गेल्या महिन्यात मला एका क्राफ्ट सामानाच्या दुकानात एक छोटसं दागिन्यांचं कपाट मिळालं होतं. स्वतःसाठी घरी आणून ते रंगवल्यानंतर एंड प्रॉडक्ट खूपच आवडला.
मग दिवाळीमध्ये जावांना भेट देण्यासाठी मुद्दाम परत त्या दुकानातून पाच कपाटं आणली. (खरंतर आम्ही सात जणी आहोत. मला सहा कपाटं हवी होती, पण पाचच मिळाल्यानी माझं कपाट पण मी भेटवस्तूंमध्ये दिलं. आता माझ्यासाठी नविन कपाट आणून रंगवायचं आहे.)
गावाला जायच्या आधी आठवडाभरात ती पाची कपाटं रंगवून (एक कोट प्रायमरचा, दोन कोट बेस कलरचे आणि मग त्यावर डीझाइन आणि सगळ्यात शेवटी एक हात वॉर्निशचा) तयार केली.
पॅक करताना घाईघाईनी इथे दाखवण्यासाठी फोटो काढून ठेवले होते.
कपाट १. : मधुबनी स्टाईल
समोरुन
वरून
बाजूने
कपाट २: वारली स्टाइल
समोरुन
वरून
दोन्ही बाजूने : वारलीमध्ये दोन्ही बाजूंना वेगवेगळी चित्रं काढली होती.
कपाट ३: सनमायका /फोरमायका रंगामध्ये तांब्याच्या रंगाचे मेटल पिसेस चिटकवून
समोरून
वरूनः
या कपाटावर बाजूने काहीही डिझाइन रंगवलं नाही. फक्त शेडेड बेस कोट दिला.
कपाट ४ : बारीक कलाकुसर
समोरून
वरून
बाजूने:
कपाट ५: व्हिक्टोरियन चार्म्स चिटकवून
समोरूनः
यावर वरच्या बाजूला आणि साइडना दोन्ही बाजूंना सारखीच डिझाइन आहे.
आधी रंगवलेलं कपाट :
हे दोन टी कोस्टर्सचे सेट - जावेच्या माहेरी भाऊबीजेला देण्यासाठी
या ज्वेलरी बॉक्सची साइझ ६.५" * ६* * ३" आहे. हे बॉक्सेस एमडीएफ चे बनवलेले आहेत. टी कोस्टर्स पण एमडीएफ चेच आहेत.
सुरेख झालय रंगकाम. मला पण
सुरेख झालय रंगकाम. मला पण मधुबनी, वारली आणि सर्वात शेवटी जे मेंदी टाइपचं डिझाइन आहे सगळ्यात जास्ती आवडली
सुंदर झाल्यात वस्तु अल्पना.
सुंदर झाल्यात वस्तु अल्पना. बारीक डिटेल्स फार छान केले आहेस.
मस्त आहेत ज्वेलरी बॉक्स.
मस्त आहेत ज्वेलरी बॉक्स.
ते शेवटचं मेंदीसारख्या
ते शेवटचं मेंदीसारख्या डिझाइनवाल्या निळ्या कपाटासाठी डिजेचे आभार. तिच्या कँडल्स वरचा मोर वापरलाय त्यात.
सगळ्या बॉक्समधे मला तुझा होता
सगळ्या बॉक्समधे मला तुझा होता (शेवटचा निळा ना?) तोच आवडला.
छान रंगवलेस सगळेच.
सुरेख आहेत. टी कोस्टरचा पहिला
सुरेख आहेत. टी कोस्टरचा पहिला सेट खूप आवडला आणि वारली डिझाईनचा बॉक्स पण जास्त आवडला.
अल्पना कसली कलाकार आहेस गं!
अल्पना कसली कलाकार आहेस गं! मस्तच झाली आहेत सगळी कपाटं!
अप्रतिम काम आहे. स्पेशली
अप्रतिम काम आहे. स्पेशली वारली मशुबनी.
खूप सुरेख!
खूप सुरेख!
वा, मस्तच ..
वा, मस्तच ..
सुरेख!!! मला वारली खूप आवडलं.
सुरेख!!! मला वारली खूप आवडलं.
सुरेख!
सुरेख!
सुर्रेख! काय कला आहे अल्पना
सुर्रेख! काय कला आहे अल्पना तुझ्यापाशी!
६ फुटी भिंत रंगवायची आहे? ये इकडे
अप्रतिम!! काय सुरेख आहेत
अप्रतिम!! काय सुरेख आहेत सगळेच पीस. लकी आहेत तुझ्या जावा
सगळ्यांना धन्यवाद. शैलजा, तू
सगळ्यांना धन्यवाद.
शैलजा, तू प्रयोग करु देणार असशिल तर मी तयार आहे भिंत रंगवायला.
फार सुंदर दिसत आहेत कपाटे .
फार सुंदर दिसत आहेत कपाटे . मस्त.
अल्पना, फारच सुरेख झालंय काम,
अल्पना, फारच सुरेख झालंय काम, भेटीची कल्पना पण मस्त.
ही ड्रॉवर्स कुठे मिळाली?
धन्यवाद. मला दिल्लीमध्ये
धन्यवाद. मला दिल्लीमध्ये चांदनी चौकाजवळ एका दुकानात मिळाली ही कपाटं.
सुंदर. कपाट क्र. ३ खूप आवडलं.
सुंदर. कपाट क्र. ३ खूप आवडलं.
सुंदर झाले आहेत. मधुबनी
सुंदर झाले आहेत. मधुबनी स्टाईल खुप आवडले.
सगळीच छान झालीत. ते वारली
सगळीच छान झालीत. ते वारली पेंटिंगवालं मला जास्त आवडलं.
मी असं एक (न रंगवलेलं...ते डेअरिंग नाही आहे एनिवे) कपाट भाचीला दिलंय. तिची चित्रकला चांगली आहे. तिला तुझी आयडीया दिली तर चालेल नं?
मस्त झालेत सर्व पिसेस.
मस्त झालेत सर्व पिसेस. शुंपीला आवडले ते मलापण सर्वात आवडले. (लगी रहो!)
अफलातुन! काय सुंदर झालेत हे
अफलातुन!
काय सुंदर झालेत हे ज्वेलरी बॉक्सेस!!!
अल्पना... तुस्सी ग्रेट हो घर, लहान मुलगा, येणं-जाणं, नोकरी सगळं सांभाळून तु हल्ली काय काय कलत्मक गोष्टी करत असतेत्स गं....
पेंट केलेले सहाफुटी कपाट आणि वॉल लवकर बघायला मिळू देत
मस्त आहेत ग सर्व.......माझ्या
मस्त आहेत ग सर्व.......माझ्या कडे पण एक बॉक्स आहे......मेटल चा...त्यावर असं काहितरी करता येइल....
वेका, अगं नक्की सांग भाचीला
वेका, अगं नक्की सांग भाचीला रंगवायला आणि तिने रंगवल्यावर इथे दाखव पण.
लाजो, मध्यंतरी अचानक बर्यापैकी रिकामा वेळ मिळाला म्हणून मग मिळेल त्या वस्तूंवर रंगवायला सुरवात केली होती.इतकं मस्त वाटायचं. त्यामूळे आता मुद्दाम वेळ काढतेच. आवडत्या कामासाठी आपोआप मिळतो वेळ.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
कित्ती सुंदर केलयसं...
कित्ती सुंदर केलयसं... मस्त!
टी कोस्टर्स तर एकदम नाजुक डिझाइन्स मधे क्युट दिसतायत..
अल्पना.खूप छान कलाकार आहेस तू
अल्पना.खूप छान कलाकार आहेस तू ..किती नाविन्यपूर्ण कपाटे केली आहेस.स्वता,कल्पकतेने कपाटे रंगवुन ,तयार करुन जावांना दिल्याने त्यांच्या कौतुकास पात्र ठरली असशील.दिल्ली हाट /चांदनी चौक/पहाडगंज रेल्वे स्टॅशनबाहेर टोपल्यात मातीच्या अगदी लहान लहान अर्धा इंच ते एक ईच उंचीच्या सपाट बेस असलेल्या --जेणेकरुन चिकटवता येतील अशा खूप छान मुर्ती,फळ-फुले-कार्टुन कॅरेक्टर मिळतात.."बारी किंवा मातीच्या तवा/तावडीवर चिकटवतात व नंतर त्यावर रंग्काम करतात.त्याचाही तुला वापर करता येईल.
सुरेखच.
सुरेखच.
धन्यवाद.
धन्यवाद.
Pages