कलिंगडाचं झाड... पोटात

Submitted by दाद on 9 December, 2013 - 22:29

"...बी गिळ्ळिस ना?"... ह्या कानापासून त्या कानापर्यंत तोंडावर कलिंगडाची मोठ्ठी फोड लावून माझ्यासारखीच बाहीला तोंड पुसत एखादा वर्षानेच मोठा भाऊ किंवा बहीण डोळे मोठ्ठे करून विचारते.
दुपारच्या ह्यावेळी माझी जबाबदारी त्या मोठ्या भावंडावर आहे.
"... " मी नुस्तीच हो हो अशी हलवलेली मान.

"... वाट... वाट लागली आता. पोटात झाड उगवणार"
कशाचं ते विचारायलाच नको, अजिबातच.

कधीतरी सिताफळ किंवा अनवधानानं सफरचंदाचं बी गिळलेली मी ह्यावेळी जाम म्हणजे जाम टरकते. पोटातून सिताफळ, सफरचंद वगैरे माफक आकाराच्या फळांची झाडं ... ठीकय.
पण कलिंगड?

हे असं कितीतरी बाबतींत झालय. तुमचंही झालं असणार. कधी मुद्दाम भीती घातलीये किंवा आमिषही दाखवलय... ह्या मोठ्या म्हणवणार्‍यांनी.

काय तर म्हणे... गाजर खाल्लं की रात्रीचं दिसतं.

तुम्हाला आठवतय असलं काय काय?.. मोठ्यांनीच नाही... पण मित्रं-मैत्रिणींमधले प्रवाद... समजुती ज्या मोठं होता होता गैर ठरतात.

आता... सॅन्टाक्लॉजबद्दल नाही हं बोलायचं वेड्यासारखं. ख्रिसमसला प्रेझेंट हवय का नाही? वेडेपणा केलेल्यांना नाही मिळत सॅन्टाकडून कायपणच.

हं तर... सांगा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलींनी पालथी मांडी घालून बसणं त्यांच्या मामासाठी वाईट.
मुलींनी चामड्याचं वाद्य वाजवलं तर स्वयंपाक अळणी होतो.... (माझ्या स्वयंपाकात हटकुन मीठ जास्तं असतं त्यामुळेच बहुतेक).

आता.... मी माझ्या लेकाला असा 'बनवला' होता...
सगळं (म्हणजे त्याला आवडत नाही ते सगळं... पालक, बीन्स वगैरे) खाल्लं तर वाढदिवसाच्या दिवशी उंची वाढते.

अर्थात मग वाढदिवसाच्या आदल्या दिवशी उंची मोजणं आलं... ती खूण मी रात्री पुसुन थोडी खाली परत करून ठेवणं आलच आलं. Happy
आमचे चिरंजीव सगळं (जवळ जवळ) खात होते बरेच मोठे होईपर्यंत.

हं... तर आता तुम्ही तुमच्या पोरा-बाळांना कसं बनवलय ते सुद्धा मोकळेपणाने इथे लिहायला हरकत नाही Happy

लहानपणी आज्जी मला किर्तन / प्रवचनाला घेऊन जायची आणि किर्तन / प्रवचन ऐकताना झोपले तर पुढचा जन्म डूकराचा मिळतो असे सांगायची. त्यामुळे मी अगदी डोळे ताणून ताणून जागे रहाण्याचा प्रयत्न करायचे तरी कधीतरी झोप लागायचीच Happy

मस्त धागा काढल्या बद्दल धन्यवाद.
१. येता जाता जे कुठले देवूळ दिसेल त्याला नमस्कार
२. दिसेल त्या गायीला हात लावून नमस्कार त्याआधी ती गाय च आहे ते चेक करणे
३. वाटीतून पाणी प्यायले की मामा भिकारी होतो म्हणे
वरच्या सगळ्या पोस्टी मधले निम्मे तरी लहानपणी खरे मानले होते.
बापरे काय धास्तीत लहानपण काढले आहे आपण !!!

Proud वरच्या बर्याच गोष्टी - पपई, मूंजीतला बेडूक, बगळे Happy

मला लहानपणी पालथं झोपायची सवय होती म्हणून काका सांगायचे की असं झोपल तर रात्री पाठीवर माकड बसतं. पण काही उपयोग झाला नाही मी अजूनही पालथीच झोपते Wink

माकडाला नाक खाजवुन वेडावु नये. नाहीतर ते चिडतं आणि थोबाडीत देतं.
त्यांच्यासमोर डोकं ही खाजवु नये. नैतर लगेच ती आपल्याला बळजबरीने घेउन बसतात उवा काढण्यासाठी.
हाहा, आमच्या लहानपणी आमच्या एरियात माकडांची टोळी आली होती तेव्हा ती पहायला जातांना चुकुनही आम्ही हात नाकाकडे किंवा डोकं खाजवायला नेत नव्हतो.

सगळंच अगदी अगदी!!!
भारी धागा! Happy
नवरा/ नवरीने काम केलं (त्यांच्याच लग्नाची कामे - जी इतरांनी करायची असतात (करतातच ते) ) की लग्नात पाऊस पडतो.
पुरूषांनी डायरेक्ट शिजवलेल्या भांड्यात खाऊ नये नाहीतर दुष्काळ पडतो. Proud

कच्चे तांदुळ खाल्ले की लग्नात पाउस पडतो म्हणे.

माझं लग्न ऐन कडक उन्हाळ्यात असुन देखील मी सारखं आभाळ आलय का बघत होतो. Proud

webmaster _/\_
सोमवारी भावांच्या बहिणीने ( भाऊ असलेल्या मुलीने ) केस धुवायचे नाहीत.
मीठ हातात द्यायचं नाही भांडण होतं ..

अजुन एक-दोन गोष्टी..

वाटीतून पाणी पिऊ नये. दळिद्र येतं म्हणे.
डोक्यावर डोकं आपटलं तर पुन्हा एकदा हलकेच आपटायचं नाहीतर शिंग येतात.
जेवतांना ताटावर आळस/ जांभई दिली तर पुढच्या जन्मी गाढव होतो.
कुणालाही काहीही देतांना ३ या संख्येत देउ नये. २ किंवा ४ द्यावेत.

किती मस्त धागा आहे. आणि यातल्या बर्‍याच समजुती अंगात पार भिनल्या आहेत. आता काहीच मानत नाही पण यातली गंमत अनुभवली आहे.

अनेक बाबींवर अगदी अगदी.
फळांच्या बिया, शनिवारी नखे/केस कापणे, संध्याकाळी दही/तेल न देणे/आणणे, बुरखा दिसला की बटणाला हात, साळुंकीची जोडी मग गोड, पापणीचा केस आणी मनातली इच्छा बोलणे, बगळे, हातावर मीठ, वाटीतलं पाणी, सगळं सगळं लहानपणी भरपूर पाळलं आहे. Happy

"... लहान मुलान्नी फोड्णीचा भात खाल्ला की बुध्धी मठठ होते ....."

(यामागचा खर कारण अस होत की रात्रीचा भात थोडाच उरलेला असायचा .... मग त्याचा फोड्णीचा भात बाबान्ना आणी अम्हाला मात्र माउ भात किन्वा असच दुसर काही तरी सो कोल्ड हेल्दी ...
त्या नन्तर किती तरी वर्ष चुकून कधी तरी फोड्णी चा भात खाताना .... आपण उद्या मठ्ठ नाही ना होणार अशी भीती वाटायची......

....खोट बोलला तर नाक / कान मोठे होतात...

एकदा काकूच्या उपवासा दिवशी तिच्या साठी केलेल थालीपीठ चुलत बहिणीबरोबर चोरून खाउन टाकल....
अणि वर विचारल्यावर साळसूद पणे "काय की बॉ ....." असा उत्तर देऊन पळालो.....
............ मग काकूने असच बोलता बोलता सान्गितल की ....खोट बोलला तर नाक / कान मोठे होतात... सगळा दिवस दोघी आपापले नाक / कान सार्खे तपासत होतो....
.......... शेवटी तो ताण असह्य झाल्यावर गुपचुप कबूली दिली. ..... ओरडा बसला पण नाक / कान व्यवस्थित राहिले याचाच आनन्द झाला....

वाटीतून पाणी पिऊ नये. दळिद्र येतं म्हणे. >>> लहानपणी आई सांगायची वाटीतून पाणी प्यायल की मामा गरीब होतो अजूनही पीत नाही

सोफ्यावर बसल्यावर पाय हलवले की आई वारते Sad

अजूनही घरातले सांगतात नखं खाल्ली की कर्ज वाढत (मी खुप नखं खातो :फिदी:)

लहान बाळाने अंगावर शि शु केली की नविन कपडे मिळतात

केरसुणीला पायगाला की मातोश्री केरसुणीचा एक बारीक तुकडा काढून ओवाळून टाकते

भूत दिसलंतर त्याची शेंडी कापायची आणि कोऱ्या चाहत उकळवून प्यायची, परत मागायला आलं की हवं ते मागून घायचं आणि त्याला समुद्राच्या लाटा मोजून ये मग शेंडी देतो सांगायचं Rofl

मीसुद्धा सांगते माझ्या मुलाला, तो तीन वर्षाचा असल्यापासून, पडलास तू तर त्यात वाईट कशाला वाटून घेतोस, उंच व्हायला होतं पडल्यानंतर.

किती मस्त धागा आहे. ह्या बर्‍याच गोष्टी केल्यात लहानपणी ...भारी ...मस्तच दादा....:-)
१. कोल्हा दिसला कि दिवस चांगला जातो.
२. मुंगुस दिसला कि..."मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शप्पथ आहे." असलं म्हणायचं.
३. खिडकीत कावळा ओरडला कि पत्र येत.
४. जमिनीवर मातीती रेषा मारल्या आणि त्यावरून गाय पाय देवून गेली कि आई मरते.(म्हणून शाळेत जाताना हाच उद्योग त्या रेषा पुसत जाणं)
५. एकाच पायात चप्पल घातली कि विंचू चावतो म्हणे.

कोळी (स्पायडर) कपड्यांवर आला की नवीन कपडे मिळतात.
मांजरीच्या अंगावर पाणी टाकलं तर्/पाल मारुन टाकली तर सोन्याची करुन द्यवी लागते!

Pages