Submitted by मुग्धमानसी on 8 August, 2013 - 07:36
मी अता तुला हे निर्वाणीचे सांगणार आहे!
नकोस लागू नादी माझ्या बजवणार आहे!
असोत ते जे तुला मस्तकी धरून करती पूजा
मी मात्र तुला नेहमी उशाशी ठेवणार आहे!
पटूदे अथवा न पटो तुजला माझे हे जगणे
हाच श्वास बघ तुझ्या गळीही उतरणार आहे!
तू काटे दे वा उन्ह, वादळे, चटके दे मजला
तरी शेवटी मीच तुला बघ दमवणार आहे!
तुझे नियम पाळूनही जेंव्हा मी ठरते खोटी
त्या नियमांवर तुला लादूनी पळवणार आहे!
धाव धाव रे आयुष्या जा माझ्यापासून दूर
अखेर तुला मी त्या वळणावर गाठणार आहे!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खल्लास!!!
खल्लास!!!
आहाहा! तिसरा शेर / कडवं तर
आहाहा!
तिसरा शेर / कडवं तर ऑसमेस्ट !
मला दुसरी आणि शेवटची द्विपदी
मला दुसरी आणि शेवटची द्विपदी फार आवडली! दुसरी तर अप्रतिम!!
असोत ते जे तुला मस्तकी धरून करती पूजा
मी मात्र तुला नेहमी उशाशी ठेवणार आहे!
क्या बात है!!
दुसरी हटके आहे अनेक ओळी खूप
दुसरी हटके आहे
अनेक ओळी खूप छान
अप्रतिम!
अप्रतिम!
तुझे नियम पाळूनही जेंव्हा मी
तुझे नियम पाळूनही जेंव्हा मी ठरते खोटी
त्या नियमांवर तुला लादूनी पळवणार आहे!<<< सुंदर
असोत ते जे तुला मस्तकी धरून करती पूजा
मी मात्र तुला नेहमी उशाशी ठेवणार आहे!<<<
पुलस्तिंच्या प्रतिसादानंतर विचार केल्यावर गंमत लक्षात आली, आधी घाईघाईत वाचून पुढे निघालो होतो.
धन्यवाद.
धन्यवाद!
धन्यवाद!
ठेवणार आणि पळवणार या द्वीपदी
ठेवणार आणि पळवणार या द्वीपदी सर्वात विशेष वाटल्या.
सूंदरच आहे
सूंदरच आहे
sundar !
sundar !
धन्यवाद!
धन्यवाद!
छानच आहे कविता. (मी कधीचा मी
छानच आहे कविता.
(मी कधीचा मी 'अता तुला हे बिर्याणीचे सांगणार आहे!' असे वाचतो आहे )
अप्रतिम!
अप्रतिम!
मस्त! मजा आली. गम्मत म्हणजे,
मस्त! मजा आली.
गम्मत म्हणजे, मला हे सगळे खडुस हेड्क्लार्कपाशी रजा मगितल्यासारखे वाटत होते.