Submitted by वर्षा_म on 12 December, 2011 - 06:46
अचानक समोर येउन
वेळ झालीये चल म्हणालास
दचकले, घाबरले
रडकुंडीला आले
विनवणी करुन पंधरा दिवस
मागितले उरलेल्या कामांसाठी
तर तू नविन कल्पना मांडलीस
"मी तुला पंधरा दिवस पुढचे दाखवतो"
माझ्या डोळ्यांवर अलगद हात ठेवलेस
आणि चित्र पंधरा दिवस पुढे सरकले
माझ्या घराच्या भिंतीवर
चंदनाची माळ घालुन
माझा सुहास्य फोटो
अडकवलाय
अडखळले थोडीशी
पण सावरले स्वतःला
हळुच आत डोकावले
सगळे कसे पुर्वीसारखेच
सुरळीत चाललेय
कुणालाच माझी उणीव
भासत नाहीये
माझ्या पश्चात रडत-कुडत
बसण्यापेक्षा सुरळीत चाललेले
पाहुन वाईट वाटले
मी मृत्यूलाही यांच्यासाठी
थांबवायला निघाले होते
यांना गरजच नाही माझी
उगाचच यांच्यासाठी
जन्मभर मर मर मेले
हळुच म्हणालास
म्हणजे मेल्यावरही
"मी" गेला नाही तर?
गुलमोहर:
शेअर करा
वर्षे कटु तरीही सत्य आहे.
वर्षे
कटु तरीही सत्य आहे.
वर्षे.... सह्ही मांडलेय....
वर्षे.... सह्ही मांडलेय....:अरेरे:
हळुच म्हणालास म्हणजे
हळुच म्हणालास
म्हणजे मेल्यावरही
"मी" ( इगो ) गेला नाही तर?
.....काय मस्त ओळ आहे..
कटु तरीही सत्य आहे. >>> १००%
कटु तरीही सत्य आहे.
>>> १००% अनुमोदन
ते कंसातलं इगो काढून टाक.
ते कंसातलं इगो काढून टाक. तरीही अर्थ पोचेलच.
ह्म्म.... खरंच काढून टाक तो
ह्म्म.... खरंच काढून टाक तो कंसातला इगो...
पोचतेय तुझी कविता..
कटु सत्य सहजतेने, नेटकं
कटु सत्य सहजतेने, नेटकं मांडलंय.
उणीव असे पाहिजे.
उणीव असे पाहिजे.
खूप सुंदर! (काही टायपो आहेत -
खूप सुंदर! (काही टायपो आहेत - मर मर मेले असे म्हणतात बहुधा, उणीव, मृत्यू, कुणालाच चे कुणलच असे काहीसे झाले असावे, उगी ऐवजी उगाचच इत्यादी)
चुभुद्याघ्या
खूप आवडला मेसेज
-'बेफिकीर'!
धन्यवाद सगळ्यांना चुका
धन्यवाद सगळ्यांना

चुका दुरुस्त केल्या आहेत
'मी कधी जातो???.. वर्षी..कटु
'मी कधी जातो???..
वर्षी..कटु सत्य..
ऐ तुला रिक्वेस्ट.. विडंबने टाक बाई..गम्मतगम्मत वाली
मस्त लिहिलय...
मस्त लिहिलय...
(No subject)
मस्त आवडले !
मस्त आवडले !
व्वा !
व्वा !
मस्त! आवडलं !
मस्त! आवडलं !
धन्यवाद
धन्यवाद
आवडली.
आवडली.
वर्षे, मस्त !!
वर्षे, मस्त !!
धन्यवाद प्राची , स्मि
धन्यवाद प्राची , स्मि
आवडलं....
आवडलं....
सहीये वर्षे 'मी' कधीच जात
सहीये वर्षे

'मी' कधीच जात नाही शक्यतो...त्याचं न जाणंही त्याच्यापुरतं माफच असतं
आवडली.
आवडली.
वा.वा. पाटणकरान्ची आठवण
वा.वा. पाटणकरान्ची आठवण आली....
छान लिहीलंय ( ललित मधे पोस्ट
छान लिहीलंय
)
( ललित मधे पोस्ट केलंय
धन्स किरणा केलाय रे बदल
धन्स

किरणा केलाय रे बदल
वर्षे, कटू सत्य, सोप्या
वर्षे, कटू सत्य, सोप्या शब्दात छान मांडलस.
सट्ट्याक आहे... थे ट!! सही
सट्ट्याक आहे...
थे ट!! सही लिहीलंस.. मनापासून आवडलंय!
सहीच! पट्याचं एकदम
सहीच! पट्याचं एकदम
शेवटी कुत्र्याची शेपटी!,
शेवटी कुत्र्याची शेपटी!, मी....
छानय!
Pages