अचानक रात्रीची झोप न येण्यामागे काय कारण असू शकेल?

Submitted by गुलाम चोर on 8 August, 2013 - 10:08

अचानक रात्रीची झोप न येण्यामागे काय कारण असू शकेल ?

- प्रेमात पडलो नाहीये
- अपचन झाल नाहीये
- टार्गेट्स अर्धवट राहिली नाहीयेत
- दुपारची (झोप) जास्त होत नाहीये

गेले काही दिवस (म्हणजे रात्री) उशिरा पर्यंत फुकटम - फाकट जागं राहावं लागतंय राव! सुनील शेट्टीचे सिनेमे पाहून झाले, xxxxxची पुस्तकं वाचून झाली.. पण पहाटे पर्यंत झोप नाही ती नाही …

काय गंडलं असावं ??

( झोप न येण्यामागची कारणे आणि त्यावरचे उपाय यावरचं मायबोलीकरांच्या प्रतिसादांचं संकलन "झोप येण्यासाठी काय करावे?" या धाग्यावर पाहता येईल. -वेमा)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी,

विरंगुळा मध्ये लिहिण्याचं कारण म्हणजे झोप येत नसल्याने (एकट) जागं राहण सुसह्य व्हावं यासाठी काही तरी विरंगुळाच हवा ना… त्याचे काही रामबाण उपाय इथे मिळतील अस वाटल.

- इयत्ता सहावी ते दहावीची इतिहासाची पुस्तकं वाचून एकदाच कसाबसा सहीसलामत सुटलोय आता पुन्हा नाही. मला झोप हवीये, काळझोप नकोय…
- मालिश चा उपाय पण चांगला वाटतोय पण करून पाहायला (का कोण जाणे?) धीर होत नाहीये.
- सूनबाई / वैनी आणा असा उपाय गुदगुल्या करणारा आहे खरा.. पण "पावशेर दुधासाठी म्हैस पाळणं" म्हणजे जरा अतीच होईल नाही का..

माधवी, तुला/तुम्हाला १० पैकी १० मार्क! (dockच म्हणायचं आहे मला)

काल माबो वर नसलेल्या कोणीतरी सांगितलेला पुढील उपाय सुद्धा बरा वाटतोय, - कप भर गरम दुध घ्याव, त्यात छोटा चमचाभर हळद टाकावी मग त्यात "उगाच एवढीशी" सुंठ टाकून ते दुध प्यावं, नक्की शांत झोप लागेल.. (रिया आज हा उपाय करून पाहूयात का?)

तूर्तास

चैन एक पल नही । और कोई हल नही

अस झालय खरं

. पण "पावशेर दुधासाठी म्हैस पाळणं" म्हणजे जरा अतीच होईल नाही का.. >>>>>>>

तुम्ही सरळ सरळ चक्क "म्हैस" संबोधत आहात ......................... अरे लक्ष द्या इथे............ Biggrin

(वेळेअभावि मी बाकी प्रतिक्रिया वाचू शकलो नाहीये)

>>>>> अचानक रात्रीची झोप न येण्यामागे काय कारण असू शकेल? <<<<
१. वैचारिक किंवा शारिरीक रिकामपण - वैचारिकदृष्ट्या मेंदूस काहीच श्रम/काम पडत नसेल, त्याचा पर्याप्त उपयोग करुन घेतला जात नसेल, अथवा शरिराच्या पर्याप्त कष्टाच्या क्षमतेच्या काही टक्केच वापर होत असेल, तरीही बर्‍याचदा झोप उडू शकते.
२. चिंता किंवा शारिरीक/मानसिक अतिव्यग्रता - वरील बाबीच्या नेमके उलट झाल्यास, सहसा शारिरीक श्रमाने जरी थकुन झोप येत असली, तरीही अपवादात्मक परिस्थितीत अतिश्रमाने (शारिरीक/मानसिक) कित्येकदा झोप उडूही शकते. खास करुन अतिविचाराने शरिरास "बुद्धिमांद्य" आणण्याची गरज पडते. पुरेशा झोपेने ते शक्य होते. मात्र झोपही पुरेशी ठरत नसल्यास शरिर दुसरे उपाय शोधुन काढण्यासाठी "जागे" रहाणे आवश्यक मानते अन झोप उडते. हलकेफुलके वाचन/कृती याद्वारे यावर मात करता येते.
३. आधिदैविक/आधिभौतिक कारणे (यात दूर अंतरावरून तुमची कुणीतरी तीव्रतेने आठवण काढीत असणे, पितरविषयक कर्मे पाळली न जाणे, बाहेरची बाधा, नजर लागणे इत्यादी अनेक बाबी येऊ शकतात)

बाप रे...

limbutimbu ने सुचवलेला सल्ला वाचताना मला आताच गुंगी यायला लागलीये.. काय जडत्व आहे शब्द्योजने मध्ये.. रोज रात्री हमखास झोप येण्यासाठी आता हा सल्लाच वाचावा कि काय ? !

गुलाम चोर, तुम्ही नक्कीच काहितरी विचार करत असणार. ..... त्यामुळेच झोप येत नाही लवकर.....
शरिर थकले की आपोआप झोप येते..... रात्रीचे जेवण झाले की फिरुन येत जा ..........म्हणजे छान झोप येते.

तांब्याच्या भांड्यामध्ये...पाणी भरुन तुळशीच्या खाली ठेवावे व ते सकाळी प्यावे ह्याने पण छान झोप लागते Happy

मला सुद्धा सेम प्रोब्लेम गेले काही दिवस सतावत आहे. खर तर कुंभकर्णाचे वंशज म्हणून माझी ओळख होती पण गेले काही दिवस पार वाट लागली आहे. बाकीचे सगळे झोपले आहेत आणि आपण तेवढे जागे यानेच डिप्रेशन येते. मी रात्री ३ वाजेपर्यंत पुस्तक वाचत बसते. खर तर ऑफिस आणि बाकी गोष्टींमुळे दिवसा झोप कठीण आहे पण तरी रात्री येत नाही म्हणून मी पण हवालदिल झाले आहे.

एक उपाय सांगतो ,झोप का येत नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा एक छान झोप काढा.... झोपून उठल्यानंतर मेंदू तरतरीत होतो, मग तुम्हाला निद्रानाशावर विचार करता येईल.

सुज्ञसमन्जस, तुम्ही जरा उशिरा आलायत इथे पण सुरवातीपासून वाचत आला असाल तर, अश्विनिमामी ने लिहिलेली कारणमीमांसा अगदी छान आहे. त्या पैकी कोणत कारण आहे का ते शोधा आणि सापडलं तर त्यानुसार प्रतिकाराची उपाय-योजना करा. शिवाय 'माशा'ने सुचवलेले उपाय ही सहज करता येण्याजोगे वाटतात.

किंवा शक्यतो सगळे उपाय करून पहा आणि नेमक्या कोणत्या उपायाने नेमका काय फरक पडतोय ते पहा आणि मला पण सांगा

>>>> रोज रात्री हमखास झोप येण्यासाठी आता हा सल्लाच वाचावा कि काय ? !<<<<< Lol
हो तर, केवळ हाच सल्ला नव्हे तर कुठल्याही धाग्यावरील माझी कोणतीही पोस्ट वाचलीत तर झोप येऊ शकते असेच बहुसन्ख्य माबोकर (खासकरुन वाडकरी) तुम्हाला सान्गतील. Proud

इयत्ता सहावी ते दहावीची इतिहासाची पुस्तकं वाचून एकदाच कसाबसा सहीसलामत सुटलोय आता पुन्हा नाही. मला झोप हवीये, काळझोप नकोय… >> Rofl

झोप येत नाही,

ही काय समस्या आहे, इथे झोप येवू नये किंवा लवकर उठावे म्हणून काय काय उपाय करावे लागतात

तरीही ..............
झोप येत नाही तोपर्येंत एका पायावर उभे रहा ( कोणत्या ते तुम्ही ठरवा)
नवरत्न तेल डोक्याला लावा डोळे जळजळ करतील झाकल्याशिवाय पर्याय नसेल
चालत असेल तर एखाद दोन पॅक मारायला काही हरकत नाही,गुंगीतच झोप लागेल
लग्न झाल असेल तर बायकोला महिनाभर गावाला पाठवा (पण जेवणाची व्यवस्था करुन ठेवा)

तरीही झोप लागली नाही तर ,

जागा
Rofl

जागं राहण सुसह्य व्हावं यासाठी काही तरी विरंगुळाच हवा ना… त्याचे काही रामबाण उपाय इथे मिळतील अस वाटल >>
गुलाम चोर, जागं राहण्यासाठी विरंगुळा आणि झोप येण्यासाठी उपाय असे दोन्ही शोधू नका. धड झोपही येणार नाही आणि जागंही राहता येणार नाही Happy

गुलाम चोर, जागं राहण्यासाठी विरंगुळा आणि झोप येण्यासाठी उपाय असे दोन्ही शोधू नका. धड झोपही येणार नाही आणि जागंही राहता येणार नाही>>> +१
गुलामचोर, आधी तुम्हाला नक्की काय हवंय ते ठरवा.. प्रतिसादात हे शोधताय, आणि वर मूळ प्रश्न विचारलाय-झोप न येण्याचे कारण काय असावे... कशाचा कशाशी संबंध नाही.. पुरेशी झोप न झाल्याने असे झालेय का तुमचे? Proud

शाब्बास सानी,

बेमतलब - बेहिसाब जागरणाचा हा परिणाम असावा… भंजाळायला झालय पार

मी पण ३ च्या सुमारास झोपतो...पण मला ऑफीसातून यायलाच १ वाजून जातो...मग आल्यावर जेवतो आणि जेवल्या जेवल्या लगेच झोपू नये म्हणून कॉम्पुटरवर गेम्स खेळत बसतो किंवा पुस्तक वाचतो....
मान्य आहे ही जिवनशैली चुकीची आहे..पण नाईट शिफ्ट बंद होईपर्यंत तरी काय पर्याय नाही...

इथे पोस्ट केल्यावर मला मस्त झोप लागली. आज सुट्टी मग चक्क सहा परें त झोपले. कालच्या मुंबई मिरर मध्ये २४ तासाच्य बॉडी रिधम वर चांगला लेख आहे. वाचा तो.

माझ्या आईलाही रात्रभर झोप येत नाही, जेमतेम १/२ तास झोपते आणि उरलेली रात्र कशी काढते तिलाच माहिती. म्हणून हा माझ्या फारच जिव्हाळ्याचा विषय आहे Happy माझ्या माहितीतल्या काही लोकांची अशीच तक्रार अहे.जगात ५०% हून जास्त माणसाना झोप येत नाही अस मैत्रीण सांगत होती, तिच्या आईची हीच तक्रार अहे.

गुलाम चोर, आईला झोप लागावी म्हणून काहीजणांनी सांगितलेले उपाय सुचवते आहे, बघा उपयोग झाला तर.

तुमची झोपेची वेळ टाळू नका. म्हणजे समजा रात्री १० वाजता झोप आल्यासारखं वाटत असेल तर तेव्हाच झोपा, इतक्या लवकर नको म्हणून काहीतरी TP करू नका ,

झोपण्यापूर्वी अर्धा तास cycling करा, १००% झोप येईल, असा उपाय dr. संचेती यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.

तुमची झोपेची जागा आणि दिशा यात काही बदल झालाय का तेही बघा, सध्या आम्ही अमेरिकेत UTAH मध्ये रहतो. इथे राहायला आल्यावर पहिले काही दिवस आम्हला अजिबात झोप लागायची नाही, काही स्वप्न पडायची, आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांची देखील अशीच तक्रार असयची, आम्ही इथे असणारी काही ठिकाणे बघायला गेलो होतो, त्या हॉटेल मध्ये हि आम्हाला कोणालाही झोप लागली नहि. त्यानंतर कळल कि हि सगळी valley आहे, चारी बाजूला डोंगर , अत्यंत कोरड हवामान , त्यामुळे हे सगळे त्रास सुरवातीला होतात.

नेट वर शांत झोप यावी म्हणू काही musical pieces आहेत, आईकून बघा

श्रीकृष्णाचा फोटो ठेवून बघा उशाशी, ( माझी आजी सांगायची आम्ह्ला लहानपणी, अंधश्रद्धा असेल कदाचित, पण समजा झोप आली तर काय वाईट आहे?)

आली का? लागली का? Happy
आजच याहुवर एक लेख आहे त्यात २ उपाय आहेत ते कापी करत आहे. करुन पहा. सोपं वाटतय.

१. Fall Asleep with Cherries - Cherries and cherry juice are concentrated sources of melatonin, a popular over-the-counter sleep aid.

२. हा जास्त आवडला. "Kur" Your Fatigue - If you wake unusually early, dampen a towel with cool water and lightly wipe your arms, legs, and torso, then go back to bed. The body is very warm when it comes out of REM sleep. Back in bed, the body heats up even more. The result is a deep, restful sleep and more dreams. Called kur, this technique is standard at European spas.

बाकी वजन पण कमी होत असेल तर थायरॉईड चेक करा.

<<<लग्न झाले नसेल तर त्वरीत करा
मन एकाग्र करा ! >>>
काहीतरीच काय सांगताय कुळकर्णी , दोन्ही गोष्टी एकदम कशा जमतील ? Wink Proud

श्री, अहो एकाग्र मनाने त्वरित लग्न असं म्हणायचं असणार Proud

बादवे,

अचानक रात्रीची झोप न येण्यामागे कारण म्हणजे ति प्लान करून येत असणार अचानक कशी येणार Wink

मंडळी,

शान्त झोप येण्यासाठी
डोक्याला तेल मालिश हा नक्की मस्त उपाय आहे. त्यशिवाय,

कप भर गरम दुध, त्यात छोटा चमचाभर हळद आणि अगदी किन्चीत सुंठ टाकून ते दूध प्यायल्यचा पण फायदा आहे.

परवा पासून हे दोन्ही उपाय करतोय आणि त्यामुळे फरक जाणवतोय

मनापासुन आभार !

चला मंडळी

गुलाम चोर यांना आता शांत पणे झोप लागली आहे

धाग्याला सारखे सारखे वाजवुन त्यांची झोपमोड करु नका

झोपलात हा हो गुलामचोर ? हा हा हा ...
रोज थोडं दान करा, म्हणजे शांत झोप लागेल. बघा करुन तुम्हाला नाही लागली तरी ज्यांना मिळालं त्यांनातरी लागेलच.

एक मोठा बाऊल दही खावे ( झोपण्या आधी ) . हे जो पर्यंत हा प्रश्न संपत नाही तो पर्यंत चालु ठेवावे.

तीन दिवसात फरक न जाणवल्यास.

पहिल्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ १ चमचा तुप ( साजुक -गायीच्या दुधाचे )
दुसर्‍या दिवशी २-२-२

तिसर्‍या दिवशी ३-३-३ पर्यंत न्यावे.

तिसर्‍या दिवशी रात्री जेवण झाल्या नंतर २ तासांनी गरम पाण्याबरोबर १-२ चमचे त्रिफळा चुर्ण घ्यावे. याने जुलाबाद्वारे शरीरातील पित्त शोधन होऊन बाहेर पडेल.

शरीरातील पित्त कमी झाले की झोप येऊ लागेल.

त्रिफळा चुर्ण ताजे ( सातार्‍याच्या ग्रीन फार्मसीचे घ्यावे ) गुठळ्या झालेले. तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस पॅकिंग उघडुन झालेले फारसे प्रभावी रहात नाही.

कप भर गरम दुध, त्यात छोटा चमचाभर हळद आणि अगदी किन्चीत सुंठ टाकून ते दूध प्यायल्यचा पण फायदा आहे. >> अहो त्याने सर्दी दूर होते

काहीतरीच काय सांगताय कुळकर्णी , दोन्ही गोष्टी एकदम कशा जमतील ? >> एकाग्र यासाठी की त्यांचे लग्न न झाल्याने जाणते आजाणतेपनी जे विचार येतात ते टाळण्यासाठी, आणि त्यावर उपाय लग्न Lol

पहिल्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ १ चमचा तुप ( साजुक -गायीच्या दुधाचे )
दुसर्‍या दिवशी २-२-२

तिसर्‍या दिवशी ३-३-३ पर्यंत न्यावे.

त्यांच्याकडे एकच चमचा असेल तर Rofl

त्यांच्याकडे एकच चमचा असेल तर >> अरे काय हे किकु.. ते रोज त्यांना असे चमचे वाढवायला सांगतायेत. म्हणजे दिवस - चमचे मोजण्यात वेळ जाईल आणि कंटाळुन झोप लागेल Wink

ऑन सिरीयस नोट : सर्पगंधा म्हणून एका वनस्पती मुळाची पावडर मिळते, ती एक ते दोन चमचे घ्या, ( आधी बाकी इलाज काम करत नसतील तर )

"मायबोलीवरचे धम्माल धागे" या धाग्यासारखा "मायबोलीवरील रटाळ धागे" असा धागा काढून त्यात रटाळ, कंटाळवाण्या चर्चांच्या धाग्यांची यादीच करायला हवी.
जेव्हा झोप नाही येत, तेव्हा वाचत बसा.

तसं झालं तर कल्याण >>>>> तसं होत नाही पण आधीच सांगुन ठेवतोय, पाण्यासोबत घ्या म्हंटलं तरी ही पावडर पाण्यात मिक्स होत नाही, चमचाभर पावडर संपवण्याऐवजी झोप आणलेली पत्करली असं शरीराला वाटेल कदाचित Happy पण हे सहन करून घेऊ शकत असलीस तर काही हरकत नाही त्यानंही झोप लागेल,
अवांतर : तु फार लवकर बाह्य उपचारांकडे वळतेयस असं नाही वाटतं ?

Jhop yete ki yet nahi????

mattress badlun bagha buwa

konti fav blanky nai ka?

ग्लोरीया टेक अ चिल पिल.
आता हे जुने पुराणे सल्ले मागणारे धागे काढुन त्यावर उपाय सांगुन काय उपेग आहे?
का धागाकर्ता तुमच्या सल्ल्याची वाट बघत आहे असं तुम्हाला वाटतंय.
तुम्ही अशा प्रकारचा वर काढलेला आणि सल्ला दिलेला हा दुसरा धागा पाहिला म्हणुन लिहिलं.
बाकी ही दिसताहेत तेही तुम्हीच वर काढलेत अशी खात्री आहे.

नावात चोर असल्याने त्याच सवयी शरिरात उतरल्यात म्हणुन रात्री झोप येत नसेल Lol
कोणाचे तरी पाय चेपा रोज रात्री, झट्कन झोप येइल, कारण अशी कंटाळवाणी कामं करायची वेळ येते की नेमकी झोप येते

कारण काही असू शकते , पण उपाय आहे अगदी सोपा, रोज एक पटियाला पॅक चिल्ड पाण्यात, (सोडा कोल्ड्रिंक वगैरे नको, ) जेवणाच्या अर्धा तास आधी, आणि एक म्हणजे एकच नाही तर व्यसन लागेल..... जर दारू चालत नसेल तर वाईन घ्या...

Pages