वांग्याचे लोणचे

Submitted by दिनेश. on 8 October, 2013 - 09:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
लोणचे आहे. आठवडाभर अगदी फ्रीजबाहेरही टिकेल.. तेव्हा..
माहितीचा स्रोत: 
गोव्यातला पारंपारीक पदार्थ.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश, लकी आहात. लोकं तुमच्या रेसिप्यांवर संशोधनं करणार असं दिसतय.

पाकशास्त्रात पीएचडी करता येते का? तसे असेल तर तुम्हाला चटकन मिळेल बघा. थेसिस तर रेडीच आहे Happy

केले लोणचे. वांगी छोटी भाजीची वापरली, व्हिनीगर घातले नाही आणि कोळ न घालता चिंच पावडर घातली (पाण्याचा अंश नको म्हणुन) मसाल्याची चव अप्रतिम Happy

थोडेसेच करुन बघितले, त्यामुळे लगेच संपले.

Lonache.JPG

भाजून केलं तरच ते भरीत असंही नसावं. तांबड्या भोपळ्याचं किंवा बटाट्याचं भरीत भाजून करत नाहीत. घाईत करायचं असेल तर वांगीसुद्धा मोठे तुकडे करून कुकरला इतर पदार्थांसोबतच नुसती वर ठेऊन वाफवून घेतली की चटकन चुरून पाचव्या मिनिटाला भरीत तयार होतं की... काहीही असो, पण त्यानिमित्ताने झालेला उहापोह मात्र चांगलाच आहे!

दिनेश, नशिबवान आहात लेकाचे.
ह्या पानावर तुमची प्रसिद्धि अशी नाहीतर तशी करायला लोकं तयार आहेत... मजा करा लेकानो.

वरच्या त्या भाउंना भरीत कसे करतात ते शिकवा आधी, मग लोणचे काय असते ते सांगा. दालचिनीची भुकटी जरा ज्यास्त घालून वांग्याचे लोणचं खायला द्या..मग उगाच असले प्रश्ण पडायचे नाहीत.

आरती लोणचे मस्त दिसतयं.:स्मित:

इथेही वाद सुरु झाला का? खरं नाही. चर्चेला विषय दिला नवा. वडी दिनेसभाय जरा राजकारन आणी कवितांचे पण लोनचे घालो नी साईं.

मिलिंदा, मला वाटलं अज्ञातवासात असताना, पाककलेवर बरेच संशोधन केले असणार ! अगदी चिनूक्स स्टाईल लेखांची वाट बघत होतो.

मूळात भरीत म्हणजे केवळ वांग्याचेच असे कुठे लिहिलेय ? अगदी पेशवाई जेवणावळीच्या वर्णनातही भरीतें असे अनेकवचन आहे.

ते बटाटा, लाल भोपळा, अननस, केळफूल, घोसाळे असे अनेक भाज्यांचे करतात. गरजेप्रमाणे भाजून वा उकडून घेतात. लाल भोपळा आणि घोसाळे यांचे उकडून, कुस्करून करतात. लाल भोपळ्यांचे फोडी करून देखील देखील करतात.

वांग्याचेच भरताचे चार पाच प्रकार आहेत ( दही घालून, दही न घालता, कोळाचे, काळ्या मसाल्याचे, भाजलेल्या कांद्या मिरचीचे, पंजाबी पद्धतीचे मटार घालून, सोलाणे घालून आणि हो सुदानी पद्धतीचे तळूनही.. सुदानमधे अरेबिक भाषा बोलतात आणि त्या भाषेत भरीत हा शब्द नाही. )

बाकी कुठलाही बीबी भरकवटण्याच्या कलेत काही लोक माहीरच आहेत. नै का ? तरी बरं, त्या मुद्दाम भरकटवण्यासाठी काढलेल्या बीबींवर बाकीचे कुणी फिरकतच नाहीत ! रडत कुंथत हजारी गाठावी लागते.

काही वेळेस कॅलरीजचा सुद्धा विचार मनात डोकावत नाही कुठलेही लोणचे पाहिल्यावर्.:स्मित: फ्लॉवरच्या भाजीपेक्षा त्याचे लोणचे खमंग लागते.

रश्मी,

खरं तर अशी ताजी लोणची चांगलीच. मीठ आणि तेल कमी पडतं.

आणि राजकारणाचं काय, गुढघे दुखतात आजकाल बहुतेक. त्या सुदानी भरीताच्या बीबीवर याला भरीत म्हणावे का, असे स्पष्ट लिहिलेय तरी कुचाळक्या करायची सवय जात नाही. आपल्या मनचेच वाचून
शिमगा करायची पद्धत ना. अनुल्लेखाने मारणेच बरे.

तों.पा.सु. रेसिपी.
या रविवारी करुन बघणार नक्की! इथे जे मिळेल ते वापरुन. दैवयोगाने चिंचेचा कोळ मिळतो इथे ! पण असंच होईल की नाही माहित नाही.

Pages