युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्राईड आईसक्रिमसाठी अतिथंड ( लिक्विड नायट्रोजन वापरून थंड केलेले ) आईस्क्रीम, मैदा किंवा कॉर्नफ्लोअर आणि अंडे यांचे बॅटर, आणि बर्‍यापैकी तापलेले तेल वा तूप हवे. आईसक्रीमचा गोळा बॅटरमधे बुडवून ( हवा तर कोरड्या कॉर्नफ्लेक्सच्या चुर्‍यात घोळवून ) तळतात. अंडे असल्याने कव्हर पटकन सेट होते व या वेळात आतले ऑसक्रिम वितळत नाही.

food food var baghitalele fried icecream - freezemadhoon scoop kaadhoon cornflax madhye changala gholavala aani lagech talalaa.

नुसते कॉर्नफ्लेक्सच वापरायचे तर ते आधी फ्राय किंवा टोस्ट करून मग त्याच्या चुर्‍यात आईसक्रिम स्कूप घोळवला कि झाले कि. त्यासाठी ते तळायची गरज राहणार नाही, कारण तसाही तो चुरा त्या स्कूपला चिकटेलच.

मी लिहिलेल्या प्रकारातले फ्राईड आईसक्रीम, ताडदेवला मिळत असे. पण मला ती कल्पनाच न आवडल्याने खाल्ले नाही मी कधी.

आता वाशीला, पाम बीच रोडवर एका ठीकाणी स्मोकिंग आईसक्रीम मिळते. ते तोंडात घातल्यावर तोंडातून धूर येतो ( तसा दिसतो ).

खूप आवडते म्हणून चवळीची पालेभाजी आणली, पण ऐन वेळच्या कामाच्या घाईत निवडायची राहिली नि बरीचशी खराब झाली. जेमतेम एक-दोन मुठी होईल इतकाच ऐवज उरलाय तर तो रोजच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत ढकलावा का? चवळीची पालेभाजी आवडत असली तरी आमटीत कशी लागेल याचा नक्की अंदाज येत नाहिये. आणि घालायची झाली तर फोडणीत कांदा वगैरे परतून मग बारीक चिरलेली भाजी परतून घ्यावी लागेल ना?

९, हो. हो. Happy
पण मला चवीचा अंदाज नाही...

प्रज्ञा भाजीला जशी फोडणी देतात तशी द्यायची प्रॉपर लसुण कांदा, आणि मग त्यात डाळ ढकलून नेहमी प्रमाणे आमटी करायची. नक्की मस्त लागेल

धन्यवाद.आमटीत चांगली लागली चव. मला मेथीचा पाला आवडतो असाच मूठभर घातला तर, हा पण आवडला.
मेधा, दोन्ही रेस्प्या चांगल्या वाटतायत, अख्खी जुडी पुन्हा आणीन तेव्हा करणार नक्की. या वेळी अगदीच एक मूठ भाजी झाली होती चिरल्यावर. त्यामुळे क्वांटिटी अगदीच कमी होती.

जरा विचीत्र प्रश्न आहे. यासाठी नवीन धागा कशाला काढायचा म्हणून इथेच विचारतेय. सध्या पावसाळ्यामुळे स्वीट कॉर्नला भरभराटीचे दिवस आलेत. माझ्या मुलीला ते दाणे उकडुन खायला फार आवडतात. पण ते उकडायचे, त्यात मीठ+ तिखट+ चाट मसाला + बटर व कुठलेही चीज स्प्रेड घालायचे व खायचे असा तिचा रोजचा कार्यक्रम झालाय. तिला त्याची कांदा टॉमेटो अशी भेळ नकोशी झालीय. पण आरोग्यासाठी हे दररोज चीज खाणे तसेच मका ही खाणे कितपत ठीक आहे? तिचे वय ११ आहे. शाळेतुन आली की तिला हेच लागते. मला कंटाळा आलाय, कारण तिला बाकी कुठलीच व्हरायटी नको आहे खाण्यातली.

रश्मी,
राधाक्काच्या धाग्यावरचा तुझाच १५:२३ चा प्रतिसाद वाचुन घेणे Happy

तिलाच कंटाळा येईल असे बरेच दिवस खाल्ल्यावर Happy
स्वीट कॉर्न तसा चांगला नाही. पण लहान मुले शारीरीक अ‍ॅक्टिव्ह असल्याने थोड्या प्रमाणात चालेल असे वाटते.

सस्मित यु आर राईट Proud थॅन्क्स गं ! पण ती मला जुमानत नाही. हट्टी आहे. तिने ते बिग बाजारच्या बाहेर ते लोक करुन देतात ना अमेरीकन स्वीट कॉर्न म्हणून, तसे खाल्ले. तेव्हापासुन तेच आवडते तिला. तरी कधी पोहे, चिवडा तर उकडुन अंडे, असे देते तरी तो कॉर्नचा हट्ट जात नाही.

अनू, धन्यवाद Happy पण आता बाहेर खेळणेच बंद झालेय पावसामुळे आणी शाळेचा अभ्यासही वाढलाय. मग बसल्या जागी हे असे चरुन वजन वाढणारच की. तिला स्वीट कॉर्नचा कंटाळा येत नाहीये हाच मुळात प्रॉब्लेम झालाय माझ्यासाठी. कारण मका पचायला जड असतो की हलका हेच माहीत नाहीये.

मका पचायला जड असतो.
एकदम बंद केला तर ती स्वाभाविकपणेच ऐकणार नाहीये. तेव्हा बाकीचे दोन/तीन पदार्थ इतके इतके खाल्ले की अमूक एवढे स्वीट कॉर्न खाता येईल असं करता येतंय का बघा. म्हणजे भुकेच्या एक तृतियांश हवा असलेला पदार्थ आणि दोन तृतियांश एरवी आवडीचे असलेले पण पौष्टिक पदार्थ असं समोर द्यायचं. थोड्या पेशन्सने हे जमावं असं वाटतंय.

शाळेतून आल्याबरोबर खणकून भूक असेल तर आधी पोळी/भाजी इ. प्रकार समोर करायचे आणि कॉर्न उकडायला ठेवतेच आहे असंही सांगायचं. तोवर दुसरं काही खाईल आणि मग कॉर्न खाऊदेत लहान वाटीभर... होप हे चालेल.

आधी पोळी/भाजी इ. प्रकार समोर करायचे>>. ती खूप हट्टी असेल तर म्हणेल ठीके थांबते मी कॉर्न होईपर्यंत Wink .. किंवा मुलांना लगेच कळते कि आपल्याला हे द्यायचे नाहीये आईला सो ती पळवाट काढत आहे ..
पण काहीतरी करून कॉर्न चा (आणि त्यायोगे चीस चा वगैरे ) इन्टेक कमी करता येईल अशी युक्ती हवी
आज जास्त मिळालेच नाहीत /संपले होते /चांगले नव्हते etc
शिवाय जमलं तर हे पण समजवा कि केव्हा ना केव्हा कॉर्न चा सिझन संपेल मग अचानक बंद होईल तेव्हा तुला त्रास होईल सो आत्तापासूनच कमी खाऊया वगैरे .. किंवा त्याच्या तोडीचे असेच काहीतरी चटपटीत(किंवा खूप आवडीचे ) बनवायचे
(हे शाळेतून आल्यावर जेवेपर्यंत च्या मधल्या वेळचे खाणे असे समजून लिहितेय )
तरी कधी पोहे, चिवडा तर उकडुन अंडे, असे देते तरी तो कॉर्नचा हट्ट जात नाही.>> जाईल हळू हळू या बाकीच्या गोष्टी सुद्धा खाते नुसते कॉर्न नाही हा +ve मुद्दा आहेच

पोरं इतकी सुधी नसतात, योकु Proud आपलं बारसं जेवलेली असतात >>>
लॉल, या लेव्हल वर यायला अद्वैत ला बराच वेळे अजून सो आण्भव नई

एकदम काँट्रॅव्हर्सिअल उपाय - अमूक एकच आहे ( जे काय तुम्हाला द्यायचे आहे) नाहीतर पाणी/दूध आणि अर्ध्या तासाची मुदत तुम्ही दिलेला खाऊ संपवायला. नाहीतर रात्री डायरेक्ट जेवण मिळेल सांगायचं. रागावू नका, it works!

माझी साडे तीन ची आहे पण मी तिला सरळ नाही देणार सांगते. उगाच तात्पुरती समज देऊन उपयोग नसतो. तिला मध्यंतरी रोज टेट्रा पॅक मधील मिल्क शेक हवा असायचा. मी तिला सरळ नाहीच देणार म्हणून सांगितलं. ते अनहेल्दी आहे आणि ते खाल्ल तर तू आजारी होशील. म्हणून मी तुला देणार नाही परत विचारू नको. डॅडी आणि आजी ला सांगितलं तर तुझे मी लाड करणार नाही......

बस तेंव्हापासूउन मागत नाही. महिन्यातून एकदा प्यायली , बाहेर गेलो कुठे आणि वेळेवर जेवण नाही कधी मिळू शकलं तर अश्या गोष्टी दिल्या तर ठीक पण नेहमी नाही म्हणजे नाही....

घरातले मला मी एक नालायक आई आहे असं बोलतात पण माझ्यात इतके पेशन्स नाहीत हे कबूल करायला लाज वाटत नाही...

अनिष्का आणि राजसी एक्दम एक घाव २ तुकडे Proud कधी कधी असं कठोर व्हावंच लागतं म्हणा !
माझी एक मैत्रीण पण असंच करते आणतच नाही एखादी सो अपोआप मुलं विसरतात . पण इथे तिची मुलगी मोठी आहे ग तशी.. ११ म्हणतेय ना ..

१. किन्चित भाजून रोज जेवणानन्तर खा. भाजलेली बडिशेप पट्कन सम्पेल.
२. भाजि-आमटिच्य फोड्नित वापरा. मोहरी-जिर्याबरोबर.
३. किन्चित भाजून पूड करुन भाजीत, सलाड्मधे वापरा.

Ho अंजली 11 म्हणजे थोडं अडनिड वय....पण तिला मग वजन वाढेल, पिंपल येतील वगैरे सांगून घाबरवलं तर काही वर्क होईल का... याचा अनुभव नाही सो मी सल्ला द्यायला अपात्र... Happy

राजसी आणी अनिश्का, सल्ला छानच आहे, मी पूर्वी तशी वागत पण होते. पण ती बाकी गोड वगैरे जास्त खात नसल्याने मला पर्याय कमी झाले. नाहीतर मुले शिरा, खीर , वड्या वगैरे खातात तरी.

योकु, डब्यात पोळी भाजी देत असल्याने आल्यावर परत मुलांना हे नको असते. कारण आजकाल शाळा सुद्धा पोळी- उसळी-भाजी, पुलाव, थालीपीठ, इडली वगैरेसारखे हेल्दी डब्यात आणायला सांगतात. कारण काही आया पण कंटाळा करतात डबा द्यायला. हो , हे खरे आहे, माझ्या मुलीच्या शाळेत हे प्रकार घडले आहेत. ( सॉरी चर्चा जरा लांबलीय )

पण याला चांगले म्हणावे की वाईट माहीत नाही, पण काल पासुन तिचे पोट दुखत असल्याने डॉ कडे नेले तर त्यांना मक्या विषयी सांगीतले तेव्हाच तिच्याच समोर त्या म्हणाल्या की मका पचायला जड आहे, त्याने गॅसेस होतात. मग घरी तिला समजावुन सांगीतल्याने सारखा मका खाणार नाही हे तिने कबुल केले. शेवटी सोनारानेच कान टोचावे लागले.

सर्वांचे खूप धन्यवाद ! मका पुराण इथेच समाप्त करते, नाहीतर बाकी मुद्दे मागे पडतील. Proud

मनीम्याऊ, बडीशेप + बाळंतशेपा + ओवा हे सर्व काळे मीठ चोळुन जराशे पाणी शिंपडुन भाजुन घे, त्यात ज्येष्ठमध पूड घालुन सुपारी होईल. पचनाला उत्तम. आज मुलीच्या पोटदुखीवरुन शेजारी हा विषय झाला. शेजारणीची दीड वर्षाची मुलगी पण भाजलेला ओवा चावुन चावुन खाते.

Pages