आले पाक (बेळगाव स्पेशल - फोटोसहित)

Submitted by आरती. on 26 November, 2013 - 10:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. पातळ भाजलेले पोहे - पाव किलो
२. कुरमूरे - पाव किलो
३. भाजकी डाळ - १ वाटी
४. भाजलेले शेंगदाणे - १ वाटी
५. लिंबाचा रस - ४ चमचे
६. खवलेल ओल खोबर - १/२ वाटी
७. कोथिंबीर - १ वाटी
८. हिरव्या मिरच्या - ३- ४
९. साखर - चवीनुसार
१०. मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

डाळ, कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, दोन चमचे लिंबाचा रस, साखर, मीठ सर्व मिक्स करुन मिक्सरला बारीक वाटून घ्यावी. ह्या मिश्रणाचे छोटे लाडू (तिळाचे लाडू बनवतो त्या आकाराचे) बनवून घ्यावेत.

एका मोठया बाऊलमध्ये पोहे, कुरमूरे, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, २ चमचे लिंबाचा रस, मीठ व थोडी साखर, ओल खोबर घालून सर्व मिक्स कराव.
त्यावर डाळ्याचे लाडू ठेवून सर्व्ह कराव.
खाताना लाडू कुस्करून त्यात मिक्स करून खावेत.

आले पाक व ऊसाचा रस हा बेळगावचा संध्याकाळचा नाश्ता.... Happy
alepak.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढ कमीच आहे.
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडरेला Happy
बाई, हो पंढरपूरी डाळ. ह्याला पंढरपूरी डाळ बोलतात हे उदगीर बाफवर समजल. आम्ही भाजकी डाळ किंवा चटणीची डाळ असच बोलतो.

चनस, अन्जू धन्यवाद. Happy
इन्ना, मी बिन आल्याचा खाल्ला आहे. आई असच बनवते. थोडसच आल घालून ट्राय करेन. सढळ हाताने नको ग बाई. Happy

हे हे आरती, मस्त आठवण करून दिलीस गोड पोंगलची. बर्‍याच दिवसात झालीच नाही ही रेसिपी घरी. करेन करेन म्हणत कोर्टात जसं तारिख पे तारिख देतात तसं झालं हिचं Proud आता दोन्ही करेन

डाळवं मिळाली की करुन बघेन. Happy

आरती रेसेपीच्या नावात किंवा शब्दखुणांमध्ये "पोहे" लिही ना म्हणजे नंतर शोधायला सोप्पं पडेल.

धन्स अल्पना, तुमच्या ईकडे Spar असेल तर तिकडे नक्की डाळवं मिळतील.
रेसिपीच्या नावात पोहे नाही लिहीता येणार ओरिजिनल नाव आले पाक आहे. शब्दखूणांमध्ये पोहे लिहील आहे.

इथे कोणत्याच सुपरमार्केटात कधी डाळवं दिसली नाहीत. कदाचीत छोट्या किराणा दुकानात मिळू शकतिल पण मला डाळव्याला हिंदी /पंजाबीत का म्हणतात ते अजून कळालं नाहीये. भावानी एकदा puffed chana dal या नावानी विचार म्हणून सांगितलं होतं, पण आमच्या किराणा दुकनदाराला काही ते नाव कळालं नाही. Proud

अल्पना, डाळव्याला हिंदी /पंजाबीत का म्हणतात <<< तसच मला कडवे वालाला हिंदीत काय म्हणतात ते कळल नाही. Proud
तुमच्या गावावरुनच मागव आता डाळव.
साऊथच्या स्पारमध्ये सर्व नॉर्थ इंडियन किराणा सामान अगदी मखाणापासून आहे म्हणून सेम तिकडे असेल अस वाटल.

अल्पना चटनी वाला दलिया असे विचारून बघ. इथला बिहारी(?) दुकानदार असे म्हणले की डाळं आणून देतो. Happy
चटनी वाला नाही म्हणले की मग आपला गव्हाचा दलिया!!

मला वाटतं 'अवलक्कि पाक '
चे सोपे नाव आले पाक
झाले असेल .

माझ्या माहिताप्रमाणे -

अवलक्कि = पोहे ,ओले खोबरे .हिरवी मिरची ,मीठ ,साखर
अथवा पोहे ,तेल ,मेतकूट घातलेलं दुपारचं खाणं .

पाक =खारीक ,शेंगदाणे ,चणे ,डाळं ,गुळ वगैरे थंडीतले मुलांचे पौष्टीक खाणं .

मस्तच.. लावलेले पोहे म्हणतात ते हेच का ?
बेळगावला बर्‍याच वेळा जाणे झाले ( गोवा - कोल्हापूर असा प्रवास करताना ) पण असे खास बेळगावी पदार्थ चाखता आलेच नाहीत.

Pages