Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी
शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी २०१४ : अपडेट
~ चार स्त्रिया दिवाणखान्यात बसून शरयूच्या वागण्याबद्दल चिंतेने तसेच चिडीने चर्चा करत आहेत. प्रमुख अर्थातच बेबीआत्या. ती म्हणते, "ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे...!" नर्मदा आणि सरसूमावशी बेबीला आणि इंदूला शांत राहून शरयूबाबत अशी टोकाची भूमिका न घेता तसेच आजीना हे सारे न कळता यातून काय मार्ग निघतो का ते पाहू असे सुचवितात. नाईलाजाने का होईन पण बेबीआत्या होकार देते. मग जान्हवीला यात मध्यस्थ म्हणून घ्यावे कारण शरयूचे तिच्यावर चांगलेच प्रेम आहे; दोघींचे जमतेही छानपैकी त्यामुळे ती जान्हवीचे ऐकेल असे ठरते. जान्हवीला फोन करण्यात येतो. नर्मदाबाई तिच्याशी बोलतात त्यावेळी ती रस्त्यातून चालत येत आहे. ती विचारते, "आई तुमचा आवाज असा का येत आहे ?" त्यावर नर्मदाबाई, "ते मी तुला इथे आल्यावर सांगते. तू लवकर ये..." आणि फोन ठेवला जातो. त्यानंतर नर्मदाबाई शरयूच्या रूममध्ये जातात. तिथे शरयू कसलाही प्रतिसाद देत नाही त्याना...उलट "माझे डोके दुखत आहे मी पडते थोडा वेळ...." असेच वारंवार सांगते कारण सायंकाळचे साडेसात होत आलेत....आणि तिला नवर्याला भेटायला जायचे आहे हे समजतेच. मात्र नर्मदाबाईना तिची तब्येत ठीक नाही असेच वाटते म्हणून तिला झोपायला सांगतात आणि रूममधून निघून जातात. खाली किचनमध्ये मग त्या आणि सरस्वती जेवणाच्या तयारीला लागतात. जेवण करता करता नर्मदाबाई शरयूच्या डोकेदुखीचा उल्लेख करतात....आणि ती जेवणार नाही असेही सांगतात. पण सरस्वती "जेवणार नसेल तर मग मी तिला आले घातलेला चहा देवून येते..." असे म्हणत शरयूच्या रूममध्ये जातात. तिथे कॉटवर पसारा पडलेला आहे....चादर आहे, ती ओढली जाते तर खाली उशा अंथरल्या आहेत. सरसूला धक्का बसतो...म्हणजे शरयूने डोकेदुखीचे नाटक केले आहे आणि आपण कुणी इथे नसताना ती निघून गेली आहे. बाकीच्या तिघीही तिथे येतात. त्यांच्यात आता शरयू जणूकाही कायमचेच घर सोडून गेली की काय या संभ्रमात पडतात. आजींना ही बाब सांगितलीच पाहिजे असा बेबीआत्याचा आग्रह होतो. तिच्या संतापाला नर्मदा वा अन्य आवर घालू शकत नाहीत.
या दरम्यान श्री बसस्टॉपवर त्या पैसे देणार्या प्रवासी मित्राची वाट पाहात थांबला आहे. तो अजूनी आलेला नसल्याने श्री जान्हवीला फोन करून त्याचा मोबाईल नंबर मागवून घेतो आणि फोन जोडण्याचा प्रयत्न करत राहतो; पण त्याला "मोबाईल स्वीच ऑफ" असा संदेश सातत्याने येत राहतो. श्री फोन बंद करून घरी निघतो.
जान्हवीची कार रस्त्यात बंद पडली आहे. ड्रायव्हर किरकोळ दुरुस्ती आहे असे तिला सांगतो, तेव्हा ती तिथेच इकडे तिकडे पाहात थांबते. सायंकाळची ट्रॅफिक आहे. जान्हवीचे लक्ष समोर जाते. तिला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. कारण एका भेळेच्या वा चाटच्या गाडीजवळ शरयू आणि तिचा नवरा [अर्थात जान्हवीला तो इसम शरयूचा नवरा आहे हे माहीत नसते....ती फक्त शरयूचा आनंद पाहात आहे] हसतखेळत उभे आहेत. खाणेपिणे गप्पागोष्टी झाल्यानंतर शरयू रिक्षाने गेल्याचे दिसते. थोड्या वेळाने तो इसम आईसकांडी खातखात जान्हवीजवळ आला आहे आणि तिला हसत "हाय..." म्हणतोय. नकळत धक्का बसल्याप्रमाणे जान्हवी स्तब्ध उभी आहे.
मामा मस्त अपडेट्स. आता
मामा मस्त अपडेट्स. आता जान्हवी बहुतेक आजींना मनवून शरयूच्या नवऱ्याला घरी आणेल, तसेच श्रीचे बाबा येतील, चला येत्या काही दिवसात गोखल्यांच्या घरातील स्त्रियांची मक्तेदारी कमी होईल, मालिकेत रंगत येईल, मामा तुम्ही बघत राहा, डिटेल अपडेट्स देत राहा, मी वाचत राहीन.
अन्जू.... असे व्हावे ही तर
अन्जू....
असे व्हावे ही तर सर्वांचीच इच्छा असणार....पण ते लागलीच होईल याची शक्यता मात्र फारच धूसर....शेवटी हे नाट्य कुठपर्यंत न्यायचे हे निर्माता-दिग्दर्शकच ठरविणार, तेही विसरून चालणार नाही.
मात्र श्री शिवायही अन्य पुरुष पात्रांनी कथानकात प्रवेश केला वा करणार असल्याने कथानकातील रंगत वाढेल हे नक्की.
हो बरोबर आहे तुमचे मामा,
हो बरोबर आहे तुमचे मामा, कथानक स्लो स्लोच पुढे नेणार, तुमचे पेशन्स ट्राय करणार, पण मला माहितेय तुम्ही लाडक्या जान्हवीसाठी ते सहन करणार आणि आम्हाला अपडेट्स देत राहणार.
तू समोर येच कशी आता !!!! एवढी
तू समोर येच कशी आता !!!! एवढी देखणी आणि नाजूक भाची माझी ती डोम्बिवलीची आणि तू तिला थोराड म्हणत्येस ???>>> आता आहे तर आहे ना थोराड आपण काय करणार?? आणि डोंबिवलीची आहे म्हणुन तिने नाजुक असाव असा नियम आहे का?? कल्याण-डोंबिवलीच्या मुली लग्नाआधी थोराड दिसतात स्वानुभव आहे... आता लग्न होउन पुण्यात आली की दिसेल नाजुक
हाही स्वानुभवच.... 
मामा, अर्थात जान्हवीला तो
मामा,
अर्थात जान्हवीला तो इसम शरयूचा नवरा आहे हे माहीत नसते....ती फक्त शरयूचा आनंद पाहात आहे>>>>>> ती नुसतीच बघत राहते याच आश्चर्य वाटल मला. ती आज्जीबात तिथे गेली नाही????
बेफिजी,
तुमचे अपडेट्स कुठेत????
मधुरा.... ती आपल्या कारजवळच
मधुरा....
ती आपल्या कारजवळच थांबलेली आहे हे दाखविले आहे....ते मान्य. रस्ता क्रॉसिंग करून तिने त्या दोघांजवळ जाऊन शरयूला ओशाळवाणे करावे असे तिला वाटले नसावे [हा माझा एक तर्क].
अर्थात शरयूचा नवरा जान्हवीजवळ आला आहे....तो बोललाही आहे....आज बहुधा पुढील संवादही होईल असे वाटते.
शययूचा नवरा जान्हवीला ओळखतो
शययूचा नवरा जान्हवीला ओळखतो का?
बेफिजी,
तुमचे अपडेट्स कुठेत???? +++१११
मामा तुमचे अपडेट्स नेहमी प्रमाणे चांगले
अदिति... कथानकाच्या
अदिति...
कथानकाच्या बांधणीवरून तरी असे समजायला हरकत नाही की लक्ष्मीकांत जान्हवीला नक्की ओळखत असेल. शरयू त्याला रात्रीच्या समयी नेहमी भेटत असते. जेव्हा हे दोघे भेटतात त्यावेळी "गोकुळ" बंगल्यावरील घडामोडींचा विषय त्यांच्यात असणार हे तर उघडच आहे. शरयूने श्री च्या लग्नाबद्दल नवर्याला सांगणे ही बाबही गृहित धरावी लागेल...मग त्या अनुषंगाने जान्हवीचा उल्लेख....त्याने केव्हातरी तिला श्री समवेत पाहिले असणे....असा अंदाज करता येईल....कारण कालचे त्याचे तिच्याकडे पाहून स्मित करणे ओळखीचाच एक भाग दिसला.
कारण कालचे त्याचे तिच्याकडे
कारण कालचे त्याचे तिच्याकडे पाहून स्मित करणे ओळखीचाच एक भाग दिसला.>>>
शरयूचा नवरा जान्हवीला 'मी तुम्हाला काही मदत करू का?' असं विचारताना पुढच्या भागात दाखवतील
शरयूचा नवरा जान्हवीला 'मी
शरयूचा नवरा जान्हवीला 'मी तुम्हाला काही मदत करू का?' असं विचारताना पुढच्या भागात दाखवतील >> मग तो सुधारून कार मॅकॅनिक झाल्याचे पण दाखवतील.....
लोकं किती डोकं लावतायत मालिका बघताना!!!!!!!!
झाल बै लगीन ...जाणू आणि श्रीच
झाल बै लगीन ...जाणू आणि श्रीच
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5613287887842957865&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20140208&Provider=-&NewsTitle=श्री-जान्हवी अडकले विवाह बंधनात>>>
मुग्धा, अग काहीही काय
मुग्धा, अग काहीही काय सांगतेस, कल्याण-डोंबिवलीच्या मुली लग्नाआधी थोराड वगैरे, चांगल्या नाजूक असतात, लग्नानंतर थोराड होतात, स्वानुभव. आता जान्हवी जरा कमी नाजुक आहे (मामा आता मला मारणार).
चला शशांक आणि तेजश्रीचे अभिनंदन.
लग्न झाले....खरेखुरे.....भाची
लग्न झाले....खरेखुरे.....भाची अडकली आमची अखेरीस ! वैवाहिक आयुष्य सुखसमाधानाचे जावो, हीच प्रार्थना.
[ बाकी जावईबापूनी प्रत्यक्ष लग्नातदेखील दाढी केल्याचे दिसत नाही....फोटा पाहिला "सकाळ" मध्ये ]
अन्जु माझा अनुभव बरोब्बर उलट
अन्जु माझा अनुभव बरोब्बर उलट आहे... आता जान्हवी जरा कमी नाजुक आहे (मामा आता मला मारणार).>>>> कदाचित नाही मारणार, तु त्यांच्या सग्गळ्यात लाडक्या भाचीची गाववाली ना??
(आता मला मारणार मामा)
अन्जू.....तुला काय बोलायचे ते
अन्जू.....तुला काय बोलायचे ते बोल....या मुग्धटलीकडे अजिबात लक्ष देवू नकोस.
मामा अन्जु आता जान्हवी जरा
मामा अन्जु आता जान्हवी जरा कमी नाजुक आहे अस म्हणाली.... आयला हे बरय आम्ही काही म्हटल की बघतोच तुझ्याकडे आणि अन्जु काही म्हणाली की तुला काय बोलायचय ते बोल??? असा भेदभाव शोनाहो मामांना
मामा हा हा हा. मुग्धा अग मी
मामा हा हा हा.
मुग्धा अग मी जान्हवीची गाववाली नाही, ती माझी गाववाली, मी मोठी आहेना, मी तिच्या आधीपासूनच डोंबिवलीत राहते.
मामा बोलाहो मला बिनधास्त,
मामा बोलाहो मला बिनधास्त, तुमच्या बेक्कार म्हणण्यातपण प्रेम दडलंय.
.
.
मुग्धा अग मी जान्हवीची
मुग्धा अग मी जान्हवीची गाववाली नाही, ती माझी गाववाली, मी मोठी आहेना, मी तिच्या आधीपासूनच डोंबिवलीत राहते.>>>>> तेच ग ते अन्जु... बादवे अन्जु तेजश्रीची जन्मतारीख माहित्येय का ग? तु कधीपासुन आहेस डोंबिवलीत?
(No subject)
संपादन.
संपादन.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowpics/msid-30042763.cms
जैसी आपकी इच्छा अन्जुजी
जैसी आपकी इच्छा अन्जुजी
मंजुडीला काय झाले? डोळे फिरवत निळी का पडली??
मंजुडीला काय झाले? >>> काय
मंजुडीला काय झाले? >>> काय चाल्लंय इथे??
तुम्हाला मायबोलीबद्दल, या मालिकेबद्दल जिव्हाळा वाटतो हे ठीक आहे, पण त्या नादात किती वाहवत जायचं, कोणाची किती वैयक्तिक चौकशी करायची त्याचे कृपया भान राखा. इथे लिहित नसले तरी इतर अनेक हजारो लोक हा बाफ वाचत असतात हे लक्षात असू द्या.
यस मंजूडी, sorry.
यस मंजूडी, sorry.
ओळख नसताना आमच्या जानूकडे
ओळख नसताना आमच्या जानूकडे बघून लक्ष्मीकांत का हसला ?
अजूनही वायाच गेलेल्या अवस्थेत आहे की काय ?
मंजुडी सॉरी,
मंजुडी सॉरी,
अरेच्या!! मला कशाला सॉरी
अरेच्या!! मला कशाला सॉरी म्हणताय?
आपण (सगळ्यांनीच) सोशल नेटवर्किंग साईटवर आहोत याचे भान बाळगायला हवे एवढंच म्हणणे आहे. ते मामा-भाची-जावई वगैरे जरा अतिच होतंय..
Pages