Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शुक्रवार दि. ३ जानेवारी २०१४
शुक्रवार दि. ३ जानेवारी २०१४ : अपडेट
~ जान्हवी बहर 'गोकुळ' मध्ये फुलायला सुरुवात झाली आहे असे वाटत आहे. प्रसन्न मुद्रेने तिचा वावर जाणवत आहे आणि तेही नवरा हॉटेलमध्ये राहात असताना. हा बदल स्वागतार्ह वाटतो शिवाय खुद्द श्री देखील 'माझ्या तिथून बाहेर पडण्यामुळे जान्हवीचे महत्व इतके वाढते होत असेल तर ही एक चांगलीच गोष्ट मानली जावी...". तर त्या अनुषंगाने आता कथानकाकडे पाह्यचे झाल्यास असे दिसून येईल की आज ऑफिसमधून आईआजी दमून आल्या आहेत. सोबत लॅपटॉपही आहे. गादीवर हुश्शः करत त्या बसल्या आणि जे काही घडत आहे त्यावर विचार करत असतानाच आता लाडकी होत चाललेली नातसून पाण्याचा ग्लास घेऊन आत येते. तिला पाहाताच आईआजीच्या चेहर्यावर स्मितही उमटते. दोघीपैकी आजीच संभाषण सुरू करतात आणि "व्यवसायाची वाढ किती मोठी झाली आहे हे मी आज पाहिले. उद्योग मी सुरू केला होता मात्र तो दसपटीने वाढविला श्री ने....त्याच्या अनुपस्थितीत तो कसा सांभाळला जाईल याची चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. जान्हवी मला सांग तुला लॅपटॉपचे ज्ञान आहे का ?".... जान्हवी मंद स्मित करत होकारार्थी उत्तर देते. "मग तू मला शिकविशील ?" या आजीच्या प्रश्नाला ती लागलीच हो असे उत्तर देते...."मी चहा करून आणते तुमच्यासाठी आणि मग लागलीच कॉम्प्युटर तुम्हाला शिकवायला सुरुवात करीन..." इथे आजी बरं तर म्हणतातच पण त्याचवेळी "अगं तू चहा जेवण करशील, पण बाकीच्या कुठे आहेत ?" जान्हवीला त्या कुठे आहेत हे माहीत तर आहेच, पण दाखवून द्यायचे नसल्याने ती लगबगीने पाण्याचा ग्लास घेऊन जिना उतरते.
नर्मदाबाई, इंदू आणि शरयू या तिघी प्रत्यक्षात श्री ला हॉटेलवर भेटण्यास गेल्या आहेत. त्याच्यासाठी बंगल्यात त्या ज्या ज्या सोईसुविधा देत असत त्या सार्याघ तिथेही घेऊन गेल्या आहेत. श्री ला घरी येण्याविषयी त्या बोलतात पण श्री ला आता त्या विषयासंदर्भात काहीही बोलायचे नसल्याने तो वरवर त्यांची समजूत काढीत राहतो. जान्हवीमुळे घर व्यवस्थित चालले आहे असे सर्वांचे मत बनते.
इकडे आईआजी आपल्या नव्या संगणक शिक्षिकेकडून धडे घेत आहेत. आता अशा उतारवयात कॉम्प्युटर शिकणे मला काहीसे अवघड जाईल असे त्या म्हणतात पण जान्हवी त्याना सोदाहरणासह प्रोत्साहित करते शिवाय प्रत्यक्ष स्क्रीनवर विविध तांत्रिक माहिती देत राहते. अधुनमधून दोघींमध्ये हास्यविनोदही होत राहतो ते पाहणे आल्हाददायक वाटले. जेवणाची वेळ होत आली तरी आपल्या तीन सुना अजूनी आल्या नसल्याचे आजीच्या लक्षात आले आहे, तर त्यांचे त्या विषयावरून लक्ष दुसरीकडे जावे म्हणून जान्हवी "मीच खाली जाऊन जेवण सुरू करते" असे म्हणते आणि दोघीही मग किचनमध्ये येतात. तिथे बेबीआत्या आली आहेच व ती शरयूला फोन करण्याच्या नादात आहे पण शरयू फोन उचलत नाही. बेबीआत्याचा संतप्तपणा पाहून आजी तिला शांत राहाण्याचा सल्ला देतात तर जान्हवी स्वयंपाकामध्ये मग्न असल्याचे दाखविते....भाजी आणायला उशीर होत असेल असाही बहाणा सांगते. ह्या तिघींचे हे बोलणे चालू आहे तोच तिन्ही सासूबाई आत येतात. त्याना पाहाताच बेबीआत्याची सरबत्ती चालू होते. शरयू "माझा फोन बंदच आहे त्यामुळे मला तुमचा फोन आल्याचे समजलेच नाही..." असे उत्तर देवून वेळ मारून नेते तर नर्मदा आणि इंदू भाजी चांगली मिळाली नाही म्हणून शोधत होते, ही सबब पुढे करतात. आजी आणि बेबीआत्या दोघींनाही ही कारणे पटलेली नाहीत पण त्या विषय पुढे नेत नाहीत.
आपल्या रूममधून रात्री जान्हवी श्री ला फोन करून दिवसभरातील घडामोडीचा वृत्तांत अगदी हसतमुखाने देते त्यामुळे दुसरीकडे तोही समाधानाने उत्तर देत राहतो. जान्हवीच्या "तू परत ये, श्री..." या मागणीला तो तितक्याच सौम्यपणे नकार देतो आणि 'माझ्या निर्णयावर विश्वास ठेव..." असा योग्य सल्लाही देतो. दोघेही अगदी हसर्यात मुद्रेने एकमेकाना गुड नाईट म्हणतात. जान्हवी फोन बंद करते आणि समोर पाहते तो नर्मदाआई आपला मुलगा आणि सूनबाई यांच्यातील लाडीक संवाद ऐकत उभ्या असतात. त्याना आपली सून इथे एकटी राहूनदेखील नवर्यांपेक्षा आपल्या सार्यांूची जी काळजी घेत आहे ते पाहून तिच्याविषयी त्यांच्या मनी प्रेम निर्माण झालेले आहे. मग तिला आपल्या जवळ बसवून घेऊन स्वतःवर आलेले दु:खाचे सावट तुझ्यावर येऊ नये अशी प्रार्थना करतात. जान्हवी त्यानाच उलट 'असे काही होणार नाही, आई" म्हणत धीर देते.
शनिवार ते सोमवार मी 'सासवड
शनिवार ते सोमवार मी 'सासवड साहित्य संमेलना' त असल्याने हे दोन दिवस माझ्याकडून मालिकेचे अपडेट येऊ शकणार नाही. तेव्हा कृपया आपल्यापैकी कुणीतरी हे काम करावे ही विनंती.
वा मामा मस्तच लिहिलेत.
वा मामा मस्तच लिहिलेत. सासवडसाठी शुभयात्रा, काळजी घ्या.
<<श्रीला हापिसात जाण्यासाठी
<<श्रीला हापिसात जाण्यासाठी बसमधे चढताना जो शॉट आहे (जाह्नवी असताना) तोच शॉट परत वापरलाय .....
<<ओढूनताणून काहीतरी गुंतागुंत निर्माण करण्यासाठी आपटेला आणण्याचा विचार असावा.>> +१
अनिल आपटे भेटतो तेंव्हा....
दोन शाळकरी मुलं डबलसीट सायकलवर दिसतात...दोन्ही वेळा...>> येस.माझ्या पण तेच लक्षात आल. आणि मुल पण तीच आहेत
बेफि
जान्हवी आणि आईआजीचे तसेच
जान्हवी आणि आईआजीचे तसेच श्री-आईआजीचे कॉम्प्युटर ट्रेनिंगचे संवाद रूपकात्मक होते.
आपण चुकून डिलिट केलेली फाइल रिसायकल बिनमधून परत काढता येते यावर आईआजी अशीच डिलिट केलेली माणसेही परत आणता येतात का असे म्हणतात. श्री आणि आईआजीही जनरेशन,इ.इ. द्वारे संवाद साधत असतात.
त्या तिघी श्रीलाच भेटायला गेल्या होत्या आणि जान्हवी त्यांना वाचवायचा प्रयत्न करते आहे(पुन्हा खोटे बोलून!) हे आईआजींनी ओळखलेले आहे. पण त्या फक्त गालातल्या गालात हसतात. त्या हसण्याचा अर्थ : ही खोटारडी मंडळी कधीही सुधारणार नाहीत यापासून "नवी सून सासवांची पाठराखण करते आहे याबद्दल कौतुक" असा काहीही लागू शकतो.
एकंदरित चांगल्या हेतूसाठी खोटे बोलले तर ते वावगे नाही असे आईआजींना ऊमगू लागलेले आहे (किंवा आधीपासूनच मान्य आहे) पण मी खोटे खपवून घेत नाही हे तत्त्व टाकून दिलेले दाखवणे त्यांना शक्य नाही.
श्री खोटे बोलला म्हणून त्या दुखावलेल्या नाहीत तर आपल्यातले नाते मोकळे आहे, एकमेकांपासून काही लपवायची गरज नाही या त्यांच्या समजाला धक्का लागल्याने त्या दुखावल्या आहेत.
मयेकरांना आता होसुमीयाघ
मयेकरांना आता होसुमीयाघ मालिकेचा प्रवक्ता हा किताब द्या़यला हरकत नाहि.
मयेकरांना आता होसुमीयाघ
मयेकरांना आता होसुमीयाघ मालिकेचा प्रवक्ता हा किताब द्या़यला हरकत नाहि.>>>++११
मुमुदा त्याचे अभिनय कौशल्य
मुमुदा त्याचे अभिनय कौशल्य असले तरी एखादे कॅरेक्टर अचानक गायब करायचे, पुन्हा आणायचे याला काहीतरी लॉजीक हवे ना?>>>> पण हा मुद्दाच नाहिये तिथे बेफीजी.... भिडे काकांनी पोस्टमध्ये लिहिलेल्या कमेंटला उत्तर आहे ते... अनिल आपटे परत आलेला माझ्याही डोळ्यात खुपतोच आहे, तो नक्कोचे परत त्या मालिकेत....
पण हा मुद्दाच नाहिये तिथे
पण हा मुद्दाच नाहिये तिथे बेफीजी.... भिडे काकांनी पोस्टमध्ये लिहिलेल्या कमेंटला उत्तर आहे ते... अनिल आपटे परत आलेला माझ्याही डोळ्यात खुपतोच आहे, तो नक्कोचे परत त्या मालिकेत....<<<
अहो पण हे मी म्हणालेलोच नाही आहे, हे त्या सामी म्हणाल्या आहेत आणि त्यावर मी फक्त हासलो आहे.
अहो पण हे मी म्हणालेलोच नाही
अहो पण हे मी म्हणालेलोच नाही आहे, हे त्या सामी म्हणाल्या आहेत आणि त्यावर मी फक्त हासलो आहे.>>>>> हो का आय माय स्वारी बेफिजी.... मागे मागितली होती तश्शी नाक घासुन माफी मागते.
मागे मागितली होती तश्शी नाक
मागे मागितली होती तश्शी नाक घासुन माफी मागते.<<<
अहो माफीबिफी का मागताय? मी फक्त क्लेरिफाय केले एवढेच पण मागे तुम्ही कधी आणि का माफी मागीतली होतीत? आय डी चे नांव बदलले आहेत का मध्यंतरी? जुना आय डी कोणता ते समजले तर कदाचित मला आठवेल.
मयेकरांना आता होसुमीयाघ
मयेकरांना आता होसुमीयाघ मालिकेचा प्रवक्ता हा किताब द्या़यला हरकत नाहि.<<<
हे बहुधा चुकीचे विधान आहे. माझ्यामते मयेकरांना त्या मालिकेचे क्रिटिक हा किताब द्यायला हवा आहे.
विषयला धरून लिहिल्यास मी
विषयला धरून लिहिल्यास मी उपकृत राहीन.
पण मागे तुम्ही कधी आणि का
पण मागे तुम्ही कधी आणि का माफी मागीतली होतीत? जुना आय डी कोणता ते समजले तर कदाचित मला आठवेल.>>>> बेफीजी मी मुग्धा रानडे. मागे एकदा आयडीं बद्दलच्या एका धाग्यावर मी तुमची नाक घासुन माफी मागितली होती.... आठवल का?
आय डी चे नांव बदलले आहेत का मध्यंतरी?>>>> हो... म्हटल वर्ष बदलल तर मग आपण आयडी का बदलु नये...
श्री अशोक यांच्या अनुपस्थितीत
श्री अशोक यांच्या अनुपस्थितीत अपडेटचे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करतो. सुदैवाने आज फार काही घडलेले नसल्याने थोडक्यात आटपता येईल.
सुरुवात आईआजींची लॅपटॉपशी झटापट. पुन्हा बाण. पुन्हा फाइल. पुन्हा सेव्ह. प्रेक्षकांत बेबीआत्या. तिलाही लॅपटॉप शिकायची सुरसुरी. आई तूच मला शिकव. यावर मी कसली शिकवणार. मला आधी जान्हवीकडून शिकू दे. हे ऐकल्यावर बेबीआत्याचे चक्क स्माइल. आईआजी बेबीला पुन्हा एकदा श्रीला आपल्य फ्लॅटवर राहायला (आणि हे मी सांगितले नाही) सांग. बेबी प्रत्यक्ष भेटूनच सांगणार. फोनवर वादविवाद नीट होत नसल्याने.
प्रसंग दुसरा: सकाळीच जान्हवीने स्वयंपाकघराचा ताबा घेऊन काहीतरी रांधलेले आहे. आपल्या बॅगेत ती दोन टिफिन बॉक्स भरताना दिसते. मोठी आई आणि छोटी आई या जुगलबंदी कलाकारांचे आगमन. तू का केलेस सगळे? तुम्ही करत नाही म्हणून. आता मी केलेय तर अन्न वाया जाऊ नये म्हणून खाल तरी. नाही नाही आता आम्ही करूही आणि खाऊही. श्रीला सांगितलंय ना काल तसं. मग दोघींना इंग्रजीच्या शिकवणीची आठवण. मग मायबोलीकरांच्या डोक्यात जाणारे विनोदाचे प्रयत्न. स्पर्धेसाठी ठरलेला जज्ज(ओळखा कोण) मिळेल की नाही हे प्रश्नचिन्ह दोघींच्या तोंडावर असताना शॉट कट.
सीन ३ : श्री आणि जान्हवी बसस्टॉपवर. श्रीला जेवणाचा डबा. श्रीला स्वत:साठी फर्निश्ड फ्लॅट बघायला जायचेय, सोबत जान्हवीही हवी. त्यावर(फ्लॅटवर राहण्याबद्दल) जान्हवीचे कशाला, काय गरज समजावणे.श्रीचे चिडणे (जे खोटे आहे हे प्रेक्षकांना कळेल पण जान्हवीला नाही)
सीन ४ : ऑफिस : आईआजी आणि लॅपटॉप. त्या लॅपटॉपशी बोलतायत. पण तो काही बोलत नाही त्यामुळे चिडचीड. श्रीचे आगमन. वेळेआधी १ मिनिट आल्याची वर्दी. आईआजीच्या लॅपटॉपसंबंधीच्या मायबोलीकरांच्या ड्डोक्क्य्यात्त जातील अशा प्रश्नांवर हसणे. असहकार आंदोलन. आईआजी जान्हवीकडे मदतीसाठी जाव्यात यासाठी.
बेबीआत्याचे आगमन. आईआजीना आश्चर्य. मग तुला नाही श्रीला भेटायला आले म्हटल्यावर आणखी आश्चर्य. श्रीला महत्त्वाची मीटिंग. आईआजीचा बेबीसमोर त्रागा. नातू छळतोय. लॅपटॉप पिळतोय. पण मी शिकून दाखवेनच. पुन्हा फ्लॅटसंबंधी सूचना. आता एकदम वरचा सूर.
श्रीची मीटिंग एकट्याचीच चाललीय. आईआजीचा चेहरा आठवून. आपण आईआजीपासून दूर जाऊ तेवढी जान्हवी त्यांच्या जवळ येईल हा प्लान इम्प्लिमेंट होतोय.
पुढच्या भागात : आईआजी जान्हवीला फोन करणार. जान्हवी नंबर ओळखून खुष होणार. आईआजी चकित होणार. माझा नंबर तुझ्या फोनात कसा? मी गोखल्यांच्या घरात आले त्याच दिवशी घेतला. इन केस ऑफ इमर्जन्सी. पण माझा नंबर तुमच्याकडे? उत्तर चाणाक्ष मायबोलकरांनी ओळखलेच असेल. तू घरात आलीस त्याच दिवशी घेतला इन केस ऑफ इमर्जन्सी.
तर ही इमर्जन्सी आता येऊन ठेपलेली आहे. कोणती ते कळण्यासाठी पाहात रहा 'होणार सून मी या घरची' फक्त झी मराठीवर सोमवार ते शनिवार रात्रौ ८:३०......
चुकलं चुकलं...कोणती ते कळण्यासाठी वाचत रहा मायबोलीवरचे या मालिकेचे अपडेट्स. टिंग टाँग.
भरत, शिवधनुष्य नुसतं उचललं
भरत,
शिवधनुष्य नुसतं उचललं नाहीत, तर शरसंधान देखील छान केलंत.
एकेक सीन थोडक्यात आणि इतका मुद्देसूद लिहिलात ..... छानच.
काही दिवसांनी एखाद्या सिरिअलची पटकथा लिहू शकाल असे वाटले.
वा, मस्त लिहिलेत भरतजी.
वा, मस्त लिहिलेत भरतजी.
ए श्री.. आईआज्जी ना.. कर्सर
ए श्री.. आईआज्जी ना.. कर्सर ला बाण म्हणतात.. खिदीखिदीखि, आता काय करायचं
पुन्हा डोक्यात गेलं>>>अगदी अगदी
आधी मला खरच कळालं नाही की जोक नेमका कशात आहे. मग कळालं बाण म्हणतात आणि त्यात पण आई आज्जी म्हणतात हा जोक आहे>>> ती आजी arrow ला मराठीत बाणच म्हणणार ना....जान्हवीला वाटत असेल कि कर्सरलाच बाण म्हणते आहे ते (किंवा जोक लिहिणार्याला कळलं नसेल कि काय जोक लिहायचा ते...)
मग मायबोलीकरांच्या डोक्यात जाणारे विनोदाचे प्रयत्न. >>
कालच्या अपडेटमध्ये एक प्रसंग
कालच्या अपडेटमध्ये एक प्रसंग सुटला त्याबद्दल क्षमस्व.
जान्हवी बँकेत श्रीच्या चिडण्याच्या आठवणीत हरवलेली. शेजारी गीताची बोरकरसाहेबांबद्दल कॉमेंट्री चालू आहे. जान्हवीला "तू त्यांची चमची आणि आता तर काय गोखले" हे वाक्य ती रोज म्हणणार. जान्हवीचे आपल्या बोलण्याकडे लक्ष नसल्याचे पाहून रोमँटिक कपलचे पहिले भांडण झाल्याचा निष्कर्ष. बोरकर साहेबांचे आगमन. गीताला वाक्ताडन आणि पीजेजच्या धबधब्याने जान्हवीचा मूड पुन्हा हसरा. अनेक मायबोलीकरांच्या डोक्यात जाणारे खोटे हास्य.
(No subject)
"तू तिथे मी" मध्ये भावा
"तू तिथे मी" मध्ये भावा बहिणीतील अनैतिक संबंध जितक्या चवीने दाखविले आहेत , त्याला बोलायलाच लागेल "मराठी पाऊल पडते पुढे "… मराठी माणसाला Incest Relationships इतक्या कधी पासून आवडायला लागल्या ?
आता यापुढे काय? "होणार सून मी या घरची " मध्ये त्या पाच बरण्याना समलैंगिक दाखवा . नाहीतरी नवर्यानं हाकलून द्यायची परंपराच आहे तिथे.
रोहिणी हत्तंगडी पोरांना जन्म देते आणि त्यांचे लग्न लावून बायका ठेवून घेते. त्या बायका पण नवऱ्या शिवाय उर्वरित आयुष्य सासुसोबत आणि इतर बरण्या सोबत घलवतत.
चो-थो-र विचारवन्त>>>> wt was
चो-थो-र विचारवन्त>>>> wt was that ??????
मयेकरजी तुम्ही अगदी मस्त लिहीले आहेत अपडेटस... मालिका पाहण्यापेक्षा इथेच मालिका वाचणे जास्त चांगले आहे, या निष्कर्षाला मी पोचले आहे.
भरतजी.. जमलयं अपडेट्सच मग
भरतजी.. जमलयं अपडेट्सच

मग मायबोलीकरांच्या डोक्यात जाणारे सीन >>
सॉरी, चुकून चुकीच्या ठिकाणी
सॉरी, चुकून चुकीच्या ठिकाणी चुकीचा प्रतिसाद टाकला होता. क्षमस्व
भरतदादा, एक नंबर अपडेट्स
भरतदादा,

एक नंबर अपडेट्स आहेत
असेच अपडेट्स हवेत मला
भरत मयेकर मस्त अपडेट!!
भरत मयेकर
मस्त अपडेट!!
मयेकर
मयेकर

फ्लॅटमधे आल्यावर जान्हवीची आई
फ्लॅटमधे आल्यावर जान्हवीची आई सुगरण झाली का आळस झटकला तिने ? स्वयंपाकाला येणारी शांता दिसत नाही आता
अशोकरावांच्या पोटावर पाय
अशोकरावांच्या पोटावर पाय आणण्याच्या मयेकरांच्या कृतीचा हळवा व सेंटिमेंटल निषेध!
अशोकरावांच्या पोटावर पाय
अशोकरावांच्या पोटावर पाय आणण्याच्या मयेकरांच्या कृतीचा हळवा व सेंटिमेंटल निषेध!
>> अयाई गं बेफी..
Pages