3d visualisation : गणपती (बदलुन)

Submitted by प्रसन्न अ on 12 September, 2013 - 04:46

गणपती उत्सवात यावेळी गणपती बाप्पाचे visualisation करायचे ठरवले . आम्हाला काही खरी खुरी मूर्ती बनवता येत नाही, पण म्हटल खरं जमत नाही हरकत नाही ,3D मध्ये प्रयत्न करूयात. एक बेसिक मॉडेल नेट वर मिळाले, पण ते अगदीच raw होते , त्यात बरेच बदल करण्याची आवश्यकता होती. ते बदल केले . 3D फुलं आणि निरंजन वेगळी मॉडेल केली.

निरांजनासाठी पितळ , आणि मूर्ती साठी तांबे . ह्या मटेरीअल साठी जरा डोके लावावे लागले

मटेरीअल देण्याआधीचा बाप्पा लाईट सेट अप सकट Happy

d

हे फायनल रेंडर, तांब्याची मूर्ती दाखव्लीये . ज्योतींचा इफेक्ट आफ्टर इफेक्टस मध्ये दिलाय

व

एकूण लागलेला वेळ : एक दिवस
सोफ्टवेर्स : 3d max ,Photoshop,, vray, आफ्टर इफेक्टस

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे तितकसं नाही आवडलं. मूर्ती तांब्याची न वाटता दगडी मूर्तीला कॉपर कलर दिल्यासारखी वाटतेय.

निरांजनांवरचे प्रकाशाचे परीवर्तन पण सफाईदार वाटत नाहीये.

टेबलावरचे परावर्तन मात्र सुंदर आलंय.

@चिमुरि : तुमच्याकडे फेसबुक ब्लॉक असेल Happy

@माधव : प्रतिसादासाठी धन्यवाद , धातूंचे मटेरीअल सेट कर जाम कीचाट काम असते , त्यामुळे ते तांबे तितकेसे जमले नाहीये . मी प्रयत्न करेन पण त्यात अजून सफाई आणायला

थोड्या वेळात करतो , हे फेबु वरून अपलोड केलेत

घरी गेल्यावर पिकासावरून करतो , इकडे पिकासा, जी प्लस ब्लॉक आहे

सुंदर!

पहिल्या फोटोतला बाप्पा जास्त आवडला.

दुसर्‍या फोटोत बाकी सगळे रंगित ठेऊन बाप्पा संगमरवरी किंवा पाषाणाची काळी मुर्ती केली तर केसे दिसेल? मागचा रंग ही बदलावा लागेल.

जस्ट एक ऑल्टरनेटीव्ह म्हणून करुन बघता येइल का?

Pages