Submitted by आरती. on 26 November, 2013 - 10:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. पातळ भाजलेले पोहे - पाव किलो
२. कुरमूरे - पाव किलो
३. भाजकी डाळ - १ वाटी
४. भाजलेले शेंगदाणे - १ वाटी
५. लिंबाचा रस - ४ चमचे
६. खवलेल ओल खोबर - १/२ वाटी
७. कोथिंबीर - १ वाटी
८. हिरव्या मिरच्या - ३- ४
९. साखर - चवीनुसार
१०. मीठ - चवीनुसार
क्रमवार पाककृती:
डाळ, कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, दोन चमचे लिंबाचा रस, साखर, मीठ सर्व मिक्स करुन मिक्सरला बारीक वाटून घ्यावी. ह्या मिश्रणाचे छोटे लाडू (तिळाचे लाडू बनवतो त्या आकाराचे) बनवून घ्यावेत.
एका मोठया बाऊलमध्ये पोहे, कुरमूरे, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, २ चमचे लिंबाचा रस, मीठ व थोडी साखर, ओल खोबर घालून सर्व मिक्स कराव.
त्यावर डाळ्याचे लाडू ठेवून सर्व्ह कराव.
खाताना लाडू कुस्करून त्यात मिक्स करून खावेत.
आले पाक व ऊसाचा रस हा बेळगावचा संध्याकाळचा नाश्ता....
वाढणी/प्रमाण:
खाल तेवढ कमीच आहे.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/6784
ही वाच. यात साय आहे.
थँक्स वेका, हीच रेसिपी हवी
थँक्स वेका, हीच रेसिपी हवी होती
सुशीला नावाचा एक पदार्थ असतो
सुशीला नावाचा एक पदार्थ असतो ना?>>> असतो की. पण त्यात चुरमुरे / कुरमुरे भिजवुन घालतात पोह्याप्रमाणे.
https://www.betterbutter.in/mr/recipe/76971/sushila-in-marathi
मस्त आहे कृती. ते तिखट लाडु दहीकाल्यात प्रसाद म्हणून खातात तसेच वाटतायत.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/35062
सुशीला
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-mah...
आले पाक.मीही नावावरून गंडले
आले पाक.मीही नावावरून गंडले होते.पण मग आमच्या सोसायटीत बेळगाव करांनी ऊसाच्या रसाच्या दुकानात आलेपाक म्हणून भेळ सदृश काहीतरी विकायला ठेवल्याचे आठवले आणि हे ते असं रिलेट झालं.
Pages