आले पाक (बेळगाव स्पेशल - फोटोसहित)

Submitted by आरती. on 26 November, 2013 - 10:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. पातळ भाजलेले पोहे - पाव किलो
२. कुरमूरे - पाव किलो
३. भाजकी डाळ - १ वाटी
४. भाजलेले शेंगदाणे - १ वाटी
५. लिंबाचा रस - ४ चमचे
६. खवलेल ओल खोबर - १/२ वाटी
७. कोथिंबीर - १ वाटी
८. हिरव्या मिरच्या - ३- ४
९. साखर - चवीनुसार
१०. मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

डाळ, कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, दोन चमचे लिंबाचा रस, साखर, मीठ सर्व मिक्स करुन मिक्सरला बारीक वाटून घ्यावी. ह्या मिश्रणाचे छोटे लाडू (तिळाचे लाडू बनवतो त्या आकाराचे) बनवून घ्यावेत.

एका मोठया बाऊलमध्ये पोहे, कुरमूरे, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, २ चमचे लिंबाचा रस, मीठ व थोडी साखर, ओल खोबर घालून सर्व मिक्स कराव.
त्यावर डाळ्याचे लाडू ठेवून सर्व्ह कराव.
खाताना लाडू कुस्करून त्यात मिक्स करून खावेत.

आले पाक व ऊसाचा रस हा बेळगावचा संध्याकाळचा नाश्ता.... Happy
alepak.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढ कमीच आहे.
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्-चार वर्षांपुर्वी गोकाकला गेले होते. धबधब्याच्या शेजारी असलेल्या एका हॉटेलात काऊंटरवर मोठ्ठी परात ठेवलेली आणि त्या परातीत लाल मसाला आणि इतर गोष्टी मिसळलेल्या पातळ पोह्यांचा एक मोठ्ठा डोंगर उभा होता. मी वेटरला हे काय आहे म्हणुन विचारल्यावर त्याने काहीतरी नाव घेतले आणि वर काय हे? एवढेही माहित नाही?? असे कानडीमिश्रित मराठीत बोलत माझ्याकडे अतिशयच तु.क. टाकले.

बहुतेक ते आले-पाक असावे. Happy

मंजु, वर्णन वाचुन तरी तेच वाटतेय. धन्यवाद गं, एक मस्त मसाला मिळाला.

माझ्या लेकीला कांदापोहे अजिबात आवडत नाहीत पण पातळ पोहे न शिजवता त्याचे काहीबाही केलेले आवडते. वरच्या दोन्ही रेसिपीच मदतीला आहेत आता.

<<एका मोठया बाऊलमध्ये पोहे, कुरमूरे, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे....<<
हे पोहे कोरडेच घ्यायचे का? कि आधी भिजवुन?

मी_आर्या, हे पोहे कोरडेच घ्यायचे का? कि आधी भिजवुन? <<< हे भाजून घ्यायचे आहेत. लागणारे जिन्नस मध्ये दिल आहे. थोड्याशा तेलामध्ये किंवा कोरडे भाजू शकता.

आरती आठवण करून दिलीस की बरेच दिवसात रसाच्या गुर्‍हाळाला भेट दिली नाही. Sad
मी मूळची बेळगावची नाही पण आता सात वर्ष इथे आहे लग्नानंतर.. इथे जेव्हा जेव्हा आलेपाक आणि रस हादडला आहे तेव्हा त्यात आल्याची चव नक्कीच जाणवली आहे. इथल्या ओळखीच्यांकडून जेव्हा रेसिपी कळली त्यात पण आल्याचा समावेश असल्याचे कळले.. मी स्वतः घरी ऑथेंटिक आलेपाक बनवला नाही ( म्हणजे पोहे आणि ते लाडू असा) पण पोहे कालवतानाच त्यात आले घालून झटपट आलेपाका सदृष्य जे बनलं, त्याची चव विकतच्या आलेपाकासारखी होती.. आलं आवडत असेल तर नक्की घालुन करुन पहा रेसिपी..
हो आणि एक, इथे खवलेल्या ओल्या खोबर्‍या ऐवजी ओल्या खोबर्‍याची करवंटी काढून टाकुन खोबरे किसणीवर लांब किसून घेवून पोह्यात घालतात.. ते दिसायला आणि खायला पण छान वाटतं..
हो आणि दुसरं, इथे पोहे आलेपाक आणि शेंगा आलेपाक असे दोन प्रकार मिळतात.. शेंगा आलेपाकात फक्त भाजलेले शेंगदाणे (पोहे आणि कुरमुर्‍याचे नाव सुद्धा नसते त्यात ! Happy ) असतात.. भारी लागतो हा प्रकार ( मेले शेंगदाणे वाईट ते काय लागणार?) पण रसाबरोबर संध्याकाळी खायला खरच मज्जा येते.. Happy

sonchafa, काय छान वर्णन केल आहे. Happy
आतापर्यंत तुमची रसाच्या गुर्‍हाळाला भेट झाली असेल आणि आम्हाला मिस करत, आमची आठवण काढत खाल्ल असेल. Wink

हो गं खरच आरती, मी मध्यंतरीच्या काळात दोन-तीन वेळा आलेपाक आणि रस हादडला ( खाल्ला हा शब्द फारच decent Blush आहे..) आणि आठवण सुद्धा काढली कारण आलेपाकात आलं आहे की नाही हे पुन्हा पुन्हा चेक करत होते.. इथे छातीठोकपणे लिहीलं होतं ना ?? Lol

रेसिपी महाराष्ट्रातून आली आहे हो.. तिथे घालत नाहीत आलं बहुतेक.. बेळगावात असतं. म्हणून बेळगाव महाराष्ट्रात येत नाही..
दिवे.. Lol

sonchafa, रेसिपी महाराष्ट्रातून नाही तर, आंध्रमधून आली आहे. Wink

खर॑ तर हि भेळ या प्रकारत मोडणारी पाक्रु झाली.>>> खरंच की!! आमच्या ऑफिसच्या इथला भेळवाला सुक्या भेळीत असंच चटणीसदृश कायसंसं घालतो... पा.पो. नसतात, पण कुरमुरे, ही अशी ओली नाही आणि कोरडीही नसणारी चटणी, कांदा, टोमॅटो, बटाटा, चुरलेल्या पुर्‍या, खारे दाणे, फरसाण आणि नमक मसाला मारके तो एक चविष्ट प्रकरण पुड्यात बांधून देतो.

अरे खरच की.. ! मोत्यांचे शहर आत्ता बघितलं...शुद्ध मराठी बघता तू मूळची महाराष्ट्रातली असशील असं वाटतं.. Happy रच्याकने.. मी दुसरी आरती समजत होते एवढे दिवस.. नियमित माबोवर न आल्याचा परिणाम Sad
मंजूडी तोंडाला पाणी सुटतय त्याचे काय ??

दर रविवारच्या पावसाळी ट्रिप्समध्ये आम्ही खेडेगावातून वेगवेगळ्या भाज्या विकत आणतो आणि पाकृ साठी शोधण्यासाठी धावाधाव करतो. या रविवारी छान कोवळं भरपूर सारं आलं आणलं आहे आणि माझी जाऊ आलेपाक ( आल्याच्या वड्या) करायचं चॅलेंज घेऊन बसली. आम्ही दोघींनी युट्युबवर शोधलं पण एकही रेसिपीमध्ये साय घातलेली नाही, जे आमची सासू घालायची ( त्या आता नाहीत आणि आम्ही तेव्हा ही रेसिपी शिकलो नाही Sad ) . माबोबर सर्च मधे ही पाकृ मिळाली, पण यात साय सोडा पण आलं सुद्धा नाही Lol

Pages