होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवार दि. १ फ़ेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ जान्हवी आणि श्री फ़्लॅटमध्ये आहेत. श्री ती कराराची फ़ाईल वाचत बसला आहे तर जान्हवी त्याची अस्वस्थता पाहून एकीकडे मनातल्या मनात हसत तर आहेच पण तिला नव-याची अशी परिस्थिती पाहून वाईटही वाटत आहे. त्याला ती जेवणाबद्दल विचारते तर तो चिडलेल्या स्वरात नको म्हणतो आणि आजी असे का वागत आहे ? हा प्रश्न उलट जान्हवीलाच विचारतो. जान्हवी आपल्याला काहीच माहीत नाही असे म्हणतेच पण “श्री तुला जर हे पसंत नाही तर तो गोखले गृह उद्योग सोडून का देत नाहीस ?” असाही सल्ला देते. यावर श्री नकारार्थी भूमिका घेऊन मी तिथेच राहून उलट हे का असे घडत आहे हे पाहणे योग्य आहे असे उत्तर देतो. ही कंपनी माझी आहे, माझे संबंध आहेत….” जान्हवीला तेच हवे आहे…..बंगल्यात आली आहे, आईआजीला रीपोर्ट करते आणि दोघीही खोखो हसत आहेत. जान्हवी म्हणते, “आईआजी, खूप उपयोगी झाली आहे आपली चाल. विशेष म्हणजे आता श्री स्वत:शीच चिडलेला आहे आणि तोच म्हणत आहे की कंपनी सोडून जाता कामा नाही….” इथे बोलताबोलता जान्हवी त्या लव्हाटेबाईंच्या घरची परिस्थितीही आजींना सांगून टाकते… विशेषत: त्यांचा मुलगा मूकबधीर असल्याने कुणीतरी त्याच्याजवळ असल्याखेरीज त्या नोकरीवर येऊ शकत नाही. आजीदेखील चिंतीत दिसतात; पण म्हणतात “पण कर्मचा-यांच्याबाबतीत काही वेळा कठोर निर्णय घेण्याची वेळ येत असतेच, जान्हवी.” जान्हवी ऐकते म्हणते, “हे सारे श्री ने देखील मला सांगितले आहेच. तुम्हाला एक सांगते आजी की तुमच्या त्याच्याशी असलेला बॉन्ड वेगळाच आहे.” आजी विचारात पडतात, म्हणतात, “बॉन्ड !!...इंग्लिश भाषेत काही काही शब्द किती छान असतात…नाही….बॉन्ड !”

आता दुसरीकडे रस्त्यावर त्या आपट्याची आणि पिंट्याची भेट. आपटे याने नेहमीप्रमाणे पिंट्याचे डोके उठविले आहे आणि कोणत्याही स्थितीत श्रीरंग गोखले याना आपल्या बिझिनेसमध्ये घेणे आवश्यक आहे असे जोरजोराने सांगितले. पिंट्यासमोर अत्यंत लबाडीने तो जान्हवीचा “जान्हवी....ताई” असा उल्लेख करून त्याला आणखीनच आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करीत आहे…. आपटे कथानकात का आला आहे हे कळण्यापलिकडे झाले आहे. असो.

श्री कार्यालयात फाईल बघत आहे. नंदन त्याच्या टेबलजवळ येऊन फ़ाईल्स समोर ठेवतो आणि “लव्हाटेबाई आल्या आहेत का ?” या श्री च्या प्रश्नाला तो होकारार्थी उत्तर देतो पण पुढे भागीरथीबाईनी अकांउंट सेक्शनकडून लव्हाटेबाईंची फ़ाईल मागविली आहे, अशी जादाची माहितीही देतो. श्री ला त्याबद्दल वाईट वाटते. कामे संपवून तो बस स्टॊपवर आला आहे….घाईने…त्याची बस बहुतेक चुकली आहे म्हणून तिथे मोबाईलवर बोलत असलेल्या एका प्रवाशाला “अहो आठची बस गेली का ?” असा प्रश्न विचारतो. प्रवासी फ़ोन करता करता वळून त्याच्याकडे पाहतो….त्याला पाहून श्री ला धक्का बसला आहे.

हा प्रवासी त्याच्या घरातीलच असणार….बहुधा शरयूचा पती....किंवा बेबीआत्याचा....आता सोमवारीच रहस्यभेद होईल.

मामा नेहेमीप्रमाणे मस्त. आज लवकर अपडेट्स दिलेत. पिंट्याची वाट लावणार आहेत ले. आणि दि.
आपण काय करू शकतो? जे जे होईल ते पहा मामा आणि आम्हाला सांगा.

गुड नाईट.

बेफिकिर, <<ते समजल्यामुळे आता ह्या धाग्यावर थट्टायुक्त असे काहीही न लिहिण्याचा निर्णय मी घेत आह<<...>>
हे त्या सिरियलसाठी आणि ह्या धाग्यासाठी घातक आहे. नाहीतरी प्रत्यक्षातल्या त्या दोघांविषयी काहीही थट्टा नव्हतात करत. त्यांची पात्रं आणि त्यांचे अभिनय ह्यावरच चाललं होतं ना?
खरच छान बिन्-पाण्याची करता हो तुम्ही... चालूच दे तुमचही

अदिति.....

बेफिकीर दगा देणार नाहीत....त्यांचही मन या सीरिअलमध्ये अडकलेले आहेच ना...! शिवाय त्यानी थट्टायुक्त काही लिहिणार नाही असे म्हटले आहे....म्हणजे लिखाण बंद असा अर्थ होत नाही.....सो रीलॅक्स.

राहता राहिला माझा प्रश्न....तर त्याचे उतर तर उघडच आहे. मी ही एकच सीरिअल पाहात असल्याने तुलना करण्याचा प्रश्नच उदभवत नाही....सबब जोपर्यंत जान्हवी श्री दिसतात पडद्यावर तो पर्यंत तुम्हा सर्व भाच्यांना माझे त्या संदर्भातील लिखाण वाचायची शिक्षा मिळणारच.

सोमवार दि. ३ फेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ घरी इंदूबाई आणि जान्हवी श्री संदर्भात बोलत आहेत. घरातील सर्वांना माहीत आहे की श्री आता परत येणार असेलच तर तो जान्हवी माध्यमाद्वारेच येईल. त्यामुळे एरव्ही जान्हवीच्या बाजूने सहसा न उभ्या राहणार्‍या इंदूबाईना जान्हवी जे काही प्रयत्न करीत आहे आणि त्याद्वारे तिने आईआजीना कसे जिंकून घेतले आहे त्याचे कौतुक वाटत आहे. इंदूबाई श्री साठी दूधाचा ग्लास घेऊन येत असतात, तो नसल्याने दूध आज त्यानी जान्हवीला आग्रहाने प्यायला लावले. जान्हवी या सर्व स्त्रियांची आपल्या नवर्‍यावरील माया पाहून भारावून जाते.

ऑफिसमध्ये आजी आणि श्री समोरासमोर आले आहेत. [हा या धाग्यातील सर्वात चांगला संवादाचा भाग ठरला असे म्हटले तरी ते ठीक ठरेल. रोहिणी हट्टंगडी आणि शशांक केतकर दोघांनीही खूप छान अभिनय केला आहे.]

मॅडम भागीरथीची परवानगी घेऊन श्री आत प्रवेश करतो. त्याच्या हातात कॉन्ट्रॅक्टची ती फाईल आहे.
तो म्हणतो, "मॅडम थोडे बोलायचे आहे." मॅडम त्याला बसायला सांगतात, पण तो नकार देतो. "मला जे सांगायचं आहे ते काहीसे कठीण जरी असले तरे ते मी शांतपणे सांगण्याचा प्रयत्न नक्की करीन." आजी त्याच्या चेहर्‍याकडे निरखून पाहतात. "बोला मी ऐकते आहे..." श्री : "ओके. फर्स्ट...लव्हाटेमॅडमनी असा काय गुन्हा केला आहे की तुम्ही त्याना डायरेक्टली काढून टाकायची शिक्षा दिली आहे ?" मॅडम चष्मा काढून त्याच्याकडे पाहतात, "मला वाटले तुम्ही बोलायला आला आहात, पण तुम्हाला प्रश्नच विचारायचे असतील तर माझी हरकत नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असे आहे की त्यानी काहीही गुन्हा केलेला नाही." श्री : "पण मग न केलेल्या गुन्ह्याची इतकी मोठी शिक्षा ?" आजी "तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मी जर या कंपनीची सर्वेसर्वा असेन तर मग कुणाला कामावर ठेवायचे वा काढायचे हा अधिकार माझा आहे, नाही का ?" श्री उत्तरतो : "अहो, पण अशाने तुम्ही त्यांच्यावर अन्याय करताय ?" आजी "नाही, हा अन्याय नाही. कंपनी जॉईन करण्यापूर्वी त्यांची करारपत्रावर सही घेण्यात आली आहे. त्यात कामाच्या वेळा जाण्याच्या वेळा आदी बाबी स्पष्टपणे लिहिल्या गेलेल्या आहेत. आता त्यानुसार त्यानी वेळ पाळली नाही हा काही कंपनीचा दोष नव्हे. त्यांच्या उशीरा येण्यामुळे कंपनीला नुकसान होत असेल तर ते करून देण्याचा त्याना काहीही अधिकार नाही. म्हणून त्याना नोटीस देवून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चुकीचा पायंडा पाडणारी माणसे वेळीच दूर करणे गरजेचे असते अशा मताची मी आहे." श्री खेदाने हसतो, म्हणतो, "मग असे असेल तर तुम्ही माझ्या हातात ही कंपनी चालवायला द्यायलाच नको होती तुम्ही. कारण तुम्ही म्हणता तसे अनेक पायंडे मीही पाडून दिले आहेत या कंपनीत. इथे सारेच काही लिहिलेल्या कायद्यानुसार होऊ शकत नाही. माणसाच्या शब्दावरही मी विश्वास ठेवतो."

वादावादी अजूनही रंगत जाते....पण दोघेही आपापल्या मुद्द्यांना ठाम चिकटून आहेत. शेवटी वाद थांबवावा या हेतूने श्री शेवटचे अस्त्र बाहेर काढतो. तो म्हणतो, "ठीक आहे. तुम्ही म्हणता तसा मी या करारावर सही करायला तयार आहे...." आजी खुश होऊन काही म्हणणार तोच श्री त्याना थांबवितो, "पण एका अटीवर. तुम्ही लव्हाटेबाईंना दिलेली नोटीस मागे घ्यावी. ती घेतली की मी इथे लागलीच सही करतो." आजी सुन्न होऊन त्याच्याकडे पाहात राहतात. त्या म्हणतात, "निर्णय घ्यायला मला वेळ पाहिजे..." श्री ओके म्हणून बाहेर निघून जातो. आजी तात्काळ जान्हवीला फोन लावून तिला हा सारा वृत्तांत सांगतात. जान्हवी नेमके काय बोलणे झाले असे विचारताच आजी म्हणतात, "जान्हवी, अगं एक प्रॉब्लेम झालाय. श्री म्हणतोय त्या लव्हाटेबाईला कामावर ठेवले तरच तो सही करेल. याचा मी विचार केलाच नव्हता..." जान्हवीही गोंधळते विचारते, "तुम्ही काय ठरविले ?" "अगं यातून काय तोडगा काढायचा ? माझे डोके काही चालत नाही." जान्हवी थोडा वेळ विचार करून तीन मार्ग सांगते, : "१. कंपनीकडून लव्हाटेबाईना रिक्षाचे पैसे दिले तर त्या वेळेवर येतील. बसने येण्याचा त्यांचा वेळ वाचेल २. कंपनीने त्याना मेडिकल ग्राऊंडवर लोन प्रोव्हाईड केले तर त्या मुलाचे ऑपरेशन करू शकतील; म्हणजे त्या नवराबायकोचे कष्ट वाचतील. ३. त्यांच्या मिस्टरांना जर आपण आपल्याच कंपनीत कामे दिले तर ते दोघेही कदाचित वेळेवर पोचू शकतील. यापैकी काहीच करता येणे शक्य नसेल तर मग त्याना आता आहेत त्या डिपार्टमेन्टमधून काढून अन्य डिपार्टमेन्टमध्ये वेगळे काम देता येईल." आजी सारे मार्ग मनी ठेवतात, म्हणतात "चांगले सुचविले आहेस. यावर मी विचार करते आणि लगेच श्री ला बोलावून घेते म्हणजे तो लागलीच सही करेल..." इथे हुशारपणे जान्हवी आजीना थांबविते, "नको, नको आजी, लगेच बोलावून घेऊ नका. तुम्हीही थोडा विचार केला आहे असे भासवा....लागलीच सारे देवून टाकू नका त्याच्या हातात. त्याच्या मनासारखेच करायचे आहेच ना ? मग त्याची किंमत म्हणून त्याला आजची रात्र काहीशी टेन्शनमध्ये घालवू दे..." ....आजी खुश, हसत म्हणतात "बरोबर बोललीस. तसेच करते." दोघीही हसतहसत एकमेकीना बाय म्हणतात. श्री आणि जान्हवी फ़्लॅटवर आहेत. सकाळची वेळ आणि श्री ऒफ़िसला जायच्या गडबडीत. तो सरळ नाष्टाही करीत नाही किंवा कपडेही कसेबसे घालत आहे. जान्हवी त्याची धावपळ पाहून त्याला मदत करत आहे. पण दोघानाही घड्याळाची वेळ पाळणे मुश्किल होत आहे असेच दिसते. श्री नाष्टा न घेताच बससाठी धावत जातो. जान्हवी खोलीत परतते आणि त्याचवेळी मोबाईल वाजतो. तो असतो श्री ला आलेला….जान्हवी तो फ़ोन तर घेतेच शिवाय तिला दिसते की श्री आपले पैशाचे पाकिटही घरीच विसरला आहे.

श्री बसस्टॉपवर आला आहे. बस चुकली असल्याची त्याला शंका येते म्हणून तिथेच फ़ोनवर बोलत असलेल्या एका व्यक्तीला विचारतो, “अहो ८.०५ ची बस गेली का ?” ती व्यक्ती त्याच्याकडे पाहते. दोघेही एकमेकाकडे पाहातच राहतात. त्यांच्यात पुढे जो संवाद होतो तो भाग उद्या असेल.

बर्‍याच आधीच्या एका भागात जान्हवी आणि नर्मदा आई च्या संवादात अस सांगितल होत की श्रीने त्याच्या बाबांचे फोटोही पाहिलेले नाहीएत. आज्जींची बंदी होती म्हणुन

"...श्रीने त्याच्या बाबांचे फोटोही पाहिलेले नाहीएत...."

मालिकेत लेखक/लेखिकेला मुबलक स्वातंत्र्य असते म्हणून अशा "बाबांचे फोटो पाहिलेले नाहीत" कल्पनांना मुक्त वाव असतो; पण व्यावहारिक पातळीवर विचार केल्यास जो मुलगा एम.बी.ए. झाला आहे....ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इथे शिक्षण घेतलेला आहे....कोट्यावधी रुपयांची इंडस्ट्री चालवत आहे, वादाच्या कित्येक प्रसंगी आपले स्वतंत्र असे अस्तित्वही दाखवितो....अशा युवकाने आजी सांगते म्हणून वडिलांचा फोटो पाहिला नाही, ही बात न पटणारी अशीच आहे.

असो....शेवटी मालिका आहेत. पटवून घ्यावे लागते.

आता या मालिकेत परत आयडेंटीटी गुलदस्त्यात ठेवण्याचा खेळ सुरु होईल... श्री आणि मनोज जोशी दोघही पटकन सांगुन मोकळ होणार नाहीत ते कोण आहेत ते. मग परत मनोज जोशीच आईआज्जी समोर येण, त्यांच नाराज होण अश्रुंचे पूर वगैरे गोष्टी सुरु....

जो मुलगा एम.बी.ए. झाला आहे....ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इथे शिक्षण घेतलेला आहे....कोट्यावधी रुपयांची इंडस्ट्री चालवत आहे, वादाच्या कित्येक प्रसंगी आपले स्वतंत्र असे अस्तित्वही दाखवितो....अशा युवकाने आजी सांगते म्हणून वडिलांचा फोटो पाहिला नाही, ही बात न पटणारी अशीच आहे.<<< चक्रम पटकथा आहे असे दिसते.

असो....शेवटी मालिका आहेत. पटवून घ्यावे लागते.<<< पटवून नव्हे, खपवून घ्यावे लागते. Happy

मामा आणि इतर सगळे कृपया गैर्समज करु नका. मला हे म्हणायच होत की आईआज्जींनी सगळ्या इतर आयांना त्याला फोटो दाखवायलाही बंदी केली होती. आणि फोटो पहायलाही. त्या पाहतात ही गोष्ट अलाहिदा. त्याला डायरेक्टली अस म्हटलेल नाहीये.

मामा अपडेट्स देतात म्हणून सीरियल नाही बघत आता
ऑफिस मधून येऊन कंटाळाच येतो
त्यापेक्षा इथेच वाचलेल बर

बर्‍याच आधीच्या एका भागात जान्हवी आणि नर्मदा आई च्या संवादात अस सांगितल होत की श्रीने त्याच्या बाबांचे फोटोही पाहिलेले नाहीएत. आज्जींची बंदी होती म्हणुन>>>> आईआज्जीच्या पीठपिछे शरयु चोरुन तिच्या नवर्‍याला भेटते, रात्रीच्या वेळी सगळे घरात असताना, अगदी गजरा-बिजरा घालुन घरात येते, दोन-तीन वेळा पकडली जाउन पण कुण्णाच्या लक्षात येत नाही आणि आईआज्जी ऑफिसात असताना या बायकां श्रीला फोटो दाखवायला घाबरतात बायका.... कैच्याकैच

श्री लहान असताना त्यान नकळत काही विचारल तर आईआज्जीला कळेल म्हणुन बायका घाबरत असतील्, पण श्री समजुतदार झाल्यावर आज्जीच्या नकळत या बायकांनी श्रीला फोटो दाखवला असता तर काय कळणार होत? उगी आपल ट्विस्ट आणायचे म्हणुन काहितरी बालिश कारणं निर्माण करतात...

पण श्री समजुतदार झाल्यावर आज्जीच्या नकळत या बायकांनी श्रीला फोटो दाखवला असता तर काय कळणार होत<<<

काहीच कळलं नसतं! प्रॉब्लेम एकच होता, श्री समजुतदार झालाच नाही. Biggrin त्या यड्या वाट पाहात बसल्या हा आत्ता समजुतदार होईल मग समजुतदार होईल, पण नाहीच्च मुळी झाला तो समजुतदार! मग कसा काय दाखवणार फोटो?

अहो बेफिकीर....

झालाय ना तो समजुतदार....!! एवढी अप्सरेसारखी सुंदर आणि हुशार आणि गुणवान आणि मृदू स्वभावाची युवती त्याने मिळविली म्हणजे तो निश्चित्तच समजुतदार असे समजले पाहिजे.

अशोकराव, तुम्हाला जान्हवी अप्सरेसारखी वाटते हे तुमच्या क्षमाशील स्वभावाचे व औदार्याचे प्रतीक आहे.

अशा युवकाने आजी सांगते म्हणून वडिलांचा फोटो पाहिला नाही, ही बात न पटणारी अशीच आहे.>>>> हम्म तेच तर.

आता या मालिकेत परत आयडेंटीटी गुलदस्त्यात ठेवण्याचा खेळ सुरु होईल... श्री आणि मनोज जोशी दोघही पटकन सांगुन मोकळ होणार नाहीत ते कोण आहेत ते. मग परत मनोज जोशीच आईआज्जी समोर येण>>>>>>> हो मुग्धा ही शक्यता नाकारता येणार नाही Happy

प्रीतमोहर ~ अगं माझा तोच मुद्दा...जर त्या सहाही आयांना घरातील पुरुषांबद्दल फोटोद्वारे का होईना पण चेहरपट्टी, रुप, आकार, सद्यस्थिती यांची माहिती आहे तर आजच्या घडीचा घरचा कर्ता पुरुष श्रीरंग गोखले याला ते फोटो पाहाण्यापासून त्या वंचीत का ठेवतात ? पण मीच म्हटल्याप्रमाणे कथानकामध्ये असलेले स्वातंत्र्य दिग्दर्शकाने घेतले आहे असे समजू या....!

अन्जू..... त्याने डोंबिवलीची नायिका जोडीदारीण म्हणून मिळविली म्हणजे तो किती समजूतदार आहे हे तू ओळखू शकशील ना ? आता आहे सुधारणेला वाव, तर सुधारेल ना....मी कुठे तक्रार करीत आहे ? राहू दे सुखी.

बेफिकीर.....जान्हवी अप्सरेसारखी वाटते म्हणजे कुठल्याही मामाला आपल्या भाचीविषयी असेच प्रेम वाटत असते...त्या भावनेतून मी तिच्याकडे पाहतो...सो देअर इज नो क्वेश्नन ऑफ क्षमाशील ऑर औदार्याचे प्रतीक.

अंजली_१२ ~ बस स्टॉपवरील व्यक्ती "मनोज जोशी" आहे हे माहीत नव्हते. थॅन्क्स.....पण आजचा भाग पाहिल्यावर वाटू लागले आहे की ह्या जोशीनी नेमक्या कोणत्या भूमिकेत पडद्यावर दर्शन दिले आहे ? श्री चे वडील की शरयूचे मिस्टर ?

Pages