मृत्युपश्चात पुढे काय ?

Submitted by रविन्द्र... on 24 October, 2013 - 08:38

मृत्युपश्चात पुढे काय ? हा प्रश्न मला नेहमी पडतो…त्याच उत्तर शोधण्याचाही मी खूप प्रयत्न केला… पण मला पटेल असे एकही उत्तर मिळाले नाही…. कृपया याचे उत्तर शोधण्यात मला मदत कराल….?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृत्युपश्चात पुढे काय ? हा प्रश्न मला नेहमी पडतो…त्याच उत्तर शोधण्याचाही मी खूप प्रयत्न केला… पण मला पटेल असे एकही उत्तर मिळाले नाही…. कृपया याचे उत्तर शोधण्यात मला मदत कराल….?>>>>>>>>>>

जिवंत व्यक्ती कसे या प्रश्नांची उत्तरे देतील ? हे तर असे झाले. पॉयझन नामक विषाची चव काय आहे ? कोणी सांगाल का? असे विचारण्यासारखे आहे. काहीही प्रश्न विचारली जातात.

असं काय म्हणता दीपस्त?
प्लांचेट वगैरे लावून मृतात्म्यांना बोलवून, विचारुन सांगेल ना कोणीतरी.

भूतानची यात्रा>>> हा हा.
>>सई, तुमचे बीबी बघता आता तुम्ही जास्त कॅल्शियम होण्यासाठी काय खाल्लं पहिजे हे लिहिताय की काय वाटलं Happy

मी मुळात शक्य तितक्या उशिरा मारायला काय खाल्लं पाहिजे याचा अभ्यास करते आहे. माझे आजोबा ९१ व्या वर्षी गेले. त्यांची १०० गाठायची फार इच्छा होती. म्हणून आता मी माझ्या आईला १०० वर्षं जगण्यासाठी काय काय करावं लागेल याचा अभ्यास करतीये. नाहीतर मला जगावं लागेल आजोबांचं स्वप्न पूर्ण करायला.

जाणिव मेंदूत कशी उत्पन्न होते हे समजले तर मरणानंतर काय होते याचे उत्तर मिळेल.सध्याची ट्रेन्डींग थेरी आहे क्वान्टम मांईंडची,हा सिद्धांत मांडला आहे स्टुअर्ट हॅमेरॉफ आणि रोजर पेनरोज यांनी,याला Orchestrated objective reduction (Orch-OR) असे म्हणतात.मेंदूतील न्युरॉनमध्ये microtubules नावाचे स्ट्र्क्चर असतात ,तिथे चालणार्या क्वान्टम प्रोसेसेसमुळे आपल्याला जाणीव उत्पन्न होते.पैकी स्टुअर्ट हॅमरॉफ यांचे मत असे आहे की मृत्युनंतर ही क्वान्टम स्टेट कायम राहते ,फक्त मेंदूऐवजी विश्वात कुठेतरी ही क्वान्टन मनोवस्था कायम राहते,थोडक्यात quantum soul never dies,its dissipates in universe at large

निद्रापश्चात (म्हणजे झोपल्यावर) पुढे काय? जाग येते.
मृत्युपश्चात पुढे काय ? जाग कधीच येत नाही.
बस्स. एवढाच फरक. बाकी सगळे सेम. Lol

Pages