मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम ''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' - क्र.३

Submitted by संयोजक on 7 September, 2013 - 04:08

नियमावली

हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी.काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे. या गणेशोत्सवात आपणही एक आनंददायी खेळ म्हणून दिलेल्या विशिष्ट वस्तूंवर हायकू रचायचा आहे, जसे की खाली उदाहरण म्हणून दिलेल्या हायकूत दिवा ही वस्तू आहे.

''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.

ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:

१. हायकू ३ ओळींचा असावा.

२.दरवेळी दिलेली वस्तू घेऊनच हायकू रचायचा आहे. उदा. दिवा. आणि त्यावर रचलेला हायकू बघा:

"नववर्षाच्या नव्या पहाटे नवीन आली हवा
क्षण थरथरला मिटून गेला
खिडकीमधला दिवा ''

३. वस्तूचा उल्लेख तिसर्‍या ओळीत व्हावा आणि पहिल्या दोन ओळींचा असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध त्या वस्तूशी असायला हवा. जो तिसर्‍या ओळीत दिसला पाहिजे. तिसरी ओळ ही विरोधाभास/ पंच ( अनपेक्षित परिणाम )साधणारी असावी.

४. हा उपक्रम गणेशोत्सवाचे पाच दिवस (दिनांक १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१३) चालेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार १० सप्टेंबरपासून दररोज सकाळी ११ वाजता नव्या वस्तूसाठी नवा धागा काढला जाईल आणि त्यानंतरच्या २४ तासात त्या वस्तूवर हायकू या उपक्रमात भाग घेणार्‍यांनी प्रतिसादातच रचायचा आहे.
२४ तासांनंतर पहिला धागा वाचनासाठी खुला असेल

५. पारंपारिक जपानी हायकू हा १७ जपानी सिलॅबींचा असून पहिल्या ओळीत ५ दुसर्या ओळीत ७ आणि तिसर्‍या ओळीत ५ सिलॅबी असतात. पण मराठी उदाहरणे वाचताना यमकबद्ध हायकूही आढळतात. .आपल्या तिसर्‍या हायकू उपक्रमाला रंगत यावी म्हणून या उपक्रमाचा महत्त्वाचा नियम-
"हायकू कमीतकमी २० ते जास्तीत जास्त ४० अक्षरांचा असावा. किमान दोन ओळींत यमक साधलेले असावे. तिसर्‍या ओळीत आम्ही दिलेल्या विशिष्ट वस्तूचा उल्लेख अनिवार्य आहे.

६. वरील नियमांनुसार तयार न होणारा हायकू बाद केला जाईल.

७. एक आयडी एकाहून अधिक हायकू रचू शकेल.

८. हायकू बद्दल अधिक माहितीसाठी येथे एक लिंक दिली आहे.

http://www.wikihow.com/Write-a-Haiku-Poem

जालावर अन्यत्रही मोठ्या प्रमाणात अनेक भाषांत आधुनिक स्वरूपात हायकू लिहिले जातात. त्यात निसर्ग, प्रेम वगैरे पारंपारिक विषयांबरोबरच दैनंदिन जीवन , राजकारण, विनोद यांवरील हायकूंचाही समावेश असतो.

चला तर मग! या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची रंगत अनुभवूया,गणेशोत्सवाचा आनंद वाढवूया !! ऑल द बेस्ट !!!

आजच विषय आहे :- पेन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजा नॉलेजचा
मी कागदी घोड्यावर स्वार
पेन माझी तलवार

(दोन्ही हायकूंत ५-७-५ सिलॅबल्सचा नियम पाळायचा प्रयत्न केला आहे.)

(डॉक्टरचे हायकू. टाय हा कंपल्सरी ड्रेसकोड असलेले मेडीकल रिप्रेझेंटेटिव्ह नामक लोक भर दुपारी येऊन एक ५-१० मिनिटं पोपटपंची करून तेच तेच प्रॉडक्ट लिहा असे एकानंतर एक येऊन सांगत असतात. अन हे ऐकून घेतल्याच्या पेन च्या बदल्यात एक प्लॅस्टिकचा पेन 'गिफ्ट' देतात, त्यावरून)

दुपारी पेशंट पाहून दमलेला मी
उन्हातही टाय बांधलेले 'रेप्स'
पेन नको, पण पेन आवर.. 102.gif

इब्लिस Wink
मी सरळ त्यांची बडबड चालू असताना मायबोली चाळते.

आंबोळेबाई एकदम फॉर्मात(म्हणजे ५-७-५ फॉर्ममध्ये Wink )

नताशा , फ्रॉड, फ्रॉड! Happy

नखरा पेन्सिलींचा तोरा रंगांचा
चित्रांचा घेरा कागदांचा पसारा
एकट्या पेनमध्ये मावतो शब्दांचा पिसारा

भव्य डोंगर , कोळशाच्या खाणी
विस्तीर्ण शेतजमीन, मुबलक पाणी
कॉलनी बांधतो पेन !
( विल्यम )

सणाच्या दिवसांतली भरलेली एस्टी
आजीबाईंची नातवाला सांभाळण्याची धडपड
कंडक्टरला एक हाक "भाऊ, येक फुल्ल, येक हाफ - पेन"

>>तिसर्‍या ओळीत आम्ही दिलेल्या विशिष्ट वस्तूचा उल्लेख अनिवार्य आहे.
aschig यांचा हायकू बाद! Proud

रांगलं, बसलं, चाललं
शिकायला कॉलेजात निघालं
मोकळं झालं प्ले-पेन

Pages