रम्य संध्याकाळ

Submitted by स्वाकु on 18 October, 2013 - 07:43

तांबड्या घटांनीच व्यापले होते
ते सौंदर्य नभाचे खुलले होते

तो अथांग सागर, सुरेख किनारा
ते लोभस रूप मनी उतरले होते

स्वच्छंदी सागर मनमौजी लाटा
आज मनाचे रंग बदलले होते

मी ही त्या क्षणी जरी बुडून गेलो
चांदणे शशीचे तरंगले होते

जशी विरघळत होती संध्याछाया
तसे माझे 'मी' पण हरवले होते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार समीर,

वरील पंक्ती या मात्रावृत्तात आहेत. प्रत्येक ओळीत २० मात्रा आहेत. अजुनही काही अपेक्षित आहे का?

तो अथांग सागर, सुरेख किनारा २० नाहीत
तसेही मात्र मात्रा एकसारख्या ठेवून वृत्तात बसत नाही. लय जी undefined आहे सांभाळावी लागते.
ह्यावर एक उपाय आहे. शक्यतो सुरुवातीला मात्रावृत्तांच्या मार्गी न जाता आनंदकंद सारखे सुटसुटीत वृत्त हाताळावे.

शुभेच्छा.