फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फटाके वाजवणे ते पण मोठ्या आवाजाचे हे खूप चांगले काम आहे .
असे मत कोणाचेच नाही.
पण दिवाळी मध्ये फटाके वाजवू नका ह्या वर आक्षेप आहे.
कारण इथे दिवाळी ह्या सणाचा उल्लेख आहे.
ह्या दिवाळी नंतर थोरली दिवाळी येते तेव्हा फटाके वाजवणे ही प्रथा नाही तर आसूड वाजवून त्याचा आवाज करणे ही प्रथा आहे.
आसूड भात्याण्या पासून बनवला जात असे.
लोकांना त्या मुळे रोजगार मिळत असे .
आणि कोणाला त्रास नाही ,प्रदूषण पण नाही.
पण ती प्रथा आता बंद झाल्या त जमा आहे.
मोठ्या आवाजाचे फटाके उत्पादन सरकार नी सक्ती नी बंद केले तर मला नाही वाटत कोण विरोध करेल.
किंवा हिंदू वर अन्याय झाला अशी बोंब मारेल.

अरे, अधिकार कुणाला याची चर्चा इथेच सुरू?
नव्या धाग्यात करायला सांगितली होती.
ज्यांनी इथेच सुरू केली त्यांची पत नाही राहिली त्यावर भाष्य करायला.

ह्या धाग्याची चर्चा त्या धाग्यावर आणि त्या धाग्याची चर्चा ह्या धाग्यावर.
लोकाना प्रतिसाद "जास्त" होऊन "चढलेले" दिसताहेत.
अशी माझी मायबोली!

अरे, अधिकार कुणाला याची चर्चा इथेच सुरू?
नव्या धाग्यात करायला सांगितली होती.
>>>

कुठे आहे तो नवीन धागा. लिंक द्या बघू Happy

"माझे वजन बघ किती वाढलेय. उद्या माझे बरे वाईट झाले तर कुणी येणार आहे का?" त्यावर तो तरुण " हो! का नाही? मागच्या महिन्यात समोरच्या चाळीतली म्हातारी गेली तर आम्ही सारे गेलो होतो" . हे वाचले की मला ऋन्म्याचीच अठवण येते !
>> LOL

पर्यावरणस्नेही फटाक्याबाबत काय स्थिती आहे सध्या? चूलीवरच्या जेवणाला जसे महत्व आले आहे तसे काही या फटाक्यांचे होईल. ई व्हेईकल हे देखील पर्यावरण जागृती मुळे आले आहे. त्याबद्दलही प्रश्नचिन्ह उभी राहताहेत. बर ते जाउ द्या. मायबोलीकर मंडळी येवढी परदेशात असतात तर तिथे फटाक्यांबाबत काय नियम आहेत व त्याची अंमलबजावणी कशी होते?

वर कोणी तरी वेगळी आयडिया सांगितली आहे.
दारू न वापरता इलेक्ट्रॉनिक रीती नी फटाके तयार करायचे.
जे आवाज करतील पण प्रदूषण करणार नाही .
चार फटाके वर्षभर कोणत्या ही कार्यक्रमाला पुरतील.
चीन च असे उत्पादन भारतात दिवाळी मध्ये पाठवेल मग भारतीय उत्पादक ,सरकार, चळवळी वाले जागे होतील.
तो पर्यंत नुसत्या चर्चा उपाय काही नाही.

असं कसं म्हणता? या अशा चर्चांमुळेच लोकांचा कल बघून ते असले पर्यायी उत्पादने तयार करतात.

मायबोलीकर मंडळी येवढी परदेशात असतात तर तिथे फटाक्यांबाबत काय नियम आहेत व त्याची अंमलबजावणी कशी होते?
>>>>
माझ्या माहितीप्रमाणे परदेशात दिवाळीची सुट्टी नसते. कोणी मुद्दाम आपल्या पदरची खर्च करून घेतली तर..
तिथली स्थानिक लोकं नववर्षाच्या स्वागताला फटाके लावत असतील. वा त्यांच्या सणाला.
मलाही हे जाणून घ्यायला आवडेल.

प्रकाश घाटपांडे, अमेरिका -इंग्लंडमधले मायबोलीकर लिहितीलच. शोधलं तर नियम दिसले. बर्‍यापैकी स्पष्ट आहेत.
https://www.rd.com/article/states-where-fireworks-are-legal/
https://www.gov.uk/fireworks-the-law#:~:text=The%20law%20says%20you%20mu...

फटाकेमुक्त दिवाळी असे शीर्षक असलेला जुना लेख असला तरी पुढे लेखकानेही हे शब्दशः नव्हे पण फटाक्यांचे प्रमाण कमी करणे हा उद्देश आहे असे स्पष्ट केले आहे.

फटाके मोकळ्या जागी उडवावेत, लहान गावात, वस्ती विरळ आहे तिथे घरासमोर उडवले तरी हरकत नाही, वेळेचे बंधन मात्र सगळ्यांनी पाळावे अशी भूमिका मी अनेकवेळा मांडली आहे.

परदेशात काय परिस्थिती आहे हे लिहिताना भारतातील दाटवस्तीच्या शहरांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी उडवलेले फटाके आणि त्यामुळे त्या भागातील लोकांना जाणवणारा हवा आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास। याच्याशी तुलना होणार नसेल तर मग त्यात काही अर्थ नाही.

फटाके मोकळ्या जागी उडवावेत, लहान गावात, वस्ती विरळ आहे तिथे घरासमोर उडवले तरी हरकत नाही, वेळेचे बंधन मात्र सगळ्यांनी पाळावे अशी भूमिका मी अनेकवेळा मांडली आहे.>>> अगदी बरोबर.
मोठ्या शहरांमध्ये काही ठराविक जागा / मैदाने ठरवून ठेवावी फटाक्यांसाठी.
पर्याय एक - अशा मोकळ्या मैदानावर दिवाळी, गुरूपुरब आणि नवीन वर्षाच्या वेळी ( अजून कोणता सण असेल फटाके उडवायचा तर तो पण घाला यात) आतिषबाजी करता येईल. ज्यांना बघायची आहे त्यांनी तिथे जावून बघावी.
पर्याय दोन - अशा मैदानात फटाके उडवण्यासाठी ठराविक वेळ आणि तिकीट ठेवावे. ज्यांना हवे त्यांनी तिथे तिकीट काढून जावून त्या वेळात फटाके उडवावे.

हे दोन्ही पर्याय मुंबई, दिल्ली, पुणे अशी शहरे जिथे लोकसंख्या जास्त आहे आणि मोकळ्या जागा कमी तिथे वापरता येतील.
मध्यम आकाराच्या शहरांमध्ये मोकळ्या मैदानात / जागेत लोकांनी जावून ठराविक वेळेत फटाके उडवावेत. स्थानिक प्रशासनाला अशा ठिकाणी गर्दी होवून दुर्घटना होवू नये याची काळजी घ्यावी लागेल.

अगदीच छोटी शहरे किंवा खेडेगावात फारसा प्रश्न येणार नाही. पण वेळेची लिमिट आणि दाट वस्तीच्या ठिकाणी फटाके नको हे मात्र सगळीकडेच असावे.

याशिवाय लग्न, वराती,अजून कसल्या मिरवणूका, समारंभ, मॅच जिंकणे इ प्रसंगी फटाके उडवण्यासाठी पण नियमावली असावी. स्थानिक प्रशासना च्या परवानगी शिवाय कधीही आणि कुठेही फटाके नकोच.

आपल्याकडे याबाबत सगळेच पक्ष लोकानुनय करतात. जागरुक लोक न्यायालयांत जाऊन नियम बनवून घेतात आणि सरकार त्यात सूट कशी देता येईल ते बघतं. नियमांच्या अंमलबजावणीचं नावच नको.
हे प्रदूषणाला कारण ठरणार्‍या प्रत्येक उत्सवी गोष्टीबाबत. शुभा राऊळ मुंबईच्या महापौर होत्या तेव्हा त्यांनी गणेश मूर्तींच्या उंचीबाबत नियम आणण्यासाठी चर्चा करायचा खूप प्रयत्न केला. व्यर्थ गेला.

तसंच एकावेळी एके ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके उडवले, यात आवाज न करणारे शोभेचे फटाकेही आले, तर त्याचा त्या परिसरात राहणार्‍या लोकांनाच अधिक त्रास होतो यात न कळण्यासारखं काही नाही. म्हणजे फटाके वाईट हे मान्य असायला हरकत नसावी. मग त्यासाठी सरकार नियम का करत नाही, आमच्या मुलांना दुसरं कोणी समजावून का सांगत नाही, इतर गोष्टी कशा चालतात, असले प्रश्न का पडावेत? तुमच्या घरात श्वसनविकार असलेलं , आवाजाचा त्रास होणारं वयस्कर कोणी असेल तर तुम्ही काय विचार कराल, तोच इतरांच्या बाबतही करावा हे उमगणं फार कठीण नसावं.

आपल्याकडे याबाबत सगळेच पक्ष लोकानुनय करतात. जागरुक लोक न्यायालयांत जाऊन नियम बनवून घेतात आणि सरकार त्यात सूट कशी देता येईल ते बघतं. नियमांच्या अंमलबजावणीचं नावच नको.>>> खरे आहे.

तुमच्या घरात श्वसनविकार असलेलं , आवाजाचा त्रास होणारं वयस्कर कोणी असेल तर तुम्ही काय विचार कराल, तोच इतरांच्या बाबतही करावा हे उमगणं फार कठीण नसावं.>>> दुसऱ्यांच्या बाबतीत विचार करावा असे जर समजत असते तर कडलेच प्रश्न उरले नसते ना!

मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरे करा असे जाहीर आवाहन करीत शपथ दिली. प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करुन सुसंस्कृत बनू यात! संपूर्ण विडिओ जरुर पहा
https://youtu.be/XKaWkNGYvDk

स्तुत्य पाउल.
राजकीय पक्षांनी निवडणुकीतील विजयानंतर स्वतःच्या बाबतीत याचं अनुकरणही करावं.

<<स्तुत्य पाउल.>> +१ .
कसलेही किंतु, परंतु न बाळगता, कांगावा न करता फटाके निदान कमी तरी करावेत अशी भूमिका मांडणाऱ्या कुणालाही याचे स्वागत करण्यास कसलाही संकोच/लाज वाटणार नाही कारण त्यांना आपल्या भूमिकेपासून कोलांटी उडी मारावी लागणार नाही.

गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गाकडे आलेली (आणि खालच्या स्तरांमध्ये थोडीफार झिरपलेली) आर्थिक सुबत्ता बघता, फटाक्यांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढायला हवा होता. पण मला वाटतं की शहरांमध्ये फटाके लावायला जागा नसणे, मनोरंजनाचे इतर मार्ग उपलब्ध असणे, प्रदूषणाबद्दलची जागृती वगैरे कारणांमुळे फटाक्यांचा वापर anyway कमी कमी होत होता. नंतर काही सेलेब्रिटीजनी उपदेश देण्याचा देखावा केला आणि त्यांचा दांभिकपणा लोकांच्या डोक्यात गेला म्हणून काही लोक मुद्दाम हट्टाने फटाके वाजवायला लागले (ह्यात इतर धर्मांच्या सणांबद्दल चकार शब्द न काढणे, stubble burning हा फटाक्यांपेक्षा मोठा प्रदूषणाचा स्रोत असून त्याविरुद्ध काही उपाय न केले जाणे वगैरे करणे सुद्धा होती ). माझ्या ओळखीत उदाहरणे आहेत ज्यांनी फटाके वाजवणे बंद किंवा खूप कमी केले होते पण ह्या गोष्टींची चीड येऊन त्यांनी मुद्दाम फटाके वाजवायला सुरुवात केली. पण ही एक तात्कालिक प्रतिक्रिया होती. हल्ली सेलिब्रिटीजचं ज्ञान देणं थोडं कमी झाल्यासारखं वाटतंय. आणि लोकांनाही सारखं सारखं स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्यात रस नसल्याने पुन्हा स्वतःहून लोक फटाक्यांचं प्रमाण कमी करतायत असं वाटतंय. हे anecdotal information आणि जनरल निरीक्षणावर आधारित आहे. त्यामुळे चू भू द्या घ्या. पण फटाके वाजवणं अजून कमी झालं तर बरं होईल.

गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गाकडे आलेली (आणि खालच्या स्तरांमध्ये थोडीफार झिरपलेली) आर्थिक सुबत्ता बघता, फटाक्यांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढायला हवा होता. पण मला वाटतं की शहरांमध्ये फटाके लावायला जागा नसणे, मनोरंजनाचे इतर मार्ग उपलब्ध असणे, प्रदूषणाबद्दलची जागृती वगैरे कारणांमुळे फटाक्यांचा वापर anyway कमी कमी होत होता. नंतर काही सेलेब्रिटीजनी उपदेश देण्याचा देखावा केला आणि त्यांचा दांभिकपणा लोकांच्या डोक्यात गेला म्हणून काही लोक मुद्दाम हट्टाने फटाके वाजवायला लागले (ह्यात इतर धर्मांच्या सणांबद्दल चकार शब्द न काढणे, stubble burning हा फटाक्यांपेक्षा मोठा प्रदूषणाचा स्रोत असून त्याविरुद्ध काही उपाय न केले जाणे वगैरे करणे सुद्धा होती ). माझ्या ओळखीत उदाहरणे आहेत ज्यांनी फटाके वाजवणे बंद किंवा खूप कमी केले होते पण ह्या गोष्टींची चीड येऊन त्यांनी मुद्दाम फटाके वाजवायला सुरुवात केली. पण ही एक तात्कालिक प्रतिक्रिया होती. हल्ली सेलिब्रिटीजचं ज्ञान देणं थोडं कमी झाल्यासारखं वाटतंय. आणि लोकांनाही सारखं सारखं स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्यात रस नसल्याने पुन्हा स्वतःहून लोक फटाक्यांचं प्रमाण कमी करतायत असं वाटतंय. हे anecdotal information आणि जनरल निरीक्षणावर आधारित आहे. त्यामुळे चू भू द्या घ्या. पण फटाके वाजवणं अजून कमी झालं तर बरं होईल.

शिंदे आणि फडणवीस.
फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी .
जनतेला तत्व ज्ञान,उपदेश सांगितला आहे.
आता निवडणुका चालू च होतील .
बघू ही लोक स्वतः तशी वागतात का ते.
फटाके स्टॉल लावणारे ह्यांचेच कार्यकर्ते असतात.
रस्त्यावर त्यांना जागा हीच लोक देतात.
दारू पिणे वाईट आहे हे बार वाल्यानीच सांगणे.
किंवा अट्टल दारू पिणाऱ्या माणसाने सांगणे .
जितके हस्यास पद आहे तितकेच शिंदे फडणवीस ह्यांचे आव्हान हास्यास्पद आहे.

<<स्तुत्य पाउल.>> +१ .

stubble burning किंवा पराली जाळणे याविरुद्ध कोणत्याच पक्षाची सरकारे फारशी अँक्शन घेत नाहीत. पंजाब मध्ये काँग्रेस चे सरकार होते त्या काळात stubble burning होतच होते. आता तिथे आप चे सरकार आहे. बघू यावर्षी काही वेगळं होतेय का? हरियाणा आणि युपी मध्ये भाजपा सरकार आहे. दोन्ही ठिकाणी stubble burning थांबले नाही आहे.

दोनेक वर्षांपासून चंडीगढ मध्ये काहीतरी संशोधन होत होते stubble burning च्या पर्यायासाठी. ओळखीतल्या एका संस्थेने अशाच एका प्रकल्पावर काम सुरू केलं होते गेल्या वर्षी. पुढे काय झाले त्याचे हे चौकशी करून बघावे लागेल.

फटाके बंद # फटाक्यांना पर्याय.
प्लास्टिक बंद # प्लास्टिक लं पर्याय.
स्वच्छ रस्ते # कचरा कुंडी जागो जागी.
उसाची pachat जाळणे# त्या परळी ची विल्हेवाट लावण्याचा मार्ग.
अशी उत्तर असतात प्रतेक समस्येची.

हागणदारी मुक्त गाव ही योजना राबवली पर्याय सहित.
बंदी घालून ही समस्या सुटली च नसती.
पण जागोजागी स्वच्छता गृह,घरोघरी संडास हा पर्याय पण राबवला .
हागणदारी मुक्त गाव झाले.समस्या सुटली.

बरोबर.
पोलिओमुक्त देश पोलिओला पर्याय दिल्या शिवाय होऊ शकत नाही.

ऊस लागवड नाही केली तर पंजाबी शेतकऱ्यांना जाळण्यासाठी काहीच उपलब्ध नाही.
समस्या तशी पण सुटेल.
पण ऊस जितके आर्थिक उत्पादन देते असे दुसरे पीक सुचवा .
साखर टंचाई भारतात निर्माण होईल.
त्या साठी पर्यायी व्यवस्था करायला लागेल.

सेलिब्रिटींवर चिडून काही लोकांनी मुद्दाम उडवलेल्या फटाक्यांचा त्या सेलिब्रिटींना नक्कीच त्रास झाला असेल.

Pages