डांगर

Submitted by प्रिति १ on 10 September, 2013 - 09:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ भांडे उडदाची डाळ, १ भांडे हरभरा डाळ, १ चहाचा चमचा जिरे, १ मोठा कांदा बारीक चिरुन, १ चमचा तिखट, मीठ चवीनुसार, १ चमचा तेल, मोहरी, हींग, १ वाटी दही.

क्रमवार पाककृती: 

उडदाची डाळ आणि हरभरा डाळ १ चहाचा चमचा जिरे घालुन भरड दळुन घ्यावी / आणावी. वरील भरडा अर्धी वाटी घ्यावा. त्यात बारीक चिरलेला कांदा, तिखट, मीठ दही घालुन कालवावे. आवडत असल्यास १/२ चमचा साखर घालावी. वरुन तेलाची मोहरी , हींग घालुन फोडणी द्यावी मग कालवावे.

अधिक टिपा: 

वरील दांगर चट्णी ऐवजी बदल म्ह्णुन मस्त लागते.

भाकरी बरोबर खायची पधत आहे.

माहितीचा स्रोत: 
हमखस स्वयंपाक पूस्तक.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उडीद डाळ,हरबरा डाळी बरोबर एक चमचा तान्दूळ खमंग भाजून मिक्सरवर भरडा काढा,तान्द्ळामुळे डान्गर मिळून येते चोथापाणी होत नाही!