एक चित्रपट एकत्र.......!!

Submitted by रसप on 13 August, 2013 - 04:58

अ‍ॅडमीनची परवानगी कशी घेतात, माहित नव्हतं... जर असा धागा चालत नसेल, तर डिलीट करावा.

माझ्या बाफवर वाफा निघत होत्या म्हणून इथे चर्चा करू.

रियाने सुचवल्याप्रमाणे एक चित्रपट सर्वांनी एकत्र पाहायचा आहे.

तिला बहुतेक 'शाखा'चाच किंवा 'चे.ए.'च म्हणायचं असावं... पण मी 'कुठलाही' चित्रपट म्हणतो.

आता पुढे.............................................

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिण भारतीय कुटुंबांचं सुखद दर्शन झालं,

आणि दिपीकाला पुर्ण कपड्यात पाहिल यातच धन्य

मलाही 'कश्मिर मैं तू कन्याकुमारी' गाण चांगल वाटल

वन टू थ्री फोर मध्ये आयटेम जरा अजून आयटेमदार पाहिजे होती,
(व्ययक्तिक मत) Happy

शाखाच्या सिनेमात 'संगीत' एक अतिशय महत्वाची बाब असते बहुतेक वेळा. बाय दॅट स्टॅण्डर्ड, हे संगीत निव्वळ 'होपलेस' वाटलं मला तर..... अगदी 'जतहैंजा' आणि 'रा-वन' च्या डिजास्ट्रस संगीताशी स्पर्धा करेल इतपत..

"संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे."

मी साउथ इंडीयन मुव्ही बघतो मी डान्सबद्दल नाही म्हणत ( डान्स ओके आहे)
आयटम गर्ल अजून चांगली अपेक्षित होती

रसप
संगीताच म्हणशील तर सध्या हिदी चित्रपटसंगीताची अत्यंत दयनीय अवस्था आहे,
चिकनी चमेली पव्वा उठाके आई, एन ओ डब्लू नाऊ नाऊ , भाग भाग डीके बोस- कशाचा कशाला ताळमेळ नाही, ही गाणी ठराविक वर्गात लोकप्रिय होतात पण ती केवळ आयटेम गर्ल किंवा त्यांच्या डान्समुळे

काल वन्स अपॉन बघितला - नाही आवडला अ‍ॅक्शन ची अपेक्षा होती सगळी साली रडकी लव्ह स्टोरी

conjuring

हिंदीत असेल तर येइन, मला ते विंग्रंजी झेपत नाहीघा, भ्या वाटत Happy

किरण बाजुच्यांना विचारायचे.........काय म्हणाली ही ? Biggrin
.
.
असे ही त्यात डायलॉग कमी बाकीचेच जास्त आहे

किरण बाजुच्यांना विचारायचे.........काय म्हणाली ही ?

त्यांनाच बघून जास्त भिती वाटली तर Rofl

Pages