Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला जान्हवी काकवी वाटते कारण
मला जान्हवी काकवी वाटते कारण जिथे सडेतोड बोललं पाहिजे तिथे ती बोलते पण ते समोरच्याला सणसणितपणे चपराकीसारखं बसत नाही>>> असं असत तर ही मालिका खुपच छान झाली असती.
जान्हवीसाठी काकवी हा शब्द
जान्हवीसाठी काकवी हा शब्द सर्वप्रथम मी वापरलेला आहे ह्याची रॉयल्टी मला मिळाली नाही तर मी येथे थैमान घालेन!
बुधवार दि. २२ जानेवारी २०१४ :
बुधवार दि. २२ जानेवारी २०१४ : अपडेट
~ पहिलाच भाग असेल की ज्यात जान्हवी चक्क आईआजींची बाजू घेऊन श्री बरोबर संतापात वाद घालते आणि त्याच्या वर्तणुकीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करते. "तू घरच्या नात्याबाबत इतका कोरडा कसा काय होऊ शकतोस, हे मला कळत नाही....". श्री तिला "आत्ता तूदेखील असले टोमणे मारणे बंद कर. मी निर्णय घेतला आहे तो योग्य आहे...." हा निर्णय म्हणजे श्री ने बॅन्केतून आपल्या पर्सनल अकाऊंटवरील ८० लाख रुपये काढले आणि गोखले कंपनीच्या खात्यावर वर्ग केले आहेत. ही बातमी जशी जान्हवीला कळते तशीच अर्थातच शिवदेमॅडम यांच्यातर्फे आईआजींनाही कळते. दोघीनाही हा एक प्रकारचा असा धक्का आहे की ज्यामुळे एक गोष्ट निश्चित होत आहे की श्रीरंग गोखले कायमस्वरुपात कंपनी सोडून चालले आहेत.
या अगोदर आजी ऒफ़िसमध्ये असतानाच अशाच विचारात आहेत की आता बस्स झाले. श्री चा सहवास आपल्याला घरीही हवाच. इथे ऒफ़िसमध्ये निदान मला तो काही वेळ दिसतो, भेटतो, पण घरातील स्त्रियांना यात काय दोष की ज्यामुळे त्याना हा मुलगा दिवसभर दिसत नाही. आता त्याला आत बोलवायचे आणि सांगायचे झाले गेले विसरून जा आणि तू आता घरी ये. हा निर्णय लागलीच त्याच्या कानावर घालायचा विचार त्या करीत आहेत तोच शिवदेमॆडम ती ८० लाखाच्या व्यवहाराची बातमी घेऊन येतात. आजींना काहीच सुचत नाही. त्या ’त्याला आत पाठवा आणि आम्ही बोलत आहोत तो पर्यंत आत फ़ोन देवू नका, तसेच कुणाला आतही पाठवू नका…’ अशी सूचना देतात. शिवदेमॆडम श्री ला हा निरोप देतात आणि श्री केबिनमध्ये येतो. तिथे पैशासंदर्भातच विषय निघतो. आजीचे म्हणणे ज्या पद्धतीने त्याने कंपनीचा हा व्यवहार भरभराटीला आणला आहे त्या अर्थी त्या पैशावर त्याचाच अधिकार आहे. श्री त्या म्हणण्याला विरोध करतो, म्हणतो…ते पैसे माझ्या नावावर म्हणजे कंपनीची ती अंतर्गत व्यवहाराची नोंद असते, त्या पैशावर माझा कसलाही अधिकार नाही. उलटपक्षी मी आता इथून जाणार म्हणजे माझ्या अंगावरील ते ओझे इथे देणे आवश्यक आहे. आजीना काय बोलायचे ते सुचत नाही….हाच संवाद उद्याही चालेल.
या अगोदर सहस्त्रबुद्धे यांच्या घरातील एक प्रसंग दाखविला गेला. पिंट्या नीटनेटका ड्रेस घालून वडिलांच्या पाया पडत आहे, आशीर्वाद मागत आहे. मुलाखतीसाठी चालला आहे. सदाशिवराव आशीर्वाद देतात; पण आईचा आपल्या मुलाच्या कर्तृत्वावर शून्य विश्वास असल्याने तिच्या तोंडून त्याला बोल लावण्याखेरीज काहीच पडत नाही.सदाशिवराव बायकोच्या या असल्या दरिद्री स्वभावाकडे पाहून हताशपणे तिथून उठतात.
मामा धन्यवाद. पिंट्याला
मामा धन्यवाद. पिंट्याला चांगली नोकरी लागुदे आता.
कोण पिंट्या?
कोण पिंट्या?
८० लाख कश्यासाठी त्याने घेतले
८० लाख कश्यासाठी त्याने घेतले होते का?
मामा धन्यवाद. पिंट्याला चांगली नोकरी लागुदे आता.<<< +१११
मामा पिंट्याला नोकरी लागली की पेढे वाटा
अदिति.... है शाब्बास पोरी !
अदिति.... है शाब्बास पोरी ! च्यामारी, त्याला नोकरी लागणार...तो पगार आपल्या आईबापाला, बहिणीला देणार.... आणि पेढे वाटू मी ? वा गं व्वा !
बेफि, पिंट्या जान्हवीचा
बेफि, पिंट्या जान्हवीचा भाऊ.
मामा पिंट्याला चांगली नोकरी लागली तो मार्गाला लागलाना की मी देईन पेढे, मला तो खूप आवडतो, चांगले काम करतो.
अहो मामा जान्हवीच्या भावाला
अहो मामा जान्हवीच्या भावाला नोकरी लागली आणि तिच टेन्शन कमी झाला तर सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला होइल ना? :))
श्रीने ५०,००० रूपये
श्रीने ५०,००० रूपये जान्हवीच्या आईला दिले तर किती गहजब झाला आणि आता ८० लाख कंपनीला देतो आहे तर नको नको कशाला
प्राजक्ता..... शशीकलाबाई
प्राजक्ता.....
शशीकलाबाई कसल्या स्वभावाची आहे याची प्रचिती आईआजींना त्यापूर्वीच आली होती. त्यामुळे आपल्या नातवाकडून थेट त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तिने पन्नास हजार घेणे ही घटना गोखले आजीना न पटणे साहजिकच आहे. कारण मग त्यानंतर ती सवयच पडून गेली असती.
८० लाख रुपये हा अंतर्गत आर्थिक व्यवहार आहे. कंपनीचाच पैसा आहे तो, जो श्री च्याच खात्यावर होता तो त्याने आपण आता तिथून कायमचे जात आहोत तर कंपनीला परत करणे योग्य असे त्याने मानले. पण आजीच्या मनी तसे होऊ नये असे असल्याने या व्यवहाराला त्या तयार नाहीत.
अन्जू.... थॅन्क्स..... तू
अन्जू....
थॅन्क्स..... तू पेढ्यासारखीच मुलगी आहेस.
अदिति....
तिचे टेन्शन कमी झाले तर मला नक्की आनंद होईल. तरीही पेढे अन्य कारणासाठी पुढे केव्हातरी वाटता येतील.
मामा, अपडेट्स साठी धन्यवाद
मामा, अपडेट्स साठी धन्यवाद
प्रोप्रायटरी किंवा
प्रोप्रायटरी किंवा पार्टनरशिपमधल्या बिझिनेसमध्ये ओनर्/पार्टनरला सॅलरी देउन कंपनीचा नफा कमी दाखवता येतो. टॅक्स वाचवता येतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतही असे होत असेल.
पण ते पैसे असे परत कंपनीत वळवले तर कंपनी आर्थिक घोटाळे करतेय असा ठपका बसणार नाही का?. कंपनीतल्या शिपायालाही त्याच्या परतफेडीच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज देणे, दिलेले कर्ज परत वसूल न करणे हाही आर्थिक घोटाळा.
सी.ए. , लॉयर असे शब्द वापरले की झाले. त्यापुढचे बारकावे मालिकाकर्त्यांना माहीत असण्याची अपेक्षा करणे अंमळ जास्तच होईल.
तेच तर भरत. मला हे कळत नाही
तेच तर भरत.
मला हे कळत नाही श्री पात्र अगदी सरळ सरळ मॅनिप्युलेट करणारे, खोटे बोलणारे दाखवूनही त्यासप्रेक्षकांची सहानुभूती , प्रेम कसे काय मिळू शकते. विचार करून, गोड बोलून पण तो सर्व बायकांचा फायदाच घेत आहे. बायकांनी प्रेमाची झालर डोळ्यावरून घेतली आहे.
८० लाख रुपये असेच त्याचा
८० लाख रुपये असेच त्याचा सेव्हिंगमध्ये पडून होते हे ऐकूनच मी भयानक हसले!
बर, त्याने घेतलेही असतील काम केल्याबद्दल. पण त्याने एकही रुपाया खर्च केला नाही, किंवा एवढा हुशार बिझनेसमॅन आहे ना, मग कुठे गुंतवलाही नाही? किती किती मूर्ख संवाद हे! एक काहीतरी आकडा फेकला की झालं. ८० लाख! जोक आहे का? 
मला हे कळत नाही श्री पात्र
मला हे कळत नाही श्री पात्र अगदी सरळ सरळ मॅनिप्युलेट करणारे, खोटे बोलणारे दाखवूनही त्यासप्रेक्षकांची सहानुभूती , प्रेम कसे काय मिळू शकते. विचार करून, गोड बोलून पण तो सर्व बायकांचा फायदाच घेत आहे. >>> हो अमा.
त्या शिवदे बाई आगाऊ आहेत !
त्या शिवदे बाई आगाऊ आहेत ! उगीच इकडचं तिकडे सांगतात आणि मग त्यामुळे सिरियल्स घडतात.. !
८० लाख अस्ते तर नवा फ्लॅट तरी
८० लाख अस्ते तर नवा फ्लॅट तरी घेतला अस्ता राजाराणींनी. आणि फ्रँकली असा माणू स कुठल्यातरी बँकेतल्या क्युटीबरोबर इन्वॉल्वच होणार नाही लग्न तर कदापि नाही. ह्या लोकांची गणीते वेगळी असतात सोशल सर्कलही वेगळे असते. क्या तोबी लिकते यारों .
सहा सहा गाड्या धूळ खात पडून
सहा सहा गाड्या धूळ खात पडून असतात तसेच ऐंशी लाख
खा खा शिकरण खा, मटार उसळ खा
खा खा शिकरण खा, मटार उसळ खा त्यातलेच हे प्रकरण आहे. गोखल्यांच्या श्रीमंतीचे. तो पण कायम असा ज्युनीअर म्यानेजमेंट मधील मुले असतात तसेच कपडे घालून फिरतो. असे साहेब लोक्स कधी ब्याग घेउन फिरत नाहीत. त्यांचे शोफर आणतात आणि पीए लॅप्टॉप वगैरे मेंटेन करते.
मालकीचं हॉस्पिटल आणि देऊळही
मालकीचं हॉस्पिटल आणि देऊळही आहे.
अहो अमा, ' साधी राहणी उच्च
अहो अमा, ' साधी राहणी उच्च विचारसरणी' हे ब्रीद असेल त्याचे.
ण त्याने एकही रुपाया खर्च केला नाही, किंवा एवढा हुशार बिझनेसमॅन आहे ना, मग कुठे गुंतवलाही नाही? >>>>> मला हा मुद्दा पटला पूनमचा.
पण श्रीमंती आणि कपडे किंवा बॅग हातात घेऊन फिरणे याचा काय संबंध?
मला खटकलेली गोष्ट म्हणजे हा श्री उच्चशिक्षणासाठी परदेशी राहून आलेला असतो ना? मग तो जरासुध्दा स्वावलंबी कसा नाही? परदेशात तर आया गेल्या नव्हत्या ना बरोबर?
मला खटकलेली गोष्ट म्हणजे हा
मला खटकलेली गोष्ट म्हणजे हा श्री उच्चशिक्षणासाठी परदेशी राहून आलेला असतो ना? मग तो जरासुध्दा स्वावलंबी कसा नाही? परदेशात तर आया गेल्या नव्हत्या ना बरोबर? अ ओ, आता काय करायचं>>++११
हो ८० लाख सेविंग्जला कसे काय
हो ८० लाख सेविंग्जला कसे काय ठेऊ शकतात वैयक्तिक अकाउंटला, म्हणजे पासबुक मधे हि रक्कम कशी दिसत असेल हो? गरिब प्रश्न!!
पण श्रीमंती आणि कपडे किंवा
पण श्रीमंती आणि कपडे किंवा बॅग हातात घेऊन फिरणे याचा काय संबंध?>> त्या स्टेटस चे लोक्स असे वागत रहात नाहीत. पण ह्यांची व्ह्युअर शिप जशी आहे त्यांना सूट होणारी जोडी घेतली आहे आणि एक वेगळी लाइफ स्टाईल मध्ये त्यांना फिट करायचा प्रयत्न चालू आहे तो विनोदी वाट्तो.
श्रीमंत माणूस रोज झोडिएक चा शर्ट वापरेल. ज्युनीअर मॅनेजमेंट्वाला त्याच पैशात तीन शर्ट बिग बझार मधन घेइल. ह्यात चूक काही नाही पण फरक आहे दोघांत.
श्रीचे पात्र ज्या प्रकारे उभे
श्रीचे पात्र ज्या प्रकारे उभे केलेले आहे ते पाहता त्याचे वागणे खटकत नाही.
तो शोफरला बॅग घेऊन यायला लावेल किंवा श्रीमंतीचे प्रदर्शन करेल असे वाटत नाही.
असो.
मराठी लेखकांना श्रीमंत
मराठी लेखकांना श्रीमंत माणसांचं, उद्योगपतींचं जग रंगवणे शक्य नाही. शोभा डे यांची शिकवणी लावली तर थोडीफार आशा आहे. पण मग त्या मालिका आजीआजोबा असलेल्या घरात बघता येतील का माहीत नाही. मी स्वाभिमान का अशी कोणती मालिका पाहिलेली नाही.
हिंदी मालिकांमध्येही फार उजेड असतो असे नाही. कंपनी टेकोव्हर करणे म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मिटिंगमधली संगीतखुर्चीच जणू असे कघघकी या मालिकेत दाखवले होरे
अरे!! त्याने म्युच्युअल
अरे!!
त्याने म्युच्युअल फंडात ठेवले असतील, तिथून रीडीम करून सेविंग अकाऊण्ट आणि तिथून कंपनी अकाऊण्टला ट्रान्स्फर असा प्रवास घडला असेल त्या ८० लाखांना
अमा, श्रीमंत माणसाला बि.बा.चेच शर्ट आवडत असतील तर?
किंवा गरीब माणूस 'रोज धुवून इस्त्री करून वापरेन, पण शर्ट घालेन तर झोडीअॅकचाच' अश्या पंथातला असेल तर?
म्हणजे झोडिअॅक किंवा बि.बा. हे श्रीमंतीमापक नाहीत असे मला म्हणायचे आहे.
हे उगीच लिहायचे म्हणून लिहीत नाही, ही अशी मंडळी मी रोजच अगदी जवळून बघते. १ कोटी वार्षिक पगार घेणारा माणूस वेळ वाचवण्यासाठी रोज लोकल ट्रेनने प्रवास करतो.
त्याने म्युच्युअल फंडात ठेवले
त्याने म्युच्युअल फंडात ठेवले असतील, तिथून रीडीम करून सेविंग अकाऊण्ट आणि तिथून कंपनी अकाऊण्टला ट्रान्स्फर असा प्रवास घडला असेल त्या ८० लाखांना >>>
असेल असेल. 
Pages