पुरणाची खीर उर्फ हयग्रीव.

Submitted by नंदिनी on 20 November, 2013 - 06:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चणा डाळ १ वाटी
गूळ पाऊण ते एक वाटी (तुमच्या गोडाच्या आवडीनुसार)
ओले खोबरे
कजू बदाम मनुका इत्यादि (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

चणा डाळ प्रेशर कूकरला पूर्णपणे शिजवून घ्या. डाळ पूर्ण शिजलेली हवी.
प्रेशर उतरल्यावर डाळीमधले पाणी काढून घ्या. (शिकाऊ लोकांसाठी: यालाच कट असे म्हणतात, कटाची आमटी करण्यासाठी वापरा)
एका पॅनमधे शिजवलेली डाळ काढून त्यामधे आवडीनुसार गूळ मिक्स करा. डाळडाळ आवडत नसेल तर गूळ घालण्याअधी मॅशरने डाळ मॅश करून घ्या. (भांडी तुम्हीच घासणार असाल तर ज्या कूकरमधे डाळ शिजवली त्यातच घालून केलेत तरी चालेल.
गूळ विरघळल्यावर (खीर तयार झाली, यापुढे आता गार्निशिंग फक्त!!) त्यामधे आवडत असेल तितके ओले खोबरे घाला. शक्य असेल तर नारळाचे दूध घातलेत तर उत्तमच. मस्त क्रीमी बनते खीर.
काजू बदाम मनुका वगैरे आवडत असतील तर तुपात तळून मग घाला अथवा तसेच घाला (अथवा घालू नका. चॉइस इज युअर्स!) जायफळ, वेलदोडे वगैरेची पूडअघाला.
वाढताना वरून चमचाभर तूप अथवा आवडत असेल तर दूध घालून द्या.

वाढणी/प्रमाण: 
कराल तसे.
अधिक टिपा: 

हयग्रीव बनवताना पुरण गार झाले की कोरडे पडेल या अंदाजाने कन्सिस्टन्सी ठेवा. आधीच खूप कोरडे केले तर खाताना तोठरा बसतो.
गोडाची तुमची जशी आवड असेल तसं गुळाचं प्रमाण कमी जास्त करा.
ही खीर जर खूप कोरडी झालीच तर नारळाचे दूध घालून अथवा दूध घालून सारखी करता येईल.
डाळ नीट मॅश केली असेल तर हेच सारण भरून कडबू, मोदक अथवा करंज्या वाफवता येतील.

आमच्याकडे ही खीर नैवेद्याला कंपल्सरी लागते. मंगलोरे उडुपीकडे देवळांमधून ही खीर प्रसादाला वाटली जाते. या खीरीला हयग्रीव (घोड्यासारखी मान असणारा) असे नाव का आहे मला माहित नाही. मात्र, एक पुराण कथा यासंदर्भात सांगितली जाते.

माहितीचा स्रोत: 
आई+पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आहे रेसपी .तोंडाला पाणी सुटले .
पूर्वी शक्तीवर्धक खाणे म्हणून मुलांना चणे आणि गुळ द्यायचे .
घोड्यालासुध्दा याचीच चंदी /तोबरा देतात .यावरूनच हयग्रीव खीर नाव पडले असावे .
या पुरणाबद्दल सज्जनगडावरचा समर्थांचा शिष्य कल्याणाची गोष्ट आहेच .

गोव्यकडे ह्याला मणगण म्हणतात. खोबर्‍याचे तुकडे (कातळ्या), काजु पण घालतात. तसेच सुकरुंडे (कुसरुंडे, नावात नेहमीच गोंधळ होतो) म्हणजे पुरणाचे वडेही (बटाटवड्या सारखे) करतात. तेही छान लागतात.

गोव्यकडे ह्याला मणगण म्हणतात. >> हो हो खाल्लेलं हे मी... कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी साईडलाही हेच म्हणतात बहुदा. प्रचंड गोडखाऊ असल्याने भयंकर आवडतं प्रकरण आहे Happy धन्यवाद नंदिनी रेसीपीसाठी. नक्की करून बघेन Happy

हयग्रीव तयार आहे!

आणि हे घटस्थापनेनिमित्त देवाला नैवेद्याला दूध तूप घालून :

उद्याच्या भोंडल्यासाठी करणार होते पण काही कारणाने 'खिरापत' न्यायचे रद्द झाले पण मनात आले होते करायचे तर केलेच. खूप मस्त झाले होते. अर्धी खोबर्‍याची वाटी नारळ व दूधही घातले आहे. खाऊन एकदम मस्त गुंगी आली आहे. Happy

अर्रे, ही पाकृ बघितली नव्हती. आवाक्यातली दिसतेय. ते पुरण करणे आणि त्याच्या पोळ्या लाटणे वगैरे गड चढायचे नाहीत इथे.
या दुर्गापूजेत एक दिवस करून बघेन Happy

आजच करून पाहिले. घरात सगळ्यांना आवडले. पुरणपोळीचा कुटाणा नाही. नावही भारदस्त ;)A1DC86CA-D878-4AA2-938F-3AC5E238CB35.jpeg

Pages