मृत्युपश्चात पुढे काय ?

Submitted by रविन्द्र... on 24 October, 2013 - 08:38

मृत्युपश्चात पुढे काय ? हा प्रश्न मला नेहमी पडतो…त्याच उत्तर शोधण्याचाही मी खूप प्रयत्न केला… पण मला पटेल असे एकही उत्तर मिळाले नाही…. कृपया याचे उत्तर शोधण्यात मला मदत कराल….?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याचे उत्तर फक्त मेल्यानंतरच मिळते........

तसे बघितल्यास मरण पावल्यावर माणसाला आणि त्याच्या भोवतालच्या लोकांना बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतात

सध्यातरी आम्ही रिटायरमेंटनंतर पुढे काय? याचा विचार करतोय. त्याकरिता पेंन्शन फंड इ. गुंतवणूक करतोय.

मृत्यूनंतर पुढच्या अवस्थेतला कोणीही मला भेटला नाही की त्याबद्दल कोणीही नीट सांगू शकत नाही. तर का उगाच भलतेच विचार करुन आजचे जीवन जगायचे क्षण वाया घालवावेत?

काय कमाल करता राव!

सोप्पंय.

आपण मेलो,की आपली 'डेड बॉडी' तयार होते. आपल्या ओळखीपाळखीचे लोक जमून तिला स्मशानात नेऊन जाळून टाकतात. त्यानंतर थोडी रडारड वगैरे होते, पण सुमारे १२-१४व्या दिवशी हे सगळे लोक मिळून मस्त खीर, वडे, भजी इ. ची पार्टी करतात. (जाळणे हिंदू धर्मियांत होते. बाकी काही लोकांत पुरतात वगैरे. पार्टीचा मेन्यू इतर धर्मियांत कसा असतो ते ठाऊक नाही. जाणकारांनी लिहावा.)

नंतर काही वर्षे दर वर्षी श्राद्ध होते. त्यालाही असाच मस्त मेन्यू असतो. तुमच्या फोटोला हार बिर घातला जातो. कालांतराने लोक आठवणही काढणे विसरून जातात.

बास फिनिश. इतकंच असतं मृत्यूपश्चात.

बाकी तुमच्या असल्या नसलेल्या इस्टेटिची अन कीर्तीची योग्य ती विल्हेवाट लावायला तुमचे वारस सक्षम असतात. त्याची काळजी करू नये.

मी मृत्युपश्चात अवयव दान केले आहे. त्या अवयवांच पुढे काय होईल ते माहित नाही. मृत्यु ही गोष्ट आज तरी अटळ आहे. भविष्यात माहित नाही. जास्त विचार करु नका. मानसिक आरोग्य खराव होईल.
चार्वाकाला जवळ करा
यावज्जीवेत सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पीबेत।
भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः।।

जी गोष्ट आपसूकच कधीतरी येणारच आहे तिच्याबद्दल विचार कशाला?
जबतक जिन्दा हूं तबतक मरा नही.... आनंद म्हणून गेलाच आहे.
<इब्लिस> Happy +१

तुम्ही सगळ्यान्नी एकदम भन्नाट उत्तर दिलीत आणि ती वाचता वाचता मी माझा प्रश्नच विसरलो....इब्लिस तुमच नाव आणि तुमच उत्तर आपल्याला जाम आवडल बुवा...superlike....!!!

तसा मी दरदिवशी सकाळी गप्पागोष्टी या पानावर "जिवंत" होत असतो......

हवे तर इथल्या कुणालाही विचारु शकतात Happy

जे. कृष्णमूर्ती म्हणतात - वॉट इज बिफोर डेथ, सेम विल बी आफ्टर डेथ ....
जर मरणाआधी मत्सर, द्वेष, निंदा असेल तर त्यानंतर तेच असेल..
जर आधी प्रेम, दया, शांति असेल तर नंतरही तेच असेल...

विनोबा म्हणतात - मृत्यू ही महानिद्रा (मोठी झोप) - रोजची झोप हा छोटा मृत्यूच.

कोणी संत म्हणून गेलेत - मरणाचे स्मरण असावे | हरिकीर्तीस सादर व्हावे ||

पु. लं - "शेवटचा दिस गोड व्हावा" असे तुकोबा म्हणून गेलेत - कशावरुन आजचा दिवसच शेवटचा नसेल ?

कुणी डॊ मेधा खासगी वाले यांचा मृत्युपश्चात जीवन हा गूढ कार्यक्रम पाहिला आहे काय? मला सुरवातीला मनोरंजक वाटला पण नंतर अंधश्रद्ध वाटायला लागला.

चला उद्या परत "जिवंत" होण्यासाठी आज जावे लागेल ..... आजचा "अनुभव" उद्या सांगतो ...

शुभ रात्री......शब्बाखैर... गुडुची नाईट...

प्रकाश जी Dr. मेधांच काय म्हनन आहे या विषयावर...जरा विस्त्रुत लिहाल का प्लीज ?

तो कार्यक्रम पाहिला पाहिजे तसे सांगता येणार नाही. पण त्यात मनोरंजन किती व मरणोत्तर अस्तित्वाबद्दल शक्यता किती हे सांगता येत नाही.

आता तुम्ही माझी उत्सुकता वाढवताय प्रकाश जी ....पण तो कार्यक्रम बघायला जायचो आणि माझाच पोपट व्हायचा....त्या बाइसाहेब इथल्याच पोस्ट वाचुन सांगायच्या.....हाहाहा...

मामी...खुप उपकार होतील आपले....येताना ह्या भाच्यासाठी खाऊ आणायला विसरू नका....;-)

मृत्युपश्चात काय ???????

ऐका....

आपण सर्वजण उर्जेचे रुप आहोत. मृत्युनंतर शरीरातील ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साईड हे आजुबाजुच्या परिसरातील ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साईड मध्ये विलीन होतील. मृत्युसमयी जे काही पाणी शरीरात असेल त्याचे वाफेत रुपांतर होइल. इतर शरीरभाग जमिनीत विलीन होईल पुन्हा नविन शरीरामध्ये रुपांतर होण्यासाठी. यासाठी हा नियम लक्षात ठेवा "उर्जा नष्ट होत नाही फक्त परावर्तित होते". अश्या रितीने मृत्युपश्चात तुम्ही जे शरीर धारण करुन इतके वर्ष जगलात ते शरीर किंवा त्याचा भाग कोणत्या ना कोणत्या रुपात या जगात नेहमी अस्तित्वात असणारच. हे झाले वैज्ञानिक उत्तर.

आता अध्यात्मिक उत्तर....

तुमच्या मृत्युपश्चात तुमचे बाह्य शरीर कसे नष्ट होते हे तुम्हाला कळले असेलच. आता तुमचे अंतःशरीर जे तुमच्या मन,बुद्धी,वासनेमुळे बनते ते देखील स्वतःचे अस्तित्व राखुन असतेच. योग्य वेळ आल्यावर पुन्हा नविन भौतिक शरीर धारण करते. या जगातील उर्जा मग ती शारिरीक रुपात असो वा सुक्ष्म मानसिक/ आत्मिक रुपात ती कधीही नष्ट होत नाही. विविध रुपात परावर्तित होउन ती सतत जिवंत असते. जगात जन्म-मृत्यु हा सतत, प्रत्येक क्षण चालु असतो. तुमच्या शरीरातील जेवढया पेशी मरतात तेवढयाच नविन जन्म घेत असतात. त्यामुळे मृत्युपश्चात काय, तर फक्त जीवन.... पुनश्च जीवन बाकी काही नाही.

त्यामुळे एवढा विचार करु नका आनंदाने जगा, दुसरयांना आनंदाने जगण्याची प्रेरणा दया. जगात करण्यासारख्या खुप उत्तम गोष्टी आहेत व त्या कोणाच्या मृत्युमुळे थांबत नाहीत. तुमची उर्जा सकारात्मक ठेवा. तुम्हाला त्याचा उपयोग भविष्यातील अनंत जीवन-मृत्युसाठी नेहमी होईल. शुभेच्छा Happy

प्रवचन संपलेले आहे Happy

मरण्यापेक्षा जगणे जास्त कठीण असते.त्यामुळे आजचा दिवस चांगल्यारितीने संपला. उद्याचा दिवस कसा असेल हे बघा.

त्यामुळे एवढा विचार करु नका आनंदाने जगा, दुसरयांना आनंदाने जगण्याची प्रेरणा दया. जगात करण्यासारख्या खुप उत्तम गोष्टी आहेत व त्या कोणाच्या मृत्युमुळे थांबत नाहीत. तुमची उर्जा सकारात्मक ठेवा. तुम्हाला त्याचा उपयोग भविष्यातील अनंत जीवन-मृत्युसाठी नेहमी होईल. शुभेच्छा स्मित>>> +१

यशस्विनी, एकदम भारी प्रवचन…आवडलं आपल्याला…. पण एक छोटासा प्रश्न… मन मन म्हणतात ते काय??
आणि मेल्यानंतर त्याचं काय होतं ??? कि तेही एका बॉडी मधून दुसऱ्या बॉडीत आत्म्याबरोबर किवा आत्म्याशिवाय हि जातं ????

तैत्तिरिय की कठोपनिषदात याचे विवेचन आहे असे आठवते.
राजा असतो त्याला मुलगा असतो. हा राजपुत्र सदैव मेल्यावर काय होते हे विचारत असतो. शेवटी राजा म्हणतो जा यमाकडे आणि त्यालाच विचार. मुलगा यमाकडे जातो आणि त्याला हे ज्ञान विचारतो. यम ते देत नाही. पण राजपुत्राची चिकाटी पाहिल्यावर त्याला दया येते.
मग त्याला यम त्याचे स्पष्टीकरण देतो की आत्मा मृत्युपश्चात अवकाशात जातो. तेथून तो पावसाबरोबर जमिनीत जातो. आणि मग तीच उर्जा निरनिराळ्या प्रकारे जीवन मात्रातून निरनिराळ्या स्वरूपात जन्मात वहात राहते.
असे काहीसे मला आठवते आहे.

अजून कुणाला पुर्ण आठवत असल्यास दुरुस्ती/भर घालावी.

माझा सगळ्यात आवडता विषय.. धागा नजरेतुन कसा सुटला Uhoh

ईब्लीसांची पोष्ट आवडली Happy

नंतर काही वर्षे दर वर्षी श्राद्ध होते. त्यालाही असाच मस्त मेन्यू असतो. तुमच्या फोटोला हार बिर घातला जातो. कालांतराने लोक आठवणही काढणे विसरून जातात. >>> हे मात्र १००% खरे Proud

http://www.maayboli.com/node/11641

बाकी तुमच्या असल्या नसलेल्या इस्टेटिची अन कीर्तीची योग्य ती विल्हेवाट लावायला तुमचे वारस सक्षम असतात. त्याची काळजी करू नये. >> Lol

http://www.maayboli.com/node/31174
हे असे असते बघा.. तेव्हा काय तो निर्ण्य आत्ताच घ्या Happy

आणि ही माझी अंतीम ईच्छा Happy
http://www.maayboli.com/node/38378

मी मृत्युपश्चात अवयव दान केले आहे>> व्यकरणाच्या दुर्ष्टी ने हे वाक्य "मी मृत्युपश्चात अवयव दान करणार आहे " असे पाहिजे होते ना

मर्ग इक मांदगी का वक्फा़ है
यानी आगे चलेंगे दम लेकर

मर्ग - मृत्यू, मांदगी - विश्रांती, वक्फा़ - स्थळ

यशस्विनी, छान पोस्ट Happy

मला हा प्रश्नच पडत नाही, कारण रोजच्या रोज रात्री वा कुठेही डुलकी जरी लागली तरी मला अफलातुन स्वप्ने पडतात अन त्या स्वप्नात "मी" कुठे कुठे फिरत अस्तो, नाना दृष्ये/प्रसंग बघत असतो, अन कित्येकवेळेचा अनुभव असा की स्वप्नात मला दिसलेल्या जागी/ठिकाणी, ज्या मला आधी पूर्णपणे अपरिचित होत्या, तिथे कालांतराने मीच प्रत्यक्ष गेलो आहे. काही वेळेस स्वप्नात प्रसंग/घटनाही जसे दिसले तसेच भविष्यात घडले.
तर मृत्यू वगैरे बाजुला राहूचे, वर शंशांकनी सांगितले की विनोबा भावे म्हणतात - रोजची झोप हा छोटा मृत्युच, तसे या रोजच्या रोज झोपेत नेमके काय होते, तेच मला अजून समजले नाहीये, तर मृत्यूची बात फार लाम्बची! Happy असो.

मला अफलातुन स्वप्ने पडतात अन त्या स्वप्नात "मी" कुठे कुठे फिरत अस्तो, नाना दृष्ये/प्रसंग बघत असतो, अन कित्येकवेळेचा अनुभव असा की स्वप्नात मला दिसलेल्या जागी/ठिकाणी, ज्या मला आधी पूर्णपणे अपरिचित होत्या, तिथे कालांतराने मीच प्रत्यक्ष गेलो आहे. काही वेळेस स्वप्नात प्रसंग/घटनाही जसे दिसले तसेच भविष्यात घडले.
तर मृत्यू वगैरे बाजुला राहूचे, वर शंशांकनी सांगितले की विनोबा भावे म्हणतात - रोजची झोप हा छोटा मृत्युच, तसे या रोजच्या रोज झोपेत नेमके काय होते, तेच मला अजून समजले नाहीये, तर मृत्यूची बात फार लाम्बची! >> लिंबु भाऊ ते शोभन सरकार म्हणजे तुम्हीच काय?, नसात तर तसे काहीतरी सांगुन पहा १००० गिजार टन सोने मिळून जाईल .

रविंद्र,
इथे सगळे जिवंत लोक उत्तर देत आहेत. त्यांच्याकडुन तुम्हाला ऐकीव माहितीच मिळणार.

कृपया सगळ्या जिवंत मायबोलीकरांनी हा बाफ लक्षात ठेवावा आणि मेल्यानंतर आपल्या स्वर्ग किंवा नरकवासातुन थोडासा वेळ काढुन इथे पोस्ट करावे ही विनंती Happy

चला मी "जिवंत" झालो ........आज सकाळी

तर आपण विचारत होतात की काय होते मेल्यावर..

काल रात्री १२.२८ मिनिटांनी मी देहत्याग केला.. त्याआधी मी मोबाईल वर फेसबुक आणि ट्विटर इत्यादी तस्सम वेबपेज वर कार्यांन्वित होतो.. अचानक डोळे जड झाले ..श्वास मंदावला.. हातपाय जड झाले... डोक्यावरुन चादर घेतलेली होती त्यामुळे डोळ्यासमोर अंधारी आधीपासुनच होती .. ती जास्त होत गेली... डोळे बंद झाल्यावर ... मी ध्यानमुद्रेत खोल ढकलला गेलो.....डोक्यात आत मधे चक्कर आल्यासारखे वाटु लागले..एका अंधार्या पोकळीत मी फेकला गेलो आहे आणि हाता पायाला काहीच लागत नाही मधेच तरंगत मधेच वेगात वार्याचा झोत आल्यामुळे देहाला गती मिळत होती..तब्बल ६ तास म्हणजे ६.३० च्या सुमारास मी कुठेतरी वेगात आदळलो..
डोक्याला दगड लागल्यासारखा ठणका बसला आणि डोळे खाडकन उघडले....... मी परत जिवंत झालेलो..पाण्याचे दोन घोट घेतले.. जिवंत माणसांच्या जगात परत आल्याचे समाधान आणि दुख एकत्रित रित्या अनुभवले.... आणि आपल्या रोजच्या व्यवहारात समावुन गेलो ..........

>>>> कुठेतरी वेगात आदळलो.. डोक्याला दगड लागल्यासारखा ठणका बसला <<<<
पूर्वी लोकल/एस्टीने प्रवास करताना खिडकीमधे बसून डुलक्या काढताना असेच आदळायचो अन जागे व्हायचो! Proud
कधीमधी हाका मारमारूनही उठत नाही दिसल्यावर आई हातात येईल ते भान्डे फेकुन मारुन उठवायची, तेव्हाही असाच दगड लागल्यासारखा ठणका बसायचा.
हल्ली एकतर मोबाईलच्या गजराचा किन्वा लिम्बीचा ठणठणाट ऐकुन जाग येते, तेव्हा डोक्याला काही न लागताही ठणका बसतो! तुम्हाला असला अनुभव अजुन यायचाय असे दिसते Wink

मामी...खुप उपकार होतील आपले....येताना ह्या भाच्यासाठी खाऊ आणायला विसरू नका....

>>> जरूर. मी नरकात जाणार असं मला ओळखणार्‍यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तिथून एक लिटर उकळतं तेल आणि मुठभर जळक्या लाल मिरच्या घेऊन येईन. Happy

काल रात्री १२.२८ मिनिटांनी मी देहत्याग केला.. त्याआधी मी मोबाईल वर फेसबुक आणि ट्विटर इत्यादी तस्सम वेबपेज वर कार्यांन्वित होतो.. अचानक डोळे जड झाले ..श्वास मंदावला.. हातपाय जड झाले... डोक्यावरुन चादर घेतलेली होती त्यामुळे डोळ्यासमोर अंधारी आधीपासुनच होती .. ती जास्त होत गेली... डोळे बंद झाल्यावर ... मी ध्यानमुद्रेत खोल ढकलला गेलो.....डोक्यात आत मधे चक्कर आल्यासारखे वाटु लागले..एका अंधार्या पोकळीत मी फेकला गेलो आहे आणि हाता पायाला काहीच लागत नाही मधेच तरंगत मधेच वेगात वार्याचा झोत आल्यामुळे देहाला गती मिळत होती..तब्बल ६ तास म्हणजे ६.३० च्या सुमारास मी कुठेतरी वेगात आदळलो..
डोक्याला दगड लागल्यासारखा ठणका बसला आणि डोळे खाडकन उघडले....... मी परत जिवंत झालेलो..पाण्याचे दोन घोट घेतले.. जिवंत माणसांच्या जगात परत आल्याचे समाधान आणि दुख एकत्रित रित्या अनुभवले.... आणि आपल्या रोजच्या व्यवहारात समावुन गेलो ..........
<<

हाऽय गापै! Wink

>>> जरूर. मी नरकात जाणार असं

>>> जरूर. मी नरकात जाणार असं मला ओळखणार्‍यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तिथून एक लिटर उकळतं तेल आणि मुठभर जळक्या लाल मिरच्या घेऊन येईन >>> मामी थोडे नरकातले कांदे घेउन या Happy

>> अवधुत म्हणजे मुक्ती वगैरे जे म्हणतात ते सगळ झुठच म्हणायच की काय ?
मुक्ती या देहीच मिळवावी लागते. मग ना जन्म ना म्रुत्यु......

''अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ..''

भारती.. यांनी नेमका श्लोक दिल्याने पुढचे प्रश्न मिटलेच आहेत.
आता बाकीचे अध्याय वाचले की प्रश्न राहणारच नाही.

कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन
थोडा कॅल्शियम फॉसफरस.

मग त्यातून एक छानसं झाड येईल. >> सई, तुमचे बीबी बघता आता तुम्ही जास्त कॅल्शियम होण्यासाठी काय खाल्लं पहिजे हे लिहिताय की काय वाटलं Happy Light 1

माझ्या मृत्यूपश्चात नवरा एकदम खुश होईल. रोज कुणीही त्याला diet food साठी भुणभुण करणार नाही. पसारा का केला अस विचारणार नाही. मुलाला मात्र आज ममा हवी होती असा वाटेल जेव्हा काही महत्त्वाचं बोलायचं असेल. नंतर काही दिवसात तो ही विसरेल. सून खुश होईल म्हातारीची कटकट गेली म्हणून. मुलगी खुश होईल सगळे दागिने मिळणार म्हणून.एकंदरीत काय माझ्या घराचे सगळे खुश होतील
मी कुठे आणि काय करीन ते मायबोलीवर सांगायला नक्की येईन. त्या अमानवीय धागयावर शोध मला.

रविन्द्र... on 24 October, 2013 - 18:08
मृत्युपश्चात पुढे काय ? हा प्रश्न मला नेहमी पडतो…त्याच उत्तर शोधण्याचाही मी खूप प्रयत्न केला… पण मला पटेल असे एकही उत्तर मिळाले नाही…. कृपया याचे उत्तर शोधण्यात मला मदत कराल….?

>>>>>

हि घ्या माझी थोडी मदत..

१) पुढे तुमच्या देहाच काय होत ? (उत्तर तुम्हाला माहित असेल)
२) पुढे तुमच्या आत्म्याचा काय होत ? (उत्तर तुम्हालाच शोधाव लागेल )
३) पुढे तुमच्या संपत्तीच काय होणार ? (उत्तर तुम्ही कस मृत्युपत्र केलय त्यावर आहे)
४) पुढे तुमच्या बायको मुलांच काय होणार ? (उत्तर तुम्ही त्यांच्या साठी कश्या प्रोव्हिजन्स केल्या त्यावर आहे)
५) पुढे मायबोलीच काय होणार ? (उत्तर ..एक सदस्य कमी होइल )
६) पुढे जगाच काय होणार ? (उत्तर ....काही फरक पडनार नाही ... )

इथे "तुम्ही" हे जनरीक या अर्थाने वापरलेले सर्वनाम आहे...

Happy

तुम्ही मरणापूर्वी काहीहि करून ठेवले असले तरी तुमच्या देहाची, संपत्तीची काय वाट लावायची ती जिवंत असलेले लोक लावतील, तुम्हाला हवे होते तसेच केले किंवा नाही हे तुम्हाला कसे कळणार? तुमच्या बायका मुलांचे काय होणार, त्याची तरतूद तुम्ही केली असली किंवा नसली तरी जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत ते स्वतःचे स्वतः बघतील.
थोडक्यात, काळजी करत बसण्यापेक्षा, मज्जेत, नि आनंदात दिवस घालवा. रागावणे, रडणे व्यर्थ आहे, कुण्णाला त्याचे काही नाही. तेंव्हा ते विसरा.

Pages