हैदराबाद व जवळच्या ठिकाणा ची माहिती हवी आहे

Submitted by राज1 on 27 August, 2013 - 06:50

ट्रीप साठी हैदराबाद व जवळच्या ठिकाणा ची (BUS व TRAIN) माहिती हवी आहे.
खर्चाचा अंदाज दिल्यास खूप मदत होईल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mee 23 march la sakali pohochen. 28 march la ratri nighen.

23 la zoo ani je kahi basel te like golkonda light show

24 la ramoji

25 shopping n tyasobat je kahi basel te may be that car eexhibition

26 27 srisailam

28 partially museum n ajun je kahi pahta yeil.

Khup chalawe lagel asha jaga nahi pahaychya tyamule golkonda fort purn pahne kadahit drop hoil.

Ajun kahi suggestion??

सुधा कार मुझियम हे झूच्य जवळ आहे, २३ ला तेही करुन गोलकोंडा जाता येईल.

२५ ला. अन्य - लुंबिनी पार्क (यात हुसेन सागर आलेच, बोटिंग करता येईल), स्नो वर्ल्ड, बिरला मंदिर करता येईल. यापैकी २ किंवा तिन्ही करता येईल.

२८ सालर्जंग म्युझियम सोबत, चारमिनार करता येईल.

जवळच कामत आहे कि. इडली डोसा व्हेज मील्स सर्व मिळते.

अभिरूची आहे. ते नॉन्वेज आंध्रा थाली साठी फेमस आहे. पण व्हेज थाली पण मिळेल. खूप ऑप्शन्स आहेत. शिवाय चाट पण मिळते. चौकात.

Chillys restaurant आहे, व्हेजी.
Dadu's Mithai Vatika आहे तिथे, भेळ, चाट वगैरे मिळते.
ताजमहाल हॉटेल आहे, शुद्ध शाकाहारी, चेन्नई शॉपिंग मॉल जवळ (पॅरॅडाइज पासून अर्धा कि.मी.),
आणि ताजमहाल हॉटेलच्या समोरील लेन मध्ये Taj Tristar हॉटेल आहे. तिथे व्हेज बुफे असतो दुपारी.

रहायला चांगला आहे, गर्दी भरपूर असते. (ती सगळीकडेच असणार म्हणा).

थोडे पुढे गेले तर सूर्या टॉवर्स च्या गल्लीत एक चांगले चायनीज रेस्टॉ आहे. डे. क्रोनिकल च्या ऑफिसच्या अलिकडे सवेरा म्हणून हॉटेल आहे तिथे व्हेज बुफे असते. तिथूनच पुढे गेले तर एक ताजमहाल ( ट्राय स्टार) हॉटेल आहे गल्लीत. तिथे इडली डोसा मील्स सेटप परत आहेच.

राहायच्या ऑप्शन मला तितक्या माहीत नाहीत. सवेरा व ताज ट्राय स्टार एक आहे. हॉटेल करण मध्ये राहू नका शेडी प्रकरन आहे.

मी हैद्राबादी असल्याने सिकंद्राबाद मध्ये फक्त कामापुरती चक्कर टाकून परत. झू, चारमिनार म मुझी अम करायचे असेल तर ते दूर पडेल. हैद्राबादेत अ‍ॅबिड्स भागात किंवा काचि गुडा साइडला हॉटेले आहेत ती बरी पडतील. मध्यवर्ती आहे. प्यारेडाइज पासून फक्त जगदंबा पर्ल्स व इतर शॉपिन्ग जवळ आहे
बशीर बागला ओहरीज आहेकिंवा अ‍ॅबिड्स ला ताज महाल आहे. दोन हॉटेले आहेत. व त्यांची उप हार गृहे पण आहेत.

दादुजमध्ये निसत्या २ कचोरी किंवा समोस्याचे १००० रू. होऊ शकतात. खिसा सांभाळून.
चौकात बरीच रेस्टॉरंट्स आहेत. सकाळी सकाळी रोडसाईडची इडलीदेखील इथे डोळे मिटून खाऊ शकता. चटणी न सांबार मात्र तिखट खायची सवय असेल तरच ओरपा.

२९/०९ ते ३/१० हैद्राबाद ट्रिप केली. जाताना आणि येताना शताब्दीचे बुकिंग केले होते (अनुभूती कोचचे) २५००/- एका वेळचे भाडे आहे. गाडी मस्त आहे. फार कमी थांबे आहेत. खानपान ठीक ठाक आहे. हैद्राबाद पुणे प्रवासात कमी खानपान सोयी आहेत. गाडी पुण्यातून सकाळी ५.५० ला सुटते आणि हैद्राबादला दुपारी २.३० पोचते. हैद्राबादेतून २. ४५ ला सुटते आणि पुण्यात रात्री ११.१५ ला पोचते.

राहायला ताज डेक्कन, बंजारा हिल्सचे बुकिंग केले होते. सर्व ठिकाणी ओला कॅबचा वापर केला. ऑटोवाले पुण्यातल्या ऑटोवाल्यांच्या तुलनेत १०० पटीने जास्त माजोरे आणि प्रचंड फसवेगिरी करतात.

२९/०९ (शनिवार) ला संध्याकाळी लुम्बिनी पार्कला लेझर शो बघितला. शनिवार व रविवार ७.१५ आणि ८. ३० असे दोन खेळ असतात. ईतर दिवशी फक्त ७.१५ ला. आम्ही ७.१५ चा शो बघितला जो ७.४५ ला संपला. हैदराबादेत सॅक बॅग कुठेच आत न्यायला अलाऊड नाही लेडीज पर्स अलाऊ करतात. तेंव्हा हि काळजी नक्की घ्या नाहीतर सॅक बॅग साठी २०/- द्यावे लागतील सर्व ठिकाणी. लेझर शो नंन्तर मिनर्व्हा कॅफे, हिमायतनगर ला खादाडी केली. प्रचंड गर्दी होती पण फूड अप्रतिम होते. मसाला डोसा आणि पुरी भाजी एक नंबर.

३०/९ (रविवार) ला सकाळी १०.३० ला सालारजंग म्युझिअम बघायला गेलो. हे शुक्रवारी बंद असते. अप्रतिम आहे. केवळ अफाट. तिथे ४.३० पर्यंत होतो. तरीही काही काही गोष्टी राहिल्या बघायच्या. भव्य आहे म्युझिअम. आत कँटीन आहे. सो खाण्याची सोय आहे. ५.०० वाजता चारमिनारला गेलो. सालारजंग ते चारमिनार अंतर १० मिनिटे असेल. रविवार असल्याने पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तिथे टाईमपास करून पॅराडाईज, हिमायतनगरला जाऊन बिर्याणी खाल्ली. हे फेमस आहे बिर्याणीसाठी. चांगली चव होती. बावर्चीची पण चांगली असते असे ऐकले होते. पण ह्या ट्रिपमध्ये नाही जमले.

१/१० ला रामोजी फिल्म सिटी बघितली. सकाळी १०.३० पोचलो. हे ठिकाण शहराबाहेर आहे. हॉटेलपासून ओला कॅब केली. ५००/- झाले. इथे स्टार एक्सपीरियन्स टूर घेतली होती (२,२५०/-). ह्याचे बरेच फायदे झाले. एक तर एसी बस होती आणि बरेच ठिकाणी वेगळी लाईन होती ह्या टूर मेम्बरसाठी. प्रचंड आवडले हे ठिकाण. इतके काही बघायला आहे. इथे सुद्धा पूर्ण दिवस कमी पडतो. ६.३० पर्यंत इथे वेळ घालवला. ७.१५ ला परत कॅब बुक केली (६५०/-) आणि हुसेनसागरला गेलो बोटिंग करायला आणि बुद्ध स्टॅच्यू बघायला. ठीक ठाक आहे हे. इथून चटनीज, हिमायतनगरला खादाडी करायला गेलो. मसाला डोसा, स्टीम डोसा, बाबाइ इडली आणि घी डोसा अशी खादाडी केली. मस्त ठिकाण आणि भारी फूड.

२/१० ला सकाळी १०.०० वाजता सुधा कार म्युझिअम बघायला गेलो. काही गर्दी नव्हती. तीस मिनिटात पूर्ण पाहून होते. ठीक आहे म्युझिअम. नंतर नेहरू झू बघायला गेलो. इथे सुट्टी असल्याने जत्रा भरली होती अक्षरशः आत टॉय ट्रेन (२०/-) आणि छोट्या गाड्या आहेत जर चालायचे नसेल तर. चांगले मेंटेन केले आहे. इथून ३ वाजता निघालो ते चॊमहाल पॅलेस बघायला. अप्रतिम पॅलेस. हा खरेतर चारमिनारच्या अगदीच जवळ आहे पण टायमिंगमुळे ३०/९ ला आम्हाला बघता आला नव्हता. हे ठिकाण पण शुक्रवारी बंद असते. सुंदर जागा आणि इथे जुन्या चारचाकी गाड्या पण आहेत ज्या निजामाने वापरल्या होत्या. कपडेपट पण बघण्यासारखा आहे. पूर्ण पैसावसूल आणि न चुकविण्यासारखी जागा. नंतर कलांजलीमध्ये साडी खरेदी झाली. आणि जगदंबा पर्ल मधून मोती सेट्स खरेदी. हि दोन्ही दुकाने एकमेकांपासून ५ मिनीटाच्या अंतरावर आहेत. कलांजली फारच भारी. इथून निघून बिर्ला मंदिरला गेलो (कलांजली पासून १० मी.) ८.१५ वाजले होते जरा कमी गर्दी होती. छान वाटले. खादाडीसाठी अबीड्स मधल्या ताज महाल हॉटेल मधली व्हेज थाळी खायला गेलो. मस्त चव. इथे पण गर्दी होती.

३/१० ला सकाळी फक्त खरेदी केली. सुभान बेकरीमधून ओस्मानिया बिस्कीट, रोट आणि चांद बिस्कीट घेतले. आणि कराची बेकरीतून वेगवेगळी फ्रुट बिस्कीट, पिस्ता बिस्कीट इ घेतले. दुपारी १.३० ला चेक आऊट केले आणि २.३० ला रेल्वेस्टेशनला पोचलो. गाडी १ नंबर फलाटावर लागलेलीच होती. पुण्यात ११.१५ ला पोचलो.

आम्ही गेलो तेंव्हा वातावरण फारच दमट होते आणि ऊनसुद्धा जाणवत होते. ट्राफिकला काहीच म्हणजे काहीच शिस्त नाहीये. खाण्याची मात्र चंगळ आहे. आम्ही बरेचदा हिमायतनगरम्ध्ये खादाडी केली कारण हे हॉटेलपासून जवळ होते आणि ईथे सार्‍या फेमस ईटरीज (चेन) आहेत. टुरिझम छान डेव्हलप केले आहे. एकंदर मजा आली.

पुढील महिन्यात हैद्राबादला ट्रिप साठी जायचा प्लॅन करत आहे. कोणी चांगली राहण्याची व्यवस्था सुचवू शकेल काय? ३ लोक ३ रात्री बजेट १० ते १२ हजार (फक्त राहण्याचे). सुरक्षिततेला प्राधान्य. आणि शहरातील मुख्य पर्यटनस्थळांपासून जवळ असावे. आणि चेकिन चेक आऊट च्या वेळा कश्या असतात? रामोजी व इतर प्रसिद्ध ठिकाणे पाहायची आहेत. तेंव्हा फिरण्यासाठी काय पर्याय असावा? ओला उबेर कि टूर टॅक्सी? ओला उबेरसाठी प्रत्येक ठिकाणी त्या त्या वेळी बुकिंग करत बसावे लागेल. ते कटकटीचे वाटते. एक दिवस रामोजी व एक दिवस इतर स्थळे पाहायचा बेत आहे.
धन्यवाद.

कोणी चांगली राहण्याची व्यवस्था सुचवू शकेल काय? ३ लोक ३ रात्री बजेट १० ते १२ हजार (फक्त राहण्याचे). सुरक्षिततेला प्राधान्य. आणि शहरातील मुख्य पर्यटनस्थळांपासून जवळ असावे. >>
https://www.booking.com/hotel/in/taj-mahal-abids.html
इथे राहिलो होतो. हॉटेल मस्त आहे. बुकींग.कॉम वर चांगले डीलस मिळतात. इथे मस्त साउथ इंडीयन थाळी मिळते. ती नक्की चुकवु नका.

रामोजी व इतर प्रसिद्ध ठिकाणे पाहायची आहेत. तेंव्हा फिरण्यासाठी काय पर्याय असावा? ओला उबेर कि टूर टॅक्सी? >>
टॅक्सी चा पर्याय चांगला आहे रामोजी ला जाण्यासाठी. तिथुन परत येण्यासाठी पण आरामात टॅक्सी मिळाली. १ पूर्ण दिवस रामोजी ला द्या.

Pages