मी अता तुला हे निर्वाणीचे सांगणार आहे!

Submitted by मुग्धमानसी on 8 August, 2013 - 07:36

मी अता तुला हे निर्वाणीचे सांगणार आहे!
नकोस लागू नादी माझ्या बजवणार आहे!

असोत ते जे तुला मस्तकी धरून करती पूजा
मी मात्र तुला नेहमी उशाशी ठेवणार आहे!

पटूदे अथवा न पटो तुजला माझे हे जगणे
हाच श्वास बघ तुझ्या गळीही उतरणार आहे!

तू काटे दे वा उन्ह, वादळे, चटके दे मजला
तरी शेवटी मीच तुला बघ दमवणार आहे!

तुझे नियम पाळूनही जेंव्हा मी ठरते खोटी
त्या नियमांवर तुला लादूनी पळवणार आहे!

धाव धाव रे आयुष्या जा माझ्यापासून दूर
अखेर तुला मी त्या वळणावर गाठणार आहे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला दुसरी आणि शेवटची द्विपदी फार आवडली! दुसरी तर अप्रतिम!!

असोत ते जे तुला मस्तकी धरून करती पूजा
मी मात्र तुला नेहमी उशाशी ठेवणार आहे!

क्या बात है!!

तुझे नियम पाळूनही जेंव्हा मी ठरते खोटी
त्या नियमांवर तुला लादूनी पळवणार आहे!<<< सुंदर

असोत ते जे तुला मस्तकी धरून करती पूजा
मी मात्र तुला नेहमी उशाशी ठेवणार आहे!<<<

पुलस्तिंच्या प्रतिसादानंतर विचार केल्यावर गंमत लक्षात आली, आधी घाईघाईत वाचून पुढे निघालो होतो.

धन्यवाद.

sundar !