अचानक रात्रीची झोप न येण्यामागे काय कारण असू शकेल?

Submitted by गुलाम चोर on 8 August, 2013 - 10:08

अचानक रात्रीची झोप न येण्यामागे काय कारण असू शकेल ?

- प्रेमात पडलो नाहीये
- अपचन झाल नाहीये
- टार्गेट्स अर्धवट राहिली नाहीयेत
- दुपारची (झोप) जास्त होत नाहीये

गेले काही दिवस (म्हणजे रात्री) उशिरा पर्यंत फुकटम - फाकट जागं राहावं लागतंय राव! सुनील शेट्टीचे सिनेमे पाहून झाले, xxxxxची पुस्तकं वाचून झाली.. पण पहाटे पर्यंत झोप नाही ती नाही …

काय गंडलं असावं ??

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरिराला दिवसभरात कष्ट कमी पडतात का? थकलेल्या शरिराला चट्दिशी झोप लागते.

पण काही डोकेदुखी असेल आणि गहन विचारात गुरफटले असाल तर कठिण आहे.

उद्यन>>>> Proud

गुलाम चोर,

१) तुम्ही दुपारी झोपु नका.......दिवसात थोड काम करा....थकल्यावर झोप येते.
२) फेकबुकचा वापर कमी करा.
३) जेवण योग्य प्रमाणात करा.

(वरील उपाय पचनी नाही पडले , तर हा प्रश्न डॉक्टरांना विचारा.)

माझ्या साठी अतिउपयूक्त धागा Happy
मला तर खुप झोप येते पण लागत नाही Sad
दहा साडे दहाच्या सुमारास थकवा आणि गुंगी जाणवायला लागते पण ३ पर्यंत झोप काही लागत नाही Sad

रिया
आपण बहुदा एकाच नावेचे प्रवासी आहोत... ३ पर्यंत काय टी. पी. करतेस ते तरी सांग …. झोप नाही आली तर वेळ कसा घालवायचा हे कोडं तरी सुटेल

रात्र काळी घागर काळी अशी गाणी ऐका.:फिदी:

१) नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात करा.

२) एकता कपूरच्या सिरीयल बघा.

३) सध्या झी आणी ई मराठीवर चालू असलेल्या सर्व सिरीयल्स रात्री १० वाजता बघायला सुरुवात करा.

४) कुठच्याही प्रकारचे विनोदी वाचन करु नका, जेणे अंगात उत्साह संचारेल. विनोदी सिरीयल पण बघु नका.

५) प्रवचनाला जा.

अगदीच हे नाहीच जमले तर लग्न करा, झोप कायमची उडेल्.:खोखो:

मी पुर्वी माबो वाचत बसायचे .... त्याने झोप जायची
मग वॉट्सअप वर टीपी करायला लागले त्याने अजुनच झोप जायला लागली
मग आजकाल दिवसभरात काय काय झालं ते आठवते.... मनातल्या मनात अनेक गोष्टी/कथा तयार करते (फील गूड टाईप्स गोष्टी) ज्यात माझ्यासोबत सगळं चांगलं घडतय वगैरे...फॉर ईजी, मी इंडियन आयडल मध्ये सिलेक्ट झालेय Proud मग मी एखादं भारी रोमँटीक साँग म्हणलं मग जज मध्ये शाहरूख होता... त्याने मला अ‍ॅप्रिशिएट केलं वगैरे वगैरे Proud

गाणी ऐकत ऐकत हे सगळं करते Happy

कधी कधी मायबोलीच टायटल साँग लागलं की अशे गोष्ट रचते की मी तिथे हे गाणं गातेय स्टेजवर आणि मग तिथे आणखी एक दोन माबोकर आहेत जे माझ्या सूरात सूर मिसळायला स्टेजवर आले वैगेरे Proud

कधी कधी मनातल्या मनात एक दोन कविता रचून टाकते.

त्यानंतरही झोपल्यावर खुप सारी स्वप्न पडतात आणि झोप अपुरीच रहाते Sad
असो! आणखी करणार तरी काय Sad

बाय द वे कुठली पुस्तक वाचता तुम्ही झोप यायला? Uhoh

गेले काही दिवस म्हणजे आधी हे होत नव्हतं ना? मग अचानक कुठलं टेन्शन निर्माण झालंय का? उघड उत्तर नसेल तर काहीतरी सुप्त अस्वस्थता नक्कीच असू शकते. ती काय आहे? याचा विचार करा. नेमकं काय बिनसलंय, ते सापडलं की त्यावर मार्ग सापडेल आणि मग आपसुकच झोप लागेल.. पण तोवर हे उपाय करुन बघा.
१. रात्री झोपण्याआधी आंघोळ करणे जमत असेल, तर बघा.. आंघोळीनंतर मस्त झोप लागते.
२. संध्याकाळी जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग चांगले तासभर करुन या. थकव्याने अशी काही गाढ झोप लागेल, की बस्स! स्वानुभवाचे बोल..
३. कथा/ कादंबर्‍यांचे वाचन आवडत असेल, तर माबोवर भरपूर आहेत. वाचत वाचत डोळे थकून कधी झोप लागेल, कळणारही नाही.
४. रात्रीचे जेवण लवकर करा. लवकर जेवले की लवकर झोप येते, हा अनुभव आहे.

रिये, अतीच विचार करतेस गं... Happy मी वर लिहिलेले उपाय तू पण करुन बघ बरं.. इतके उशीरापर्यंत जागणे तब्येतीसाठी योग्य नाही.

सानी या पैकी रात्री अंघोळ करूनच मी झोपते, संध्याकाळी काहीही करणं शक्य नाही कारण मी हापिसातून घरीच ऑलमोस्ट ९.४५ला वगैरे पोहचते ( सकाळीही व्यायाम शक्य नाही कारण मी सकाळी ८ ला निघते ऑफिसला) ऑफिसात एक तास जीम तेवढच काय तो व्यायाम. कथा कादंबर्‍या न वाचणंच माझ्यासाठी चांगलं कारण मी एखादी गोष्ट वाचायला घेतली की पुर्ण झाल्याशिवाय ठेवत नाही. म्हणजे अजुन खोळंबा!
राहिलं लवकर जेवण करण तर ते मला शक्य नाही कारण वरचच Sad

मूळ लेखाच्या शेवटी विचारलेला प्रश्नः

काय गंडलं असावं<<<

ओरिजिनल आयडीचे यूझरनेम आणि पासवर्ड लक्षात राहिले नसावेत.

रिया, एवढी थकतेस.. तरीही झोप लागत नाही म्हणजे कमाल आहे! युट्युबवर "music for deep sleep" चे भरपूर व्हिडिओज आहेत.. गाण्यांपेक्षा ते ऐक. अधूनमधून झोप येत नसतांना मी हे करुन पाहिलेलं आहे. एकदम शांत झोप लागते, कुठल्याही विचारांशिवाय. एक व्हिडिओ पूर्ण व्हायच्या आतच झोप लागते की नाही बघ! लॅपटॉप/ आयपॅड/ फोन बॅटरी संपल्यावर बंद होईलच. Proud

रिया, तुझ्यासाठी आता स्थळे बघणार आहे मी. तू उगाच मधेमधे एखाद्या पोक्त स्त्रीसारखी झोपेच्या अडचणी वगैरे काय सांगतीयस? अगं हे होतंच या वयात.

वैनी गावाला गेल्यात का?<<<

अजून वैनी यायच्या आहेत, भावी आहेत त्या<<<

रश्मी, इब्लिसांचे फारसे सांगता येत नाही, ते कदाचित गुलाम चोरांना गुलाम चोरांच्याच वैनींबद्दल विचारत असतीलही

'विरंगुळा' मधे ओपन केलयं!<<<

म्हणजे नक्की अ‍ॅडमीनच्या विपूत क्लोज होणार

गुलाम चोर ,
झोप येण्यासाठी हेही उपाय करून पहा -

१) कोमट दूध (शक्य असेल तर जायफळ पावडर घालून) झोपण्यापूर्वी प्या.
२) तळपायांना तिळाचे किंवा एरंडेल तेल (हसू नका , खरंच गुण येतो !) थोडा वेळ चोळा.
३) भुवईच्या खाली पापण्यांच्या वर एरंडेल तेल लावून थोडा वेळ हलक्या हाताने मालिश करा.
४) डोक्याला तेल मालिश करा.
५) जप करून बघा.
६) झोपण्यापुर्वी टी व्ही बघणे टाळा.

१,२,३,४ या उपायांनी माझी लहान मुलगी लौकर झोपायला लागली.

माशा करेक्ट. मस्त उपाय.:स्मित: काशाची वाटी मिळते, तळपायाला तेल लावुन त्या वाटिने घासायचे. अंगातली उष्णता कमी होते. दिवसभरच्या कामामुळे शरीर व मेंदू थकतो, तेव्हा शांत झोपेकरता हे जरुर करावे. टिव्ही दूर ठेवुन जागरणे टाळा. शरीर व मन शांत करणारी सौम्य रागातील ( शास्त्रोक्त संगीत) गाणी ऐका.

मी पुर्वी माबो वाचत बसायचे .... त्याने झोप जायची>>>> हे महत्वाचे कारण आहे.माझ्याबाबतीतही नेट्वर बसण्याचे हेच परिणाम आहेत.

अजून वैनी यायच्या आहेत. भावी आहेत त्या. >>> रश्मी तुम्हाला कसं माहीत ? Proud
रिया ह्या वयात एवढं जागरण चांगलं नाही.

रात्री उशिरा पर्यंत झोप आली नाही ना कि 'डॉक' गाठावं असं अनेकदा वाटतं <<< इतक्या रात्री कोणता डॉक जागा असेल? Happy

Lack of sleep could be because of the following:

1) excess coffee and alcohol, smoking.
2) not getting tired.
3) internet addiction forever online.
4) loneliness
5) depression, recovering from grief, worries and anxiety about future
6) Terrible bedroom, lumpy mattress, no proper sheets and pillows, unclean sleeping place
7) If your roof hosts a mobile tower, the waves interfere with our waves and cause disturbances. ( there is evidence on the net which you can google)
8) If one lives as natural a life as possible, sleep is easier.
9) bad lighting and watching meaning less tv or reading upsetting books etc.
10) legal or other hassles, stress.
11) genuine health issues heart disease/ high bp other unknown stuff. talk to a doctor.

if you can renew your spiritual connection it will help. If you believe in such things,
like a good sincere prayer, reading few verses of religious books, achieving inner peace and
accepting your karma in life.

good night. sleep well. take care

.

जर कोणत्याही digital device (computer, laptop, mobile, tablet) चा वापर खूप असेल तर end of the day डोळे खूप शिणतात आणि झोप लागत नाही. यासाठी computer वर F-lux download करून घ्यावे. फार छान freeware आहे जे computer screen चा brightness आणि color intensity दिवसाच्या प्रहराप्रमाणे नियंत्रित करतं. Android devices साठी F-lux च्या धर्तीवर Twilight नावाचे app आहे. मी दोन्ही काही महिने वापरते आहे आणि मला खूप फरक जाणवतो.

रश्मी, इब्लिसांचे फारसे सांगता येत नाही, ते कदाचित गुलाम चोरांना गुलाम चोरांच्याच वैनींबद्दल विचारत असतीलही
<<
हेऽ धर्ला इब्लिस की धोपट! 113.gif वयोगट म्हैती न्हव्ता हो!
अन बेफींचा ओपन अन क्लोज चा पण अभ्यास दिसतो Wink

ओ गुलाम चोर,
तुम्हाला थोपटून थोपटून (पाऽर) "झोपवतील" , अशा आमच्या सूनबाई आणा बघू लवकर! त्या येत नाहीयेत हाच झोप न लागण्यापाठीचा बेसिक प्रॉब्लेम दिसतोय मला. नसेल तर तीर्थरूपांचा नंबर व्यनी करा, मी बोलतो त्यांच्याशी स्थळांबद्दल.

रच्याकने(BTW) तुमचे अजून 'झाले' / 'वाजले' इ.नाही, म्हणजे आमच्या दृष्टीने तुम्ही, 'चिरंजीव' वयोगटात येता Wink

(समय आया बाका, इसलिये काका) इब्लिस.

रिया .. तुला झोपेचा प्रॉब्लेम आहे हे कोणाला कळणार नाही तुझी स्वप्न वाचुन.. कमी वेळात लैच फिरुन येते की!
एनीवेज.. डोकं नि पायाला तेल मालीश हा मस्त उपाय आहे!

झोपण्यागोदर थंड पाण्याने हात पाय धुवावेत, लवकर झोप लागते.
resting heart rate कमी करणार्या औषधांचा मला उपयोग होतो.

मलिश याक Sad
मला तेल्कट होईला नाही आवडत Sad

भूषणदादा,नको शोधूस अरे Proud

श्री Sad
मी मुद्दाम नाही जागत अपोआप झोप लागत नाही Sad

चनस, ती ४-५ तास भरपूर झाले की स्वप्न पडायला Proud
त्यामुळे तर अजुनच झोपेच खोबरं होतं पण आता काय Sad

जिज्ञासा, असं अशू शकतं.... मी करून पहाते हे ही आता

चोर (आयडी) असुन रात्री झोपायचं म्हणता, कसं होईल धंदापाण्याचं. Happy

सानींनी अगदी बरोबर लिहिलय. शक्य असेल तर टबमध्ये पडुन रहा. काही दिवस करावं लागेल, नंतर लौकर झोपायची सवय लागेल. टब नसेल तर आंधोळ करुन कोमट पाण्यात मीठ टाकुन पाय बुडवुन ठेवा. यानेही झोप चांगली लागेल. झोपण्यापुर्वी कोमट दुध + साखर घेणे उत्तम.

इतकं (वरचे सगळे उपाय) करुन काहीही फरक नसेल तर रक्त तपासुन घ्या, कदाचित साखरेची पातळी कमी/जास्त असु शकते.

आणि रिया "दादा" म्हणणे सोडा, ती मंडळी तुम्हाला झोप येवू नये म्हणुन प्रार्थना करतील Light 1 Lol

आणि हे सगळं करुनही (अगदी डॉक्टर) नाहीच जमलं, तर माबो सोडा Happy

रिया आणि गुलाम चोर... माबोअवर एक धागा कढा - 'निद्रादेवी चा उंबरठा' .. रोज या धाग्यावर या, दिवाबत्ती करा, प्रसाद दाखवा...आरती करा...प्रवचन करा.... एक ना एक दिवस निद्रादेवी तुमच्यावर प्रसन्न होइल Happy

ऑन अ सिरीयस नोट - झोप न येणे हे मन आणि मेंदू शांत नसल्याने असेल. काहितरी सुप्त कारण असेल ज्याने तुम्हाला मनात्/डोक्यात कुठतरी काळजी असेल...

आणि झोप न येणे हे सायकॉलॉजिकल पण आहे... 'मला झोपच लागत नाही... काहिही करा' असा विचार सारखा केलात तर मेंदुला चुकीचे संदेश जातात.... त्यापेक्षा 'मी आता झोपणार आहे आणि मला शांत झोप लागणार आहे' असे म्हणा... काहि दिवसात सगळं सुरळीत होइल.

वर सगळ्यांनी सांगितलेले, तुम्हाला जमतिल, रुचतिल, पटतिल ते उपाय करुन बघायला हरकत नाही.

शरिराला/मेंदुला नीट आराम नाही मिळाला तर पुढे अनेक रोगांना आमंत्रण... सो काळजी घ्या.

ऑल द बेस्ट!

आणि तरीही नाहिच झोप आली तर नाईट ड्युटी सुरु करा....

अचानक रात्री झोप फार येते...........काय कारण असु शकेल ????

- प्रेमात पडलो
- जेवन व्यवस्थित आहे
- टारगट पणा करत नाही
- दुपारी झोपत नाही

गेले काही दिवस (म्हणजे सकाळी अगदी उशिरा पर्यन्त फुकटम - फाकट झोपाव लागतंय राव! सुनील शेट्टीचे सिनेमे पाहून झाले, ____ ची पुस्तकं वाचून झाली.. पण पहाटे झोप मोड होत नाही …

काय गंडलं असावं ??

Pages