मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम ''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' - क्र.१

Submitted by संयोजक on 7 September, 2013 - 03:48

हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी.काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे. या गणेशोत्सवात आपणही एक आनंददायी खेळ म्हणून दिलेल्या विशिष्ट वस्तूंवर हायकू रचायचा आहे, जसे की खाली उदाहरण म्हणून दिलेल्या हायकूत दिवा ही वस्तू आहे.

''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.

ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:

१. हायकू शक्यतो ३ ओळींचा असावा.हायकू मुक्तःछंद असतो, पण मराठी उदाहरणे वाचताना यमकबद्ध हायकू आढळतात, तसेही चालेल.

२.दरवेळी दिलेली वस्तू घेऊनच हायकू रचायचा आहे. उदा. दिवा. आणि त्यावर रचलेला हायकू बघा:
''नववर्षाच्या नव्या पहाटे
नवीन आली हवा
क्षण थरथरला मिटून गेला खिडकीमधला दिवा ''

३. वस्तूचा उल्लेख तिसर्‍या ओळीत व्हावा आणि पहिल्या दोन ओळींचा असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध त्या वस्तूशी असायला हवा. जो तिसर्‍या ओळीत दिसला पाहिजे. तिसरी ओळ ही विरोधाभास/ पंच ( अनपेक्षित परिणाम )साधणारी असावी.

४. हा उपक्रम गणेशोत्सवाचे पाच दिवस (दिनांक १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१३) चालेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार १० सप्टेंबरपासून दररोज सकाळी ११ वाजता नव्या वस्तूसाठी नवा धागा काढला जाईल आणि त्यानंतरच्या २४ तासात त्या वस्तूवर हायकू या उपक्रमात भाग घेणार्‍यांनी प्रतिसादातच रचायचा आहे.
२४ तासांनंतर पहिला धागा वाचनासाठी खुला असेल.

तसेच हायकूसाठी नवी वस्तू नव्या धाग्यात दिली जाईल.

५. वरील नियमांनुसार तयार न होणारा हायकू बाद केला जाईल.

६. एक आयडी एकाहून अधिक हायकू रचू शकेल.

७. हायकू बद्दल अधिक माहितीसाठी येथे एक लिंक दिली आहे.

http://www.wikihow.com/Write-a-Haiku-Poem

जालावर अन्यत्रही मोठ्या प्रमाणात अनेक भाषांत आधुनिक स्वरूपात हायकू लिहिले जातात. त्यात निसर्ग, प्रेम वगैरे पारंपारिक विषयांबरोबरच दैनंदिन जीवन , राजकारण, विनोद यांवरील हायकूंचाही समावेश असतो.

चला तर मग! या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची रंगत अनुभवूया,गणेशोत्सवाचा आनंद वाढवूया !! ऑल द बेस्ट !!

आजचा विषय आहे :- घड्याळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिक-टिक तालवर सगळी हालचाल
आमची याच्याशी जोडली आहे नाळ
जन्म वेळ ते म्रूत्यु वेळेच्या मधले गणित आहे घड्याळ.

मनगट झाले सुने
भिंतीलाही पुसली पाने
स्मार्ट फोनच्या रिंगणात घड्याळ गाई गाणे.

हे खालचं हायकु म्हणून चालेल का? Wink

तिने पाठीमागे फिंगर्स क्रॉस केले अन त्यानेही मनोमन देवाचे नाव घेतले
नंतर हिंमत करुन रंगीत कागद उघडल्यावर,
दोघांच्याही तोंडून निघाले, "अरे देवा, अजून एक भिंतीवरले घड्याळ!"

लगबग, गडबड, घाई, गोंधळ
सोमवारची एक सकाळ
पाहते निर्विकारतेने भिंतीवरचे घड्याळ

पंजा म्हणाला कमळाला

सायकल वाजते खट खड्याल

दोघे मिळून चल पाडू बंद घड्याळ

सही लिहीलेत नताशा, इंद्रा.
माझा प्रयत्न:
चतुर्भुजाने निर्मिले सृष्टीचक्र जगड्व्याळ
तीनच हातांवरी सहज तोलले तीन त्रिकाळ
जणू नांदतो परमेशच घरोघरी बनूनी घड्याळ!

ती येते जणू बेभान वावटळ
आकस्मिक विद्युल्लता चपळ
टिकटिकते संथपणे घड्याळ

घड्याळ गणते, समय दिनाचा
घड्याळ वदते, सफर निशेचा
घड्याळ नसता, समय कुणाचा?

गजर वाजवा आणि बदल्यात शिव्या खा!
एक दिवस घेईन बदला
घड्याळ मी, माझ्याच सेलवर मारील लाथ आणि करीन घात!

चैत्राली/संयोजक, सॉरी. शब्द जुळवण्याच्या नादात नियमच निसटला.

आता शेवटच्या ओळीत घड्याळ घातलेय (घुसडलेय!) चालत नसेल* तर हायकू बाद ठरवला तर चालेल**. (घड्याळाच्या भावना व्यक्त होणे म्हत्वाचे वाटत होते, त्या केल्यात. Proud )

* 'दुरुस्ती केलेली चालत नसेल तर..' असे म्हणायचे आहे. नाहीतर 'घड्याळ चालत नसेल तर..' असा अर्थ निघायचा.
** पुन्हा 'चालेल' हे 'घड्याळ चालेल' अशा अर्थी वाचू नये.

जरा गम्मत केली, बरं का. Light 1

देवाला दिलाय खेळायाला
लॅपटॉप, आयपॉड, स्मार्टफोन भारी
टिकटॉक घड्याळाला बहुतेक विसरली दिसते स्वारी!

वाट पहाताना चाल याची संथ
भेटीच्यावेळी धावते जणू बालक खट्याळ
असे आहे भिंतीवरचे माझे घड्याळ!

शाळेकरता धावता धावता लेकानं विचारलं, "आज लेखन कायकू?"
उशीर झाला म्हणून लगबगीनं ऑफिसात गेली बायकू
सावकाशीनं मी मग लिहिला घड्याळाचा हायकू

लग्नघरातला सावळा गोंधळ बाया बाप्यांची लगबग, बडबड
आटपा चटकन, नाहीतर आपले खरेच वरातेमागून घोडे
डोळे मिचकावत आजी सांगते घड्याळ केलय १५ मिनिटे पुढे

.

कैच्याकै स्पर्धा!
हायकू मुक्तछंद काय?
येडे लेकाचे!

(वरच्या कवितेला हायकू म्हणतात. यात पाच-सात-पाच सिलॅबल्सचा नियम पाळला आहे. वरच्या प्रतिसादांमध्ये एकही हायकू नाही!)

Pages