तांदुळ दिड वाटी, भाज्या (उदाहरणार्थ श्रावण घेवडा, तोंडली, मटार, गाजर, बटाटा, टोमॅटो), आले, लसूण, कांदा, मिरची, लिंबू, कोथिंबीर, गरम मसाला (मिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र), ड्राय फ्रूट्स (बदाम, काजू व बेदाणे) तसेच हवे असल्यास पनीर किंवा टोफू!
तांदूळ धुवून घ्यावेत.
सर्व भाज्या पातळ, उभ्या चिरून घ्याव्यात.
लसूण, आले, कोथिंबीर व मिरची ह्यांची पेस्ट करून घ्यावी.
पातेल्यात तेल घेऊन त्यात गरम मसाला घालून फोडणी करावी.
त्यात कांदा परतावा.
त्यात लसुण, आले, मिरची व कोथिंबीर ह्यांची पेस्ट घालावी व परतावी.
त्यानंतर चिरलेल्या भाज्या घालून पुन्हा परतावे.
ड्राय फ्रूट्स घालावीत.
तांदूळ घालावेत.
चवीप्रमाणे मीठ, चिंच, गूळ हे घालून भात शिजवावा.
(मांसाहारींनी इच्छेनुसार अंडी किंवा चिकन / मटन पिसेस घालावेत)
एकुण, हा भात करताना काय व किती घालायचे ह्याचे कोणतेही ठराविक निकष नाहीत. त्यामुळे असेल ते साहित्य घेऊन हा भात होऊ शकतो. स्वादिष्ट लागतो व जितका न्युट्रिशिअस केला जाईल तितका न्युट्रिशिअसही ठरतो.
आपण आपल्या इच्छेनुसार हा भात मॉडिफाय करू शकता.
एनीटाईम राईस असे म्हणण्याचे कारण की हा दिवसातील अगदी कोणत्याही वेळी खाण्यासारखा वाटतो.
(सशल ह्यांच्या सूचनेनुसार लिंक दिल्यावर चित्रे मूळ मजकुरात दिसू लागली. सशल ह्यांचे आभार)
ही पाकक्रिया सौ. यशःश्रीची आहे, तिचे येथे सदस्यत्व नसल्याने मी फक्त लिहून काढली आहे.
मूळ मजकुरात चित्रे देऊ शकलो,
मूळ मजकुरात चित्रे देऊ शकलो, कशी द्यायची ते सांगितल्याबद्दल सशल ह्यांचे आभार!
आक्खा कुकर खाऊन टाकावासा
आक्खा कुकर खाऊन टाकावासा वाटतोय आताच्या आता! मस्त अन सोपी पाकृ
मस्तच फोटो.
मस्तच फोटो.
मस्त....................
मस्त....................
बेफी आता तुम्ही शिकुन घ्याच..........
अरे वा मस्तच
अरे वा मस्तच
चक्क बेफींनी पाकृ टाकली??
चक्क बेफींनी पाकृ टाकली??
क्या बा(भा)त है!!
बाकी पाकृ मस्तच! फोटो पाहुन भुक लागलीय! तोंपासु!
चविष्ट प्रकार. बेफिकीर
चविष्ट प्रकार. बेफिकीर वहिनींना धन्यवाद सांगा. ( वहिनी म्हणले तर चालेल ना?) असा भात आमच्या कडे असतोच. त्यात तुम्ही फरसबी, तोंडली काय पण टाका. बरोबर पापड आणी दही. जबरी!:स्मित:
फोटु बी झ्याक आलेत, मस्त!
फोटु बी झ्याक आलेत, मस्त!
जबरीच ..... केवळ तोंपासु.....
जबरीच ..... केवळ तोंपासु.....
झकास !!! मला वाटलं, आता
झकास !!! मला वाटलं, आता इकडेही घुसलात की काय.
अभिनंदन...
वा, छानच दिसतोय
वा, छानच दिसतोय
मस्तच..
मस्तच..
मस्त.. हा भात बघून ग्रॅड
मस्त..
हा भात बघून ग्रॅड स्कूलचे दिवस आठवले. दिवसातला संध्याकाळचा अर्धा-पाऊणच तास स्वैपाक आणि जेवणासाठी मिळे. तेव्हा हाती लागतील त्या भाज्या, मनाला येईल ते मसाले घालून नुसता भात किंवा खिचडी करण्यात येई. पापड असेल तर मावेमधे फिरवून आणि लोणचं, दही डब्यातून काढून त्या भात/ खिचडी बरोबर गडप केले जाई.
परत भरपूर करायचे म्हणजे लंचला न्यायला लेफ्टोव्हरसुद्धा..
एनीटाइम गझल आणि एनीटाइम
एनीटाइम गझल आणि एनीटाइम राइस...
कधीतरी बोलवा खायला.
एनीटैम येऊ
छानै
छानै
याच भातात तांदळाबरोबरच
याच भातात तांदळाबरोबरच तूरडाळ/मूगडाळ्/छिलकामूगडाळही ढकलते मी.
उठा ले रे बाबा इस कूकर को
उठा ले रे बाबा इस कूकर को अपने घर.
फुकट ते पौष्टीकच्या दिवसात कँटीनमधली टोमॅटो सॉस घातलेत अश्या भातात. सुका मेवाचे दिवस खूप नंतर पाहिले पण मित्र राहिले नाही.
मस्त. प्राची +१. मोडाचे मूग
मस्त.
प्राची +१. मोडाचे मूग ढकलले तरी छान लागतात. मी गरम मसाला घालत नाही, फक्त जिरं, मिरचीची फोडणी करते आणि चवीला माईल्ड करते
चक्क बेफींनी पाकृ टाकली??
चक्क बेफींनी पाकृ टाकली?? +१
मस्त दिसतोय प्रचित! मी असतील तेवढ्या भाज्या ढकलते किंवा कडधान्ये.. सही होतोच
सह्हीईईईईई.....
सह्हीईईईईई.....
लक्ष्मी गोडबोलेंशी सहमत
लक्ष्मी गोडबोलेंशी सहमत !
झक्कास बेत !
अरे वा मस्त फोटो आला आहे.
अरे वा मस्त फोटो आला आहे. मला पण सकाळी अर्धा ते पाउण तासच मिळतो स्वैपाक करायला. एकदा हे उकडले कि काम झाले.
भात, खिचडी मी सकाळ, संध्याकाळ
भात, खिचडी मी सकाळ, संध्याकाळ रोज खाऊ शकते.
मस्त दिसतोय भात. मी यात मोड
मस्त दिसतोय भात. मी यात मोड आलेले कढधान्य पण घालते. मी अशाच पद्धतीने दलियाची खिचडी आणि बार्ली पण शिजवते मात्र बार्ली ओवनमधे शिजवते.
मस्तच दिसतोय राईस.
मस्तच दिसतोय राईस.
मस्त पाकृ
मस्त पाकृ
मस्त दिसतो आहे!
मस्त दिसतो आहे!
मस्तं पाककृती. फोटोपण सुंदर
मस्तं पाककृती. फोटोपण सुंदर आहेत.
पुळिओग्रे सोडून चिंच घातलेला मसालेभात कधी खाल्ला नव्हता. करून बघायला हवा.
मस्त. मी अशा भातात नारळाचं
मस्त. मी अशा भातात नारळाचं दूधही घालतो.
चांगली दिसतेय रेसिपी ! करून
चांगली दिसतेय रेसिपी ! करून बघेन हा भात.
ते असो . पण स्वतःच स्वतःच्या बायकोला "सौभाग्यवती" म्हणायचं म्हणजे जरा जास्तच नै का ....
Pages