हैदराबाद व जवळच्या ठिकाणा ची माहिती हवी आहे

Submitted by राज1 on 27 August, 2013 - 06:50

ट्रीप साठी हैदराबाद व जवळच्या ठिकाणा ची (BUS व TRAIN) माहिती हवी आहे.
खर्चाचा अंदाज दिल्यास खूप मदत होईल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिर्ला मंदिरच्या आधीचा हॉल्ट चारमिनार आहे.
तिथे एकदा बायामंडळींनी खरेदी सुरु केली की ३-४ तास तिथेच. Happy मग कसले येतात बिर्ला मंदिरला ४ वाजता Biggrin

तिथे एकदा बायामंडळींनी खरेदी सुरु केली की ३-४ तास तिथेच. मग कसले येतात बिर्ला मंदिरला ४ वाजता >> मग मी असही म्हणु शकते की पुरुष मंड्ळींच्या खिश्याचाही/हिताचाही विचार यात समाविष्ट आहे Wink

(१२.३० ते ३.३० भरपुर वेळ मिळतो ना खरेदीला. तो वेळ विचारात घेतला आहे.. हे शेड्युल ट्राईड अ‍ॅण्ड टेस्टेड आहे. Proud )

>>मग मी असही म्हणु शकते की पुरुष मंड्ळींच्या खिश्याचाही/हिताचाही विचार यात समाविष्ट आहे
Proud
सर्वांनी छान माहिती दिली आहे.

स्मित_ , १२.३० ते ३.३० हा वेळ खूपच कमी आहे चारमिनारा के शॉपिंग के लिये. Happy
आम्ही तर पूर्ण दिवस जातो तिथे शॉपिंगसाठी तरी सगळ्या गल्ल्या फिरून होत नाहीत. Sad रात्री ८ वाजता मोठ्या मुष्किलीने पाय निघतो. आणि रमजानच्या सिझनमध्ये तर एक दिवस मी एकटीच जाते शॉपिंगसाठी Happy आणि नातेवाईक आणि मेत्रिणींबरोबर रमजानच्या महिन्यात पुन्हा दोन तीन फेर्‍या होतात. मुख्य म्हणजे ह्या महिन्यात रविवारीसुध्दा सर्व दुकान चालु असतात.
चारमिनारा के शॉपिंगकी बाता कुछ ओर ही हे | Wink

१२.३० ते ३.३० हा वेळ खूपच कमी आहे चारमिनारा के शॉपिंग के लिये >> हो ! ते तर आहेच Happy
( मुळातच कोणतीही/कुठेही शॉपिंग नि टाईम ह्यांचा दुर दुर पर्यंत संबध नसावा असेल तर ती शॉपिंग नाही Proud )
पण मग ३ दिवसात है.बाद कव्हर करण जरा अवघड होत..

सगळ्यांनी खूपच छान माहीती दिलीय त्यात एक टिप माझीही .....रामोजीला जाल तेंव्हा त्यांच भारीवालंच टिकीट घ्या.. फुल्ल पैसा वसूल तसेच त्रास जास्त जाणवत नाही त्यात वेलकम ड्रिंक पासून फिरायला एसी बस ,बिसलरी वॉटर तसेच कोल्ड्रींकचे कुपन, दुपारच जेवण न संध्याकाळचा नाश्ता इन्कलुड आहे तसेच त्यांचे सगळे शो पहाताना फस्ट प्रायोरीटी मिळते. दोन प्रकारची टिकीट्स असतात तिथे.

एक प्रायवेट ट्रिप असते त्यात आपल्याला कारने सर्वत्र नेतात आणि जास्त फेवर्ड ट्रीटमेंट मिळते. फॉर अ फी. लहान मुलांचा खेळण्याचा भाग आहे फंडुस्थान, तिथे बारका भिजेल. तरी एक बदलायचा कपडा जोड, पातळ टॉ॑वेल जवळ असूद्या. जमिनीतून कारंजे यायचे असा एक भाग आहे तो मला पण फार आवडतो. मुलं मुलं म्हणत मी मस्त भिजले आहे त्या कारंज्यात. लै मजा येते.

चिन्नु , माझ आणि निलमदींच चारमिनारा, कोटी, श्री शेल्यम आणि ईतर मा.बो. बरोबर हे. गटग भरपूर झाली. Happy
तू आणि मृनिश एकदा ही नाही भेटलीस. Sad
अब आपके साथ चारमिनारा गटग पक्का .:डोमा:

राजेंद्रना हवंय पुण्याहून है .बाद ट्रिप पैकेज पण इकडे इतकी माहिती जमा झालीय की ते आपला प्लान बदलून स्वतंत्रच जातील .मला पण पुन्हा जावंसं वाटतंय .

एक प्रायवेट ट्रिप असते त्यात आपल्याला कारने सर्वत्र नेतात आणि जास्त फेवर्ड ट्रीटमेंट मिळते. >> अश्विनीमामी हे माहितीच नव्हत. नक्कि ट्राय करणार Happy धन्स !

मी चाललोय हैदराबादला. १२ तारखेला सकाळी कोणार्क ने तिथे पोचू आणि १५ ला दुपारी शताब्दी ने तिथून परतीसाठी निघू. आई, बाबा, बायको, मुलगी (११) आणि मुलगा (८) असे सगळे सहकुटुंब जातोय. आधी स्मित_ यांनी सांगितलेला ३ दिवसांचा प्लान वापरायचा म्हणतोय. काही टिप्स असतील तर जरूर कळवा.

आम्ही २९/३० एप्रिलला मुंबैतून निघून ५ मे पर्यम्त हैद्राबाद ट्र्रीप प्लान केली आहे. ५ मेला परत निघाय्चे आहे. स्वतःच्या गाडीने जाणार आहोत.
बाणेरच्या पुढे पुणे हैद्राबाद रस्ता कसा आहे
पोहोचायला किती वेळ लागेल?सकाळी ७ वाजता निघाल्यास रात्री मध्ये कुठे राहावे का की सरळ हैद्राबाद ?

रामोजी पाहाय्ला किती वेळ लागेल. काही जण म्हणतात दिवस लागतात.
हैद्राबाद मध्ये शाकाहारी जेवण कुथे चांगले मिलेल?.

पुणे सोलापूर हैद्राबाद रस्त्यामधे खाय्चे चांगले जॉइण्ट्स कोणते.

श्रीशैलम हे ठिकाण
फक्त् देवस्थान नव्हे तर ह्याशिवाय पर्यटनास कसे आहे? वर लिहिलेल्या क्रूज इत्यादी बद्दल अधिक माहिती मिळेल का

हैदराबाद मध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे.

जर सोबत लहान मुले असतील तर रामोजी फिल्म सिटी ला नक्की भेट द्यावी. रामोजी साठी एक दिवस राखून ठेवावा. रामोजीमध्ये राहण्यासाठी दोन हॉटेल आहेत तारा आणी सितारा पण ती पंचतारांकीत आहेत त्यामुळे ती महाग असावीत असा अंदाज आहे.

शाकाहारी जेवणासाठी "बिकानेर" अप्रतिम आहे (बंजारा हिल्स रोड क्र. १) याच्या बाजूला कराची बेकरी आहे तेथील बिस्किट्स अप्रतिम आहेत. तसेच दादुज झरोकाचे जेवणही सुंदर आहे (हिमायतनगर आणी जुबिली हिल्स)
सालारजंग म्युझियम आणी फ़लकनुमा म्युझियम पाहण्यासारखे आहेत.

नेहरू झू जवळ सुधा कार म्युझियम सुद्धा अप्रतिम आहे.

आणी श्रीसैलमचे मंदीर सुंदर आहे त्यायातिरिक्त तिथे रोपवे चा आनंदही लुटता येइल. पण राहण्याची व्यवस्था अगोदर करून घ्यावी लागते अन्यथा त्रास होतो. हरिता रेसोर्ट हा तिथे राहण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

तसेच तेथील चिलकुर बालाजी मंदिर फार प्रसिद्ध आहे. तिथेही अवश्य भेट द्या.

आम्ही ११/११/२०१५ ला हैदराबादला जाणार आहोत पुणे येथून (मी, मिसेस व मुलगा (वय ८ वर्ष ) व १४/११/२०१५ किंवा १५/११/२०१५ ला परत येणार आहोत. हैदराबाद मध्ये फिरण्यासाठी व राहण्यासाठी हैदराबाद मधील कोणी आम्हाला मार्गदर्शन करू शकेल का?
धन्यवाद

मानव व रोहन तत्काळ प्रतिसादा बद्दल धन्यवाद
आमचे हॉटेल चे बजेट (राहण्यासाठी) १,०००/- प्रती दिवस, जेवण vegetarian
APTDC च्या बसेस सर्व ठिकाणा पर्यंत जातात का, (हैदराबाद मधील सर्व ठिकाण, श्रीशैलम, रामोजी फिल्म सिटी, दुध सागर धबधबा) किंवा टॅक्सी ने सोयीचे पडेल?
टॅक्सी व बस च्या खर्चाचा अंदाज देता येइल का?

राजेंद्र, तुम्हाला मागच्या आठवड्यात आणि आताही मेल केली आहे. प्लीज तुमच स्पॅम फोल्डर चेक करा कारण तुमचा मेल मला स्पॅम फोल्डरमध्ये मिळाला. बसची तिकीट सिझनला खूप महाग असतात. तुमची विपू आणि संपर्क बंद आहे, त्यामूळे तुम्हाला तिथे लिहिता आल नाही.

दुध सागर धबधबा इथे नाहीये.

श्रीसैलमला जायचे असेल तर दोन दिवस पूर्ण जातात. काही लोक एका दिवसात taxi ने करतात, पण ते खूप hectic तर होतेच, शिवाय इतर काही पाहणं होत नाही.
रामोजी फिल्म सिटीला एक पूर्ण दिवस जातो.
हैद्राबाद लोकल किमान एक दिवस : असे तुमचे चार दिवस झाले.
हैद्राबादला तुम्ही ५ दिवस थांबणार की ४ दिवस?

बसने वरिल सगळे होऊ शकते, ही साईट पहा:
http://www.telanganatourism.gov.in/tour-packages.html

हे बसचे टुर्स सिकंदराबादला यात्री निवास मधुन सुरु होतात. यात्री निवासला रहायला किमान २५०० रुपये प्रतिदिन आहे, तिथे ३ रेस्टॉरंट्स आहे, त्यातील एक व्हेजी. पॅराडाइज या एरियात इतर बरीच हॉटेल्स आहेत, जी स्वस्त असतील आणि तिथुन यात्री निवास अगदी जवळ पायी जाण्यासारखे आहे (२५० मिटर). पॅराडाईज हॉटेल ज्याची बिरयाणी फेमस आहे ते सुद्धा तिथेच आहे. जवळ कामत आहे.

तिथे रु. १५०० च्या आसपास काही हॉटेल्स:
Hotel Ambassador : https://sites.google.com/a/hotelambassador.in/index/amenities-and-tariff
Hotel Aditya Deluxe: http://www.hoteladityadeluxe.chobs.in/#Contact

http://yellowpages.fullhyderabad.com/hotel-kakatiya/nampally/directions-...

इथे फोन करुन रेट्स विचारा. तेव्हा तरी अगदी रिझनेबल रेट्स होते. इथूनच बुकिंग केलं होतं. १८ वर्षांपुर्वी गेले होते तिथे. आता हॉटेल कसं आहे माहित नाही. नाश्ता करायला / जेवायला आम्ही रस्ता क्रॉस करुन कामत कडे जात होतो. तुम्हीही तसे करु शकता. हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये साईट सीइंगसाठी चौकशी करा. त्यांनी तेही बुकिंग करुन दिले होते. हॉटेलच्या दारातूनच आपल्याला बसमध्ये घेऊन परत आणून सोडत.

स्टेशनच्या अगदी जवळ असल्याने नामपल्ली (हैद्राबाद) स्टेशन गाठणे सोयीचे पडते. जवळच महत्वाचे सगळे बस स्टॉप आहेत त्यामुळे कुठेही फिरता येईल. एक दिवस आई बाबांनी हॉटेलमध्येच आराम केला होता त्या दिवशी मी आणि भाऊ बस पकडून झू परत पाहून आलो होतो. चारमिनारलाही खरेदीसाठी बसनेच परत जाऊन आलो.

झू अवश्य बघा.

जर सोबत लहान मुले असतील तर रामोजी फिल्म सिटी ला नक्की भेट द्यावी. रामोजी साठी एक दिवस राखून ठेवावा. रामोजीमध्ये राहण्यासाठी दोन हॉटेल आहेत तारा आणी सितारा पण ती पंचतारांकीत आहेत त्यामुळे ती महाग असावीत असा अंदाज आहे.

शाकाहारी जेवणासाठी "बिकानेर" अप्रतिम आहे (बंजारा हिल्स रोड क्र. १) याच्या बाजूला कराची बेकरी आहे तेथील बिस्किट्स अप्रतिम आहेत. तसेच दादुज झरोकाचे जेवणही सुंदर आहे (हिमायतनगर आणी जुबिली हिल्स)
सालारजंग म्युझियम आणी फ़लकनुमा म्युझियम पाहण्यासारखे आहेत.

बिर्यानी चे चाहते असाल तर "बावर्ची" च्या बिर्यानीचा आस्वाद नक्की घ्या...paradise च्या बिर्यानीपेक्शा अप्रतीम आहे. (RTC क्रॉस रोड जवळ)

नेहरू झू जवळ सुधा कार म्युझियम सुद्धा अप्रतिम आहे.

आणी श्रीसैलमचे मंदीर सुंदर आहे त्यायातिरिक्त तिथे रोपवे चा आनंदही लुटता येइल. पण राहण्याची व्यवस्था अगोदर करून घ्यावी लागते अन्यथा त्रास होतो. हरिता रेसोर्ट हा तिथे राहण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

तसेच तेथील चिलकुर बालाजी मंदिर फार प्रसिद्ध आहे. तिथेही अवश्य भेट द्या.

शिल्पारामम हे देखील एक प्रेक्शनीय स्थळ आहे. (हाई टेक सिटी जवळ)

बरोबर लहान मुलगा आहे तर झू पण पहा.. छान आहे
झू अवश्य बघा.
+१
इथला झू सुद्धा प्रसिद्ध आहे: पिंजर्‍यात कोंबलेले प्राणी नाही, तर मोठे आयलंड्स आहेत प्राण्यांसाठी. लहानांनीच नव्हे तर मोठ्यांनीही पहाण्यासारखा आहे. बराच मोठा आहे. त्या व्यतिरिक्त वेगळी सफारी सुद्धा आहे, प्रोटेक्टेड एरियात, जिथे प्राणी खुले आणि आपण जीप मध्ये असतो. याचे तिकीट वेगळे असते, झूचे एन्ट्री तिकीट घेतानाच सफारीची चौकशी करुन घ्यावी, त्याचे टाइमिंग्स आणि तिकीट कुठे घ्यायचे ते.

झूमध्ये एकदा टॉय ट्रेन ने चक्कर मारुन मग पायी आत फिरणे चांगले, ट्रेन मधुन कुठे काय आहे याचा अंदाज येतो.

चिलकुर बालाजी: यात अर्धा दिवस जातो: श्रद्धेखातर बघायचे असल्यास जावे जागृत म्हणुन प्रसिद्ध आहे.

आम्ही ९ नोव्हेंबर ला पुण्यातून निघून (RJT SC EXPRESS, अजून waiting आहे.) हैदराबादला १० तारखेला पोहचू. Train च waiting कमी झाल नाही तर Bus च ticket काढणार आहोत. ट्रेन सिकंदराबाद पर्यत आहे. तिथून हैदराबाद किती लांब आहे. आंध्र प्रदेश tourisum (APTDC) च्या बस मध्ये बस मध्ये बसण्या साठी कोणत्या AREYA मध्ये उताराव. तिथल हॉटेल कृपया सुचवा. आंध्र प्रदेश tourisum (APTDC) च TICKET ONLINE BOOKING कराव का तेथे आल्या वर बुकिंग कराव. कारण त्यांच्या टोल फ्री नंबर वरील व्यक्ती ला सांगता आल नाही. किंवा मी काय सांगतो आहे ते त्याला समजले नाही

हैद्रा बाद व सिकंद्राबाद एकच सिटी आहे. जुळे शहर म्हणता येइल. सिकंद्रा बाद स्टेशन मधून बाहेर
आल्यावर रिक्षा करता येइल. बसेस ही आहेत.

Pages