मागे एकदा माझा एक मुंबईकर मित्र औरंगाबादला आला होता. ऐन उन्हाळ्यात. म्हणजे नेमके उन्हाळ्याचेच दिवस होते का ते आठवत नाही, पण हवा मात्र होती. त्याच्या येण्याच्या २ दिवस आधी ४३ अंशाच्या आसपास तापमान होतं. त्याने मला विचारलं, 'कसं करावं ?' मीही त्याला म्हटलं की, 'बघ बाबा ! आपण मुंबईकर ह्युमिडिटी सहन करू शकतो, पण हा कोरडा उन्हाळा म्हणजे बिनपाण्याची हजामत केल्यासारखा बिनघामाचं 'डिहायड्रेशन' करवतो. अगदीच आवश्यक असेल तर ये, नाही तर टाळ !' पण त्याचं काम अत्यावश्यक होतं. तो आला. आणि गंमत अशी की पाऊस पडला ! अन् तापमान बऱ्यापैकी सुसह्य झालं ! दोन दिवस मजेत गेले आणि जाताना म्हणाला, 'मुंबईपेक्षा इथेच छान आहे रे !'
त्याला तसं का वाटलं असेल हे मला काल समजलं. 'क्रिश - ३' पाहिल्यावर. तिकिट घाबरत घाबरत काढलं होतं. हृतिकसाठी पाहायचा होता आणि सुपरहिरो व विवेक ओबेरॉय मुळे टाळावासा वाटत होता. पण काढलं तिकीट, घेतली रिस्क, केली हिंमत आणि झाली गंमत ! कारण बऱ्यापैकी सुसह्य होता की ! अडीच तासांच्या स्टंटबाज नाट्यानंतर हा स्पायडरमॅन + एक्स-मेन + सुपरमॅन + मिशन इम्पॉसिबल + वगैरे + देसी शक्तिमान चांगलाच मनोरंजक वाटला.
'कोई मिल गया' मधला अर्धवटराव रोहित 'जादू'च्या मदतीने स्वत: स्वत:ला गवसतो, नंतर 'क्रिश' मध्ये त्याला डॉ. आर्या डांबून ठेवतो व त्याचा मुलगा 'क्रिश' स्वत: स्वत:ला गवसतो. 'क्रिश-३'मध्ये रोहित आणि क्रिश दोघेही आपापल्या क्षेत्रात व्यवस्थित एस्टॅब्लिश झालेले आहेत. बाप एक नावाजलेला शास्त्रज्ञ आणि मुलगा एक नावाजलेला सुपरहिरो !
दुसरीकडे 'काल' (विवेक ओबेरॉय) हा एक महत्वाकांक्षी माथेफिरू अख्ख्या जगावर राज्य करायचं स्वप्न बघत असतो. त्यासाठी तो एक 'मानवर' (मानव + जानवर) फौज तयार करत असतो. जन्मजात अपंग असलेल्या 'काल'ने आपल्या दुर्दम्य आत्मविश्वास, बुद्धी आणि पैश्याच्या जोरावर आपल्या अपंगत्वावर एका मर्यादेपर्यंत मात केलेली असते. पण पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी तो जंग जंग पछाडत असतो. ह्या सगळ्या संशोधन, निर्मितीसाठी हवा असलेला पैसा कमवायची क्लृप्ती असते, विषाणू आणि त्याच्यावर 'अॅण्टीडोट' (प्रतिबंधक औषध) तयार करणे. आधी स्वत:च तयार केलेल्या विषाणूचा संसर्ग घडवून आणून हाहाकार माजवणे आणि मग त्यावरचं औषध स्वत:च पुरवून अव्वाच्या सव्वा कमावणे !
एक संहार नामिबियात यशस्वीरित्या घडवून आणल्यावर काल व कं. आपला मोर्चा 'बिग्गर मार्केट' भारताकडे वळवते आणि मुंबईत घातपात घडवला जातो.
ओव्हर टू शास्त्रज्ञ व सुपरहिरो.
ते काय करतात ?
अर्थातच शहराला वाचवतात, पण कसं ?
त्यानंतर काय होतं ?
'काल'च्या महाशक्तीस तोंड देताना 'क्रिश'ला कशाकशाला तोंड द्यावं लागतं ?
ह्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघा.

काही वर्षांपूर्वी काही सुपरहिरो किंवा चमत्कारी पुरुष हिंदीत आणायचे हास्यास्पद प्रयत्न केले गेले होते. 'क्रिश'सुद्धा मी घरी, टीव्हीवर तुकड्या-तुकड्यांत पाहिला होता. थेटरात जायची हिंमत झाली नव्हती. सुपरहिरो किंवा काहीही सुपरह्युमन दाखवण्यात बॉलीवूड मार खातं किंवा हॉलीवूड मात देतं ते मुख्यत्वेकरून 'स्पेशल इफेक्ट्स' मधल्या तफावतीमुळे. क्रिश-३ ही तरी उणीव भरून काढतो. (थ्री चिअर्स फॉर 'रेड चिलीज'!) पण फुटकळ प्रेमकहाणी अन् फडतूस गाणी मात्र कोंबतोच आणि बॉलीवूडपण राखतो.
प्रियांका चोप्राला स्वत:कडून नेमक्या काय अपेक्षा आहेत ? असा प्रश्न 'जंजीर' आणि 'क्रिश-३' मुळे पडतो. जिथे 'नटी की केवळ शोभेची बाहुली असते' हा पूर्वीचा बहुमान्य समज हळूहळू मोडीत निघत आहे, तिथे प्रियांका एकानंतर एक कमजोर भूमिका करते आहे. स्वत:ची अधोगती स्वत:च करवते आहे. कदाचित आधीच्या भागात तीच 'प्रिया' होती म्हणून कंटिन्यू केलं असेल, पण तरी डझ नॉट मेक सेन्स.
गाणी म्हणजे तर कोपरापासून दंडवत आहेत ! राजेश रोशन साहेबांचं घणाघाती संगीत त्यांच्या वयाच्या इतर कुठल्या सामान्य माणसास ऐकवलं तर त्याचा रक्तदाब निश्चित वाढेल, कदाचित गचकेलही ! 'छू कर...', थोडा हैं थोडे की जरूरत हैं', 'बातो बातो में' सारखं तरल संगीत आत्ताच्या काळात अपेक्षित नाही. पण हे ? असं ?
बरं, गाणी भंकस आहेतच. त्यांची पेरणी ? म्हणजे कसंय.... कहाणी आपली पुढे जात असते. मध्येच 'कट' ! --------- गाणं ---------- गाणं संपलं. कहाणी पुढे………. अरे काय लावलंय काय ? गणेशोत्सवाचा मंडप आहे का हा ?
समीर अनजान कोण आहे माहित नाही. तो 'अनजान'च राहिलेला बरा. 'समीर'कडून काहीच अपेक्षा कधीच नव्हती. त्यामुळे गाण्यांच्या शब्दांबद्दल तक्रार नाही. चालू द्या दळण.
हृतिक हा एक अत्यंत प्रामाणिक कलाकार आहे. तो प्रत्येक भूमिकेत जीव ओततो. त्याने साकारलेला म्हातारा रोहित अप्रतिम ! सुपरहिरोच्या भूमिकेतही तो अगदी फिट्ट. आजच्या हिरोंपैकी तो एकटाच आहे जो 'सुपर' वाटू शकतो. दोन्ही भूमिका करताना त्याने लाजवाब अदाकारी केली आहे, नि:संशय ! इतकं की, हे दोन नट नसून एकच आहे ह्याचाही विसर पडावा !
'काल'ची हुकमाची राणी मानवर 'काया' उभी करणारी 'कंगना राणावत' एक आश्वासक अभिनेत्री वाटते बऱ्याचदा. प्रियांकापेक्षा कंगना लक्षात राहावी, ह्यातच सर्व काही यावं, नाही का ?
पण, द सर्प्राईज इज 'विवेक ओबेरॉय' ! हातापायाची हालचाल करण्याला काही वावच नसताना, केवळ मुद्राभिनयातून त्याने 'काल' सुंदर साकारला आहे. ह्यापूर्वी अत्युत्साही अभिनयाने काही बऱ्या भूमिकांची माती करणारा वि. ओ. इथे समजूतदार, संयत अभिनयाचं दर्शन घडवून सुखद धक्का देतो. आत्तापर्यंतचे हे त्याचे नक्कीच सर्वोत्कृष्ट काम आहे.
अॅक्शन, स्टण्ट्स आणि स्पेशल इफेक्ट्स अनन्यसाधारण महत्वाचे असणार होते, आहेतही. काही ठिकाणी इंग्रजी चित्रपटांची आठवण येते, नाही असं नाही. पण चालसे. एकूणच हाणामाऱ्या, उड्या, फेकाफेकी, तोडफोड, चिरफाड चांगली रंगली आहे.
शंभर वर्षानंतर हिंदी चित्रपटाला एक सुपरहिरो मिळाला आहे का ?
ह्याचं उत्तर 'हो' द्यावंसं वाटतंय. पण होल्ड ऑन. चित्रपटाच्या अखेरीस पुढील भागाची सोय केलेली आहेच, तोही पाहू या, मग ठरवू ! घाई काय आहे ? १०० वर्षं थांबलो अजून ३-४ थांबू !!
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/11/krrish-3-movie-review.html
करीना देखील.
करीना देखील.
कतरीना/दीपिका/प्रियांका
कतरीना/दीपिका/प्रियांका ?त्यांचे त्यांचे पिताश्री चित्रपट निर्माण करणार आहेत का? हृतिकची मुलगी चित्रपटात नायिका व्हायच्या वयाची होईल त्या सिक्वेलमध्ये मुलगी झालेली दाखवतील. तोवर धीर धरा.
रितिक ला 2 मुल आहेत मयेकर
रितिक ला 2 मुल आहेत मयेकर
उदयन, आराध्या आहे कि
उदयन,
आराध्या आहे कि
मलापण सिनेमा आवडला. रसप नी
मलापण सिनेमा आवडला. रसप नी बरोबर लिहीलय की एकाच माणसाचे दोन रोल्स वाटतच नाहीत. ते दोघे दोन वेगळी माणसंच आहेत असं वाटतं. अगदी एकमेकांकडुन मिठाईचा डबा घेतात वगैरे त्या दृष्यातही परफेक्ट इफेक्ट्स आहेत.
गाणी राम कृष्ण हरी!
उदयन, कतरिना, दीपिका,
उदयन,
कतरिना, दीपिका, प्रियांका यांचे नाही माहित, पण करिना म्हणे हृतिकबरोबरच्या एका सिनेमासाठी सिक्स पॅक बनवतेय. खरं खोटं सैफ जाणे. त्यामुळे सुपरवुमन म्हणून ती शाभेल कदाचित.
दिनेश,
आराध्या तशीही जन्मतःच सुपरगर्ल आहे. ती हसली, रडली, कडेवर बसली आणि कॅमेराला दिसली तरी बातमी होते हो.
क्रिश ३ ने चार दिवसांत १३५
क्रिश ३ ने चार दिवसांत १३५ कोटींचा व्यवसाय केलाय म्हणे.
त्यांचे त्यांचे पिताश्री
त्यांचे त्यांचे पिताश्री चित्रपट निर्माण करणार आहेत का?<< मग सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा हे ऑप्शन्स ध्यानात आले. चालतील का?
ह्रिथिकला दोन्ही मुलगे ह्रेहान आणि ह्रिदान. मुलगी अद्याप तरी झालेली नाही.
"मग सोनम कपूर, सोनाक्षी
"मग सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा हे ऑप्शन्स ध्यानात आले. चालतील का?" - सोनम कपूर चालेल. वेगळा मास्क लावायची गरज नाही. सोनाक्षी सिन्हा साठी हल्क ला हीरो म्हणून घ्यावा लागेल
सोनाक्षी सिन्हा साठी हल्क ला
सोनाक्षी सिन्हा साठी हल्क ला हीरो म्हणून घ्यावा लागेल>>
अरेच्या सुपरवुमन साठी राकेश
अरेच्या सुपरवुमन साठी राकेश रोशन कशाला काढेल मुव्ही ? जर ह्रितिक स्वतःच 'ह्रितिका सुपरवुमन ' चा रोल करायला तयार झाला तरच शक्यय हे
साउथच्या पिक्चरमधे
साउथच्या पिक्चरमधे याच्यापेक्षा जबरी इफेक्ट्स असतात.
देसी सुपरहीरो वाचल्यावर लालूप्रसाद यादव पाठीला लाल ओढणी बांधून म्हशीवरून फास्ट चाललेत असं वाटलं.
स्पायलर असेल तर अॅलर्ट शेवटी
स्पायलर असेल तर अॅलर्ट
शेवटी जेव्हा विओ मेटल मॅन बनुन एका मोठ्या गोल लोहचुंबकाला (?) चिकटतो. पण तिथे उभी असलेली कार तशी का चिकटत नाही?? का माझ्या बघण्यात काही फरक झाला.
नावात असलेला (क्रिश) ३ हा
नावात असलेला (क्रिश) ३ हा आकडा आणि क्रिशचं गॉगल (?) पेहनलेलं पोस्टर यामुळं पिच्चर ३ डी आहे असाच समज करून घेतला होता. आज हा धागा वाचताना लक्षात आलं ते.
या सिक्वेलमधल्या पुढच्या पिच्चरचं टायटल क्रिश -२ असेल कि क्रिश ५, ७ असं काहीही ?
यापुढच्या पिक्चरचं नाव 'कोई
यापुढच्या पिक्चरचं नाव 'कोई खो गया' नंतर पुन्हा दोन क्रिश (n + 1). वगैरे असे असावे.
गजानन परिक्षण वाचुन झेपेल
गजानन
परिक्षण वाचुन झेपेल असं वाटतयं.. बघुयात
कोई खो गया कोई सो गया, कोई
कोई खो गया
कोई सो गया, कोई खा गया, कोई भाग गया... राकेश रोशनला आता चिंता नाही. शिवाय सिक्वेल आहेतच. बिचा-याचे पिच्चर्स चालतात पण.
मी निगेटिव्ह लिहिणार आहे
मी निगेटिव्ह लिहिणार आहे
परीक्षण अंशतः पटलं ..
परीक्षण अंशतः पटलं .. इफेक्ट्स खरोखर छान जमले आहेत .. मधली मधली बॉलीवुडी ड्रामेबाजी थोडीशी बोअर झाली ..
हृतीक रोशन थोडासाच आवडतो त्यामुळे इकडेही थोडासाच आवडला ..
कंगना मात्र भारी हां ..
अति हॉलिवुडपण पाहण्याचा
अति हॉलिवुडपण पाहण्याचा परीणाम असेल कदाचित, पण नाही आवडला. असो.
इफेक्ट्स खरोखर छान जमले आहेत
इफेक्ट्स खरोखर छान जमले आहेत .. मधली मधली बॉलीवुडी ड्रामेबाजी थोडीशी बोअर झाली ..<<<< १००% सहमत !!! अजिबात आवडला नाही
इफेक्ट्स खरोखर छान जमले आहेत
इफेक्ट्स खरोखर छान जमले आहेत .. मधली मधली बॉलीवुडी ड्रामेबाजी थोडीशी बोअर झाली >>+१००
गाणी तरी उगाचच वाटली..
कंगना प्रि.चो पेक्षा कैकपटीने सरस..
स्पायडरमॅन सुपरमॅन पण सारे
स्पायडरमॅन सुपरमॅन पण सारे एकमेकांचेच कॉपी असतात ओ, तोच इकडम तिकडम मालमसाला, तंत्रात थोडेसे ते सरस अन पॉलिशिंग चक्काचक बस्स.
मला "कोई मिल गया" जास्त आवडला होता कारण त्यात इमोशन्स होते, सुपरनॅचरल असूनही रिलेट होऊन भिडायचा. आपण भारतीय पब्लिक आहे, आपल्याला मुजिक आणि इमोशन हवेतच.
मागच्या आठवड्यात चुकून तमिळ
मागच्या आठवड्यात चुकून तमिळ डब्ड व्हर्जनचे टिकीट बूक केल्याचे आयत्यावेळेला प्लान कॅन्सल केला होता. यावेळी मात्र आठवणीने हिंदी क्रिश बघायला गेलो होतो.
सिनेमाचे नाव क्रिश ३ पेक्षा रोहित३ असायला हवे होते. हा सिनेमा रोहित मेहरा आणि कालचा आहे. क्रिश१ मधे अगदीच कमी दिस्णारा आणी कोइ मिल गयाची जान असणारा रोहित पुन्हा एकदा या सिनेमामधे छा गया है. कोइ मिल गयामधल्या रोहितची व्ह्लनरॅबिलिटी आजदेखील ह्रितिक रोशनने कमाल दाखवली आहे.
रोहित-प्रियांका- क्रिश्नाचे फॅमिली सीन्स या पिक्चरमधला बॉलीवूड जान आहेत.. खास करून प्रियांका आणी रोहितचे काही सीन्स खूप खास घेतले आहेत. कोइ मिल गयामधे जादूने पॉवर्स दिल्यावर देखील रोहितची वागणूक, बोलणं त्याच पद्धतीने ठेवलं होतं ते त्यावेळी फार आवडलं होतं मला. तीन पिक्चरनंतर तो निर्णय किती योग्य होता ते अजूनच जाणवलं. याही सिनेमामधे रोहित मेहराचा मेकप आणि अभिनय सर्वात जास्त आवडला.
ह्रितिक रोशनने पहिल्या फिल्मपासूनच डबल रोल करण्यासाठी आवश्यक काय असतं ते जानून घेतलंय, त्यामुळे इथे ट्रिपल रोल करताना देखील कपडे, हेअर स्टाईल इतकंच त्याने देहबोली, नजर उच्चार याचं भान राखलं आहे. त्याचा तो सरळ केसवाला लूक (क्रिश्नाचा) फारसा छान वाटत नाही, पण क्रिशचा लूक भारी जमलाय.
कंगना आणि विवेक दोघेही मस्त काम करतात. विवेक ओबेरॉय आता "आवाजी व्हिलन" बनू शकतो. त्याच्या संवादामधला थरार त्याने चांगल्यारीतीने दाखवला आहे. डोळ्यांमधे ते कॉन्टॅक्ट लेन्स नसते तर डोळे अजून खुनशी वाटू शकले असते त्याचे. त्याचा तो मेटल सूटवाला लूक एकदम भंगार वाटला, लिटरली!!!!
कंगनाची स्टंट दृष्ये तिने व्यवस्थित निभावली आहेत. वेगळ्या भूमिका करत ती हळूहळू आपलं स्थान पक्कं करत आहे. अगदी हॉलीवूड स्टाईल अशी काही सीन्स तिच्या वाट्याला आलेत आणि त्याने तिचं सोनं केलंय.
आणि अशीच काही दृष्ये प्रियांकाच्या वाट्याला आल्यावर तिने त्याची माती केली आहे. तरी नशीबाने या सिनेमामधे तिचा मेकप जरा तरी सोबर आहे, क्रिश१ मधे खेड्यांतल्या गॅदरिंगच्या ड्यान्सचा मेकप केला होता पिक्चरभर!!!
ह्रितिकच्या नृत्याची जबरदस्त फॅन असूनदेखील गाणी कधी संपतील असं वाटत राहिलं यातच त्या गाण्यांची लायकी काय ते समजून घ्यावे. कंगना आणी ह्रितिकचं गाणं उत्तमरीत्या चित्रित झालंय, पण ते गाणंच पकाव आहे. आवडून घ्यावं म्हटलं तरी आवडत नाही.
रघुपतीमधे प्रियांकाला ती ह्रितिकसोबत नाचतेय हे माहित नव्हते का? कसला ड्रेस घातलाय, त्यात तिला नीट उभं राहता येत नाहीये, नाचतेय ते अगदी ऑकवर्डरीतीने. त्यामुळे ह्रितिकच्या स्टेप्स पण साध्या वाटायला लागतात. ते गॉड अल्ला भगवान गाणं आणी तो अख्खा सीन डोक्यात गेला अक्षरशः. काहीही दाखवलंय. त्यात क्रिशचा पुतळा वगैरे उभारून अगदीच हसं केलंय.
कथा-पटकथा यावर नो कमेम्ट्स. घरचा ह्रितिक असला की माणूस कसा बेपर्वा होत जातो त्याचे उदाहरण..
थेटरमधे विमानाच्या चाकाचा सीन झाल्यावर पब्लिकने तुफान कल्ला केला. ह्रितिक खर्या अर्थाने सुपरहीरो वाटतो त्या सीनमधे.
रघुपतीमधे प्रियांकाला ती
रघुपतीमधे प्रियांकाला ती ह्रितिकसोबत नाचतेय हे माहित नव्हते का? कसला ड्रेस घातलाय, त्यात तिला नीट उभं राहता येत नाहीये, नाचतेय ते अगदी ऑकवर्डरीतीने. त्यामुळे ह्रितिकच्या स्टेप्स पण साध्या वाटायला लागतात. ते गॉड अल्ला भगवान गाणं आणी तो अख्खा सीन डोक्यात गेला अक्षरशः. काहीही दाखवलंय. त्यात क्रिशचा पुतळा वगैरे उभारून अगदीच हसं केलंय.
<<< मुळात त्या गाण्यात प्रियंकाला एवढे नाचवलेच का? असाही प्रश्न काही प्रेक्षकांना पडला. अरे प्रसंग कोणता? करता काय?
नंदिनीच्या प्रत्येक शब्दाला
नंदिनीच्या प्रत्येक शब्दाला अनुमोदन.
रघुपतीमधे प्रियांकाला ती ह्रितिकसोबत नाचतेय हे माहित नव्हते का? कसला ड्रेस घातलाय, त्यात तिला नीट उभं राहता येत नाहीये, नाचतेय ते अगदी ऑकवर्डरीतीने. त्यामुळे ह्रितिकच्या स्टेप्स पण साध्या वाटायला लागतात. ते गॉड अल्ला भगवान गाणं आणी तो अख्खा सीन डोक्यात गेला अक्षरशः. काहीही दाखवलंय. त्यात क्रिशचा पुतळा वगैरे उभारून अगदीच हसं केलंय. >>>>>>>>> हे तर अगदी अगदी.
मस्तच, रणजित. बहुतेक सार्या
मस्तच, रणजित. बहुतेक सार्या ठिकाणी 'अगदी अगदी'.
ग्रँड मस्ती बघून विवेकबद्दल फार वाईट वाटलं होतं. क्रिश मधला त्याचा वावर आणि काम बघून बरं वाटलं. व्हिलन आणि विवेक?- असं बोलत अनेकांनी भुवया उचावल्या होत्या. मला मात्र खरंच असं वाटत होतं, की चेहर्यावरच्या रेषाही फारशा न हलवता माज, मस्ती अणि क्रौर्य हा माणुस उत्तम पद्धतीने दाखवू शकेल. सिनेमा पाहिला, तेव्हा वाटलं, की ही अपेक्षा त्याने बर्यापैकी पूर्ण केली आहे. पुर्वार्धातला हलू न शकणारा व्हीलचेअरवरचा काल जरा जास्तच भारी.
ऋतिक हा नेहमीच 'कृत्रिम' अॅक्टर वाटत आला आहे. इथंही तो तसाच आहे. आता तर त्याने ते कृत्रिमपण अत्यंत प्रोफेशनली अंगावर मिरवायला सुरूवात केली आहे. तो दिलेलं काम उत्तमरीत्या आणि व्यावसायिक पद्धतीने पार पाडतो, आणि याबाबतीत त्यालाही 'परफेक्शनिस्ट' म्हणायला हरकत नाही. 'सुपरहिरो'च्या रोलसाठी हे असं कृत्रिमपण आणि व्यावसायिक अभिनय आवश्यक आहेच, त्यामुळे त्याच्याव्यतिरिक्त दुसरा कुठचा अॅक्टर या रोलसाठी सुचत नाही. 'रोहित मेहरा'च्या कामासाठी हे कृत्रिमपण थोडं कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, हे खरं. मात्र त्याच्या त्याच त्याच तशाच डान्सचा मात्र कंटाळा आला. प्रोग्राम केलेलं यंत्र नाचतंय, असं कधीतरी वाटतं.
तो "कंगना राणावत फार सुंदर दिसते" वाला ऋयाम कुठे आहे? ऋतिकने जसा कुठे कुठे अकृत्रिम बनण्याचा प्रयत्न केला आहे, तसा हिला बिचारीला कुठे कुठे कृत्रिम बनण्याचा प्रयत्न करावा लागला आहे. ती नेहमीच सुंदर काम करते, तसं इथंही केलं आहे.
प्रियांकाबद्दल आजकाल बोलण्यासारखं काहीच नसतं. इथंही नाही. ब्वळजबरीने बोलायचंच झालं, तर अग्निपथपेक्षा किंचित कमी वात आणला आहे, असं म्हणता येईल.
थोडक्यात काय तर चांगले स्पेशल इफेक्ट्स, सुपरहिरो ऋतिक आणि कंगणासाठी क्रिश पाहावा.
हा सिनेमा मुंबईत घडतोय असं
हा सिनेमा मुंबईत घडतोय असं दाखवून नंतर काटेकोरपणे "हे मुंबई नाही" हे जाणवण्याचा अट्टहास का केलाय? मधला एक सीएसटीचा सीन सोडल्यास इतर सर्व सीन्स हे "परदेशात" घडल्यासारखे चित्रीत केले आहेत. अगदी क्रिश्नाचं घर सुद्धा मुंबईमधलं वाटत नाही.
मुळात त्या गाण्यात प्रियंकाला एवढे नाचवलेच का? असाही प्रश्न काही प्रेक्षकांना पडला. अरे प्रसंग कोणता? करता काय? >>> गजा
बरं ते गाणं चालू होतं त्याआधी अथवा नंतर रघुपएती राघव चा काही संबंध लागत नाही. ती बायको नवर्याच्या वादिला एवढे खंडीभर लोक कुठून आणते कुणास ठाऊक!!!
मात्र त्याच्या त्याच त्याच तशाच डान्सचा मात्र कंटाळा आला. प्रोग्राम केलेलं यंत्र नाचतंय, असं कधीतरी वाटतं.<<<
ह्रितिकला इण्डियन स्टेप्स अजिबात सूट होत नाहीत. परदेशी डान्सप्रकार त्याला (आणी त्याच्या बॉडीस्टाईलला) चांगले सूट होतात. शिवाय, तो नाचताना कधीची तो नाचणं एंजॉञ्य" करतोय हे दाखवू शकत नाही. का कुणास ठाऊक!! त्यामुळे टेक्निकली परफेक्ट असून्पण त्याचा डान्स "भारी" वाटतो पण आपल्याला पण झूमनेवाला वगैरे वाटत नाही. तरीही काईट्समधले त्याचे डान्सेस अफाट होते. इथे मुळात गाणंच बकवास असल्याने तो तरी काय करणार? 
बघितला कधीचाच.. पण मुहुर्त आज
बघितला कधीचाच.. पण मुहुर्त आज मिळाला लिहायला
-- सुपर हाईप असलेला चित्रपट .. क्रिश ३ . (हिंदीवाले "कृष३" का लिहितात देव जाणे) राकेश रोशन अतिशय काळजीपुर्वक निर्मिती केलेली याची... शाहरुख "रा-वन" बनवत असताना राकेश रोशन त्या चित्रपटाबरोबर होता..
रेडचिलीची स्पेशल इफ्फेक्ट ची सगळी टिम राकेश रोशन च्यासाठी २४ तास सतत उभी केलेली.. रितीक चित्रपटाच्या सिन्स आणि लूक इत्यादी बातमी प्रेस मधे फुटु नये म्हणुन काळजी घेतलेली त्यासाठी शाहरुख ने. रेडचिली स्पेशल इफ्फेक्ट्स च्या ऑफिस वरचा संपुर्ण एक मजला क्रिश३ च्या चित्रिकरणासाठी राखिव केलेला त्या मजल्यावर ..स्पेशल इफ्फेक्ट्स वाले खास माणसे आणि रितीक व राकेश यांनाच प्रवेश ठेवलेला. इतकी प्रचंड काळजी या चित्रपटासाठी ..घेतली गेलेली.. हॉलिवुड च्या तोडीस तोड स्पेशल इफ्फेक्ट्स "रेडचिली" ने बनवुन दिले. ते ही कमीत कमी किंमतीत. कारण संपुर्ण चित्रपटच १०० करोड च्या घरात होता..
"शाहरुख आणि त्याच्या स्पेशल इफेक्ट्स टीम शिवाय "क्रिश३" बनलाच नसता"- इति रितीक रोशन
-----------------------
आता चित्रपटाकडे वळु....
कथानक - रोहीत आता भारतात आल्यावर संशोधक बनतो.. अतिहुषार असल्याने त्याला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नसते
तो पदार्थविज्ञानशास्त्र ,उर्जाशास्त्र., शरीरशास्त्र, खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अश्या विविध शास्त्रात एकाच वेळेला काम करतो,, सुर्याच्या किरणांद्वारे उर्जा मिळवुन ती प्राणीमात्रांमधे कशी उपयोगी आणता येईल याचा अभ्यास करत असतो.. तर एकी कडे कृष्णा त्याच्या क्रिश च्या करामतीमुळे कुठेच नोकरीमधे कायम राहु शकत नाही. तर त्याची बायको प्रियांका न्युज अँकर म्हणुन काम करते.. म्हणजे घरात बसुन खाणारा फक्त "कृष्णा"च आहे ..:)
जगाच्या एका कोपर्यात "काल" नामक एक शास्त्रज्ञ आपल्या अदभुत शक्तींनी (या शक्ती त्याला कुठुन मिळतात हे चित्रपटाच्या शेवटी दाखवले आहे" व्हायरस बनवुन जगभरातील शहरात पसरवत असतो आणि त्याच्या अँटी-व्हायरस सुध्दा बनवुन बक्काळ पैसा जमवत असतो. या पैश्याने तो मानवांचे क्लोनिंग जनावरांबरोबर करुन स्वतःसाठी "मज्जातंतु" मिळवण्यचा प्रयत्न करत असतो.. " काल " ला जन्मत: "मज्जातंतु" नसते म्हणुन तो शरीराची हलचाल करु शकत नाही उभा राहु शकत नाही.. तब्बल २५ वर्ष तो व्हीलचेअर वरच असतो. प्रचंड शक्ती असुन सुध्दा तो हलचाल करु शकत नही
काल आपली नजर भारता कडे वळवतो आणि क्रिश आणि काल एकमेकांसमोर उभे राहतात..
बाकीचे तुम्ही पडद्यावर बघा
-------------------------------------------
कथानकः- सुपरहिरो च्या चित्रपटात एक तर तुम्ही एक्शन दाखवा आणि थोडेसेच इमोशन दाखवा.. थोडक्यात हिरोचा भुतकाळ त्याचे प्रोब्लेम थोडक्यात काही प्रसंगात दाखवावे.. बाकी संपुर्ण अॅक्शन मधेच घडलेला असावा.. तरच सुपर हिरो बघायला आवडतो.. आपण हॉलिवुड चा बाज बॉलिवुड मधे घुसवताना त्यात अनावश्यक गाणी, आज्जी आजोबा, भंगार कॉमेडीयन, घरचे प्रोब्लेम , बायकोचे नखरे इत्यादी इत्यादी सगळा मसाला घालताना . इतके पचकळ बनते की असे वाटते याला सुपरहिरो नाही दाखवले तरी चालले असते आता..
स्पायडरमॅन १-२-३ , थॉर, आर्यननमॅन सारख्या चित्रपटात त्यांचे इमोशन्स कमीतकमी प्रसंगात परिणामकारक दाखवले आहेत त्यामुळे ते कंटाळवाणे वाटत नाही..
विचार करा . थॉर आपला "हतोडा" फिरवत हिरॉईन बरोबर गाणे म्हणत फिरत आहे.. पीटर पार्कर गाणे म्हणत म्हणत अचानक बिल्डिंग वर चढतोय.. ..टॉमी स्टार्क आपल्या आर्यनमॅन सुट मधे आपली प्रेयसी "पेपर" सोबत हवेत गाणे म्हणत फिरत आहे ...
नशीब हे सगळे चित्रपट .. हॉलिवुड मधे बनले .. नाहीतर बॉलिवुड वाले हे सुध्दा करुन दाखवतील .
कथानकाच्या नावाने जे लिहिले .त्यात चुका तर आहेच.. वर काही ठिकाणी दिग्दर्शक आधी काय केलेले होते ते चक्क विसरुन भलतेच काहीतरी करायला लावतो..
संगीतः- राजेश रोशन यांच्या प्रदिर्घ कारकिर्दीतील हा पहिला चित्रपट असेल ज्याची गाणी कुठेच "क्लिक" झाली नाही.. "रघुपती राघव" यात रितीक चा नाच सोडला तर तर हे गाणे आपण मोबाईल वर जास्तित जास्त १-२ वेळाच ऐकु.. त्यात मेलडी चा अभाव तर आहेच त्याच बरोबर राजेश रोशन यांचे सुप्रसिध्द "बदल" सुध्दा नाही आहेत.. राजेश रोशन यांच्या गाण्यात मुखड्याला एक संगीत असते आणि अंतरा याला वेगळे एक संगीत असते.. त्यांच्या गाण्यात ठेका हा बदलत जातो..एकाच गाण्यात विविध ठेके वापरणे ही त्यांची खासियत आहे..
क्रिश" या चित्रपटातले "कोई तुमसा नही" हे गाणे ऐका फक्त..सुरुवातीचा ठेका वेगळा आहे नंतर तो बदलत जातो..आणि "कोई तुमसा नही" च्यावेळेला तर एकदमच बदलतो..
हा राजेश रोशन च्या संगीतमधला "मुख्य हायलाईट" असतो..
तो या क्रिश३ चित्रपटात संपुर्ण गायब आहे..... एक ही गाणे चांगले तर सोडाच बरे देखील नाही आहे..
अभिनय- विवेक ऑबेरॉय चा आवाजाचा पुरेपुर वापर करुन घेतलेला आहे.. विवेक त्याच्या वडिलांप्रमाणेच भारदस्त आवाज लाभला आहे.. परंतु त्याने त्याचा वापर फारच मर्यादीत करत होता. "कंपनी" मधे चंदु, शुटआउट मधला "माया" साथिया मधला आदित्य. आणि "रक्तचरित्र" मधला प्रताप.. या काही मोजक्याच भुमिके मधे त्याने आपल्या चेहर्याचा आणि आवाजाचा वापर सुंदर रित्या केला ...
रितिक ने नेहमी प्रमाणे डब्बल रोल मस्त केला आहे.. रोहितच्या बोलण्याचा टोन आणि त्याच वेळेला कृष्णाच्या बोलण्याचा टोन परिणाम कारक वेगळे दिसुन आलेत.. यात स्पेशल इफेक्ट्स चा सुध्दा आहे. एकाच वेळेला कृष्णा आणि रोहीत जवळ जवळ असतानाचे सिन्स मस्त आहेत. एकच वाईट वाटले रितीक ने इतकी मेहनत घेउन बॉडी बनवली आहे ती फक्त एकाच दृष्यात दाखवली ... अप्रतिम आणि अतिशय कलात्मक बॉडी बनवलेली आहे त्याने.. नक्कीच दाखवायला हवी होती..
कंगणा काया राणावत: कंगणाने त्या सुट मधे जाण्यासाठी स्वतःचे वजन फार कमी केलेले.. बॉलिवुड ची ती हेले बेरी बनली आहे.. सुंदर तर दिसतच होती ती
पण अभिनय सुध्दा चांगला केलेला आहे.. मुख्यतः अॅटिट्युट कायम ठेवला आहे..शेवट पर्यंत
प्रियांका : शोभेची बाहुली.. काही प्रसंग कंगणाच्या रुपात आलेले ते निभावले परंतु प्रियांका ज्या अभिनयासाठी जाणली जाते तो मिसिंग होता...
स्पेशल इफेक्ट्स :- हा मुख्य घटक चित्रपटाचा आहे.. विमानाचा प्रसंग असो या काल च्या प्रयोगशाळेमधला प्रसंग असो सगळेच प्रसंग उत्तम जमले आहेत. दोन डबल रोल एकाच ठिकाणी एकमेकांशी बोलतानाचे प्रसंग हुबेहुब वाटतात.. क्वचित ठिकाणी प्रसंग थोडे गंडले आहेत पण ठिक आहे..
हॉलिवुड मधे अश्या अॅक्शन प्रसंगा मधे "पाउस" "रात्र" अश्यांचा वापर जास्त केला जातो त्यात त्यांच्या स्पेशल इफ्फेक्ट्स चे लुप होल्स झाकले जातात .. हे आता बॉलिवुड वाल्यांनी लक्षात घेतले पाहिजे.. आपले सगळेच स्पेशल इफ्फेक्ट्स दिवसा भर प्रकाशात आपण चित्रित करतो त्यामुळे लुपहोल्स लवकर नजरेत भरतात.
क्रिश३ मधे हे प्रसंग मात्र क्वचितच आहेत... याचे क्रेडीट स्पेशल इफेक्ट्स वाल्यांच्या मेहनतीला जाते..
ओव्हरऑल काही गंभीर चुका आहेत . त्या वगळता चित्रपट छान आहे
नंदिनीच्या प्रत्येक शब्दाला
नंदिनीच्या प्रत्येक शब्दाला अनुमोदन.
प्रियांका एवजी दुसरी कोणी घेतली असती तर बघणेबल झाला असता
एकच वाईट वाटले रितीक ने इतकी मेहनत घेउन बॉडी बनवली आहे ती फक्त एकाच दृष्यात दाखवली ... अप्रतिम आणि अतिशय कलात्मक बॉडी बनवलेली आहे त्याने.. नक्कीच दाखवायला हवी होती.. - अनुमोदन
Pages