Submitted by राज1 on 27 August, 2013 - 06:50
ट्रीप साठी हैदराबाद व जवळच्या ठिकाणा ची (BUS व TRAIN) माहिती हवी आहे.
खर्चाचा अंदाज दिल्यास खूप मदत होईल
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
APTDC आता TTDC (Telangana)
APTDC आता TTDC (Telangana) झालेय.
त्यांचे सगळे टूर्स यात्रीनिवास पासुन आहेत. इतर बोर्डिंग पॉइंट्स आहेत, पण काही टूर्सना जसे श्रीसैलम, यात्री निवासच बोर्डिंग पॉइंट आहे.
त्याच्या जवळील हॉटेल्सची काही नावे व लिंक्स वरच्या पोस्ट मध्ये दिल्या आहेत.
अजुन एक हॉटेल:
Shyam Hotel
+(91)-40-66174294
+(91)-7799658814
Door No.1-7-228, 2nd Floor, S D Road, Secunderabad, Hyderabad - 500003, Paradise Circle
या सगळ्यांसाठी सिकंदराबाद स्टेशनच जवळ आहे.
आणि या हॉटेल्स पासून यात्री निवास चालत जाउ शकता ५ मिनिट.
सिकंदराबाद स्टेशनजवळ सुध्दा बरीच हॉटेल्स आहेत. पण तिथुन यात्री निवासला जायला ऑटो रिक्षाने जावे लागेल.
श्रीसैलमचे ऑनलाइन बुकिंग करावेच कारण की वेळॆवर बरेचदा मिळत नाही. त्यात श्रीसैलम हॉटेल बुकिंग included असते. इतर बुकींग सुद्धा ऑनलाइन केल्यास उत्तम, बसचे सिट नंबर हवे ते बुक करता येतात. बुकींग करताना बोर्डिंग पॉइंट यात्री निवास द्यावा.
हैद्राबाद लोकल / रामोजीफिल्म साठी बुकींग करताना, From: Hyderabad, To: Hyderabad असे सिलेक्ट करावे.
मानव सांगत असलेल्या पॅराडाईज
मानव सांगत असलेल्या पॅराडाईज सर्कल(चौक) भागात बरीच हॉटेल्स आहेत. वर्दळीचा भाग आहे, त्यामुळे रात्री उशीरा पर्यंत गेलात तरी भिती नाही वाटत.
शिवाय खायला टिफिन सेंटर (स्नॅक्स ला तिथे टिफिन म्हणतात.), प्रसिद्ध पॅराडाईज बिर्याणीचे हॉटेल आहे.
अनेक ट्रॅवेल एजंटस ची ऑफिसेस आहेत, तिथुन तुम्ही हैद्राबाद सिटी टुरसाठी कार बुक करु शकता, पण बुकिंग करताना काय काय दाखवणार ते आधीच ठरवा.
शुक्रवारी नमाजाच्या वेळी चार मिनार आणि त्याजवळची मशिद बंद असते. सालारजंग म्युझियम पूर्ण दिवस शुक्रवारी बंद असते.
जर वेळ कमी असेल तर चिलकुर बालाजी मंदिर नाही बघितले तरी चालेल. एकतर ते सिटी पासुन बरेच लांब आहे (आउटर रिंग रोडच्या बाहेर) आणि गर्दीपण भरपूर असते.
पॅराडाईज जवळच सिंधी कॉलनी रोड (P. G. Road) आहे, तिथे संध्याकाळी खाण्याचे ठेले लागतात.
तिथे एक चाचाजी की मामाजी वडापाववाला आहे. त्यांच्या कडे अप्रतिम दाबेली मिळते. शिवाय पॅराडाईजच्या पाठी पिझ्झा डेन म्हणुन पिझाचे दुकान आहे, तिथे स्वस्त नि मस्त असा अगदी दॉमिनोझच्या तोडीचा पिझा मिळतो.
पॅराडाईज पासुन सिकंदराबाद स्टेशनदेखील जवळच आहे. रिक्षाने ५ मिनीटांच्या अंतरावर!
प्रवासासाठी शुभेच्छा!
तुमचे अनुभव्/प्रवास वर्णन जरुर लिहा
मानव व गमभन प्रतिसादा बद्दल
मानव व गमभन प्रतिसादा बद्दल धन्यवाद
आम्ही ट्रेन चे तिकीट बुक केल आहे पण confirmation नाही म्हणून आम्ही (State Transport) बसनेच येऊ. ती बस हैदराबाद पर्यंत आहे (तिथल्या बस stand चे नाव माहित नाही) तिथून यात्री निवास किती लांब आहे. बस तिथे २ (दुपारी) वाजे पर्यंत पोहोचेल. त्या दिवशी तीन ते चार तासात बघण्या सारख जवळच एखाद ठिकाण आहे का? हैदराबाद दर्शन मध्ये खालील दाखवणार आहेतच. पण एखाद ठिकाण राहून जाऊ नये म्हणून. Telengana Tourism च्या SITE वरील कोणती टूर SELECT करावी
Birla Mandir, Chowmahalla Palace, Charminar,
Mecca Masjid & Shopping at Laad Bazaar(By walk), Salarjung Museum(Lunch Break), Nizam Jubilee Pavilion(purani haveli), Golconda Fort, Qutub Shahi Tombs(Drive through), Lumbini Park -(Terminating point)
बहुतेक बसेस या पॅराडाइज वरुन
बहुतेक बसेस या पॅराडाइज वरुन जातात. तुम्हाला पॅराडाइजला उतरता येईल. अन्यथा बसवाल्याला अथवा ड्राव्हयरलाच विचारावे लागेल.
दुपारी पोचल्यावर, तुम्ही स्नो वर्ल्ड करु शकता. पॅराडाइज पासून ते फार लांब नाही - ३-४ कि.मी आहे.
तिथे दर दीड तासाला सेशन सुरु होते. ते तासभर असते. दुपारी ३.३० चे अथवा ५:०० चे सेशन तुम्हाला मिळु शकते. हॉटेल मधुन किमान अर्धा तास आधी निघावे.
स्नो वर्ल्ड लोअर टॅंकबंड रोड ला आहे. ते झाले की तुम्ही वर अप्पर टॅंकबंड रोड ला फिरु शकता तिथे हुसेन सागर आहे. मध्ये बुद्धाची मूर्ती आहे. तिथे बोटिंग तुम्ही लुंबिनी पार्क मध्ये जाल तेव्हा करु शकता.
स्नो वर्ल्डला जायचे नसेल तर NTR Garden ला जाउ शकता. ते लुम्बिनी पार्क जवळ आहे पण ज्या दिवशी तुम्ही टुर कराल त्या दिवशी NTR Garden ला जाणे होणार नाही. त्यापेक्षा लुम्न्बिनी पार्क मधुन बोटिंग करता येइल.
तुम्ही कोणती टुर सिलेक्ट करावी हे कशा बद्दल लिहिले आहे ते कळाले नाही.
हैद्राबादला ऑटो रिक्षा मिटर ने जातातच असे नाही. मिटर पेक्षा २० रु. जास्त असे काही मागतात, तर काही सरळ पूर्ण एवढे असे पैसे मागतात. त्याला इलाज नाही. पोलीस विशेष लक्ष घालत नाहीत. आपणच त्यायला ता जरा घासघीस करावी.
मानव Telengana Touism च्या
मानव
Telengana Touism च्या SITE वर खालील ट्रीप आहेत.
1) 147 HOP ON –HOP OFF BY AC MINI COAC
2) 18 CITI TOUR
3) 19 RAMOJI FILM CITY – HITECH NON-A/C
4) 110 RAMOJI FILM CITY-II COACH-HITECH NON A/C.
5) 111 CITY TOUR II COACH-HITECH NON A.C
6) 119 HYD BY NIGHT
7) 121 HYDERABAD PALACE PACKAGE TOUR
8) 141 CITY TOUR HITECH AC
9) 142 RAMOJI FILM CITY AC HITECH MINI COACH
10) 144 CHILKUR BALAJI DARSHAN
यातल्या कोणत्या SELECT कराव्यात ते समजत नाही.
व हैदराबादला आम्ही उतरणार तर तुम्ही सांगितलेल्या हॉटेल मध्येच उतरावे का? (यात्री निवास जवळील)
बहुतेक लोक 18 आणि 19
बहुतेक लोक 18 आणि 19 करतात.
Hyd at night. फक्त शनि. रवी. ला आहे, त्यात काय आहे माहिती नाही.
पॅलेसेस मी सुद्धा अजून बघितले नाहीत त्यामुळे त्या टुर बद्दल सांगु शकत नाही काही.
श्रीसैलमची मात्र २ दिवसांची टुर घेतल्यास उत्तम. एक दिवसाची पण आहे.
मी सांगितलेल्या हॉटेल्सलाच उतरावे असे नाही. या ठिकाणी आमच्या कंपनीचे काही लोक उतरले होते.
अजून सुद्धा बरीच हॉटेल्स आहेत पॅराडाइज एरियात. गुगलून, फोन करुन तुमच्या बजेट ने ठरवा.
मी आता टुरवर आहे, (पुण्यात, आता बंगलोरला निघालोय), नाहीतर ओळखीच्या लोकांकडुन हॉटेल्स बद्दल अधिक माहिती देता आली असती.
तसेच तुम्ही येणार तो आठवडा आम्ही बंगलोरमध्ये असणार दिवाळीला, अन्यथा काही अडचण आल्यास मदत करु शकलो असतो.
मानव बस ची माहिती कळली, त्या
मानव
बस ची माहिती कळली, त्या प्रमाणे TICKET मी बुक करीन. हॉटेल च विचारयच कारण म्हणजे आम्ही जेथे उतरू तेथून YATRI निवास जवळ पडेल (आम्ही बस ने हैदराबाद ला उतरणार आहोत)
वा वा... सुरेख माहिती आहे
वा वा... सुरेख माहिती आहे इथे. खुप खुप धन्यवाद्...
आम्ही सुद्धा १५ नवंबर ला चाललो आहोत हैदराबाद ला. शताब्दी ने पोहोचू दुपारी ३ पर्यंत. 20 ला परत पुणे.
इथल्या माहितीमुळे टूर प्लान करायला खुपच मदत झालीये. म्हणजे काय काय बघायच ते नीट समजलय.
एक प्रश्न आहे की हैदराबाद मध्ये ओला किंवा टैक्सी फ़ॉर शुअर् आहेत का? आणि त्या रामोजी किंवा बालाजी पर्यंत जातात का?
आहेत, पण त्या पेक्षा Ola
आहेत, पण त्या पेक्षा Ola किंवा Uber वापरा. Taxi for Sure, त्यांचीच सर्व्हीस वापरते.
रामो़जी फिल्म सिटीला जातात की नाही/ गेल्यास काय चार्ज वगैरे माहिती नाही.
सगळ्यांच्या हैदराबादच्या
सगळ्यांच्या हैदराबादच्या माहितीचा आम्हाला आमच्या हैदराबाद ट्रीप मध्ये खूप उपयोग झाला.
धन्यवाद
ओके! जरा वृत्तांतही लिहा
ओके!
जरा वृत्तांतही लिहा थोडक्यात, कुठे उतरलात, कसे होते ते हॉटेल, कुठली ठिकाणं पाहिलीत आणि कशी वाटली, खाण्याच्या आवडलेल्या जागा व पदार्थ; बस सर्व्हीस कशी होतीकाय करावे, काय टाळावे वगैरे.
म्हणजे इतर लोकांना सुद्धा तुमच्या अनुभवाचा उपयोग होईल.
मस्त मस्त. हो वृत्तांत नक्की
मस्त मस्त. हो वृत्तांत नक्की लिहा. काय खरेदी केलीत?
आम्ही ९/११/२०१५ ला State
आम्ही ९/११/२०१५ ला State Transport (S.T.) च्या बसने (रेल्वे च confirmation नाही म्हणून) गेलो. रात्री 1.०० वाजता येणारी बस रात्री २.३० वाजता आली त्यामुळे हैदराबाद ला पोहचायला दुपारी ३.०० वाजले. त्यामुळे त्या दिवशी snow world बघायचं cancel कराव लागल.
Telangana State Transport Corporation www.tsrtconline.in ची पुणे ते हैदराबाद अशी बस सेवा आहे. ते मला तेथे जायच्या दिवशी कळाल त्या मूळ त्या बस ने जाता आलं नाही. त्या बस पुणे स्टेशन वरून सुटतात.
आम्ही Paradise हॉटेल (Secunderabad) समोर
Hotel Aditya Deluxe: http://www.hoteladityadeluxe.chobs.in/#Contact मध्ये राहिलो. हॉटेल चांगल आहे. (Room Rent 1500/- per day)
हॉटेल पासून तेलंगणा Toursim च ऑफिस ५ मिनिटाच्या अंतरावर आहे. (Yatri Nivas जवळ) http://www.telanganatourism.gov.in/tour-packages.html
आम्ही तीथल्या सगळया tour Telangana tourism मध्ये online book केल्या होत्या.
दिवस 1 (११/११/२०१५)
हैदराबाद city Tour (सकाळी ७.३० वाजता) मध्ये :- Birla Mandir, चारमिनार, chowmahalla palace, sudha Cars, गोलकोंडा, नेहरु झुलॉजीकल पार्क बघितल. सालारजंग musium ला त्या दिवशी सुट्टी असल्या मुळे बंद होत, ते बाकीच्या tour ठरवलेल्या असल्या मुळे बघायचं राहून गेलं.
दिवस २ (१२/११/२०१५)
(सकाळी ७.३० वाजता) Ramoji फिल्म City ला गेलो. Ramoji फिल्म City खरच बघण्यासारख आहे. Telangana tourism च्या बसच्या driver मूळ जरा गोंधळ झाला. Telangana tourism च्या बस मधून उतरून आम्ही Ramoji फिल्म City च्या बस मध्ये बसलो. Telangana tourism च्या बस मधून उतरताना
बसच्या driver ने सांगायला पाहिजे होत कि Telangana tourism ची बस तुम्हाला आत पर्यंत सोडणार आहे. त्यामुळे ऐक तास वाया गेला. पण नंतर सगळी ठिकाण बघता आली.
दिवस ३ व ४(१३-१४/११/२०१५)
(सकाळी ९.३०) वाजता
श्रीसैलमला गेलो व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.३० ला परत आलो. परत येताना रोप way ला गेलो पण वेळ नसल्या मुळे boating करता आलं नाही.
दिवस ५ (१५/११/२०१५)
(सकाळी ९.३०) वाजता snow world ला गेलो पण ११ वाजता आत सोडतात. snow world मध्ये 1 ते 1.३० तास लागतो. तेथून आम्ही सालारजंग musium ला जाणार होतो पण ते १२.०० ते ३.०० बंद असते म्हणून तेथून lumbini park ला गेलो व तेथे बोटिंग केलं. lumbini park वरून सालारजंग musium ला पोहचायला ४५ मिनिट लागतात व ४.०० नंतर सालारजंग musium मध्ये सोडत नाहीत असे रिक्षावाल्या ने सांगितले त्यामुळे सालारजंग musium बघता आलं नाही.
Paradise ची Veg बिर्याणी चांगली होती. Paradise जवळ vegetarian Hotel बरीच आहेत.
दोन मोत्याचे व ऐक खड्याचा सेट खरेदी केला.
छान झाली ट्रिप राजेंद्र
छान झाली ट्रिप राजेंद्र
डिटेलमधे लिहिलत ते बरे केलत. बाकीच्यांना पण फायदा होईल
राजेन्द्र, छान! सविस्तर
राजेन्द्र, छान!
सविस्तर वृत्तांत लिहिलात हे ही चांगले केले.
हैदराबादला त्वरीत घर हवयं
हैदराबादला त्वरीत घर हवयं रेंटल.. कृपया संपर्क करा..
tumhi srisailam la kase
tumhi srisailam la kase gela.. tethe kay soi ahe te please sanga
आम्ही पण मागच्या आठवड्यात
आम्ही पण मागच्या आठवड्यात हैदराबाद ला जाउन आलो. इथल्या माहितीचा खूप उपयोग झाला
आम्ही शताब्दीने गेलो आणि आलो. EC चं तिकिट काढलं होतं. सर्विस, स्वच्छता खूपच चांगली होती. पेपर, पाणी, चहा, सूप, नाष्ता, जेवण सर्व गाडीत पुरवले जाते.
आम्ही नामपल्ली मधे हॉटेल फिडाल्गो मधे राहिलो होतो. ते ३ स्टार हॉटेल आहे. एकदम सेंट्रल लोकेशन आहे.
इथे आरती यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही रामोजीला आम्ही कोटिहून बसने गेलो. हैदराबादची बस सर्विस खूप चांगली आहे. कोटिहून रामोजीला दर अर्ध्या तासाने बस आहे. (२०५/२०६) आणि तिघांचे मिळून ४५/- झाले. रामोजीचे तिकिट ऑनलाईन काढले असल्यामुळे तिथेही रांगेत थांबावे लागले नाही. रामोजीत लेकिनी खूप मजा केली. त्यांचे नवीन बर्ड पार्क पण अतिशय बघण्यासारखे आहे.
बाकी गोलकोंडा, सालरजंग, चाऊमहाल पॅलेस, चारमिनार, नेहेरू झू, NTR Garden, Prasad's IMAX (specially mirror maze) , सुधा कार म्युझियम पाहिले. कार म्युझियम पण खूप आवडले. विशेष म्हणजे तिथल्या वेगवेगळ्या आकाराच्या सर्व कार चालू स्थितीत आहेत. गोलकोंड्याचा साउंड आणि लाएट शो आम्हाला खूप आवडला. झू मधील बाकीचे प्राणी आवडलेच पण nocturnal प्राण्यांचा विभाग विशेष आवडला. तसा दुसर्या कुठल्या झू मधे अजून पाहिला नव्हता.
बिर्याणी म्हणाल, तर मी नॉनव्हेज खात नाही, पण नवर्याला अॅबिड्स मधे असलेल्या हॉटेल ग्रँडची आणि बावर्ची ची आवडली. पॅराडाइजची आवडली नाही.
Lat but not least, हैदराबादचं traffic आणि तिथले रिक्शावाले. तिकडे जाउन आल्यावर पुण्याचं traffic आणि पुण्याचे रिक्षावाले एकदम सोबर वाटायला लागलेत
तिथले रिक्षावाले खूपच डेंजर रिक्षा चालवतात. (रामोजीत काही शो आणि राइड्सला सांगतात की हार्ट पेशंट आणि प्रेग्नंट बायकांनी बसू नये. ती सूचना रिक्षेसाठी पण सांगायला हवी :ड ) ट्रॅफिक पण खूप जास्त वाटले (कदाचित आम्ही अगदीच मध्यवर्ती ठिकाणी राहिलो त्यामुळे असेल.)
हेमंत श्रीशैलमला जाण्यासाठी
हेमंत
श्रीशैलमला जाण्यासाठी http://www.telanganatourism.gov.in/tour-packages.html ची हैदराबाद ते श्रीशैलम अशी tour दोन दिवसासाठी आहे. १५००/- रु. प्रती व्यक्ती (A.C. Bus व A.C. Hotel) Telangana Tourism ची नॉन A.C. tour आहे पण त्याला demand नसल्या मुळे आम्हाला ती cancel करून A.C. tour घ्यावी लागली. तेथे हॉटेल खूप चांगल होत. मंदिरा जवळ vegetarian हॉटेल आहेत. Tour package मध्ये जेवण, नाश्ता, चहा include नाही त्याची सोय आपल्यालाच करावी लागते.
धन्यवाद सर्व महिती
धन्यवाद सर्व महिती देणार्यांना, आम्हीही गेल्या आठवड्यात हैद्राबादला गेलो होतो. इथल्या माहितीचा खूप् उपयोग झाला. आम्ही गोलकोंडाचा लाईट शो, सालारजंग म्युझियम, चारमिनार, चौमहल्ला पॅलेस, लुंबिनी पार्क ह्या ठिकाणी गेलो होतो. आम्ही तिथे चार दिवस होतो. लोअर टँक बंड रोडवरच्यअ एका हॉटेल मधे राहिलो होतो. मस्त आहे शहर, एथले लोक सर्वच... रीक्शावालेही चांगले भेटले. टॅक्सी वाल्या एकाचा अनुभव मात्र बरा नाही, बाकी मेरु कॅबची सर्विस चांगली होती. पॅराडाईस बिर्यानी, खुबानी का मिठा, डबल का मिठा, अंगीठीचा बुफे, चटनीज चे साउथ ईंडीयन फुड... अहाहा... अत्ता लिहीताना परत जावे वाटु लागलयं. मंगतराय मधुन मोती ब्रेसलेट आणि टॉप्स घेतले आणि गणपतीबाप्पासाठी तुरा घेतला. कराची बिस्कीट , चुडीबाजारातून बांगड्या खरेदी करून ट्रिप संपन्न झाली.
Thanks a lot for the
Thanks a lot for the same...
I will check for the same...
धन्यवाद, नुकतेच जाऊन आलेल्या
धन्यवाद, नुकतेच जाऊन आलेल्या लोकांनी मस्त उपयुक्त माहिती दिली आहे.
आम्ही जानेवारी-फेब मध्ये जायचा प्लान करतोय. इथली माहिती उपयोगी पडेल नक्की.
From first jan to 15th
From first jan to 15th February Hyderabad has an exhibition, called numaish. Of same household stuff, artefacts, sarees clothes etc. and. Good food of course. It is held at exhibition ground. Near mojhamjahi market. A regular huge mela. A big event for all families and friends. The thing to eat is veg curry puffs. With watery tomato sauce, chaat items.
It is huge and if visiting with kids pl hold their hands. Carry drinking water. There's also Ferris wheel and other mela type games. Goes on till late night. In 1983 we had gone there and I had bought red high heels a cotton Saree in grey colour and silly stuff. All for rs. 200.00.
All for rs. 200.00 >> Those
All for rs. 200.00
>>
Those are Rs 200 in year 1983
पंधरा वर्षांपुर्वी गेलो
पंधरा वर्षांपुर्वी गेलो होतो.आता पुन्हा जाणार आहे.सालारजंग त्यावेळेस पूर्ण पाहिलं होतं ( दोन तास).एक माहितीचं छान रंगीत पुस्तक चाळीस रुपयास घेतलेलं वाचून झाल्यावर एका वाचनालयात दिलं होतं.आता १२ ते ३ बंद असते हे खरं नाही वाटत.रिक्षावाल्याने खोटं सांगितलं का?मुळात दहाला उघडतं लगेच बाराला बंद नाही करणार. त्यावेळेस कोटी स्टँडसमोरच्या मारवाड्याच्या हॅाटेलात थांबलेलो.( साधं आणि स्वस्त होते.)
शरद रिक्षावाल्याने सालारजंग
शरद
रिक्षावाल्याने सालारजंग बद्दल आम्हाला खोटच सांगितल, पण त्याच्यावर विश्वास ठेवण्या शिवाय पर्याय नव्हता. पुण्यात आल्यावर वेबसाईट वर त्याची वेळ बघितली ती १० ते ५ आहे. तेथून lumbini park ला गेलो व तेथे बोटिंग केलं. ३ ते ५ वाजेपर्यंत २ तास तरी सालारजंग बघायला मिळेल अस वाटल होत. lumbini park वरून सालारजंग musium ला पोहचायला ४५ मिनिट लागतात व ४.०० नंतर सालारजंग musium मध्ये सोडत नाहीत म्हणून खरेदी केली व हॉटेल वर गेलो.
गणपतीच्या सुट्टीतला
गणपतीच्या सुट्टीतला हैदराबादेचा प्लान फिसकटला. आता होळीच्या आसपास जात आहोत. २२ / २३ ला रात्री पोहोचु. २८ ला निघु.
हैद्राबाद ट्रिप प्लान करीत
हैद्राबाद ट्रिप प्लान करीत आहे. साधारण outline अशी आहे . 24th मार्च reach hyd by 2pm by shatabdi. संध्याकाळी लुंबिनी पार्क, एनटीआर गार्डन, बिर्ला मंदिर .
25 मार्च रामोजी सिटी.
26 मार्च सालारजंग ,चारमिनार, जामा मस्जिद
संध्याकाळी गोलकोंडा, सुधा कार्स
27 मार्च दुपारी 2 ची शताब्दी रिर्टन
तर धाग्यावरील सर्व माहिती वाचुन हा प्लान केला आहे. योग्य आहे का?? काही additions /cancellations गरजेची आहेत का?बहुतेक सर्व कवर केले आहे.
ठीक वाटतोय. २४ मार्चला
ठीक वाटतोय.
२४ मार्चला लुंबिनी पार्क मधुन बोटिंग करु शकता, तसेच वेळ कमी पडल्यास NTR गार्डन ड्रॉप करु शकता.
२७ ला काहीच ठेवलं नाही. झू बघण्याची आवड असल्यास २६ ला सालार्जंग मुझियम ऐवजी झू आणि २७ ला सालार्जंग मुझियम करुन, जेवण करुन ट्रेन पकडु शकता.
झू आणि सुधा कार म्युझियम जवळ जवळ आहेत.
धन्स मानव. अजुन प्लान करतोय .
धन्स मानव. अजुन प्लान करतोय . म्हणून इथं टाकले. जाणकारांच्या inputs आले किअजुन changes होत राहील .तिथे बाजार कितीला सुरू होतो सकाळी??
Pages