हँडमेड कागदाचा केलेला आकाश कंदील - मागच्या वर्षीचा अ‍ॅड केला आहे

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 28 October, 2013 - 21:14

हा मागच्या वर्षी केलेला -

ह्याचे स्टेप बाय स्टेप फोटो नाही घेतले गेले :(. पंचकोनाला षटकोन चिकटवला आहे

20151109_105624.jpg20151109_153544.jpg

हँडमेड कागदाचा केलेला आकाश कंदील -

पेपरटेल्स - हातकागद संस्था , शिवाजीनगर,पुणे ह्या संस्थेत आकाश कंदीलांचे प्रदर्शन लागले होते. तिकडे हा आकाश कंदील मनात भरला. त्यांच्याकडूनचं कागद घेतले.

साहीत्य -
२ शीटस वेगवेगळ्या रंगाचे हँडमेड कागद
२ शीटस पातळ कागद (आतून लावायला ज्यातून लाईट पास होईल असा)
कात्री
स्टेपलर
पट्टी
कर्कटक

कृती -

१. एकूण २४ गोल आणि २० त्रिकोण लागतात.

गोल - समभुज त्रिकोणाच्या ३ बिंदूतून जाणारे वर्तुळ काढायचे आहे. त्रिकोणाच्या कडांवर फोल्ड करायचे आहे.

त्रिकोण - त्याचं मापाचा समभुज त्रिकोण काढून प्रत्येक बाजूच्या शेजारी थोडी जागा ठेवून कापायचं आहे - ही जागा दोन पिस स्टेपलरने जोडताना उपयोगी पडेल.

२. मी १०.५ सेमी. मापाचा समभुज त्रिकोण काढला. त्याच्या प्रत्येक कोनाचे दुभाजक काढले, ते जिथे मिळाले तिथून काढलेले वर्तुळ ३ ही शिरोबिंदूतून पास झाले. ह्या टेंपलेट चे २४ गोल कापले.

३. पुन्हा एकदा १०.५ सेमी. चा त्रिकोण काढून त्याच्या प्रत्येक बाजू शेजारी थोडी जागा सोडली आणि त्या टेंपलेट चे २० पिसेस कापले.

४. असेंब्ली -

४ त्रिकोणांचा एक असे ५ युनिटस तयार होतील.

३ गोलांचा एक असे ८ युनिटस तयार होतील.

हे तयार केलेले युनिटस -

****** असेंबल करायच्या आधी मुख्य काम म्हणजे त्या त्रिकोण आणि गोलात काही डिझाईन काढून ते कापणे.( हे काम पूर्णपणे नवर्‍याने केले त्यामुळे मी आधी लिहायचं विसरून गेले ;)) . त्यानंतर त्या डिझाईन वर पातळ कागद चिकटवला.

आता मुख्य जोडाजोडी -

४ त्रिकोणांचं जे एक युनिट आहे त्याच्या प्रत्येक टोकाला एक असे ४ गोलांचे (३ गोलांचा एक असे जे युनिटस बनवले आहेत ते) युनिटस स्टेपलरने जोडायचे.

आता त्या प्रत्येक गोलाच्या युनिटच्या मधे त्रिकोणाच युनिट बनवलं आहे ते फिट करायचं आहे.

आता प्रत्येक त्रिकोणाच्या मधे उरलेले गोल बसवायचे आहेत.

हा झाला आकाश कंदील तयार -

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाव, सहावीलाअसताना हस्तकला विषयाच्या मॅडमनी शिकवला होता, त्यांची सक्त ताकिद होती कि दिवाळीला आकाशकंदील विकत आणायचा नाही. त्यावेळी याला 'फुटबॉल' अस निकनेम होत Happy

मस्त दिसतोय.
गणिताशी जन्मतः शत्रूत्व असल्याने
>> गोल - समभुज त्रिकोणाच्या ३ बिंदूतून जाणारे वर्तुळ काढायचे आहे. त्रिकोणाच्या कडांवर फोल्ड करायचे आहे.

त्रिकोण - त्याचं मापाचा समभुज त्रिकोण काढून प्रत्येक बाजूच्या शेजारी थोडी जागा ठेवून कापायचं आहे - ही जागा दोन पिस स्टेपलरने जोडताना उपयोगी पडेल.

२. मी १०.५ सेमी. मापाचा समभुज त्रिकोण काढला. त्याच्या प्रत्येक कोनाचे दुभाजक काढले, ते जिथे मिळाले तिथून काढलेले वर्तुळ ३ ही शिरोबिंदूतून पास झाले. >> हे वाचून मला जमणारच नाही अशी एक नकारात्मक भावना मनात निर्माणच झाली Proud

मी ही असाच एक बनवला होता काही वर्षा पूर्वी. अगदी सोपा आहे. वर्तुळांत समभुज त्रिकोण इनस्क्राइब करा घड्या पाडा अन चिकटवा.

धन्यवाद सगळ्यांना !!

@ श्रीकांत, तुम्ही सोप्या भाषेत लिहिलतं, मला तो शब्द काही सुचत नव्हता. वर्तुळात त्रिकोण कसा बसवायचा ते कळेना म्हणून मी आधी त्रिकोण काढला, मग भूमिती आठवून वर्तुळ काढलं Happy

वर्तुळात त्रिकोण कसा बसवायचा?>>>> जाडकागदावर वर्तुळ काढुन झाल की त्रिज्या तीच ठेवून म्हणजे कंपास व पेन्सिलच्या टोकात तेच अंतर ठेउन परिघाला छेदत जावे , नंतर एक सोडुन एक छेदनबिंदू जोडला तर वर्तुळाच्या आत समभुज त्रिकोन मिळेल. त्रिकोनात प्राजक्ता-शिरीन यांनी साधीच पण सुंदर नक्षी कापून काढली आहे तशी काढावी. माझ्या प्रमाणे आळशी पणा नी नुसते चौकोन/ त्रिकोन कापू नयेत Lol मला नीट आठवत असेल तर या कंदीलाला १४ वर्तुळं लागतात पण तीन चार जास्ती बनवावी. काही चुकल तर उपयोगी पडतात. जिलेटीन पेपर ची झुबकेदार शेपूट अर्थात ऑप्शनल आहे.

झ का स!
प्राजक्ता तुम्ही म्हणजे अगदी कलाकार आहात!
आधीही किती मस्त गोष्टी बनवल्या आहेत. त्यातले तुमचे कातरकाम जबरदस्तच असते.

हा आकाशकंदिल ही बनवण्यात येणार आहे! Happy

Pages