उद्या मी नसेन तरी

Submitted by वर्षा_म on 28 October, 2009 - 05:01

उद्या मी नसेन तरी कुणाचे काही बिघडणार नाही
माझ्यावाचुन कुणाचेही काम अडणार नाही
दोन दिवस लोक माझ्याविषयी बोलतील
पुर्वी वाईट म्हणनारेही चांगली होती म्हणतील

दहा दिवस घरातलेही सुतक पाळतील
मग हळुहळु आपल्या कामाला लागतील
काही दिवस जयंती पुण्यतिथी ठेवतील लक्षात
नंतर माझी आठवण फक्त पित्रुपक्षात

भिंतीवरचा फोटो आता जुना वाटु लागेल
नविन furniture बरोबर जरा odd च वाटेल
दिवानखान्यातून आता त्याला आतल्या खोलीत हलवतील
हळुच कुनीतरी त्याला अडगळीत टाकतील

गुलमोहर: 

उमेश, कौतुक, सास, दक्षीना, कविता धन्यवाद ...

दक्षीना, कविता .... काहीच्या काही मधुन कविता मधे आहे Happy

अणखिन एकच सुचवते,, उद्या मी नसे
'ल' का वापरता तुम्ही? Uhoh
उद्या मी नसेन असं हवं.... बरोबर आहे ना?
बहुतेक करून नगर औरंगाबादला असे शब्दप्रयोग वापरतात - मी जाईल, मी करेल, खाईल....
ऐकताना कानांना खटकतं ते खूप. Sad

बहुतेक करून नगर औरंगाबादला असे शब्दप्रयोग वापरतात - मी जाईल, मी करेल, खाईल.... >>>>>>>>>
अगदी बरोबर ओळखलत मला.. मी नगरीच आहे...

तुमची सुचना योग्य आहे.. केला आहे बदल

धन्यवाद

जुई,

छान!!!!

भा.रा. तांबे यांची... "जन पळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय....' ही सत्य दर्शक कविता आठ्वली

बरोबर ओळखले ...जाइल...करेल्...असे नगरकडेच वापरतात..जुइ, छान आहे कविता..

मस्त Happy

अगं वर्षा ! भरलेल्या "मायबोलीवर" अशी कविता करु नये ! तरी कविता मस्त आहे ...

Pages