हैदराबाद व जवळच्या ठिकाणा ची माहिती हवी आहे

Submitted by राजेंद्र on 27 August, 2013 - 06:50

ट्रीप साठी हैदराबाद व जवळच्या ठिकाणा ची (BUS व TRAIN) माहिती हवी आहे.
खर्चाचा अंदाज दिल्यास खूप मदत होईल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हैद्राबादच्या जवळ श्रीशैलम हे जोतिर्लिंग आहे. हैद्राबाद पासून अंतर २००-२५० किमी आहे. रस्त्याने ३-४ तास अंतर आहे. खाजगी गाडी असेल तर पहाटे निघून रात्री उशिरा हैद्राबादमध्ये परत येता येते किंवा आंध्राप्रदेश सरकारच्या पर्यटक विभागातूनही १ दिवसात परत/ १ रात्र मुक्काम अश्या टूर आहेत.
अधिक माहिती: http://www.aptdc.gov.in/packages/srisailam/book/imgs/srisailam.pdf

रामोजी फिल्म सिटी देखील हैद्राबाद जवळच (२५-३० किमी) आहे. निवांतपणे पहायला १ दिवस राखून ठेवावा.
अधिक माहिती: http://www.ramojifilmcity.com/

बाकी हैद्राबादमध्ये गोलकोंडा, हुसेनसागर तलाव, स्नो वर्ल्ड, चारमिनार इ. प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. खादाडीसाठी पण भरपूर जागा आहेत.

जास्त वेळ नसेल प्लॅन करायला तर टूरीझम ऑफिसकडे चौकशी करा. त्यांच्या हैद्राबाददर्शन तसेच तिरुपती, श्रीशैलम, बासरा अश्या अनेक टूर्स असतात.
खालील लिंक पहा. अर्थात ही माहीती जुनी आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणी जाण्याआधी एकदा फोन करून पहा.
http://indiatoday.intoday.in/story/hyderabad-charminar-hyderabadi-biryan...

बिर्ला मंदीर पण जरुर बघा. बायकांच्या खरेदीकरता मीनाबाझार आहेच, पण जबरदस्त बार्गेनिंग करावे लागेल.

ही जुन्या मायबोलीवरची दिपांजली या माबोकरणीची पोस्ट.

या वेळी India trip मी दणकून enjoy केली , बराच वेळ मिळाल्याने ज्या ज्या शहरात राहिले , सगळीकडे बह्रपूर surfing करून आले !
पुण्यात फ़िरणे नेहेमीच होते पण या वेळच्या India trip मधे ' हैदराबाद ' ने अक्षरश : वेड लावले ... Happy
जुन्या मुस्लीम culture पासून hi tech NRI crwod परयंत सर्वांना shopping ला प्रचंड scope .....!! Confluence of old and ultra modern life!....
सर्व प्रथम अर्थातच हैदराबादच्या Pearl आणि खड्याच्या दागिन्यांच्या मार्केट विषायी !
हैदराबाद आके अगर चार मिनार और वहांका अगर चुडी बझार नही देखा तो हैदराबाद क्या देखा ....
हैदराबाद चा चुडी बझार (किंवा लाल बझार) म्हणजे साक्षात अलिबाबाची गुहा च ..!!
आपल्या तुळशीबागे सारखीच एक गल्ली आणि दोन्ही बाजुला छोटी छोटी दुकानं !
रस्त्यावर fancy jewelry हातात घेउन फ़िरणारी आणि ते खपवण्या साठी क्षरश : हात धुवुन मागे लागणारी असंख्य पोर आणि अनेक फ़ेरीवाले !
एक पोर्‍या असाच भयानक irritate करत मागे लागला होता , तो भाव कमी करत होता तरी मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते , आणि तो तरीही आशेनी मागे येत होता , शेवटी त्याला कटवण्या साठी मी म्हंटलं ,' फ़ोकट मे देता है तो दे ' तर तो येडा , ठिक है म्हणून पुन्हा मागे लागला !
असो , पण या चुडी बझार गल्लीत शिरण्या आधी
,Please update your bargain skills and then enter!!
इथल्या दुकानदारांची marketing style मोठी अजीब आहे !
त्या गल्लीत शिरताच सगळे दुकानदार जोरा जोरात टाळ्या वजवून , शुक शुक करून किंवा आमच्या दुकानात या अशा लांबूनच खुणा करायला सुरवात करतात !
ते पाहून दोन मिनिटे अगदी गोंधळून जायला होतं ,( आपल्या तुळाशीबागेतले किंवा hongkong lane मधले दुकानदार पहा कसे एका जागी बसतात )
पण धीट पणानी इथल्या प्रत्येक दुकानात शिरून तिथे काय काय आहे आणि काय rate ला आहे हे पहाणे फ़ार गरजेचे आहे .
इथे जर bargain केले नाही तर लुटले गेलात अस समजा !
प्रत्येक दुकानात खड्याच्या बांगड्या हे main attraction!
शंभर रुपरां पासून तीन चार हजारा पर्यंतच्या निरनिराळ्या रंगाच्या खड्याच्या बांगड्या , bracelets चा इथे जबरदस्त stalk आहे .
dress किंवा साडीची वट्टेल ती shade घेउन जा , त्यावर matching बांदगड्या दुकानदार शोधून देइलच !
मी अगदे कांद्याच्या सालाच्या रंगाचे fancy diamonds मिळवण्यात पण यशस्वी झाले:-)
खद्याच्या बांगड्या मेटल आणि लाखेच्या असतात .
पांढर्‍या खड्यांच्या नाजुक बांगड्या अगदी real diamonds वाटतील अशा भरपूर variety मधे प्रत्येक दुकानात दिसतात .
त्यावर match होणारी इतर fancy jewelry पण चुडी बझार मधे सही आहे फ़क्त दुकानदार जी किंमत सांगेल त्याच्या निम्म्या किमती पेक्षा कमी पासून सुरवात करणे अतिशय जरुरी आहे .
चांगले deal मिळवण्यात यशस्वी झालात तर इतर शहरांपेक्षा बरीच variety असलेली आणि त्या मानाने स्वस्त खड्याची jewelry चुडी बझार मधे best मिळेल .
या चुडी बझार मधे Must visit असे एक designer lace चे दुकान आहे ,' ख़सत '!
या दुकानात अगदी छोट्या patch work lace पासून ते अतिशय सुंदर designer साड्या खास आपल्या choice ने तयार करून घ्याव्यात इतक्या सुंदर laces आहेत . त्या सहा वार ते सात वार च्या bundle मधेच येतात .
इथली एक झलक पाहिली की designer saris कश बनत असतील याचा अंदाज येतो !
साड्यांची lace आठशे ते हजार रुपयांपासून सुरु होतात .
या दुकानात मात्र अजिबात bargain ला scope नाही , त्या दुकानाच्या मालकाला बहुदा त्याच्या unique collection ची पूर्ण कल्पना असावी .
साडी शिवाय इतर असंख्य variety च्या lace आहेत , short kurtis, सलवार कमीझ अशा lace वापरून मस्त बनवून घेता येतात आणि एकदम unique दिसतात !
मी Raw silk वर ही lace लवून काही कुर्ते करून घेतले , भारतात आणि इथे US मधले लोक तर वेडेच होतात अशी designs पाहून .
सलवार कमीझ ला lace लावायची असेल तर शिफ़ाॅन सुरेख दिसते तर साड्यांसाठी इटालियन क्रेप ,nated fabric किंवा शिफ़ाॅन सही दिसते .
शिवाय या दुकानात छोट्या योक सारखे काही जर्दोझी patches मिळतात ते पण वापरून मस्त tops तयार करून घेता येतील .
शिवाय छोटे बुंदके type पॅच वापरून साड्यांची जरीबुट्टी करून घेतली तर फ़ार च सुंदर दिसते !
या छोट्या छोट्या बुंदक्यांची किंमत अगदी दहा रुपयां पासून सुरु होते .
काही coin type lace वापरून कुर्ता border किंवा capri border, decorative belts, pillow cover border, decorative bag belts सुध्द तयार केले तर सुरेख दिसतात .
इथे cut border च्या lace पण सही मिळतात .
साड्यांना तर सहीच दिसतात पण one shoulder dress ची neck border किंवा फ़क्त cut border lace वापरून spagetti type string sleves शिवल्या तरी जबरी दिसते Happy
चुडी बझार आणि चार मिनार च्या आजुबाजुला असलेल्या दुकानां मधे मोती पण बरेच स्वस्त आणि मस्त मिळतात .
single मोत्यांची एक एक लड सुध्दा सुटी विकत घेता येते .
एक पदरी माळा शंभर ते सव्वशे rs. पासून मिळतात तर design प्रमाणे इतर ही बरीच designs पहायल मिळतात .
चार मिनार च्या जवळ एक मिनार pearls म्हणून दुकान आहे , तो बर्‍या पैकी deals देतो .
मोत्यां मधे light violet, light pink आणि black peral पण सुरेख दिसतात .
चुडी बझार मधे केसांना आणि हातांना लावायची मेंदीही , अत्तर चांगले मिळते .
मेंदीचा ' कराची ' brand चांगला आहे .....
असो , तर आज झालं चुडी बझार पुरण इतर ठिकाणां विषायी नंतर Happy
पण पुन्हा एकदा Don't go if you can't bargain..

ही अजुन एक

तर अजुन थोडे हैदराबाद विषयी ..
चुडी बझार च्या visit नंतर त्या जितेंद्र जयाप्रदाच्या movies सारख्या जागो जागी मांडलेल्या बांगड्या स्वप्नात आल्या तर नवल नाही ! Happy
पण या मोती वाल्यांशिवाय मोती , stones साठी काही Classy showrooms पण आहेत .
मला त्यातली ' मंगतराय ' ची showroom आवडली , मस्त classy collection आहे त्याच्याकडे .
चुडी बझार पेक्षा जरा महाग आहे अर्थातच ,
पण तिथेही माझ्या हैदराबादी वहिनीने bargain करून price कमी केली .
नाही तर मी काही अशा hi-fi दुकानात धजले नसते price कमी करायला:-)
पण मोत्याची खरेदी फ़क्त gifts देण्या साठी केली , मला स्वत : ला fancy diamonds इतका मोत्याचा शौक नाही .
पण ज्यांना interest आहे त्यांच्या साठे भरपूर वाव आहे मोत्याच्या shopping ला .
पंजागुट्टा area मधे असणि सोमजीगुडा circle च्या आस पास बरेच मोतीवाले आहेत .
शिवाय real diamonds साठी याच area मधला त्रिभुवन्दास भिमजी famous आहे .
साड्यांसाठी :
खास classy-pure कांचीपूरम , पोचंपल्ली आणि इतर south च्या famous साड्यां साठी ' कलांजली '( पोलिस कंट्रोल रुम जवळचे )
इथे किमती अर्थातच दणकून असतात .
चांगल्या सिल्क च्या साड्यांच्या किमती सहा हजारा पासून सुरु होतात .
तसे साड्यांसाठी अमिर पेठ area मधली चंदना bothers, R.S. brothers, Cherma's पण खूप famous आहेत .
या साड्यांच्या दुकाना बाहेर corn chat सही मिळते:-)
पण party wear हवे असेल तर साड्यांसाठी कलांजली चे collection जास्त rich आहे .
कलांजली जवळच ' लेपाक्षी handicrafts' नावचं दुकान फ़ारच मस्त आहे .
खास भारतीय handicrafts च्या अनेक वस्तू सुरेख मिळतात,, इथे अमेरिकन लोकांना gift द्यायला छान आहेत .
पंजागुट्टा arrea मधे ' कलानिकेतन wedding mall' नुकताच निघाला आहे .
Mall दोन विभागत divide केलाय , एका बाजुला दूल्हा दुसर्‍या बाजुला दूल्हन shopping!
इथे complete wedding shopping करायला भरपूर scope आहे .
North Indian style brides साठी लेहेंगा , घागरा चोली ची designer saris ची जबरी दुकानं आहेत शिवाय costume jewelry, real gold, fancy shoes ची पण दुकानं या mall मधे आहेत .
मी तरी भारतात Wedding mall concept प्रथमच पाहिली हैदराबाद ला !
बेगमपेट आणि Abids area मधे असलेले ' मीना बाझार ' हे खास designer saris साठी famous!
इथे fabric पण इतकी सुरेख आहेत कि आपल्याला हव्या तशा साड्या या fabric मधून करून घ्याव्याशा वाततात .
शिवाय या दुकानात पण matching jewelry सही आहे . पण prices are high!
साडी आणि बुटिक साठी Abids area is very famous!
इथले Neeru's बुटिक सही आहे .
पंजागुट्टा चौकात shoes ची पण बरीच दुकानं आहेत,.
त्यात Loft हा shoes mall जबरी आहे .
Loft- india's largest shoe mall अशी ad करतात , माहित नाही इतर शहरां मधे या पेक्षा मोठी show room असेल तर पण loft ची तीन मजली show room मस्त आहे .
इथे 3 rd floor वर pedicure spa पण आहे:-)
सगळ्या प्रकारचे ladies-Gents shoes इथे मिळतात ,ladies party wear shoes सही आहेत इथले

गमभन +१

किती दिवसांसाठी येताय ?

१ दिवस रामोजीसाठी लागतोच.. खर्च १०००रु च्या आसपास पर पर्सन (अंदाजे)

गोलकोंडा, हुसेनसागर तलाव, स्नो वर्ल्ड, चारमिनार >> तसेच नेहरु झुलॉजीकल पार्क , बिर्ला मंदिर , सलारजंग संग्राहलय , मक्का मशिद... अजुनही आहे

http://www.aptdc.gov.in/hyderabad.html
http://www.hoysalatours.com/packages/42/ap-tourism-aptdc-packages-from-h...

अरे वा.. दीपांजलीने लिहिलेली ही माहिती वाचायची राहुन गेली होती. थँक्स रश्मी (व अर्थातच दीपांजली).
पण दीपांजली, तयार सलवार कमीज व कुर्त्यांच्या खरेदीबद्दल नाही लिहिलेस.

माफ करा राजेंद्र, तुमच्या धाग्यावर वेगळीच माहिती विचारत आहे.

कुठून जाणार ? मुंबई पुणे कडून असेल तर आणि रेल्वेनेच करायचे असल्यास भुवनेशवर पुरी या सहलीशी जोडा .कारण वेगळी पुरी यात्रा करतांना गाडी सिकंदराबादवरूनच जाते नी दोन रात्री लागतात .#गमभन ,तीन चार तासात २५० किमी श्रीशैलम कारने करून परत ? नागार्जुन सागर म्युझिअमपण त्यात होते का ? ईद वगैरे सणाच्या वेळी फार गर्दी असते .खरेदी विषयी वेगळा धागा काढलेला बरा !६-७-८ सप्टेंबरच्या iitm च्या गोरेगावच्या प्रदर्शनात हैद्राबादचे (आंध्र प्रदेशच्या स्टॉलवर)नकाशे ,वीसेक माहितीपत्रके मिळतील .संपूर्ण सहल हॉटेलसह बुक करून देतील .तिरुपति मात्र चैनई/बंगळुरु ला जोडून करावे .

श्रीशैलम एका दिवसात कारने होत पण खूप दमायला होत. नागार्जुन सागर म्युझिअम नाही करता येत.
APSRTC ची तीन दिवसाची ट्रिप आहे, त्यात हे सर्व कव्हर होत आहे. बस भाड + हॉटेल स्टे + क्रुजवर जेवण + रोपवे include आहे. हैदराबादवरून अंदाजे प्रत्येकी ३००० ते ३५०० खर्च आहे.

रामोजी फिल्म सिटी कोणत्याही ट्रॅव्हल एजंटतर्फे नका करु. स्वतः कारने किंवा लोकल बसने जा. कोटी आणि सिंकदराबाद बस डेपोमधून डायरेक्ट बसेस आहेत.
सकाळी ९.०० वाजता उघडते पण ट्रॅव्हल एजंट १०.३० पर्यंत नेतात आणि ४ ला तिकडून बाहेर काढतात. त्यामूळे जास्त फिरता येत नाही.

चिलकूर बालाजी मंदिर, शिल्पारामम वेळ असेल तर नक्की जा.

http://sudhacars.com/ >> हो मस्त आहे हे कार म्युझियम:) नेहरु झुलॉजीकल पार्क पासुन ५-१० मि. च्या अंतरावर आहे फक्त नि बघण्यास १-२ तास पुरेसे आहेत.

चटनीज मधला एम एल ए पसार अट्टू , बंबई इडली आणि स्टीम डोसा एक नंबर ..
पॅरेडाइज मधली बिर्याणी..
ओहरीज चे आइस क्रीम ..
व्हाईट हाउस शेजारी असलेल्या हवेली मधील बटर चिकन आणि जिरा राईस..
चारमिनारच्या मागच्या साईड्ला असलेले पिस्ता हाऊस मधले मट्ण , पत्थर का गोश्त..आणि खुबानी का मिठा ..
कराची बेकरीची बिस्कीट ...गोकुळ चाट, ईट स्ट्रीटला मिळणार्या फ्रँकीज...आणि इराणी चहा ..

बावर्ची ला पण बिर्याणी जेवण चांगला मिळता ( पण बरेच डुप्लीकेट बावर्ची आहेत ..सो फेमस कोणता ते विचारून पहा )

आणि चिकन चेट्टीनाड / वेज चेट्टीनाड , मिक्स भाज्यांचे लोणचे हे ही पदार्थ खास आहेत..
बिर्ला सायन्स म्युजीयम मधे डायनॉसोर चा सांगाडा आहे ..बघायला मजा येते !

लहान मुले असतील तर प्रसाद मधे ४ डी चित्रपट , आय मॅक्स चा अनुभव घेता येइल ..

बाकी आठवेल तसा सांगतो ..

सालारजंग म्युझिअमला अकरा वाजता आत जाऊन 'घडयाळा' समोरची जागा पकडून बसल्यास बाराचे ठोके पडतांना पाहाता येईल .नंतर इतर दालने पाहावीत त्यात २६चे महत्वाचे .यात हिरे माणिकांच्या वस्तु आहेत .चायनिज रेशिमकामाचे दालन आणि तो झिरझिरित वस्त्र असलेला पुतळा पाहा. #आरती +.

आम्ही तिघे (मी, मिसेस व मुलगा (वय ६ वर्ष ) जण दिवाळीच्या सुट्टीत हैदराबाद ला जाण्याचा विचार करत आहोत.
पुण्यातून जाणार आहोत. आम्हाला तेथली काहीच माहिती नाही. पुण्यात कोणी कमी खर्चात Trip Organizer असेल तर सांगा त्याने त्रास कमी होईल आसे वाटते.

मी तिथे असते तर तुम्हास होस्ट केले असते. कलांजली जवळच एपी टुरीझमचे ऑफिस आहे.
तिथे सर्व पत्रके व अरेंजमेंटस अस्तात. हैद्राबाद पुणे एसी बस तिकेट एपी टुरिझम चे ५७५ च्या आसपास होते १ वरशा पूर्वी.

गोलकोंडा, लाइट शो असतो संध्याकाळी, सालारजंग शुक्रवारी बंद असते. रामोजीची माहिती बरोबर आहे . खूप चालायची तयारी ठेवा.

बिर्ला मंदिर एका टेकडीवर आहे व समोर हुसेन सागर आहे. हे संध्याकाळी बघा. फार सुरेख दिसते.

चारमिनार जामा मसजिद एकातच करता येइल. तिथे टॅक्सी घेउन जा. चूडी बाजारात फार बार्गेनिन्ग करावे लागते. टिपिकल खड्याच्या बांगड्या व दागिने मिळतात.

बहार अ‍ॅबिडस किंवा पॅराडाइज बिर्यानी जरूर खा. चिकन ६५ खा. मिठाई मध्ये पुल्ला रेडी शुद्ध तुपातील मिठाई घ्या. मलाई सँडविच मस्त आहे. श्रिशैलम एका दिवसात होत नाही हे ही बरोबर आहे.

मोत्याचे दागिने जगदंबा पर्ल्स सिकंदराबाद येथून घेता येतील. त्यांची साइट पण आहे. लुंबिनी पार्क व बुद्ध्हाचा पुतळा आहे तिथे बोटिंग करता येते व एका बाजूस इट स्ट्रीट आहे बारक्याला मजा येइल.

वहिनिंना पोचमपल्ली सिल्क साडी नैतर गदवाल नक्की घ्या पाडव्याची.

हाय टेक सिटी भागात शिल्पारामम आहे तिथे जाता येइल. लवकर काहीही उघडत नाही. पण दुपारी बंद पण होत नाही. इडली डोसे सर्वत्र मिळतात. मीठा पान घ्या.

oh I miss my old life. kyaa sukoon thaa bhaai.

आश्विनीमामी आणी दिपांजलीने सॉल्लीड माहिती दिलीय. बाकी लोकांना पण मनापासुन धन्यवाद्.:स्मित:

आय होप मलाही कधीतरी हैद्राबाद दर्शन करता येईल.

राजेंद्र, तुमची टूर तुम्हीच अरेंज करा. काही लागल तर आम्ही मदत करु Happy खूप कमी खर्चात होईल.

पुणेला राहता तर एक वेळचा प्रवास शताबदी एक्सप्रेसने करा. पुण्यावरून सकाळि ६ला सुटते आणि दुपारी ३ ला ईकडे पोचते आणि परत जाताना दुपारी २.३० ला सुटते आणि रात्री ११ ला पुण्यात. जेवण, ब्रे.फा. (व्हेज / नॉन व्हेज ) include आहे.

बाकीच्या ट्रेनने तुम्ही कमी खर्चात प्रवास कराल.

Maharastra Mandal मध्ये रहायची सोय होईल.
4-1-8, Opp Sariji Naidu Hall, Tilak Road, Ramkote X Raods Chowrasta, Ramkote, Hyderabad - 500001
Mr Gowri Shankar Panditkar(president),Mr Mahesh(Manager. 91)-(40)-24754029, 24758983, 65534051

सर्व ठिकाण तुम्ही लोकल बसने फिरू शकता.
.

ते गौरी शंकर पळनीटकर आहे. हैद्राबादची जबरदस्त मराठी फॅमिली. आप्पुमामा आणि बंडू मामा हे दोघे भाऊ आहेत बंडू मामा थोरले ते गौरी शंकर.

अ‍ॅबिडस वर ताजमहाल होटेल आहे तसेच पंचरत्न म्हणून काचिगुडा येत्थे ही आहे ति थे मराठी प्रवासी नेहमी उतरतात. शताब्दी ची माहीती चां गली मिळाली. नाहीतर बाँबे एक्स्प्रेस आहे ७०३१ डाउन. साडेपाचला पुण्याहून निघते व सकाळी ६.२० बेगम्पेठ. रात्री ८.४० है द्राबाद हून निघते व सकाळी ९.३० पुणे.

#अश्विनीमामी + . केरळ ,कर्नाटक ,आंध्रसाठी प्रवासी कंपनीतर्फे जाणयाची खरोखरच गरज नाही . आपलाच देश पाहायला गाईड कशाला ?त्यांच्या बसेस छान असतात .कंडक्टर आणि प्रवासी फार मदत करतात .त्यानेच फिरावे .तिकडे कार ठरवल्यास मात्र कमिशनच्याच जागी नेण्याचा लुबाडण्याचा नैशनल उदयोग अनुभवायला मिळतो . हैद्राबादला ( नायमपल्ली स्टेशन) उतरल्यावर 'कोटि ' भागात जाणे (तिकडचे 'दादर') चांगले हॉटेल मिळेल .अगोदर बुकिंगची गरज नाही .तीन दिवस पुरेसे आहेत(श्रीशैलम सोडून) .लहान मुलांना सालारजंगला नेऊ नका त्याऐवजी झू ,हुसेनसागरला अधिकवेळ द्या .

वेळ असल्यास सकाळी झू मुलांसोबत. बरोबर खाणे घेऊण जावे. आत कार व कॅमेरा नेता येतो. मुलांच्या कलाने फिरून तिथे आराम गवतात प हुडून लंच करावे. एक बोटींग पण करता येते. व मग रूम वर येऊन

संध्याकाळी गोलकोंड्याच शो बघता येइल.

मिरची बजी, मैसूर भज्जी हे पदा र्थ टिफिनचा वेळ दुपारी ४ - ७ मध्ये मिळ तात. एकेक दा खाउन बघा.

सर्वात महत्त्वाचे. ते लंगणा सीमांध्रा परिस्थिती काय आहे ते खात्री करून मगच जा नाहीतर आंदोलन, बंद सुरू झाले की अडकायला होईल.

बि रला सायन्स म्युझीअम व तारांगन पण छान आहे. मंदिरा शेजारीच आहे. तो एक प्लॅन करता येइल.

सर्वांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली (फोन number, नाव व Train च्या वेळे सह) त्यामुळे आमची Trip ज्यास्ती चांगली होईल. सर्वाना धन्यवाद.

राजेंद्र, Maharastra Mandal मध्ये अगोदर फोन करून राहयची व्यवस्था करा. खूप कमी दरात राहयची सोय होईल. तिथून कोटी बस डेपो जवळ आहे.

एक दिवशी सालारजंग म्युझियम आणि चारमिनारला जा. कोटीवरून रि़क्षाने सालारजंग म्युझियमला ३० -४० रु. लागतील. सकाळी १० ला म्युझियमला जा आणि सर्व म्युझियम फिरून ११ -११.३० पर्यंत तळमजल्यावर घड्याळाच्या बरोबर समोरच्या खुर्चीत पहिल्या रांगेत जाऊन बसा. १२ वाजताचा घड्याळाचा शो बघून नंतर चारमिनारला निघा. बाहेर रिक्षा असतील पण ते खूपच रेट सांगतात. जवळच अफजलगंज बस डेपो आहे तिथून डायरेक्ट चारमिनारसाठी बस मिळेल आणि तिथून शेअर ऑटोपण पुष्कळ मिळतील. ५ ते ७ रु शेअर ऑटोने चारमिनारला पोहचाल. चारमिनार सं. ५ पर्यंतच उघड असत. चारमिनारला लागूनच लक्ष्मी मंदिर आहे ते जरुर बघा खूप जून मंदिर आहे. त्यानंतर बाजूलाच असलेल्या लाड बाजार, गुलझार हाऊस (मोत्यांसाठी) , पटेल मार्केटमध्ये फिरा. पटेल मार्केटच्या मेन गेटच्या कमानी खाली एक चाटवाले काका आहेत. खूप गर्दी असते त्यांच्याकडे पाणीपुरीसाठी.

एक दिवस सकाळिच गोलकोंडा फोर्ट ( सोमवारी बंद असत) ला जा. आणि तिथून बिर्ला मंदिर ( दु. १२ ते २ बंद असत), Birla Science Museum, NTR garden, Lumbini Park ( सोमवारी बंद असत). NTR garden किंवा Lumbini Park च्या गेटवर प्रत्येकी १०० रु. च तिकीट मिळत त्यात लेझर शो, बोटींग आणि एन्ट्री फि include आहे. NTR garden दुपारी २.३० ला उघडत आणि Lumbini Park सकाळी ९ ला उघडत.
पहिल NTR garden ला जा नंतर ५ वाजेपर्यंत Lumbini Park ला जा तिथे प्रथम बोटींग आणि लेझर शो बघा मग टॉय ट्रेनमध्ये बसून Park बघा. आणि मग राईडस खेळा.

रामोजी फिल्मसाठी सकाळि ६.३० पर्यंत कोटी बस डेपोला पोहचण्याचा प्रयत्न करा. कोटीपासून दोन ते अडिच तास लागतात तिथे पोहचायला. ९ च्या आधी रामोजी फिल्मला पोहचा. आणि पूर्ण दिवस मजा करा.

श्रीशैलम, नागार्जून सागर ही टूर APTDC बरोबर करावी. प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी ही टूर असते.
ऑनलाईन बुकिंग करू शकता. www. aptdc.in, फोन नं. ०४०- २३२६२१५१ / २३२६२१५२

गमभन. Happy
पुण्यात कोणी कमी खर्चात Trip Organizer असेल तर सांगा त्याने त्रास कमी होईल आसे वाटते. <<< राजेंद्र, आता पुण्यातील Trip Organizer ची गरज लागेल का??? Wink

#आरती + १ .राजेंद्र यावेळी या माहितीचा उपयोग करून स्वत:च जा आणि तुमचे अनुभव लिहा . प्रवासी कंपन्या नऊ हजार प्रत्येकी सांगतील तर तुम्हाला तिघांचा खर्च अकरा हजाराच्या आत येईल .शक्यतो आणखी एक नातेवाईकाला बरोबर नेऊ नका चर्चा आणि काथ्याकूट होत राहातो .कोणत्याही ठिकाणी सकाळी अकरापर्यंत पोहोचणारी रेल्वेने गेल्यास (आणि कुटुंब असल्यास) हॉटेलची खोली घेण्यास अडचण पडत नाही ,रेट कमी करता येतो .अर्धा दिवसाचे स्थळदर्शनही होते .संध्याकाळी मात्र हॉटेलवाले अडून बसतात नी वाटेल ते दर सांगतात हा अनुभव आहे .परतताना मात्र संधयाकाळनंतरची रेल्वे असल्यास त्या दिवशीचे रुम भाडे (चेक आउट टाईम बघा)वाया जाते .शुभयात्रा !

सगळ्यांनी सांगीतलं आहेच त्यात दोन पैसे माझेही,

चारमिनार भागात चांदीचा वर्खही [गोड पदार्थावर लावायचा] मिळतो मात्र विश्वासार्ह दुकानातून घ्या.
राईसपर्लची दुकाने वर सांगितलीच आहेत अनेकांनी त्यात माझी भर - बिर्ला मंदीराच्या पायर्‍या चढताना शेवटी शेवटी उजव्या हाताला एक सरकारी की शासनमान्य असं काहीतरी ज्वेलरीच दुकान आहे [तिथे हैद्राबादी खड्याचे घेतलेले दागीने २००४ सालापासून अखंड वापरात असूनही जसेच्या तसे आहेत] तिथे नकी काहीतरी घ्या.
अ‍ॅबिडसला [ड चा पाय मोडायचाय ] राहाणार असाल तर जॉन \डॉन बेकरीचे डोनस्टस आणि मोझमजाई मार्केटमधील फेमस आईस्क्रीमची चव नक्की घ्या. कोठी \ कोटी एरीयात गोकुळ चाट भांडार ला भेट द्या.

आंध्रा टुरीझमतर्फे हैद्राबादहून दोन दिवसाची [ एक रात्र] सहल श्रीशैलम्ला जाते त्याचे बुकिंग करा .

वरती सगळ्यांनीच सविस्तर माहीती दिली आहे..
तरीही आमच्याकडे जे नातेवाईक्/मित्र-परीवार फिरायला येता त्यांची ३-४ दीवसाची ट्रीप आम्ही आशी आखुन देतो ति इथे शेअर करते ..
दिवस १ -
सुरुवात - सालारजंग म्युझियम (दुपारी १२ घड्याळाचे ठोके मस्ट, लहान मुल लवकर बोर होतात त्यामुळे २-३ तास पुरे )
चारमिनार - (सालारजंग म्युझियम पासुन ३० मि च्या अंतरावर, शेअर ऑटो सहज मिळता) तिथे दुपारी १२.३०- ३.३० थांबा..
बिर्ला मंदिर - ( चारमिनार पासुन ३० मि च्या अंतरावर) , दुपारी गर्दी कमी असते. १ तास पुरेसा होतो.
NTR Garden - (बिर्ला मंदिर पासुन १०-१५ मि च्या अंतरावर). संध्याकाळी ६ पर्यंत थांबा
Lumbini Park - इथे ७ ला लेझर शो असतो. तो बघन मस्ट आहे Happy .. ६ वाजे नंतर टिकीट विक्री सुरु होते. हुसेन सागर मध्ये बोटींग करा..

दिवस २- सकळी झु - ५-६ तास (९ ते ३)
सुधाज कार म्यझियम (झु पासुन ५ मि च्या अंतरावर ) बघा १ तास पुरे
गोलकोंडा फोर्ट -(झु पासुन शेअर ऑटो मिळन अवघड, सेपरेट करा) . रात्री मुझीक शो असतो तो पहा.

दिवस ३-
रामोजी.. इथे प्रचंड चालाव लागत. कितीही फिरलो तरी कमीच वाटत..दुसर्यादिवशी पायांची वाट लागते. म्हणुन शेवटी.

ते तर भाजतील म्हणा... तस ४ वाजेच्या आस पास ऊन कमी होईल म येताना/उतरतांना नाही भाजत.. (स्वानुभव :P)

Pages