Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मृणाल....आणि
मृणाल....आणि जान्हवी....
धन्यवाद मी म्हणतोच तुम्हाला....पण तुम्हीच उद्या म्हणाल, "मामा कधी भाच्यांना धन्यवाद देतो का ?" त्यामुळे दिले असे वाटले तरी ते दिलेले नाहीतच असे समजून स्वीकारा.
बाकी "मृणाल" हे नाव मला खूप आवडते...विशेषतः या नावाचे बंगाली रुपडे "मृण्मयी"....फार शांत लोभस नाव आहे.
- अहो तुम्ही कशाला धन्यवाद देता मामा. बर वाटते इथे आल्यावर.
माझ नाव आवडल्या साठी खास धन्यवाद.
मृणाल = 'मृणालिनी'चे लघु रूप - इथे येताना नाव थोडे अधिक सोपे केले
मुग्धटले.... "...बेबी आत्याला
मुग्धटले....
"...बेबी आत्याला बर वाटलय पण त्याचबरोबर जान्हवीच वाढत महत्त्व तिला खटकतय अस दिसल..."
~ नाही, तसे नाही दिसल्ये मुग्धे.....आज परत मी तो भाग पाहिला, त्यात उलटपक्षी बेबीआत्याच्या चेहर्यावर जान्हवीविषयी कृतज्ञतेचेच भाव दिसले मला.
@ मृणाल.... "मृणालिनी"....हो, तुझ्या नावाविषयीही इथे चर्चा झाल्याचे तू वाचले असशीलच.
हो. म्हणूनच तर पोस्ट लिहिली
हो. म्हणूनच तर पोस्ट लिहिली मी मामा.
सोमवार दि. २७ जानेवारी २०१४ :
सोमवार दि. २७ जानेवारी २०१४ : अपडेट
~ जान्हवी व श्री यांची जोडी फ़ोनवर निवांत गप्पा मारीत आहे. त्याला ऑफ़िसला यायला वेळ झाला आहे. जान्हवीला वाटते तिच्यामुळे याला वेळ लागला पण तो ट्रॅफ़िकमुळे कसा अडकलो याचा वृत्तांत देण्याच्या तयारीत आहे तोच त्याच्या टेबलसमोर लव्हाटेबाई येतात. त्यांची अवस्था रडणे आवरत आलेल्या कर्मचार्यासारखी झाली आहे. त्या श्री समोर आपले दु:ख पुन्हा मांडतात. लव्हाटे पतीपत्नीला दीड वर्षाचा मुलगा आहे आणि तो आजारी आहे, शिवाय त्यांचे पती रात्रपाळी असणा-या नोकरीवर जात असल्याने ते सकाळी जोपर्यंत घरी येत नाहीत तोपर्यंत मिसेस लव्हाटे याना घर सोडता येत नाही, त्यामुळे साहजिकच त्याना ऑफ़िसला येण्यासाठी वेळ होत आहे. अर्थात ती कसर त्या सायंकाळी जास्त वेळ कार्यालयात थांबून भरून काढीत असतात. पण शिस्तीच्या नावाखाली भागीरथीबाई त्याना सवलत देण्यास तयार नाहीत. त्या श्री ला काहीतरी मार्ग काढण्याविषयी कळकळीने विनंती करीत आहेत. त्या नोकरीही सोडू शकत नाही. श्री ला हे सारे माहीत आहे. तो म्हणतो, “मी तुमची अडचण समजू शकतो. मी जेव्हा इथे सर्वेसर्वा होतो त्यावेळी मी तुम्हाला लेट येण्याची परवानगी दिली होती…पण आता भागीरथीबाई इथे मालकीण म्हणून आल्या आहेत आणि त्या शिस्तीच्या अगदी पक्क्या आहेत, हे लक्षात घेतले तर मी तुमच्याबाबतीत काही करू शकेन की नाही हे आत्ता काहीच सांगू शकणार नाही. पण मी प्रयत्न जरूर करतो…” लव्हाटेबाई त्याचे मनापासून आभार मानून तिथून निघून जातात.
ऒफ़िसमध्ये आजी, शिवदे मॆडम आणि कंपनीचे आर्थिक सल्लागार यांच्यात मीटिंग चालू आहे. आजी त्याना विचारतात, “मी स्टेटमेन्ट्स पाहिली आहेत ड्राफ्टमधील. यात शेअर आणि प्रॊफ़िट मार्जिनचा उल्लेख आहे, तो तुम्ही तपासला आहे ?” ती अधिकारी व्यक्ती म्हणते, “नाही मॅडम. ते वेगळे आहे.” आजी “म्हणजे भविष्यात होणा-या कंपनीच्या नफ़्यामध्ये ते भागीदार असतील?” “होय मॅडम, ह्या आताच्या कायद्यानुसार ते शक्य आहे.” सुटका झाल्यासारखे आजी आनंदात म्हणतात, “गुड…सो धिस इस डन..”, त्याच मूडमध्ये त्या शिवदेबाईना म्हणतात, “श्री ने जे पैसे कंपनीच्या अकाउंटमध्ये टाकले होते ते आता त्याच्या अकांउंटमध्ये ट्रान्स्फ़र करा…” शिवदेबाईला हे काय चालले आहे ते कळतच नाही. त्या म्हणतात, “मला असे म्हणायचे आहे की, कदाचित श्री सरांना हा व्यवहार आवडणार नाही…” आजी त्याना तीक्ष्णपणे सांगतात, “ते मी पाहून घेते. तुम्ही फ़क्त हा बॆन्केचा व्यवहार पूर्ण करा…शिवाय खुद्द श्री सरांच्या म्हणण्यानुसार या कंपनीची सर्वेसर्वा मीच आहे, सबब इथे जे काही होईल ते मी सांगेल तसेच होईल.” शिवदेमॅडम ओके म्हणतात.
पुढचा मुद्दा म्हणजे, ड्राफ़्टनुसार “श्री सरांनी नोकरी सोडण्यासाठी कंपनी त्याना एक महिन्याची मुदत देवू शकते. पण अशीही तरतुद आहे की श्री सरांनी जर कंपनी सोडण्याची नोटीस दिली तरी त्याना कधी मोकळे करायचे याचा सर्वाधिकार कंपनीचा आहे.” यावर आजी जाणीवपूर्वक स्मितहास्य करतात. शिवदेबाईंना ह्या कसल्या चाली आहेत हे काही कळत नाही. बाहेर नंदन श्रीला चहा घेऊन आला आहे. त्याच्यासमोर श्री त्या लव्हाटेमॅडम संदर्भात चर्चा करतो पण त्यातून काहीच निष्पण्ण होत नाही. नंदन त्या कामाला जरी उशीरा येत असल्या तरी काम मात्र खूप करतात असे म्हणतो. लवकर घरी जाण्याची घाई करीत नाहीत असेही सांगतो, पण त्यामुळे भागीरथीबाई त्याना लेट येण्याची परवानगी देणार नाहीत हे श्री जाणतो.
बॆन्केत जान्हवी काम करता करता मोबाईलवरून आईआजीशी बोलत आहे. आजी “कामात माझ्यामुळे अडथळा येत नाही ना ?” असे विचारतात….जान्हवी अगदी हसत “नाही, तुम्ही बोला आजी” असे म्हणते. आजी रहस्यमय पद्धतीने हसत सांगतात, “मी आज पैसे ट्रान्सफ़र केले त्याच्या अकांउंटवर…” जान्हवी खुश होते, “केले ? मग काय म्हणालो तो ?” आजी, “अजून कळले नसेल त्याला. कळले की येईलच की तो गाल फ़ुगवत !”. जान्हवी हसतेही उदगारते, “बाप रे ! आईआजी म्हणजे तो आता खरेच चिडणार.” आजी चपापतात, “म्हणजे ? अगं तूच बाप रे म्हणालीस, तर माझं कसं होणार ? मी सुरुवात केली आहे ना युद्धाला, आता तू पळ काढू नकोस.” जान्हवी दिलखुलास हसते, “नाही आईआजी, मी तुमच्याबरोबरच आहे. पण तो जेव्हा आत येईल, तेव्हा तुम्ही त्याच्याशी बॉस असल्यासारखेच बोला. आईआजीसारखे अजिबात बोलू नका…”, “होय, तू म्हणतेस तसेच वागणार आहे. मऊपणा बिल्कुल येऊ देणार नाही.”…इथे जान्हवी फ़ारच खुश होते, म्हणते “आईआजी, बकअप…हम तुम्हारे साथ है !” दोघीत मजेशीर संवाद चालू आहेत. तो त्या ड्राफ़्टवर सही करेल का नाही…केली तर काय होईल इ.इ. जान्हवी म्हणते, “मी मला काही माहीत आहे असे दाखविणार नाही. पण हल्ली तो माझ्याशी बोलताना चटकन चिडतो, गप्प बसतो…” आजी म्हणतात, “अच्छा ! तुमच्या दोघात पतीपत्नीमधील विरुद्ध स्टेज आली आहे की नाही ?” जान्हवीला ही विरुद्ध स्टेज काही समजत नाही. मग आजी हसत तिला विरुद्ध स्टेज म्हणजे काय ते समजावून सांगतात सोदाहरण. नवरा जे करतो ते बायकोला आवडत नाही, आणि बायको जे सांगते त्याच्या विरोधात नव-याने करायचे. दोघात प्रेम तर आहेच पण प्रत्यक्ष वर्तनात मात्र मतभेद आहेत हे दाखविणे म्हणजे विरुद्ध स्टेज. जान्हवी हसत म्हणते, “नाही, ही स्टेज अजूनी आलेली नाही.”
आता दुसरीकडे एका हॉटेलातील प्रसंग. तिथे आहे अनिल आपटे आणि तो पिंट्या सहस्त्रबुद्धे. आपटे कोणत्याही कारणास्तव पिंट्याला दारु पिण्याचा आग्रह करीत आहे. पिंट्या नाही म्हणतोय. पण आपटे काहीही विषय काढून आता जान्हवी आणि श्री कसे राहतात, नेमके काय झाले आहे दोघांत ? असले संतापजनक संवाद ऐकून पिंट्या चिडलेला आहे पण आपटे निर्लज्जपणे तेचतेच विचारताना दाखविला आहे. वैताग संवाद होते ते सारे.
घरी सदाशिवराव व शशीकलाबाई पिंट्याची वाट बघत आहेत. पिंट्याला जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत आपला दिनक्रम व्यवस्थित चालू होणार नाही असे त्याची आई म्हणते. त्याने जावयाच्या कंपनीत नोकरी केली तर चांगले होईल. पण सदाशिवराव त्याला विरोध करीत आहेत. शशीकलाबाई नेहमीप्रमाणे शिव्यांची लाखोली वाहत बसल्या आहेत.
फ्लॅटवर श्री आणि जान्हवी आले आहेत. श्री वैतागलेला पाहून जान्हवीला मनातल्या मनात गुदगुल्या होत आहेत. ती त्याला चहाबद्दल विचारते….तो नको म्हणतो….जेवणाबद्दल विचारतो तर त्यालाही नाही म्हणतो. जान्हवी हे सार जाणते, उगाचच विचारते “ऒफ़िसमध्ये काही घडले का ?” तो सांगतो, “एक लव्हाटेमॅडम आहेत, त्यांचाच एक प्रॉब्लेम झाला आहे, त्याबद्दल विचार करतोय….” जान्हवी लपून हसते.
पुढील भागासाठी म्हणून श्री आजीच्या केबिनमध्ये आला आहे आणि बॆन्केची आलेली नोटीस दाखवून हे काय चालले आहे ? पैसे कशाला ट्रान्स्फ़र केले हे विचारीत आहे.
मामा मस्तच. जान्हवी श्रीला
मामा मस्तच. जान्हवी श्रीला कृष्णनीतीने परत घरी आणेलच, पण थोडे पिंट्याकडेपण तिने लक्ष द्यायला हवे, ते लेखक- दिग्दर्शक त्याची वाताहात का करतायत, मला खूप वाईट वाटतेय पिंट्याचे, काय दुध-खुळा असल्यासारखा आपटेच्या नादाला लागतोय. आपटेपेक्षा गोखलेमध्ये नोकरी केलेली चांगली.
"...काय दुध-खुळा असल्यासारखा
"...काय दुध-खुळा असल्यासारखा आपटेच्या नादाला लागतोय...."
~ येस्स.... दॅट्स इट....दुधखुळा ! आणि खरं सांगायचं तर मालिकेच्या सुरुवातीला हा चांगल्याच टग्या दाखविला होता. गणपती उत्सव मंडळाचा हा सेक्रेटरी, पैशाचा हिशोब वगैरे याच्याकडे....चांगला अॅक्टिव्ह. पण ज्या पद्धतीने तो आपट्याच्या नादाला लागलेला दाखविला आहे ते खरेच संतापजनक आहे.
८० लाख रुपये काय टेनिस बॉल
८० लाख रुपये काय टेनिस बॉल सारखे टणाटण या खात्यातून त्या खात्यात टोलवत असतात गोखले मंडळी आयकर खात्याचे जावई असल्यासारखी....गोखले गृहोद्योग के क्या कहने
पण ज्या पद्धतीने तो
पण ज्या पद्धतीने तो आपट्याच्या नादाला लागलेला दाखविला आहे ते खरेच संतापजनक आहे.>>> पिंट्याला कसही करुन मी मोठा झालोय, जबाबदार झालोय, ताई लग्न करुन गेली तर मी घरची जबाबदारी घेउ शकतो हे सगळ सिद्ध करायच आहे. आणि त्या नादात तो काहितरी उद्योग करुन ठेवणार अस दिसतय
"...तो काहितरी उद्योग करुन
"...तो काहितरी उद्योग करुन ठेवणार अस दिसतय..."
~ बरोबर....पण त्यासाठी त्या लंपट आपट्याच्या मागे फिरत आहे तो, हे दाखविण्याची काही गरज नव्हती हे माझे म्हणणे. वेळ आली म्हणून प्रसंगी तो एका हॉटेलमध्ये वेटरचीदेखील नोकरी करताना दाखविले गेले आहे. तद्वतच तिथून पुढेही स्वतंत्रपणे आपले व्यावहारिक जीवन सुरू करत राहिला असे दाखविले असते तर प्रेक्षकांना ते उत्साहवर्धक वाटले असते. आपटे हा प्राणी पडद्यावर आला की काहीतरी किळसवाणे आता सुरू होणार अशी भावना मनी दाटते. ज्या रितीने तो काल प्रथम "जान्हवी...." असे नाव घेत होता आणि पिंट्याने त्याच्याकडे रोखून पाहिले की...मग "...ताई" असे लबाडीने म्हणताना दाखविणे म्हणजे हा धटिंगण अजूनी त्या मुलीला विसरायला तयार नाही हेच तात्पर्य त्यातून निघते. असे असेल तर हा पिंट्या नामक वाघोबा तिथल्यातिथे त्या आपट्याच्या मुस्काडात का मारत नाही असेच वाटते.
पिंट्या नामक वाघोबा
पिंट्या नामक वाघोबा तिथल्यातिथे त्या आपट्याच्या मुस्काडात का मारत नाही असेच वाटते.>>>>>>>>> + १०००
अगदी....अगदी...
maalikechyaa saMvaad
maalikechyaa saMvaad lekhakaache Doke firale aahe kaa?
मंगळवार दि. २८ जानेवारी २०१४
मंगळवार दि. २८ जानेवारी २०१४ : अपडेट
~ जान्हवी व श्री यांचा कार्यालयात जो संवाद झाला त्यावर बोलणे चालू आहे. जान्हवी आता खुबीने नव-याकडूनच त्याची तेथील दोलायमान स्थिती वदवून घेत आहे शिवाय ती माहिती तिला अगोदरच झाली आहे याची खबरबात ती लावू देत नाही. श्री मात्र निर्व्याजपणे तिला आपल्यातील आणि आजीमधील उडत असलेले खटके योग्य त्या प्रमाणात सांगून मन हलके करीत आहे. लव्हटेबाईंच्या मुलाच्या स्थितीची, नव-याच्या रात्रपाळीची अडचण…आणि त्यामुळे बाईना नोकरीवर वेळेत यायला होणारा त्रास आदी बाबी सांगतो, पण आता हे आजींना सांगून त्यातून काही निष्पण्ण होईल असे वाटत नाही, हेदेखील तो जान्हवीला सांगतो. जान्हवी म्हणते, “आईआजीना ह्या सबबी पटणे तर शक्यच नाही…” श्री ला देखील ते माहीत आहे. जान्हवी म्हणते “तूच आता थेट आजीशी बोलून बघ ना…” श्री “नको, अगोदरच आजीच्या डोक्याला खूप टेन्शन्स आहेत, त्यात ही भर नको…” जान्हवी त्याला नकळत स्वत:शीच हसते, “ठीक आहे, बाकी काही काळजी करण्यासारखे नाही. सोडून दे.” यावर श्री डोळे मोटे करून तिला म्हणतो, “अगं एवढेच नाही, जान्हवी, त्या मॅडमची नोकरी जाईल. शिवाय आमच्या वकिलांनी कसले तरी नवीन कॉन्ट्रॅक्ट केले आहे. त्यातील कलमे वाचणे म्हणजे आता वैतागच आहे माझ्यासाठी.” जान्हवीला ही वकिलाची चाल अगोदरच माहीत आहे, त्यामुळे आता श्री त्यावर काय प्रतिक्रिया देत आहे हे समजून घेण्याची तिला उत्सुकता आहे. ती हळूच निर्विकारपणे म्हणते, “कसले कॉन्ट्रॅक्ट रे ?” श्री “तेच माहीत नाही ना. माझ्याकडे थेट आलेले नाही. पण ऐकले आहे की त्यात बरीच नवीन कलमे अंतर्भूत केलेली आहेत. जान्हवी हुशारीने म्हणते, “मग तू आईआजीना थेट विचार…हा काय कॉन्ट्रॅक्ट प्रकार आहे ?” श्री “मी कशाला विचारू, मी नाही विचारणार”. इथे मात्र आता जान्हवीला हसू आवरत नाही. आपल्या ओठांवर हात ठेवून ती ते हसू दाबण्याचा प्रयत्न करते. श्री ला हा फ़रक जाणवतो, तो म्हणतो…”ते मी पाहतो, पण मी पाहतोय, हल्ली तू आणि आईआज्जी फ़ार जवळकीने वागत आहात, तुमचं खूप पटतं, हो ना?” जान्हवी घाईघाईने हा विषय बाजूला ठेवण्यासाठी म्हणते, “बरं, तू जेवणार नाहीस ना ? मग मी चलते.” श्री तिला अडवितो, परत तोच तिच्या आणि आईआजीच्या जवळकीच्या संबंधाबद्दल विचारतो….जान्हवीला हसताना पाहून तो थेट विचारतो “का गं…हल्ली तू खूप हसायला लागली आहेस. मी काहीही बोलत असलो तरी तुला हसू का येते ?” प्रश्नाला बगल देत जान्हवी हसतच किचनमध्ये पळते.
गोकुळमध्ये आजीच्या रुममध्ये जान्हवी चहा घेऊन आली आहे. जान्हवी ऑफ़िसमधील घडामोडीविषयी विचारते. आजी खुशीच्या स्वरात जे काही घडत आहे ते सांगतात आणि आता जे काही होईल ते मस्तपैकी पाहायचे असे ठरवितात. जान्हवी फ्लॅटमध्ये त्याच्यासमवेत होत असलेल्या संभाषणाचा सारांश सांगताना एकीकडे नव-याविषयीच्या प्रेमापोटी चांगले बोलतेही पण आपण तसे खंबीर राहिलो तरच ही दुरावलेली मने एक होणार असल्याने त्याला न कळत ह्या चाली आपण खेळल्या पाहिजेत असेही आजीला सांगते. आजीच्या मनात आपल्या ह्या नातसूनेविषयी कमालीची माया उत्पन्न होते आणि त्या तिच्या गालावर प्रेमाने हात फ़िरवून आपल्या कुशीत घेतात…जान्हवीही आनंदाने आजीच्या गळ्यात पडते….आणि हे दृष्य दरवाजात उभी असलेली बेबीआत्या पाहाते. ती गोंधळून जाते. अशासाठी की आपली आई ज्या मुलीला सून म्हणून स्वीकारण्यास अजिबात तयार नव्हती…तरीही नातवाने तिला पत्नी म्हणून आणली…त्यानंतरही तिच्यासमवेत एक शब्दही बोलत नव्हती…आता त्याच नातसूनेला हीच आई अगदी गळ्यात घेऊन हसत बसली आहे. बेबीआत्या नंतर आजीच्या रुममध्ये येते आणि तिला थेटच विचारते, “आई, हे नेमके काय चालले आहे तुम्हा दोघीत ?” आजीला आपल्या मुलीच्या प्रश्नाचा रोख कळतोच. त्या म्हणतात, “अगं त्यात वावगे वाटायचे काही कारण नाही. मी तिला स्वीकारणार नव्हतो हे खरेच…पण दिवस गेले, वातावरण बदलले, तिने आपल्या स्वभावाने व कार्याने माझे मन जिंकले…मग मी तरी तिला किती दिवस दूर ठेवणार. झाल्या असतील चुका पण त्यातून आपण काहीतरी शिकले हे पाहिजेच आणि नवीन मार्गही शोधला पाहिजे.” आजीचे ते बोलणे ऐकून आता बेबीआत्याच्या डोक्यात प्रकाश पडत चालला आहे. “म्हणजे, आपणही आपल्या संसाराच्या उभारणी प्रसंगी हट्टापेक्षा हुशारी दाखविणे गरजेचे होते. आता ती वेळ आली आहे…”. जान्हवीच्या निमित्ताने बेबीआत्याचा संसार मार्गी लागेल असे दिसत आहे.
बेबीआत्या खाली येऊन अन्य दोन्ही स्त्रियांना हा कमालीचा आणि अविश्वसनीय बदल सांगत आहे; पण सांगताना तिच्या चेह-यावर आनंद आहे तो अशासाठी की काहीच दिवसापूर्वी ज्या आईला आपण दु:खाने व्याकूळ झालेले पाहिले होते तीच आई आता जान्हवीसमवेत हास्यविनोद करीत आहे. इकडे ऑफ़िसमध्ये श्री तणतणत आजींच्या केबिनमध्ये आला आहे. त्याला बॆन्केकडून त्याच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फ़र झाल्याचा मेसेज आला आहे, त्याचा खुलासा तो भागीरथीमॆडम यांच्याकडे मागत आहे. बाई त्याला म्हणतात, “कंपनीने तुम्ही इथे केलेल्या कार्याची ती पोच दिली आहे असे समजा. तुम्ही स्वत:ला इथले नोकर समजता, त्यामुळे आम्ही तुम्हाला तो पगार दिला आहे.” श्री चडफ़डतो, “मी हे पैसे परत कंपनीच्या नावे टाकणार…” आजी, “चालेल. मग तसे कंपनी पुन्हा तुमच्या खात्यावर ते पैसे वर्ग करेल.” श्री हताश होतो, म्हणतो, “मॅडम असा खेळ खेळल्यामुळे तुमच्या हाती काय लागणार ?” आजी थोडावेळ स्तब्ध बसतात, त्याच्याकडे रोखून पाहतात, “म्हटलं तर काहीच नाही…म्हटलं तर सर्वस्व !” हताश झालेला श्री म्हणतो, “पण यातून काही मार्ग नाही असे समजू नका. मलाही कायदा नियम माहीत आहेत. मी त्यातून बाहेर पडण्याचा नक्की काहीना काही प्रयत्न जरूर शोधून काढेन, आईआज्जी !”….बोलण्याच्या वेगात आपण मॅडमऐवजी आईआजी म्हणून गेलो आहे हे त्याला जाणवते व तो लगबगीने बाहेर जातो. आजी आपल्या चाली योग्य दिशेने जात आहेत हे पाहून हसत राहतात.
पिंट्या सहस्त्रबुद्धे नोकरीचे अर्ज लिहित बसला आहे. शशीकलाबाई त्याच्याजवळ आली आहे…आणि पिंट्या जे काही करत आहे ते पाहून नित्यनेमाच्या शिव्या त्याला घालते आणि त्याऐवजी “माझे ऐक, आणि आपल्या बहिणीकडे जा आणि तिला कर विनंती….ती लावून देईल तुला नोकरी तिच्या कंपनीत…” पिंट्या त्या उपायाला सक्त विरोध करतो आणि आई परत शिव्या देत आहे हे पाहून तिथून वैतागाने निघून जातो.
फ्लॅटवर श्री आणि जान्हवी आले आहेत. जान्हवीचा फ़ोन वाजत आहे. श्री तिला हाक मारतो फ़ोनसाठी. किचनमधून जान्हवी बाहेर येत. फ़ोन घेते, तो असतो नेमका आईआजीचा…आता श्री समोर असताना थेट आजीबरोबर कसे बोलायचे हे तिला कळत नाही म्हणून “हो बोलतेय…मी तुम्हाला नंतर फ़ोन करते…” असे म्हणून फ़ोन बंद करते. श्री विचारतो “कुणाचा?” तर जान्हवी खोटेखोटे हसत म्हणते “कुणाचा नाही. रॉन्ग नंबर होता.” “रॉन्ग नंबर होता तर तुम्हाला नंतर फ़ोन करते असे का म्हटलेस…” श्री ने आपल्याला पकडले असे तिला वाटते म्हणून काही तरी कारण सांगायचे यासाठी “अरे ते जाहिरातदार असतात ना, त्यांच्यापैकी एकाचा होता. ते जाऊ दे….ऒफ़िसमध्ये काय चालले आहे तुझे ?” यावर श्री खांदे उडवित म्हणतो, “मला काय चालले आहे तिथे हे काहीच कळत नाही. आईआजीसमवेत बोलताही येत नाही…सारे काही विचित्र चालले आहे.” जान्हवी यावर काही मार्ग सांगण्याचा प्रयत्न करते पण श्री म्हणतो “मला आता या क्षणी भूक लागली आहे. जेवायला वाढणार आहेस का ?” जान्हवी हसत म्हणते, “चुकले….चल जेवायला.”
एकूण श्री ची पिंज-यात अडकलेल्या सशासारखी स्थिती झाली आहे….आणि ती तशीच असावी असे आजी आणि जान्हवीला वाटत आहे.
अशोक मामा किती छान अपडेट
अशोक मामा किती छान अपडेट लिहिता हो तुम्ही! मज्जा येते वाचायला! आजचा भाग रंगला आहे म्हणून बघणार!
जिज्ञासा.... थॅन्क्स....आणि
जिज्ञासा....
थॅन्क्स....आणि आजचा भाग जरूर बघ...त्याला कारण दोन आहेत .... १. जान्हवी आणि आजी दरम्यानची परकेपणाची भावना पूर्णपणे पुसली जाणे आणि आजीने या लाडक्या नातसूनेला मायेने जवळ घेणे....आणि २. बेबीआत्याच्या मनात परिवर्तन होणे. आता कालपर्यंत जान्हवीला विरोध करणारी आपली आईच तिच्या गळ्यात पडत आहे हे पाहिल्यावर आपली नातेसंबंधातील भूमिका चुकीची ठरत आहे....याची जाणीव झाली.
मामा मस्त लिहिलेत. काय मग
मामा मस्त लिहिलेत. काय मग मामा आता तुम्ही खुशना? तुमच्या जान्हवीचे महत्व वाढत चालले, मेन मेंबरला (आजीला) जिंकले तिने.
येस्स्स....अन्जू....कथानकाचे
येस्स्स....अन्जू....कथानकाचे काय व्हायचे तो होवो पण ती जान्हवी सदैव हसरी दिसली म्हणजे बस्स !! तिच्यामुळेच आजीच्या चेहर्यावरही हसू पसरले आहे हीच बाब महत्वाची.
आजकाल अपडेट्स लांबू लागलेले
आजकाल अपडेट्स लांबू लागलेले दिसत आहेत. मधे एखादा कमर्शिअल ब्रेक मिळायला हवा.
कालचा सगळ्यात आवडलेला भाग
कालचा सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे आजी म्हणते आपण ट्रान्सफर ट्रान्सफर खेळ खेळू
बेफिकीर....
बेफिकीर....:हाहा:
बेफिकीर..... आय अॅग्री....
बेफिकीर..... आय अॅग्री....
पण ते लांबण्याचे कारण दुसरेतिसरे काही नसून जान्हवीला सासरी मिळत असलेले महत्व आणि एरव्ही [परंपरेनुसार] अन्य नायिका नेहमी आपल्या पतीचीच बाजू घेताना दाखविले जात असताना ही पत्नी चक्क आपल्या आजेसासूच्या पाठीशी राहून घरोबा तुटणार नाही याची काळजी घेत आहे.....त्या अनुरोधाने होणारी तिची त्रेधातिरपिट शब्दबद्ध करायची तर वृत्तांत काहीसा ऐसपैस होणार.....समजून घ्या, प्लीज.
अन्य नायिका नेहमी आपल्या
अन्य नायिका नेहमी आपल्या पतीचीच बाजू घेताना दाखविले जात असताना ही पत्नी चक्क आपल्या आजेसासूच्या पाठीशी राहून घरोबा तुटणार नाही याची काळजी घेत आहे.....>>
अहो पण ते पती दूर जाण्याचे कारण किती लुटुपुटीचे तकलादू आहे. बायका ह्याच्याऊन फार भयानक संघर्ष सोड्वतात. किंवा हारतात देखिल पण ते नैसर्गिक वाट्ते. हे सर्व अगदीच ग्गोग्गोड आहे.
श्रीरंग गोखले अतिशय डोक्यात
श्रीरंग गोखले अतिशय डोक्यात जात आहेत.
बेबीआत्याच्या विचारांवरून असं
बेबीआत्याच्या विचारांवरून असं वाटतय की, मालिका लवकरच नवीन विषयाकअडे वळण घेणार.....
त्या महाकाय देहाचे नांव बेबी
त्या महाकाय देहाचे नांव बेबी आहे ह्याबाबत कोणालाच हरकत नसणे हेही समलैंगीकतेइतकेच नैसर्गीक वाटू लागले आहे.
बेफी पण त्याही पेक्षा महाकाय
बेफी
पण त्याही पेक्षा महाकाय देहाचे नाव बेबी आहे आमच्या एका स्नेह्यांत.
ashok mama tumhee lihaa ho...
ashok mama tumhee lihaa ho... bephikeeraanche aikU nakaa. ( te svat: ek anyaa thoDaa thoDaa lihitaayat... te muLaat malaa pasaMt naaheeye...
)
मामा तुम्ही ब्रेक घेउ नका
मामा तुम्ही ब्रेक घेउ नका सगळे डिटेल्स टाका.
बेफि
अन्या बद्दल दाद +११
अश्विनीमामी... "...पती दूर
अश्विनीमामी...
"...पती दूर जाण्याचे कारण किती लुटुपुटीचे तकलादू आहे...."
~ होय. तेही मान्य, तरीही लुटुपुटीच्या कारणाने का होईना तो चिडून "गोकुळ" मधून निघून गेला आहे आणि तिने त्याच्यासोबत न जाता अन्य सहा स्त्रियांसमवेत राहून पतीला घरी आणणे कसे शक्य होईल हे पाहिले आहे...पाहात आहे. गोखल्यांच्या घरातील सारी लग्ने मोडली आहेत ती काहीशा गैरसमजूतीतून आणि दूर गेल्यामुळेच [असे कथानक सुरुवातीला मांडले आहे], तेव्हा निदान जान्हवीने आपल्या योजनेनुसार आपला संसार असा वेगळा न करता तो एकत्रित राहून करण्याचे मनी घेतले आहे असे दिसत्ये....ते मला वेगळे वाटत आहे.
मालिका बघणार्यांनी सांगा :
मालिका बघणार्यांनी सांगा : काल आईआजी जान्हवीला "श्री घर सोडून जाताना मी तुला थांबवून घेतले" असे म्हणाल्या. बरोबर?
मालिका बघणार्यांनी सांगा :
मालिका बघणार्यांनी सांगा : काल आईआजी जान्हवीला "श्री घर सोडून जाताना मी तुला थांबवून घेतले" असे म्हणाल्या. बरोबर?>>>> साफ चुक... जान्हवीला श्रीने थांबायला सांगितल आहे घरी...
Pages