये नाहितर उंची वाढत नाहि... गेलो तर परत मागे यायच...

दोन डोक्यांच्या टकरी झाल्या तर.. ...थु...थु...थु.. करायचं! Proud
सापसुरळीच्या(हिला पाय असतात, पण बाकी एकदम सापासारखी दिसते) शेपटीला आपल्या हाताची करंगळी लावायची, मग परीक्षेत पास होतं. मी लावला होता आणि पास पण होत होते.
भारद्वाज पक्षाला ३/५ फेर्‍या मारल्या तर परीक्षेत पास होतं. Happy
चिचुंद्री घरात दिसली तर तिला मारु नये, ती लक्ष्मी असते.

राम की भूत हे प्रकर्ण आठवत नाहिये का कुणाला?
चॉकलेट/गोळी/बिस्किट इ काहीही खायची वस्तू खाली पडल्यास उचलून खाण्याआधी सोबत असेल त्याला विचारायचे. त्याने भूत म्हटले तर खायचे नाही. यासाठी किमान निम्मी लाच दिली तर युज्वली राम असे उत्तर येत असे.

Proud
हो Proud

आम्ही मैत्रिणींनी ठरवलेलं राम का भूत विचारताना दोन बोटं दाखवली तर राम म्हणायचं, एक बोट दाखवलं तर भूत म्हणायचं Lol

आणि समजा दुसर्‍या ग्रूपमधल्या कोणी येऊन विचारलं की भूतच म्हणायचं!
दुसर्‍या ग्रूपमधल्या मुला-मुलीसाठी राम म्हणलं तर त्या मुलीशी/ मुलाशी आम्ही खेळायचोच नाही Rofl

इथल्या लहान मुलामुलीत एक समज होता की रस्त्यात बाजूला स्मशान दिसले तर श्वास घ्यायचा नाही, डोळे बंद करायचे नि बोलायचे नाही. कारण स्मशानात पुरलेल्या लोकांना श्वास घेता येत नाही, बघता येत नाही, बोलता येत नाही, म्हणून आपण तसे केले तर ते आपल्यावर रागावतील नि रात्री घरी येऊन घाबरवतील.

नसेल विचारलं, ती छकुली कदाचित कलिंगड की सिताफळ अशी वाट पहात असेल.:)

हातावर फुटलेल्या बांगडीचा तुकडा तोडायचा, तळहातावर छोटा टवका उडाला, की "आवडती राणी" होशिल असं समजायचं

आकाशात बगळ्यांची माळ दिसली की हाताची नखं एकमेकांवर घासुन 'बगळ्या बगळ्या कवडी दे' म्हणायचं. काही वेळेस नखांवर पांढर्या आडव्या रेषा दिसतात/ असतात. मग त्या एकमेकींना दाखवुन म्हणायचं, " बघ, मला बगळ्याने कवडी दिली"! फिदीफिदी
४) एक लहानसं जमिनीलगत वाढणारं झुडुप असतं. त्याचं छोटसच फुल अंगठा व तर्जनीच्या नखांमधे पकडुन म्हणायचं, " रावणा, तु सितेला का पळुन नेलस, तुझं मुंडकच तोडीन"! असं म्हणुन नखाने ते फुल त्वेषाने खुडायचं.>>
Rofl खुपच हसले..
बाकीच्यांनी लिहिलेलें ही फनी आहे. मी कधी ऐकलं नाही असं काही. पण हां, ते दात पडला की छतावर फेकायचा हे माहीत आहे. मी फेकले पण आहेत. Happy
अजून एक- सरदारजी दिसला की ३ टाळ्या वाजवायच्या म्हणजे गोड खायला मिळतं. एका वर्षी माझ्या वर्गात एक सरदार मुलगा नव्याने आला. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मी आणि काही मैत्रिणी रोज तो दिसला की टाळ्या वाजवायचो. बिचारा कुलप्रीतसिंग Rofl कित्येक वर्षाने आठवला हा आचरटपणा...

१. मीठ खाली सांडलं की स्वर्गात पापण्यांनी वेचावं लागतं.

२. मौंजीच्या वेळेस तु झोपल्यावर तुझ्या दंडात दंड कापून बेडकी भरतील अशी भिती घरातील मोठी मंडळी दाखवायचे.

३. डोक्यांची टक्कर झाली तर लगेच झाडाखाली थुंकायचं नाहीतर शिंगं येतात Sad

हायला काय योगायोग आहे.

मी अगदी कालच सीताफळाची बी गिळली आणि मी नेहमीप्रमाणेच उगाच कावरी बावरी झाले पाहून सगळे घरातले एका सुरात, आता झाड येणार पोटात....

लहानपणी अगदी हेच म्हणून त्रास द्यायचे मी जेव्हा दुसर्‍या कोणाच्या पोटात बी गेली की...

जाम हसायला आले... कारण निव्वळ योगायोग कसा झाला ना...

मोठ्यांनी घातलेली भिती... पपईची बी ओलांडली तर माणूस आंधळा... अजूनही मी ओलांडत नाही. उगाच भिती....ठाम भरलेली आहे.

तक्कर झाली तर शिंग.

पाल पडली तर काहीतरी होतं.. पण विसरले आता..

सगळी मुलं जेव्हा एकत्र असतात तेव्हा जर कोणाला वारा सरला तर कसा ओळखायचा?

......
......

खेळायच्या आधी डाव सोडवताना १०, २०, ३०... १०० म्हणतात ना त्या धर्तीवर "आदा पादा कोन पादा, रामोजीचा घोडा पादा" हा मंत्र म्हणायचा. शेवटचे अक्षर ज्याच्यावर येते, तो "कर्तबगार" समजावा. Happy

भारी आहेत सगळे प्रकार , वेबमास्तर Lol
कलिंगडाचं झाड... पोटात >>> आज मला नेमकं 'सुनो ना' सिनेमाच प्रेग्नंट हिरोईन हातात कलिंगड घेऊन उभी असलेलं पोस्टर दिसलं , काय पण योगायोग Lol

हो हो वरचे सगळेच केले आहे Lol

पापणीचा केस तळ हातावर घेउन डोळे मिटुन वीश करुन फुंकरला तर ती पुरी होते Happy

काय मस्त धागा. बर्‍याच विस्मरणात गेल्या होत्या, पुन्हा आठवल्या.

शाळेतल्या अनेक समजुतींपैकी एक म्हणजे कथाच होती. ती अशी... घुबड दिसले की त्याला दगड मारायचा नाही. जर मारला व त्याने तो झेलला तर ते घुबड तो दगड नदीकिनारी नेते व तिथे घासsssत बसते. मग जेव्हा तो दगड झिजुन झिजुन संपेल तेव्हा दगड मारणारा मरणार. ही समजुत पुर्ण शाळेत पक्की होती.
एकदा मधल्या सुट्टीत तिसर्‍या मजल्यावरच्या वर्गाच्या खिडकीत एक घुबड बसलेले दिसले. मग काय, हीsss गर्दी खाली जमिनीवर. आरडाओर्डा (हळुहळुच बरका, घाबरलो होते सर्वजण आम्ही).. १०-१५ मिनिटे तशीच गेली. मग एका मोठ्या (नववी-दहावीतल्या) मुलाने त्याला एक छोटास्सा दगड मारला तर घुबड पटकन ते पकडायला झुकले व हात पुढे केला. त्याक्षणी गर्दीतुन घाबरल्याचे उद्गार निघाले व दगड मारणारा हवालदील .. पण तो दगड घुबडाला पकडता आला नाही व दगड खाली पडला. त्या मुलाने अक्षरश: हर्षवायु होऊन 'सुटलो' असा भाव चेहर्‍यावर आणुन मित्राला गळामिठी मारली.. Proud

शाळेच्या बाहेर स्मशान होते. तिथुन जाताना जर एखाद्या थडग्यावरील नाव वाचले तर तोच माणुस भुत बनुन दर्शन देतो अशी समजुत. त्याची प्रचिती घेण्याची ओढ भयंकर लागली होती कित्येक महिने, वर्षे. ७-८वीत एकदा दुपारी तिथुन कुठेतरी निघाले असताना शेवटी मनाची जबरदस्त तयारी करुन एक नाव वाचलेच व वाट पहात बसले दर्शनाची. धाडसाचा शुन्य उपयोग झाला. Proud

आईशप्पथ... कस्ल्या एकेक भन्नाट समजुती नै?
ह्यातल्या अनेक माझ्याही होत्याच.

स्वप्नात भूत-बीत आलं तर उशीखाली कोयता घेऊन झोपायचं.
अदिती, पापणीचा केस... मी अजून करते मज्जा म्हणून.

ते टक्करींचं, शिंगांचं अगदी अगदी झालं.

Happy खुप आठवणी ताज्या झाल्या.
१. परिक्षेला जाताना तुळशीच पान खाणे/खिशात/कंपास पेटीत ठेवणे, पेपर सोप्पा जातो.
२. कोणत्याही मुक्या प्राण्याला मारले की, पूढच्या जन्मी तो बदला घेतो.
३. मोठा भाउ/ काका, चंद्रावरच हरीण पहायचं का म्हणुन विचारयचे, हो म्हणलं की पाठीमागुन दोन्ही हाताने कानाजवळ पकडुन मुंडकं उचलायचे. कानाजवळ पकडल्यामुळे वेदना होत, दिसले नाही तरी "दिसले, दिसले ..." म्हणुन त्यांच्य तवडीतुन सुटका करुन घ्यायची.
४. दिव्यासोबत खेळू नये, नाही तर रात्री चड्डी ओली होते.
५. कात्री उगाच चलवू नये, भांडणे होतात.
६. दात पडला की जमीनीत पुरावा, लवकर दुसरा दात येतो.
७. टिव्ही फुटला की त्यातुन शिंग असलेला राक्षस बाहेर येतो.
८. खोट बोललं की देव पाप देतो Happy , शिंग देतो/ शेपूट देतो, बावा/बाबा पकडून नेतो Happy . कधी खोटं बोललेल उघडकीस आलं की आई भीती दखवे की उद्या तुला पकडुन नेणार, मग खुप रडारड, "बोलशील का परत खोटं, नाही म्हण मग, मी सांगते नका नेऊ म्हणुन" मग परत खोटं नाही बोलणार अस कबूल करुन सुटका करुन घ्यायची.

१. कुणीतरी हातावर मीठ देत असेल तर ते तळहातावर न घेता उलट्या हातावर घ्यायचे असा एक समज होता.

२. आपला जन्म झालेल्या वाराला केस कापले तर पुढच्या जन्मी आपण न्हावी होतो असा एक अत्यंत टुकार समज आम्ही वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत जोपासला... शेम ऑन अस Sad

Pages