युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पातीबरोबरच चिरून भाजीत वापरायचे.> हो हो मंजुडी. मी असंच करते. पण ते दुसर्‍या कशात नाही का वापरता येणार. फार लहान असले (की चिरायला) किंवा फार मोठे असले की भाजीत आवडत नाहीत .

भरलं वांगं बटाटा भाजी असते दाण्याचा कूट रस्सा वाली त्यात वांगं बटाटा बरोबरच हे कांदे पण अख्खे शिजवायचे. त्या ग्रेव्हीत चव चांगली लागते.

रावी,

पुर्वी आपल्याकडे आपले नेहमीचेच कांदे पातीसकट मिळायचे. त्यातले कांदे त्याच काय इतर भाजीत वापरले तरी चालत असत. पण आता बाजारात जे स्प्रिंग अनियन मिळतात ती वेगळी जात आहे. त्याचे कांदे फारसे मोठे नसतात. त्यामूळे ते कोशिंबीरीत वगैरेही खपून जातात. भाकरीसोबत, मसालेदार भाजीसोबतही कच्चे खाता येतात.

पुर्वीच्या पाती सपाट असायच्या, आताच्या गोल असतात. हा फरक !

सलाद, भाजी, आमटीत कांदापातीचा कांदा वापरता येतो. पिठल्यातही छान लागतो. सूपमध्ये वापरता येतो. कच्चा कांदा मस्तच लागतो. या कांद्याची लिलीची फुले करून कोशिंबीर, सलाद वगैरे सजवण्याचा गृकृद, पाकु लोकांचा प्रघात वगैरे आहे! Proud

दिनेश, कांद्यांच्या अनेक जाती(पाती!) असतील पण हल्लीच्या लहान कांद्याच्या पाती म्हणजेच कोवळ्या कांद्याच्या असतात. याच रोपांची पूर्ण वाढ होऊ दिली आणि मग जमिनीतून उपटली तर त्यांनाही मोठे कांदे लागलेले असतील आणि तिच्या पातीही जून आणि कमी लवचिकपणाने जुड्यांमध्ये दबून सपाट झालेल्या दिसतील.

पातीचा कांदा, काकडी आणि सि.मी. बारीक चिरुन, त्यात दही, थोडी मिरपुड , मीठ घालून मस्त सॅलड / कोशिंबीर होते.

गव्हाचे सत्त्व दूधात घालून/उकळून हॉर्लिक्स- कॉप्लानसारखे मुलांना प्यायला देतात. (अजिबात आवडत नाही. मुले व्रात्य असतील तरच त्यांना असले खायला-प्यायला द्यावे असा कायदा होणे गरजेचे आहे!)

गव्हाचे सत्व = मैदाच ना? किंवा भिजवून मग केला असेल तर सरळ कुरडयांचा कोरडा कच्चा चीक असणार तो. चिकासारखाच करून छान लागायला हवा. पण यांनी नीट आंबवलेला नसेल. ताक घालून उकड केल्यासारखा चीक होईलसे वाटते.

मैदा नाही, गहू भिजवून केलेलला कोरडा चिक आहे, चिक मला खायला आवडतो (मुलगी खात नाही :डोमा:) पाकिटावर लिहिल्याप्प्रमाणे केला पण आवडला नाही. उद्या ताक घालुन प्रयोग करण्यात येईल.

Happy
सिंडरेला, ती पाक क्रुती माहिती आहे. मी रवा गव्हासारखा तीन दिवस भिजवून साठवणुकीच्या कुरडया पण करते.
पण हे तयार सत्व मिळाले म्हणून प्रयोग केला.
एरवी लहर आली की रव्याचाच चिक करते.

Scallion आणि Onions वेगळे ना ? पुर्वी जी कांद्याची पात मिळायची ती लवकर शिजायची देखील नाही. आताची तर कच्ची देखील खाता येते. ( असो, भारतात कांदापात खाऊन बरीच वर्षे झाली Happy )

मोझरेला चीज फ्रिजमधे ठेवले कि काही दिवसांनी त्याला बुरशी येतेय आणि मग सगळेच चीज फेकुन द्यावे लागते. फ्रिजच्या ऐवजी फ्रिजरमधे ठेवावे का मोझरेला चीज?

गेल्या महिन्यात प्लेन कॉर्नफ्लेक्स आणलेत पण बेचव लागत असल्याने तसेच पडुन राहीलेत. काय करता येईल त्याचं??

कॉर्नफ्लेक्सचा भुगा 'ब्रेड क्रम्ब्ज' ना पर्याय म्हणून (रेसिपी शोजमध्ये तरी) वापरतात. मी प्रयोग केलेला नाही.

पोहे, साखर नसलेले फ्लेक्स, भात अशा सगळ्या ब्लान्ड गोष्टी खपवण्याचा एक आणि एकच उपायः
झणझणीत कानातूनधूर पातळ मटकी/मूग/मसूर उसळ करुन त्यात हे तळाला घालून वर पातळ उसळ शेव कांदा घालून रात्री खाणे Happy

mi_anu , दिनेशदा, अरुंधती कुलकर्णी, धनश्री > मस्त ! पुढच्या वेळेस नक्की करून पाहीन.

ते प्लेन कॉर्नफ्लेक्स तू कसे खातेस योडे
>>
एकदाच खाल्ले तोंड वेडंवाकडं करत..

चिवडा ऑप्शन बरा वाटतोय त्यातल्या त्यात..

फ्राईड आईस्क्रीम... जरा अतिच होईल गं माझ्या सुगरणपणाला हे.. Proud

दुधात घालून खाल्लेस की कसे?

दुधात साखर घाल, घरी असेल तो कुठलाही जॅम घाल एखादा चमचा, किंवा रोझ सिरप/ बटरस्कॉच सिरप/ चॉकलेट सिरप/ स्ट्रॉबेरी क्रशपैकी काही असेल तर ते घाल आणि मग कॉर्नफ्लेक्स त्यात घालून खा.

दूध अगदी हलकं कोमट करून त्यात दोन राजगिरा लाडू मिक्स कर. शेजारी एका बोलमध्ये कॉर्न फ्लेक्स काढून ठेव. एका वेळी साधारण २-३ घास होतील एवढे फ्लेक्स त्या दुधात घालायचे आणि सॉगी व्हायच्या आत पटकन खायचे. दुधात जवसाची पूड, वॉलनटचे तुकडे घातलेस तर पोटभरीचा हेल्दी ब्रेफा होतो. भारतात मिळणारे कॉर्नफ्लेक्स फोर्टिफाइड असतात का? इथले असतात त्यामुळे मी आठवड्यातून दोनदा तरी हा असा नाष्टा करते.

पुरण पोळ्यांसाठी पातळ भिजवलेली कणिक शिल्लक आहे. साध्या पोळ्या चांगल्या होणार नाहीत.
काय करता येइल ?

~साक्षी

पुरणपोळ्यासाठी भिजवलेल्या कणकेच्या पोळ्या मस्त होतात. त्यात तेल आणि मीठ नेहेमीपेक्षा जास्त असतं त्यामुळे तव्यावरून गरमागरम लुसलुशीत नुसती पोळीच खायला भारी लागते. तूप लावायचं, म्हणजे स्वर्ग.

हो, साधी पोळी मस्त होते. तेल लावून बरीच पातळ लाटायची, पटपट भाजायची (ब्राऊन चालेल, पण काळे डाग नको), - अगदी रूमाली रोटी सारखी लुसलुशीत होते. (फार भाजली तर मात्र चिवट होते. दोन टाळ्या वाजवून कोणी असेल तिकडे तर त्याला भाजायला कामाला लावा Wink Happy )

Pages