अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ५

Submitted by स्वाती२ on 14 August, 2013 - 15:20

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - १
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - २
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ३
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ४
अमेरीकेत कॉलेज प्रवेश प्रक्रिया १२वीच्या सुरुवातीलाच सुरु होते. त्याही आधी सुरु होतो तो योग्य कॉलेजचा शोध. शाळेत काउंसिलर ९वी पासून दरवर्षी मुलांशी बोलून, अ‍ॅप्टीट्युड टेस्ट्सचा वापर करुन मुलांना पुढे काय करायचे ते ठरवायला मदत करत असतात. त्याच्या जोडीला पार्ट टाइम्/समर जॉब, मित्र-मैत्रीणींचे, नातेवाईकांचे अनुभव, वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक, जॉब शॅडोइंग सारखे उपक्रम या सगळ्याच गोष्टींचा कमी अधिक प्रभाव मुलांवर पडत असतो. पालकांनीही वेळोवेळी मुलांशी बोलून मुलांचा कल, त्यांचे साधारण करीयर प्लॅन्स काय आहेत ते समजून घ्यावे. हे प्लॅन्स दर वेळी बदलत असले तरी काळजी करु नये. It's part of growing up. आजकाल युनिवर्सिटीजमधे देखील undecided students साठी सर्व शक्यता अजमावून निर्णय घ्यायचा पर्याय असतो. निर्णय घेण्यासाठी बरेचदा मिड सोफोमोर पर्यंत अवधी दिला जातो.
साधारण १०वी च्या दुसर्‍या सेमिस्टरमधे पालकांनी आपल्या मुलांशी कॉलेज निवडीबद्दल बोलायला सुरुवात करावी. आपल्या शैक्षणीक खर्चाचे बजेट काय असणर आहे त्याचाही प्रामाणिक आढावा घ्यावा.
बर्‍याचदा पालकांचा प्रश्न असतो - कुठली युनिवर्सिटी चांगली? याचे उत्तर देणे सोपे ही आहे आणि कठीणही. तुमच्या पाल्याला जी युनिवर्सिटी योग्य वाटते आणि जिथला खर्च तुमच्या आवाक्यातला आहे ती तुमच्यासाठी चांगली युनिवर्सिटी.

युनिवर्सिटीची निवड

योग्य युनिवर्सिटी निवडताना विद्यार्थ्याने आणि पालकांनी खालील गोष्टी विचारात घेणे आवश्यक ठरते.

१. घराजवळ, होम स्टेट मधे, फार तर शेजारच्या राज्यात की दूर अगदी दुसर्‍या टोकाला
२. मोठे शहर, सबर्ब की रुरल सेटिंग
३. मोठी युनिवर्सिटी की सगळे एकमेकांना ओळखतात टाईप लहान युनिवर्सिटी
४. करीअर चॉइस बद्दल पक्का निर्णय झालाय की अजून नक्की काही ठरत नाहिये
५. इंटर्नशिप प्रोग्रॅम, को-ऑप, स्ट्डी अ‍ॅब्रॉड प्रोग्रॅम
६. इतर क्लासरुममधे तसेच कँपसवर तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या गोष्टी. उदा. रिसर्चची संधी, क्लास साईझ/ स्टुडंट टिचर रेशो, अ‍ॅकेडेमिक सपोर्ट, रेशिअल डायवर्सिटी, सिंगल जेंडर कॉलेज, कँपस सेफटी, फेथ/धार्मिक कल, कम्युनिटी सर्विसच्या संधी वगैरे
या जोडीला आपला GPA आणि SAT/ACT score देखील विचारात घ्यावा.

कॉलेज शोध मोहिमेत आम्हाला खूप उपयोग झाला तो कॉलेज बोर्ड बिग फ्युचर आणि कॉलेज कॉन्फिडेन्शिअल या दोन संकेत स्थळांचा. या साईट्सवरची टुल्स वापरुन तुम्हाला योग्य युनिवर्सिटीज तुम्ही शॉर्ट लिस्ट करु शकता. त्याशिवाय शाळेमधे दरवर्षी कॉलेज फेअर असते. वेगवेगळ्या युनिवर्सिटीच्या अ‍ॅडमिशन ऑफिसतर्फे बुथ्स असतात. बर्‍याच युनिवर्सिटीज चांगले विद्यार्थी मिळावेत म्हणून अमेरीकेच्या वेगवेगळ्या भागात इवेंट्स ठेवतात. युनिवर्सिटीजच्या साइटवर जाऊन तसेच वर्च्युअल टुर घेऊनही अधिक माहिती मिळवता येते. तुमची शॉर्ट लिस्ट तयार झाली की या युनिवर्सिटीजना औपचारिक भेट देण्याचे ठरवावे. इथे शाळा देखील खास कॉलेज विजीट्ससाठी अनुपस्थीती म्ह्णून वेगळी सवलत देतात. त्यासाठी वेगळा फॉर्मही भरुन घेतात. युनिवर्सिटीजचे अ‍ॅडमिशन ऑफिस देखील इच्छूक विद्यार्थी आणि पालकांसाठी कॉलेज विझीट्सचा वेगळा उपक्रम वर्षभर राबवतात. युनिवर्सिटीजच्या संकेतस्थळांवर भावी अंडरग्रॅड स्टुडंट्सनी कॉलेज विझिट कशी प्लॅन करावी याबद्दल माहिती असते. दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम असतो. यात युनिवर्सिटीबद्दल छान पद्धतीने माहिती दिली जाते. आपल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे मिळतात. हायस्कूल नंतर पुढील ४-६ वर्षे या ठिकाणी घालवायची आहेत हे विचारात घेऊन विद्यार्थी आणि पालक दोघांनीही विझिट्स साठी जाताना काय प्रश्न विचारायचे त्याची नीट यादी करावी. तिथल्या डायनिंग हॉलमधेच जेवावे. डॉर्म्स पहाव्यात. शक्य झाल्यास गाईड बरोबर टुर झाल्यावर स्वतंत्रपणे फिरुन कॅम्पस बघावा. ज्या विषयात मेजर करायचे त्या डिपार्टमेंटमधील प्रोफेसर्सना शक्य असेल तर भेटावे. युनिवर्सिटीने दिलेल्या माहितीपत्रकांच्या जोडीला आपणही नोंद करावी. काही वेळा युनिवर्सिटीजचे वेगळे इनविटिशन ओन्ली इवेंट्स असतात. यात विद्यार्थ्यांना पूर्ण दिवस वेगवेगळ्या लेक्चरना बसता येते, लॅब मधे नेतात. काही वेळा एक रात्र डॉर्म मधे रहाता येते. अशा इवेंटला जाण्याची संधी मिळाल्यास जरूर जावे. मुलांच्या ओळखीची सिनियर मित्र मंडळी मदत करणार असल्यास इन्फॉर्मल विझिट्ही घेता येतील. कॉलेज विझिट्स घेऊन कुठे अप्लाय करायचे त्याची शॉर्ट लिस्ट शक्यतो १२वीचे वर्ष सुरु होण्याआधी तयार असावी.


शैक्षणिक खर्चाचा अंदाज

आपल्या पाल्याला योग्य वाटणार्‍या युनिवर्सिटीचा शोध घेताना एकीकडे शैक्षणीक खर्चाचा अंदाज घ्यावा.
शैक्षणिक खर्चाला Cost of attending university असे म्हणतात. यात फी, राहण्याचा-जेवणाचा खर्च, इतर फीज, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य, आणि वैयक्तीक खर्च याचा समावेश होतो. प्रत्येक युनिवर्सिटीच्या संकेतस्थळावर याबद्दल माहिती असते. या खर्चापैकी फी सोडल्यास इतर खर्च जवळ जवळ सारखाच असतो.
विद्यार्थ्याच्या शैक्षणीक खर्चासाठी किती मदत मिळेल हे ठरवण्यासाठी कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाचा आणि मिळकतीचा विचार करुन विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी किती खर्च कुटुंबाने करणे अपेक्षित आहे ते निश्चित केले जाते. या रकमेला EFC (Expected Family Contribution) असे म्हणतात. EFC मोजण्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात - FAFSA, CSS Profile ,568 Consensus . यापैकी FAFSA हे फेडरल एड साठी वापरले जाते तसेच बर्‍याचदा कॉलेजेस प्रायवेट ग्रांट साठी देखील FAFSA विचारात घेतात. काही वेळा त्या जोडीला स्टेटचा वेगळा फॉर्म देखील भरावा लागतो. FAFSA हा फॉर्म भरण्यासंबंधी सर्व माहिती शाळा देते तसेच http://studentaid.ed.gov/fafsa या ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध आहे. याशिवाय जवळ जवळ ३०० पेक्षा जास्त प्रायवेट युनिवर्सिटीज CSS Profile वापरतात. अनेक स्कॉलरशिप प्रोग्रॅम्स देखील CSS Profile वापरतात. याबाबतची माहिती http://student.collegeboard.org/css-financial-aid-profile या ठिकाणी मिळेल. या व्यतिरिक्त सिलेक्टेड २५ कॉलेजेस Consensus पद्धत वापरतात. यात FAFSA आणि CSS Profile हे दोन्ही फॉर्म्स वापरले जातात मात्र अ‍ॅसेट वेगळ्या प्रकारे मोजले जातात. प्रत्येक पद्धत वेगवेगळे नियम वापरते याचे एक उदा. ५२९ प्लॅन मधले पैसे विचारात घेताना FAFSA ५.६% विचारात घेते, CSS Profile २०% आणि Consensus ५% . त्यामुळे तुमचे इनकम आणि अ‍ॅसेट काय आहेत आणि ते कुठल्या पद्धतीने मोजले जाणार आहेत यावर तुमचे Expected Family Contribution वेगवेगळे येऊ शकते. शैक्षणिक खर्चाचा साधारण अंदाज येण्यासाठी विद्यार्थी ११वी(ज्युनिअर) ला असताना EFC Calculator वापरून बघावा.
त्याच बरोबर विशिष्ठ कॉलेज मधे शिकण्याची नेट प्राईस काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी त्या युनिवर्सिटीचा कॅलक्युलेटर वापरावा. कारण एखाद्या कॉलेजचा खर्च (स्टीकर प्राईस) जास्त असला तरी EFC साठी वापरलेली पद्धत, उपलब्ध असलेल्या ग्रांट्स वगैरे विचारात घेतल्यावर येणारी नेट प्राईस तुमच्या आवाक्यातील आहे की नाही याचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे पुढचे निर्णय घेता येतात.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेट युनिवर्सिटी इन स्टेट आणि आउट ऑफ स्टेट अशी वेगवेगळी फी आकारते. काही वेळा पब्लीक युनिवर्सिटीच्या out of state tuition मधे सवलत मिळू शकते, मात्र अशी सवलत मिळ्ण्यासाठी काही नियम आहेत. तुम्ही कुठल्या स्टेट मधे रहाता, कुठल्या स्टेटच्या युनिवर्सिटीत जाऊ इच्छिता , कुठल्या विषयात्/कुठल्या प्रकारची डिग्री हवी आहे त्यानुसार तुम्हाला सवलत मिळणार की नाही ते ठरते. काही वेळा प्रायवेट युनिवर्सिटी देखील out of state tuition reduction program मधे सहभागी होते. अशावेळी प्रायवेट युनिवर्सिटीसाठी असलेल्या नियमानुसार सवलत मिळते. याबद्दलच्या अधिक माहिती साठी खाली दुवे देत आहे.

http://www.nebhe.org/programs-overview/rsp-tuition-break/overview/
http://www.sreb.org/page/1304/academic_common_market.html
http://wiche.edu/wue
http://msep.mhec.org/MidwestStudentExchangeProgram

कॉलेज अ‍ॅडमिशन
विद्यार्थ्याचा करीअर पाथ, इतर वैयक्तिक आवडनिवड , शैक्षणिक खर्चाचे बजेट वगैरे बाबी लक्षात घेऊन १२वी चे वर्ष सुरु होताना युनिवर्सिटीज शॉर्ट लिस्ट केल्या की सुरुवात होते ती प्रवेश प्रक्रियेची. तुम्ही निवड केलेल्या कॉलेजच्या संकेत स्थळावर कॉलेज अ‍ॅडमिशनची सर्व माहिती दिलेली असते. युनिवर्सिटी कॉलेज कॉमन अ‍ॅप्लीकेशन वापरणार की युनिवर्सल कॉलेज अप्लिकेशन वापरणार की स्वतंत्र अ‍ॅप्लीकेशन वापरणार त्या प्रमाणे ही प्रवेश प्रक्रिया थोडीशी बदलते. कॉमन किंवा युनिवर्सल अ‍ॅप मधे तुम्ही एक कॉमन फॉर्म भरता आणि जोडीला विशिष्ठ कॉलेजसाठी वेगळे सप्लीमेंट अ‍ॅप्लीकेशन करता तर स्वतंत्र अ‍ॅप्लीकेशन असेल तर तुम्ही त्या विशिष्ठ युनिवर्सिटीचा प्रवेश अर्ज भरता. पब्लीक युनिवर्सिटीला प्रवेश घेणार असाल तर त्यांच्या मेरीट स्कॉलरशिपसाठी विचारात घेतले जावे म्हणून प्रवेशाचे अर्ज लवकर (साधारणतः १५ नोवेंबर डेडलाईन) पाठवणे आवश्यक असते. प्रायवेट युनिवर्सिटीजच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ली डिसीजन, अर्ली अ‍ॅक्शन , सिंगल चॉइस अर्ली अ‍ॅक्शन, रेग्युलर असे वेगवेगळे प्रकार असतात. युनिवर्सिटीजच्या साईटवर त्या संबंधीचे नियम लिहिलेले असतात. प्रवेश प्रक्रियेसाठी कुठला पर्याय योग्य याचे उत्तर प्रत्येक केस मधे वेगवेगळे असू शकते. याबाबत अधिक मदत लागल्यास शाळेच्या काउंसेलरशी बोलावे. माझ्या मुलाने तीन पब्लीक युनिवर्सिटीजना मेरीट स्कॉलरशिप मिळावी म्हणून लवकर अर्ज केले होते. त्यातील एक युनिवर्सिटी त्याच्या लिस्टमधे दुसरा चॉइस होती. त्याचा पहिला चॉइस असलेल्या प्रायवेट युनिवर्सिटीला त्याने अर्ली अ‍ॅक्शन पर्याय घेतला तर अजून एका प्रायवेट युनिवर्सिटीला अर्ली डिसीजन ऐवजी रेग्युलर अ‍ॅडमिशनसाठी अर्ज केला. असे केल्याने त्याला काही युनिवर्सिटीजचे होकार ख्रिसमस आधीच कळले होते शिवाय अ‍ॅडमिशन मिळाल्यावर युनिवर्सिटीजनी देऊ केलेल्या स्कोलरशिप्स्/एड पॅकेजेसची तुलना करुन निर्णय घेण्यासाठी नॉर्मल डेडलाईन पर्यंत थांबता आले.
कॉलेज प्रवेश प्रक्रिये मधे निबंध लेखन, रेकमेंडेशन्स, टिचर आणि काउंसेलर इवॅल्युएशन फॉर्म्स, ट्रान्सक्रिप्ट्स वगैरे वेगवेगळ्या गोष्टींची पूर्तता करावी लागते. वेगवेगळ्या डेडलाईन्स सांभाळाव्या लागतात. साधारण १ ऑगस्टला अ‍ॅप्लीकेशन फॉर्म्स ऑनलाईन असतात. ते डोळ्याखालून घालावेत. किती निबंध लिहावे लागतील, त्यांचे विषय काय आहेत ते पहावे. निबंधाचे विषय विचारपूर्वक ठरवावेत. निबंधलेखनासाठी पुरेसा वेळ द्यावा. इंग्लीशच्या शिक्षकांना आधी विनंती केल्यास ते ड्राफ्ट फायनल करण्यापूर्वी वाचून आवश्यक असल्यास सुधारणा सुचवतात. रेकमेंडेशन्ससाठी ज्या व्यक्तींना विनंती करणार आहात त्यांना शक्य तितक्या लवकर भेटावे. बर्‍याच युनिवर्सिटीजना टिचर्सची रेकमेंडेशन्स लागतात. अशावेळी शक्यतो ११वी संपताना याबद्दल तुमच्या शिक्षकांशी बोलून ठेवावे. स्कॉलरशिप्ससाठी देखील रेकमेंडेशन्स लागतील. त्याबद्दलही बोलून ठेवावे. शिक्षकांना बरीच रेकमेंडेशन्स लिहावी लागतात. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु केल्यावर लवकरात लवकर रेकमेंडेशन साठी विनंती पाठवावी म्हणजे घाई गडबड न होता योग्य मुदतीत काम पूर्ण होईल. अनावधानाने होणार्‍या चुका टाळण्यासाठी प्रत्येक युनिवर्सिटीसाठी वेगळे फोल्डर करावे. त्यात आवश्यक गोष्टी आणि डेड्लाईन्सची नोंद करावी. जसजशी पूर्तता होत जाइल तसे चेक मार्क करावे. १२वी चा अभ्यास, एक्स्ट्रा करीक्युलर्स वगैरे सांभाळून ही सगळी कामे करायची असल्याने विकेंड्सना यासाठी आधीच वेळ राखून ठेवावा.

शैक्षणीक खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी पालकांनी शिक्षणासाठी बाजूला ठेवलेले पैसे, मुलांनी केलेले सेविंग याच्या बरोबर स्कॉलरशिप्स, फेडरल आणि स्टेट कडून मदत मिळण्याची शक्यता, शैक्षणीक आणि इतर लोनची तयारी या गोष्टींचा विचार केला जातो. .


स्कॉलरशिप्स

युनिवर्सिटी मेरीट स्कॉलरशिप्स - पब्लिक युनिवर्सिटीज मेरीट स्कॉलरशिप्स देतात. तसेच प्रायवेट युनिवर्सिटीज देखील मेरीट स्कॉलरशिप्स देतात. काही युनिवर्सिटीज नॅशनल मेरीट स्कॉलरशिप मिळाल्यास ती रक्कम मॅच करतात. नीड ब्लाईंड युनिवर्सिटीज प्रवेश दिल्यावर EFC नुसार एड पॅकेज देत असल्याने वेगळ्या मेरीट स्कॉलरशिप्स देत नाहीत.
त्याशिवाय इतर अनेक स्कॉलरशिप्स लोकल, स्टेट आणि नॅशनल लेवलवर उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या हॉबीजपासून ते वेगवेगळ्या कॉलेज मेजर्स पर्यंत अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध असतात. पालकांच्या नोकरीच्या ठिकाणी देखील काही स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत का याची देखील चौकशी करावी. फक्त हायस्कूल सिनियर्ससाठी स्कॉलरशिप्स असतात असा एक समज असतो. पण अंडरक्लाससाठी देखील स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत.
स्कॉलरशिप्स शोधण्यासाठी उपयोगी साईट्सची यादी खाली देत आहे. Every little bit helps so happy searching. Happy

www.fastweb.com
www.finaid.org
www.scholarships.com
www.scholarshipexperts.com
http://www.petersons.com/college-search/scholarship-search.aspx
www.freschinfo.com
www.salliemaefund.org
www.naas.org
http://www.scholarshippoints.com/about.php
www.schoolsoup.com

स्कॉलरशिप्स मिळवायला मदत करतो असे सांगुन कुणी फी चार्ज करत असेल तर तो स्कॅम समजावा.

फेडरल आणि स्टेट एड
युनिवर्सिटीत शिक्षण घेण्यासाठी उत्पन्नाच्या नियमानुसार Federal Pell Grant , Federal Supplemental Educational Opportunity Grant (FSEOG) , तसेच स्टेट एड मिळू शकते. या मदतीसाठी आर्थिक परीस्थिती हा निकष असतो. FAFSA फॉर्म भरावा लागतो.

लोन
शिक्षणासाठी लोनचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
1. Federal Student Loan
2. Private Student Loan

Federal Student Loan
1. Federal Perkins Loan - हे कर्ज अंडरग्रॅड आणि ग्रॅड स्टुडंटसाठी असते. कॉलेज कडे असलेले फंड्स आणि विद्यार्थ्याची आर्थिक परीस्थिती या निकषावर हे कर्ज दिले जाते. हे कर्ज कॉलेज देते आणि यावरील व्याज हे विद्यार्थी जोपर्यंत कमीत कमी अर्धवेळ शिकत आहे तोपर्यंत डिफर होते.
2. Direct Subsidized Loan - हे कर्ज देखील आर्थिक निकषावर आधारीत असून अंडरग्रॅड साठी मिळते. हे कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. व्याज विद्यार्थी कमीत कमी अर्धवेळ शिकत असेल तोपर्यंत डिफर होते.
3. Direct Unsubsidized Loan - या कर्जासाठी आर्थीक निकष नाही. कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. कर्ज घेतल्या काळापासून व्याज लागू होते.
4. Direct PLUS Loan - हे कर्ज अंडरग्रॅड स्टुडंटचे पालक किंवा ग्रॅड/ प्रोफेशनल स्टुडंट यासाठी असून आर्थीक निकष लागत नाही. क्रेडीट हिस्ट्री वाईट नसावी. कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. कर्ज घेतल्या काळापासून व्याज लागू होते.

Private Student Loan हे कर्ज खाजगी बँका किंवा पतपेढ्या देतात. क्रेडीट हिस्टरी चेक करतात. व्याज दर जास्त असतो. प्रायवेट लोन हा प्रकार शक्यतो टाळावा.

Federal Work Study Program :
या प्रकारात कॉलेज खर्चासाठी पार्ट टाईम जॉब करणे अपेक्षित असते. आर्थिक निकष आणि इतर काही अटींची पूर्तता करावी लागते. आर्थिक निकष अपेक्षित खर्चानुसार बदलतो. उदा. 'अ' युनिवर्सिटीच्या अपेक्षित खर्चानुसार तुम्हाला वर्क स्ट्डी प्रोग्रॅम लागू होणार नाही पण 'ब' युनिवर्सिटीच्या अपेक्षित खर्चानुसार तुम्हाला वर्क स्टडी प्रोग्रॅम लागू होईल. कॉलेजकडे पुरेसे फंडिंग नसेल तर वेटिंग लिस्टवर ठेवतात. आठवड्याला किती तास काम करता येइल यावर लिमिट असते. क्लास स्केड्युलही विचारात घेतले जाते. वर्क स्ट्डी जॉब्ज ऑन कॅम्पस तसेच ऑफ कॅपस उपलब्ध असतात.
कॉलेज खर्चासाठी या वर्क स्ट्डी प्रोग्रॅम व्यतिरिक्त ऑन कॅम्पस अणि ऑफ कॅम्पस इतरही जॉब उपलब्ध असतात. आर्थिक निकष लावला जात नाही. बरीच मुले खर्चाची मिळवणी करण्यासाठी तसेच नेटवर्किंगसाठी असे जॉब करतात. यात ऑन कॅम्पस जॉब बर्‍याचदा जास्त सोइचे पडतात.
बर्‍याचदा वर्क स्टडी प्रोग्रॅम मधले जॉब्ज तसेच इतर ऑन कॅम्पस जॉब्ज कॉलेज सुरु होण्याआधीच लिस्ट केले जातात. तेव्हा जॉब सर्च करायला कॉलेज सुरु होईपर्यंत थांबू नये.

खाली मी माझ्या मुलाच्या हायस्कूल प्रवासाची टाइमलाइन देत आहे.

timeline.png

अमेरीकेतील हायस्कूल प्रवासासाठी ज्यु. मायबोलीकरांना आणि त्यांच्या पालकांना खूप खूप शुभेच्छा!

टीप - अनुभवी मायबोलीकरांनी यात जरूर भर घालावी. अ‍ॅथलेटिक स्कॉलरशिपवर कॉलेजला जाणार्‍यांचा प्रवास थोडा वेगळा असतो. इथे कुणाला अनुभव असेल तर त्यांनीही आपले अनुभव शेअर करावेत. माझ्या मुलाच्या काही मित्रांनी ROTC चा पर्याय निवडला. तुमच्या पाल्याला आवडणार असेल तर जरूर विचार करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिडलस्कूलला ६वीत गेला तेव्हा त्याचे लेखन, वाचन ११वीच्या मुलांच्या वयाचे आणि गणित ७ वी च्या वयाचे होते.>>
हे कसा आणि कुठे कळते, काही therpist आहेत की शाळेतूनच reauest करून काढून घेता येते

थोडा background.. आमचे दुसरे पिल्लू 6 वर्षाचे, आम्हाला जाणवतंय की जरा जास्त हट्टी आहे, हे कळत नाहीये की हट्ट स्वभाव म्हणून आहे की delayed learning आहे म्हणून आहे की occupational therapy लागेल.. थोडा उशिरा बोलायला लागला (2 वर्ष असताना), तेव्हा असा वाटायचे त्याला instructions कळतायत की नाही, आता असा वाटतंय की कळतंय पण हट्टी आहे..
थोडक्यात, त्याला काही therapy ची गरज असेल तर the sooner the better

पुणेकर्_जोशी,
माझ्या मुलाची शाळा सगळ्यांचीच टेस्ट करत असे कॉम्प्युटरवर. विद्यार्थी ज्या यत्तेत आहे त्या पातळीवरच्या लेवलच्या सुरुवात करतात आणि जसे तुम्ही बरोबर उत्तर देत जाता तसे गणिताचे प्रश्न, इंग्रजी उतारे आणि त्यावरचे प्रश्न हे कठीण होत जातात. उत्तर देणे जमेनासे झाले की थांबतात. विद्यार्थ्याला ग्रेड लेवलचे प्रश्न जमले नाहीत तर प्रश्न सोपे होतात जेणे करुन मुलाला किती जादा मदतीची गरज आहे ते शोधून त्यानुसार मदत देता येते.
तुमचे पिल्लू लहान आहे हो. या वयात थोडातरी हट्ट करतातच मुलं. माझाही मुलगा हट्ट करायचा, सुचनांकडे दुर्लक्ष करायचा. त्याच्या टिचरच्या मते आज २० मिनीटे फायरट्रकशी खेळायचा आपला टर्न आहे हे लक्षात रहाते, अगदी चार्टवर बोट ठेवून हक्काने वसुली होते आणि प्लेटाईम संपला , खेळणी आवरा आणि आपापल्या खुर्चीत बसा हे सांगितल्यावर दुर्लक्ष करत असेल तर केवळ लिमिट टेस्ट करणे आहे. टिचरने शाळेतलीच शिस्त घरी वापरा असे आम्हा पालकांना सुचवले होते. - ' एकदाच सांगायचे, ऐकले तर ठीक, नाहीतर त्याचा काहीतरी परीणाम' असे सातत्याने करायला सांगितले होते. तसे काटेकोर वागणे सातत्याने घरी कसे जमावे. आम्ही 'आपण मिळून करुया' असे म्हणून खेळणी आवरणे, बॅग भरणे, दात घासणे, कपड्याच्या घड्या असे करुन घ्यायचो. एकीकडे कंटाळा आला तरी का करायचे ते समजावून सांगायचो. तेवढ्यापुरते त्याला पटायचेही पण शेवटी लहान मुलच ते. अधुन मधून आपणहून करायचा, अशा वेळी गुड बॉय म्हणून कौतुक करायचो, आम्ही विसरलो तर तो वदवून घ्यायचा.

उशीरा बोलायला बरीच मुले लागतात. खरेच सुचना कळत नसतील तर मग ते बर्‍याच साध्यासाध्या गोष्टींबाबतही होईल. इथे केजीच्या लेवलला शाळेतही ही बाब लक्षात येवून त्यानुसार काउंसेलरकडे रिफरल वगैरे प्रोसेस लगेच सुरु होते.

मिडलस्कूलला ६वीत गेला तेव्हा त्याचे लेखन, वाचन ११वीच्या मुलांच्या वयाचे आणि गणित ७ वी च्या वयाचे होते.>>
हे कसा आणि कुठे कळते, काही therpist आहेत की शाळेतूनच reauest करून काढून घेता येते

शाळेच्या रिपोर्ट वरच हे सर्व माहिती असते. याप्रमाणे ते मुलांना अ‍ॅक्सलरेटेड क्लासेस मध्ये पण घालतात. हे सर्व आपोआप होते,
आपण ढवळाढवळ करु नये, मुलांचा अभ्यास हवा तर घ्यावा.

हे इथे अगदीच अवांतर आहे पण मला योग्य धागा उपलब्ध असल्यास प्लीज सुचवा- अमेरिकेतील मुलांनी मराठी बोलण्यासाठी पालकांनी काय करावे याबद्दल काही चर्चा झाली आहे का?

हे कसा आणि कुठे कळते, काही therpist आहेत की शाळेतूनच reauest करून काढून घेता येते >>> हे सगळ्या देशात सारख्याच प्रोसेसनं होते की काय मला माहिती नाही. पण आम्ही रहातो त्या राज्यात स्टार टेस्टचे रिझल्ट्स बघून लेवल ठरवतात. त्यात नुसतेच मार्क्स किती सांगत नाहीत तर त्या वयाची त्या लेवलची मुलं नक्की कुठे आहेत हे ग्राफ काढून कळवतात. इथपर्यंत ठीक आहे. पण त्या स्टार टेस्टचा आणि अ‍ॅडव्हान्स लर्निंगचा काहीही संबंध नसतो. माझ्या मुलाला भाषा विषयात सातत्यानं चांगले रिझल्ट्स मिळत होते पण माझ्या मते त्याची चौथी-पाचवीत असताना सातवी आणि आठवीचा (हा एक आणखीन चक्रमपणा आहे) भाषा विषयाचा अभ्यास करायची अजिबात ईच्छा आणि समज नव्हती. आम्ही पण जरा उशीरच केला पण शेवटी मिडल स्कूलच्या सुरूवातीस शाळेला सांगून त्याचं नाव त्या फलाण्या अ‍ॅल्पमधून काढून टाकलं. स्टार टेस्टच्या रिझल्टवरून सरसगट सगळ्या मुलांना २-३ यत्ता पुढचा अभ्यास हा अत्यंत चुकीचा अप्रोच आहे.

स्वाती२, तुमची लेखमाला वाचायला घेते आहे. मी वाचतेय कारण घरात इतर सर्व मराठी अंगठा-बहाद्दर आहेत Proud

हे इथे अगदीच अवांतर आहे पण मला योग्य धागा उपलब्ध असल्यास प्लीज सुचवा- अमेरिकेतील मुलांनी मराठी बोलण्यासाठी पालकांनी काय करावे याबद्दल काही चर्चा झाली आहे का? >>> हे उपयोगी पडतय् का बघा.

https://www.maayboli.com/node/32828

सिंडरेला,
माझ्या मुलाला अभ्यास त्याच्या नेहमीच्या यत्तेचाच असायचा मात्र एनरिचमेंट प्रोगॅम असल्याने भाषेच्या क्रमिक पुस्तकाऐवजी वेगवेगळी गोष्टीची पुस्तके वाचणे, त्यावर चर्चा, छोटी नाटुकली लिहिणे, एखादी बातमी वाचून चर्चा, लहान मुलांसाठीची नॉन फिक्शन्स - त्यातून भाषा, इतिहास, भूगोल, सायन्स, आणि मॅथचे लेसन प्लॅन्स आणि सोबत प्रोजेक्ट्स, फिल्ड ट्रिप्स , पुस्तकावर आधारित सिनेमा, सोपे मनोरंजक प्रयोग/ विदा गोळा करणे असे एकंदरीत स्वरुप होते. उदा. फाउंडिंग फादर्स थीम आहे तर मुलं छोटी पुस्तकं वाचत आणि त्यांना जे कोणी आवडते त्या व्यक्तीवर प्रोजेक्ट करत, प्रेझेंटेशनच्या वेळी इतर मुलं प्रश्न विचारत. एखादी रेस -मग रेसचा इतिहास, वैशिष्ठ्य, मार्ग मॅप करणे , पक्षांचे/फुलपाखरांचे स्थलांतर वगैरे

स्वाती२, हा सगळा त्यांच्या रोजच्या अभ्यासक्रमाचा भाग झाला. त्याबद्दल नाही तक्रार. स्टार टेस्टच्या बेसिसवर पाचवीतल्या मुलांना सरसगट शेक्सपीयर अभ्यासायला लावणे हा आचरटपणा आहे आहे.

एका पुढच्या यत्तेत शिकणारं मूल असणार्या पालकाने सांगितलं की मुलांना पुढे काॅलेजच्या लेवलवर तग धरायला मदत होते. मी काही म्हटलं नाही पण गडे, आता बाल्य का नासवा त्यांचे? हा विचार मनातच गाडला. लोल्स. Happy

>>स्टार टेस्टच्या बेसिसवर पाचवीतल्या मुलांना सरसगट शेक्सपीयर अभ्यासायला लावणे हा आचरटपणा आहे आहे.>>
खरेच आचरटपणा आहे. असे काही असते तर आमच्या पोट्ट्याने स्वतःच वर्ग बदलून घेतला असता. Happy माझ्या मुलाला ६वी त जरी ११वीच्या दर्जाचे वाचता येत होते तरी आम्ही फिक्शन ग्रेड लेवलचे आणि एक ग्रेड लेवल पुढले हे पक्के ठेवले होते. त्यातल्या त्यात सेफ म्हणून नॉन फिक्शन आम्ही सिलेक्ट केलेले पण मोठ्या माणसांचे असे ठेवले होते. कार अ‍ॅन्ड ड्रायवर सारखी काही मासिके, न्यूजपेपरमधली काही नामवंतांची सदरे तो शाळेत वाचायचा. मात्र तेही त्याचे इंग्रजीचे शिक्षक आधी एक नजर टाकून त्याला योग्य आहे ना बघायचे आणि मगच त्याच्या हातात द्यायचे. शेवटी मूल म्हणून त्या वयाला काय विचार/भावना झेपतील हे देखील लक्षात घ्यायला हवे ना. अगदी सातवीपर्यंत त्याला झोपताना स्टोरीटाईम हवा असायचा. त्यामुळे ग्रेड लेवलचे फिक्शन झोपताना आईने वाचून दाखवायचे आणि वरच्या लेवलचे त्याने एकट्याने असे होते.

धन्यवाद स्वाती!
प्रवासात या वेब्साईटचा भरपुर उपयोग होतो आहे.
तीन गोष्टी बद्दल काही शंका आहेत. माझी मुलगी आता सोफोमोर (१० वीत आहे आणि आता जुनियरला जाइल)
१) तिला जुनमध्ये इन्टर्न्शीप्साठी आम्हाला अ‍ॅप्लाय करायला उशीरच झाला आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणे किती सेफ आहे?
करोनाच्या काळात अजुन काही नॉव्हेल ( एकदम नविन) पर्याय आहेत का?
२) आम्हाला बरेच लोक सांगतात की चांगल्या युनिव्हर्सिटीत अ‍ॅडमिशन साठी अर्ली अ‍ॅप्लिकेशन केलेले चांगले. पण हे अर्ली अ‍ॅप्लिकेशन काय असते? कोणत्या युनिव्हर्सिटीत याचा फायदा होतो?
३) माझ्या मुलीला न्युरो सायन्सेस , सायकोलॉजी, सायकेअ‍ॅट्री, बायोटेक, यात इन्टरेस्ट आहे. यात कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगले प्रोग्राम्स आहेत का? अर्ली अ‍ॅप्लिकेशन कोठे आणि कधी करावे?
४) आम्ही नेवाडात रहातो. https://www.wiche.edu यासारखे अजुन काही प्रोग्राम्स आहेत का?
खालिल पैकी कॉलेजेस बद्दल काही अनुभव वा माहिती आहे का?
१) UC Merced
२) अ‍ॅरिझोना स्टेट
३) कॅल पॉली (पोमोना,) (इतर कोणती कॅल पॉली बेस्ट आहे?)
४) युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅरिझोना ( ही आणि अ‍ॅरिझोना स्टेट यात कोणती जास्त चांगली?)

माझी मुलगी टेनिस खुप छान खेळते पण कॉम्पिटीशन भयंकर असल्याने पहिल्या वर्षी स्कॉलाराशिप मिळेल असे नाही पण
युनिव्हर्सिटीत नंतर याचा काही उपयोग होतो का?

निलिमा - प्रत्येक युनि. च्या दोन डेडलाइन्स असतात - एक अर्ली अ‍ॅप्लिकेशन आणि एक रेग्युलर अ‍ॅप्लिकेशन. त्या त्या साइट्सवर मिळतील. आता ज्यु. वर्ष सुरू होणार असेल तर आता त्या पब्लिश व्हायला सुरूवात होईल. इतक्या लौकर होईल का ते माहीत नाही पण जून नंतर नक्की दिसतील. त्यावरून तुम्हाला पुढच्या (सिनीयर) वर्षी जेव्हा अ‍ॅप्लिकेशन करायचे आहे त्याची तयारी केव्हा सुरू करायची याचा अंदाज येइल. साधारण तीन महिन्यांचा फरक असतो रेग्युलर आणि अर्ली मधे.

काही काही विद्यापीठांमधे अर्ली डिसीजन अशी सुद्धा सोय असते. अर्ली डिसीजन तारखेच्या आत जर अर्ज केला आणि प्रवेश मिळाला तर तिथे प्रवेश घेणे आणि इतर विद्यापीठांमधले अर्ज मागे घेणे बंधनकारक असते. साधारणपणे जे विद्यापीठ पहिल्या क्रमाकांवर असेल तिथे अर्ली डिसीजन साठी अर्ज करावा. एकावेळी एकच विद्यापीठात करावा. काही काही वेळा एका ठिकाणचे अर्ली डिसीजनचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसर्‍या ठिकाणी अर्ली डिसीजन राउंड मधे अर्ज करता येतो.

पोएट्स अ‍ॅण्ड क्वांट्स आणि यू एस न्यूज या दोन संस्थळावर भरपूर माहिती उपलब्ध असते. कॉलेजबोर्ड च्या संस्थळावर सुद्धा माहितीपूर्ण लेख आहेत. ( https://professionals.collegeboard.org/guidance/applications/early) शिवाय तुम्हाला सध्या आवडणारी विद्यापीठं जी काही असतील त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मिडिया अकाउंटवर सुद्धा माहिती आणि वेगवेगळ्या ओरियेंटेशन प्रोग्रॅमची माहिती असते.

तुमच्या शाळेतर्फे नॅव्हियांस किंवा तत्सम अ‍ॅप असल्यास तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या अर्जाबद्दल बरीच स्टॅटिस्टिकल माहिती मिळते. दरवर्षी किती विद्यार्थ्यांनी कुठे अर्ज केले, किती जणांना प्रवेश मिळाला , किती जणांनी प्रवेश स्वीकारला , सरासरी एस ए टी स्कोअर, सरासरी जीपी ए अशा अनेक बाबी पाहता येतील.

हॉस्पिटलमधे काम करण्याबाबत खरेतर इथे विचारण्यापेक्षा तुमच्या भागातल्या हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, हॉस्पिस अशा ठिकाणी प्रत्यक्ष चौकशी करा व तिथून मिळालेल्या माहितीच्या आधारे निर्णय घ्या.

मेधा आणि फारेण्ड खुप धन्यवाद!
माहिती खुपच मस्त!
दोन लोकल हॉस्पिटल्स मध्ये अर्ज केला आहे, पण कोरोना मुळे काळजी वाटते.
महत्वाच्या वर्षी काही त्रास नको!
इतर काही आजकाल इन्टर्न्शीप्चे ट्रेंड आहेत का तेही जाणुन घेण्यास उत्सुक आहोत.

>>
तिला जुनमध्ये इन्टर्न्शीप्साठी आम्हाला अ‍ॅप्लाय करायला उशीरच झाला आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणे किती सेफ आहे?
करोनाच्या काळात अजुन काही नॉव्हेल ( एकदम नविन) पर्याय आहेत का?>>
या बाबतीत मेधाशी सहमत. हे तुमच्या इथे जी स्थानिक परीस्थिती आहे त्यावरुन ठरणार. जे काही नियम, प्रोटोकॉल्स स्थानिक हेल्थकेअरने लागू केले असतील त्यानुसार होणार. त्यामुळे स्थानिक पातळीवर संपर्क करावा. जवळच्या युनिवर्सिटीतही प्रोफेसर्सना विचारावे की काही संधी आहेत का?

अर्ली अ‍ॅप्लिकेशनबाबत मेधा आणि फारेंड यांनी माहिती दिली आहेच. आम्ही अर्ली अ‍ॅप्लिकेशन केले होते. कारण जिपिए चांगला होता, त्यात अजून वाढ वगैरे फार काही अपेक्षित नव्हते. सॅट्ची परीस्थितीही तशीच होती. एक्ट्रा करीक्युलर्स, लिडरशिप वगैरे मधेही काही अजून जास्तीची भर पडणार नव्हती. थोडक्यात जे होते ते पुरेसे होते. त्याशिवाय पब्लिक युनिवर्सिटिजमधे अर्ज करताना मेरीट स्कॉलरशिप्ससाठी विचारात घेतले जावे म्हणून अर्ली अ‍ॅप्लिकेशन आवश्यकही होते. आम्ही अर्ली अ‍ॅक्शन हा पर्याय प्रायवेट युनिवर्सिटीसाठी वापरला होता मात्र डिसिजनचा पर्याय रेग्युरलच ठेवला होता. आम्हाला आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करुन निर्णय घेणे परवडणार नव्हते त्यामुळे प्रत्येकाचे स्कॉलरशिप्/मदत पॅकेज काय आहे याचा विचार करायला वेळ हवा होता त्यामुळे बाइंडिंग अर्ली डिसिजन घेतला नाही.

>>माझ्या मुलीला न्युरो सायन्सेस , सायकोलॉजी, सायकेअ‍ॅट्री, बायोटेक, यात इन्टरेस्ट आहे. यात कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगले प्रोग्राम्स आहेत का?
माझ्या ओळखीत कुणी अशा प्रोग्रॅममधे नाही पण जालावर शोधल्यास माहिती मिळेल.
उदा. https://www.usnews.com/education/best-global-universities/united-states/...
https://www.niche.com/colleges/search/best-colleges-with-neuroscience-an...
सोशल मेडीआवर ग्रुप्सही असतात विद्यार्थ्यांचे. ते देखील मार्गदर्शक ठरावेत.

अ‍ॅथलेटिक स्कॉलरशिप मिळाली नाही तरी काही वेळा एका खेळातल्या स्ट्रेंथ दुसर्‍या अ‍ॅक्टिविटीसाठी नंतर उपयोगी पडू शकतात. माझ्या मुलाचा मित्र शाळेच्या स्विमिंगच्या टीमवर होता. अ‍ॅड्मिशन अ‍ॅकेडमिक मेरीटवर झाली मात्र नंतर स्विमरचे खांदे युनिवर्सिटीच्या चिअरलिडिंग स्क्वाडसाठी अ‍ॅसेट ठरले आणि त्यासाठी सिलेक्शन झाले. काहीवेळा तुम्ही तो खेळ हायस्कूल लेवलला खेळत होता, तुम्हाला त्या खेळाबद्दल पॅशन आहे तर टीमसाठी , अ‍ॅथलेटिक डिपार्टमेंटसाठी काम करायची संधी मिळू शकते. मुलाच्या मित्राला बॉडकास्टिंगमधे संधी मिळाली होती. अ‍ॅडमिशन मिळून कँपसवर गेल्यावर बरेचदा 'हे असेही काही करता येते ' हा शोध लागतो. एंट्री लेवलच्या बर्‍याच संधी असतात, प्रयत्न करायचा.

बाकी माहिती दिलेली आहेच.
अर्ली अ‍ॅप्लिकेशन आणि अर्ली डिसीजन केले तर त्या युनि मध्ये प्रवेष मिळण्याचे आणि जास्त स्कॉलरशिप मिळण्याचे चान्स वाढतात हे स्वनुभवावरुन सांगतो. . आपल्या ड्रीम युनि मध्ये अर्ली अ‍ॅप्लिकेशन आणि अर्ली डिसीजन करावे.

अ‍ॅथलेटिक स्कॉलरशिप मिळाली नाही तरी काही वेळा एका खेळातल्या स्ट्रेंथ दुसर्‍या अ‍ॅक्टिविटीसाठी नंतर उपयोगी पडू शकतात. माझ्या मुलाचा मित्र शाळेच्या स्विमिंगच्या टीमवर होता. अ‍ॅड्मिशन अ‍ॅकेडमिक मेरीटवर झाली मात्र नंतर स्विमरचे खांदे युनिवर्सिटीच्या चिअरलिडिंग स्क्वाडसाठी अ‍ॅसेट ठरले आणि त्यासाठी सिलेक्शन झाले. काहीवेळा तुम्ही तो खेळ हायस्कूल लेवलला खेळत होता, तुम्हाला त्या खेळाबद्दल पॅशन आहे तर टीमसाठी , अ‍ॅथलेटिक डिपार्टमेंटसाठी काम करायची संधी मिळू शकते. मुलाच्या मित्राला बॉडकास्टिंगमधे संधी मिळाली होती. अ‍ॅडमिशन मिळून कँपसवर गेल्यावर बरेचदा 'हे असेही काही करता येते ' हा शोध लागतो. एंट्री लेवलच्या बर्‍याच संधी असतात, प्रयत्न करायचा.
>>
ही चांगली सजेशन आहे! सध्या सब्जेक्ट सॅट पुर्ण बंद झाली आहे. युसी (कॅलिफोर्निया) सिस्टीम तर सॅट चा स्कोर आता विचारात घेणार नाही फक्त जनरल स्कोर वरुनच अ‍ॅड्मिशन दिली जाइल असे सांगते आहे.

This year all tests are optionals. Rather, we observed that students with perfect ACT score, National Merit finalist with world class extra curricular could not get into desired schools.

दोन लोकल हॉस्पिटल्स मध्ये अर्ज केला आहे, पण कोरोना मुळे काळजी वाटते.
महत्वाच्या वर्षी काही त्रास नको!
इतर काही आजकाल इन्टर्न्शीप्चे ट्रेंड आहेत का तेही जाणुन घेण्यास उत्सुक आहोत.>> आता करोनाचा प्रभाव कमी होत असल्याने तिला सन्धी मिळू शकेल ,दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या फ्रेन्डसर्कल मधे , तुमचे पेडी , डेन्टिस्ट रेडी असेल तर शॅडो वर्क करता येइल.
जे करणार आहात ते अ‍ॅप्लिकेशनसाठि नाहितर तुम्हाला त्यात खरोखर रस आहे तरच करा , चेकमार्क करत जाण हा उद्देश नको, सोफमोअर सुरु करुन ते सिनियर किवा त्यापुढेही त्यात काम करायची इच्छा त्या अनुशगाने असलेले मेजर सिलेक्शन हे तुमच्या अ‍ॅप्लिकेशन मधे रिफेल्क्ट झाल पाहिजे.
अ‍ॅडमिशन काउन्सिलर घेतलात तर ते कॉलेज लिस्ट सॉर्टिन्ग करण्यापासुन ते इन्टर्नशिप मिळवुन देण्यात सगळ्यात मदत करतात अस एकल आहे.
टेनिस उत्तम खेळत असल्यास चान्गलच आहे पण त्याची शाळा कॉम्पिटिशन मधे भाग घेते का? घेत असल्यास काय रॅन्क आहे, तुमच्या मुलिची टिम स्पोर्ट्स साठि योगदान हे सगळ बघितल जाइल.
समर मिस झाला तरी फॉल मधे इन्टर्नशिप असतात, ज्युनियर इयरला थोडा क्र्न्च असेल पण प्लॅन केले तर तोही समर कॅच करु शकाल.

धन्यवाद प्राजक्ता!
तिने फ्रेशमन मध्ये व्हार्सिटी टीममध्ये भाग घेतला होता. तिचा शाळे च्या कॉम्पिटीशन्स मध्ये चांगला रॅन्क असला तरी यु टी आर काही खास नाही. यु टी आर हा शाळेबाहेर इतर स्पर्धांमध्ये भाग घेउन वाढविला जातो. बरेच जण(वेगास मध्ये तरी) होमस्कुलींग करुन फक्त टेनिस खेळतात (आठवड्यातुन सात दिवस २-३ तास रोज) अशांबरोबर यु टी आर वाढवणे पॉसिबल नाही कारण असे करुन अ‍ॅडमिशन/ स्कॉलरशिप मिळाली तरी पुढे तिला टेनिसम्ध्ये करियर करायची इच्छा नाही. त्यामुळे स्वाती२ चा सल्ला घेउन आम्ही "तुम्हाला त्या खेळाबद्दल पॅशन आहे तर टीमसाठी , अ‍ॅथलेटिक डिपार्टमेंटसाठी काम करायची संधी मिळू शकते. मुलाच्या मित्राला बॉडकास्टिंगमधे संधी मिळाली होती. अ‍ॅडमिशन मिळून कँपसवर गेल्यावर बरेचदा 'हे असेही काही करता येते ' हा शोध लागतो. एंट्री लेवलच्या बर्‍याच संधी असतात," हे ट्राय करु.

दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या फ्रेन्डसर्कल मधे , तुमचे पेडी , डेन्टिस्ट रेडी असेल तर शॅडो वर्क करता येइल. हे आम्ही ट्राय करु.

तिला अजुन एक प्रश्ण पडला आहे. तिने सोफोमोर इयरला एपी बायो आणि केमिस्ट्री घेतले होते. ज्युनियरला ती एपी केमिस्ट्री घेणार आहे.
सिनियरला एपी फिजिक्स करायचा तिचा विचार आहे. तिचे सायन्स साईडला बायो साईडला जायचे जरी बरेचसे नक्की असले
तरी तिचा विचार बदलु ही शकतो. जर काही कारणाने तिला इतर कोणता विषय निवडावासा वाटला ज्यासाठी फिजिक्सचे ज्ञान महत्वाचे आहे.
तर फक्त फिजिक्स ज्युनियर इयरपर्यंत केले नाही म्हणुन काही कॉलेजेस तिला अ‍ॅडमिशन नाकारतील का?

हाच प्रश्ण जास्त वाढवुन विचारु शकतो की एखाद्या युनिव्हरसिटीच्या एखाद्या कोर्स्मध्ये रिक्वायरमेंट्स मध्ये काही सब्जेक्ट्स असतील, तर फक्त ज्युनियर इयरपर्यंत ते सब्जेक्ट्स घेतले नाहित यामुळे अ‍ॅडमिशनचा चान्स कमी होतो का?
का युनिव्हर्सिटीज हे सब्जेक्ट्स सिनियर इयरपर्यंत करणार, अशी कन्डिशनल अ‍ॅडमिशन्स देतात.

माझ्या मुलीला अजुन एक प्रश्ण पडला आहे. तिने सोफोमोर इयरला एपी बायो आणि केमिस्ट्री घेतले होते. ज्युनियरला ती एपी केमिस्ट्री घेणार आहे.
सिनियरला एपी फिजिक्स करायचा तिचा विचार आहे. तिचे सायन्स साईडला बायो साईडला जायचे जरी बरेचसे नक्की असले
तरी तिचा विचार बदलु ही शकतो. जर काही कारणाने तिला इतर कोणता विषय निवडावासा वाटला ज्यासाठी फिजिक्सचे ज्ञान महत्वाचे आहे.
तर फक्त फिजिक्स ज्युनियर इयरपर्यंत केले नाही म्हणुन काही कॉलेजेस तिला अ‍ॅडमिशन नाकारतील का?

हाच प्रश्ण जास्त वाढवुन विचारु शकतो की एखाद्या युनिव्हरसिटीच्या एखाद्या कोर्स्मध्ये रिक्वायरमेंट्स मध्ये काही सब्जेक्ट्स असतील, तर फक्त ज्युनियर इयरपर्यंत ते सब्जेक्ट्स घेतले नाहित यामुळे अ‍ॅडमिशनचा चान्स कमी होतो का?
का युनिव्हर्सिटीज हे सब्जेक्ट्स सिनियर इयरपर्यंत करणार, अशी कन्डिशनल अ‍ॅडमिशन्स देतात.

आम्हाला स्टडी करुन हे कळले आहे की युनिव्हरसिटी हेच सब्जेक्ट्स ह्या क्रमाने घ्या असे सांगत नाही.
पण इन्टर्नल सिलेक्षन प्रोसेसमध्ये एपी बायो, एपी केमिस्ट्री घेतलेल्या विद्यार्थ्यापेक्षा फक्त बायो केमिस्ट्री आणि फिजिक्स (एपी नाही) घेतलेल्या विद्यार्थ्याला जास्त वेटेज मिळेल का ह्यावर काही गायडन्स निश्चित नाही .

काहीजण सांगतात की एपी फिजिक्स १ ज्युनियरमध्ये घ्या म्हणजे सर्व विषय पुर्ण होतिल तर काहीजण सांगतात की ज्युनियरमध्ये कॅल्क्युलस पुर्ण करुन सिनियरला एपी फिजिस सी. (फिजिक्स विथ कॅल्क्युलुस) घ्या. पण सिनियरला घेतला तर अ‍ॅडमिशनला वेटेज कसे मिळणार?

माझ्या मुलाने सिनियरला एपी फ्रेंच, एपी इंग्लीश लिट., एपी कॅल एबी आणि एपी फिजिक्स बी असे केले होते. अ‍ॅडमिशनसाठी यामुळे काहीही निगेटिव परीणाम झाला नाही. अ‍ॅडमिशन साठी अर्ज करताना तुम्ही तुमच्या हायस्कूलची माहिती आणि सिनियर क्लास साठी काय विषय निवडले आहेत ते सांगता. शाळेकडे तुमची फाईल असतेच. अ‍ॅडमिशन ऑफिस ते पडताळून बघते.

Pages